Pages

Showing posts with label शिक्षण. Show all posts
Showing posts with label शिक्षण. Show all posts

Wednesday, June 1, 2016

तंत्रस्नेही शिक्षण, ब्राझील

🔵जगभरातील  तन्त्रस्नेही शिक्षण पद्धतीचा आढावा घेणारा  लेख आजच्या महाराष्ट्र टाइम्स मधे🔵



 तंत्रस्नेही शिक्षणाचा ‘ब्राझिलियन’
प्रयोग….@ रणजितसिंह डिसले




ब्राझील म्हटले
कि लगेच फुटबॉल आठवतो.पेले,रोनाल्डो सारखे
आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणजे या देशाने जगाला
दिलेली देणगीच.पण आज ब्राझील ची एक वेगळी
ओळख जगासमोर आली आहे.एप्रिल २०१६ मध्ये या
देशाने माध्यमिक स्तरावरील सर्वच बालकांना
गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे उद्दिष्ट गाठणारा
जगातील पहिला देश हा बहुमान मिळवला
आहे.संयुक्त राष्ट्र संघाने नुकत्याच प्रकशित केलेल्या
अहवालात या प्रयोगाची विशेष दखल घेतली गेली
आहे. याच प्रयोगाची ओळख करून देणारा हा लेख.
सेंट लुईस हा
अमेझॉन च्या खोऱ्यात वसलेल्या खेड्यात राहणारा
मुलगा.गावात एकूण २० कुटुंबे अन लोकसंख्या ७६.लुईस
अन त्याचा मित्र फर्नांडीस हे दोघे यावर्षी ११
वी मध्ये शिकत आहे.त्यांच्या गावातील हे दोघेच
उच्च शिक्षित युवक.10 वर्षापूर्वी ची
परिस्थिती मात्र वेगळी होती.माध्यमिक शिक्षण
घ्यायचे असेल तर लुईस समोर दोनच पर्याय
होते.एक म्हणजे १०० मैल दूर असणाऱ्या शहरात जाणे
—जिथे पोहचायला तब्बल २ आठवडे लागतात,किंवा
मग शिक्षण सोडून देणे.माध्यमिक स्तरावर होणारी
गळती हा ब्राझील च्या सरकार समोरचा चिंतेचा
प्रश्न होता.ही गळती रोखण्यासाठी सरकारने
अंमलात आणलेला कृती आराखडा म्हणजेच ‘तंत्रस्नेही
शिक्षणाचा ब्राझिलियन प्रयोग’.
सन २००९
साली आपला भारत देश १४ वर्षाखालील मुलांना
मोफत व सक्तीचे शिक्षण देणारा कायदा केला
म्हणून आनंदोत्सव साजरा करत होता , त्याच वर्षी
ब्राझील ने माध्यमिक स्तरावरील मुलांना
गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारा कायदा केला अन
याची उदिष्टे गाठण्याची कालमर्यादा सन २०१६
अशी ठरवण्यात आली.ब्राझील च्या कायद्यात
गुणवत्तापूर्ण शिक्षण हा मुलभूत घटक मनाला
गेला.तसेच निश्चित कालमर्यादेत हे उदिष्ट साध्य
करावयाचे असल्याने विचार व कृती यांमध्ये
एकवाक्यता साधली गेली. अमेझॉन च्या खोऱ्यात
वसलेल्या २३०० खेड्यातील तब्बल ३,००,०००
मुलांना पुन्हा शिक्षण प्रवाहात आणण्यात ब्राझील
ला यश आले आहे.माध्यमिक स्तरावर होणाऱ्या
गळती मागील महत्वाचे कारण होते – माध्यमिक
स्तरावरील शिक्षणासाठी करावा लागणारा
शेकडो मैलांचा प्रवास.यावर उपाय म्हणून ही मुले
ज्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होती त्याच
शाळेत माध्यमिक शिक्षणासाठी थेट प्रक्षेपण केंद्रे
उभारण्यात आली.सरकारी मालकीची
दूरचित्रवाहिनी ,उपग्रह सेवा पुरवठादार व
स्थानिक केबल चालक यांच्या मदतीने पहिल्या
टप्प्यात तब्बल २३०० खेड्यामधील शाळेत ही
सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.केवळ पायाभूत
सुविधा उपलब्ध करून देण्यावर हा देश थांबला
नाही तर थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून शिक्षण
देण्याच्या यापूर्वीच्या अयशस्वी प्रयोगांवर मात
कारणासाठी विशिष्ट कार्ययोजना आखली
गेली.ब्राझील मधील विख्यात
शिक्षणतज्ञ,बालमानसशास्त्रज्ञ व शिक्षण शास्त्र
अभ्यासक यांच्या मदतीने असे शिक्षण घेणाऱ्या
मुलांसाठी वेगळा अभ्यासक्रम तयार केला गेला.या
मुलांची भौगोलिक
परिस्थिती,परंपरा,बोलीभाषा,पालकांचे व्यवसाय
यांच्या अभ्यासातून व्यवसायाभिमुख कौशल्ये
विकसित करत शिक्षणातून अर्थार्जन हे उदिष्ट
साध्य करणारा अभ्यासकम आखला गेला.
कौशल्याधीष्ठीत अभ्यासक्रमाच्या आखणी नंतर थेट
प्रक्षेपणाच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी
ब्राझील मधील सर्वोत्कृष्ट ५० शिक्षकांची निवड
केली गेली. अमेझॉन ची राजधानी मानौस मधील
केंद्रातून हे शिक्षक रोज ४ तास अध्यापन करत
राहिले. हे थेट प्रक्षेपण ज्या शाळेत दाखवले जात
होते त्या शाळेतील शिक्षकांना वर्ग व्यवस्थापन
(Classroom-Management ) व
मूल्यमापनाचे ( Evaluation) चे विशेष
प्रशिक्षण देण्यात आले.थेट प्रक्षेपण वर्ग रटाळ न
होता अधिक परिणामकारक होण्यासाठी
द्विमार्गी संवादाची सुविधा देखील पुरवण्यात
आली.यामुळे कोणताही विद्यार्थी त्याला आलेली
अडचण तज्ञ मार्गदर्शकाना विचारू शकत
होता.त्यामुळेच हे अध्यापन अधिक प्रभावी
ठरले.पारंपारिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या
मुल्यमापनाला फाटा देत कौशल्याधारित
मुल्यमापनाचा अवलंब करण्यात आला.मुलांचे
मूल्यमापन हे सार्वत्रिक न करता ते वैयक्तिक
करण्यात आले.त्यामुळे प्रत्येक मुलाच्या प्रगतीच्या
आलेखाची तुलना इतरांशी होण्याचा धोका टाळला
गेला. प्रत्येक आठवडा अखेर या प्रत्येक मुलाच्या
आठवड्यातील कामगिरीचा आढावा घेवून पुढील
आठवड्यातील पाठ्य्क्रमाची आखणी केली गेली.
प्रत्येक शाळेला पुढील आठवड्याचे वेळापत्रक
अगोदरच पाठवले जाई त्यामुळे तेथील शिक्षकांना
वर्ग व्यवस्थापन करणे अधिक सुलभ जाई.
सलग ३ वर्षे
याची अंमलबजावणी केल्यानंतर याची उपयुक्तता
पाहून ब्राझील मधील इतर ६ राज्यांनी देखील
याच मॉडेलचा स्वीकार केला.मागील 10 वर्षे हा
प्रयोग सुरळीत सुरु आहे.याचाच परिणाम म्हणून
संयुक्त राष्ट्राने ब्राझील मधील एक ही मूल
माध्यमिक स्तरावरील गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून
वंचित नाही असे प्रशस्तीपत्र दिले.संयुक्त
राष्ट्राने घोषित केलेली शाश्वत विकासाची
उद्दिष्टे गाठण्यासाठी सारे जग प्रयत्न करत
असतानाचा ब्राझीलच्या या यशाने सर्वांसमोर
आदर्श उभा राहिला आहे.
लोकसंख्या व
अर्थव्यवस्थेचा आकार याबाबत भारताशी काही
प्रमाणात साम्य असणारा हा देश जे यश साध्य करू
शकला ते आपल्यासाठी निश्चितच प्रेरणादायी
आहे.ब्राझीलच्या या शैक्षणिक मॉडेल मधील बऱ्याच
बाबी आपल्या देशाला मार्गदर्शक आहेत.जिथे
वैद्यकीय शिक्षणासाठी सबंध भारतभर ‘नीट’
नेटकी परीक्षा असावी असा आग्रह आम्ही धरत
असतानाच स्थानिक गरजांचे प्रतिबिंब
अभ्यासक्रमात उमटले तर त्याची उपयुक्तता वाढते
हेच ब्राझील च्या नव्या मॉडेल ने दाखवून दिले
आहे.पारंपारिक शिक्षण व अभ्यासक्रम यांची
वास्तविक जीवनाशी असणारी फारकत या
निमित्ताने पुढे आली आहे.महाराष्ट्रासारख्या
राज्यात जिथे मराठवाड्यातून दरवर्षी लाखो मुले
उसतोडीच्या निमित्ताने किमान ६ महिन्यासाठी
शाळाबाह्य राहतात. या मुलांच्या गरजा,
कौटुंबिक परिस्थिती यांचा अभ्यास करून वेगळा
अभ्यासक्रम आखला जाणे गरजेचे आहे.बीड सारख्या
जिल्ह्यात या धर्तीवर पथदर्शी प्रयोग राबवता
येवू शकेल.या पायलट प्रोजेक्ट मधील येणाऱ्या
समस्यांचा अभ्यास करून काही उपाय निश्चितपणे
समोर येतील.या पर्यायांची उपयुक्तता पडताळून
मगच याचे सार्वत्रिकीकरण केले जाणे उचित
ठरेल.मुलांचे होणारे स्थलांतर व गळती
रोखण्यासाठी पालकांचे मन वळवण्याचा पर्याय
दरवर्षीच लागू पडेल याबाबत शंकाच वाटते.मात्र
साखर शाळांचे पुनरुज्जीवन करून तिथे या मुलांच्या
गरजानुरूप अभ्यासक्रम आखून त्याच्या
अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाऊ
शकेल.केवळ शैक्षणिक सुविधा पुरवण्यात RTE चे यश
मानणे म्हणजे अल्प संतुष्टपणा ठरेल.शैक्षणिक
सुविधांची उपलब्धता याही पुढे जाऊन आपल्याला
गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने वाटचाल
करायला हवीय.. ब्राझीलचा हा पॅटर्न आपल्या
गरजानुरूप बदल करून अंमलात आणायला काहीच
हरकत नाही. स्थलांतर स्थानिक गरजा लक्षात घेत
अर्थार्जनासाठी शिक्षण देण्याबाबत आम्हा
भारतीयांना विचार करावा लागेल.असे शिक्षण
देताना ते अधिक लवचिक असण्याची गरज
आहे.संगणक,टॅबलेट आदी साधनाच्या मदतीने
तंत्रस्नेही शिक्षण देण्यात बाबत आपला देश
गोंधळलेल्या अवस्थेत असताना ब्राझील चे
तंत्रस्नेही प्रारूप मार्गदर्शक आहे. तंत्रज्ञानाचा
प्रभावी वापर करून घनदाट जंगलात देखील
गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गंगा अव्याहतपणे वाहू
शकते हे यातून दिसून येते. प्रचंड पाऊस व महापूर
हा जीवनाचा अविभाज्य भाग असणाऱ्या अमेझॉन
मधील मुलांच्या अभ्यासक्रमात आपत्ती
व्यवस्थापन,पर्यावरण संरक्षण यांचा जाणीवपूर्वक
समावेश केला गेला. विषारी साप ओळखणे व साप
पकडण्याचे तंत्र अवगत करण्यासाठी सिम्युलेशन ची
मदत घेतली गेली.त्यामुळे सर्प दंशाने मृत्युमुखी
पडण्याचे प्रमाण ब्राझील मध्ये लक्षणीयरीत्या
घटले आहे, असेही निरीक्षण संयुक्त राष्ट्राने
नोंदवले आहे.मुलांना शाळेत शिकण्यासाठी त्यांचे
सामाजिक अभिसरण होणे महत्वाचे असते हा आपला
भारतीय समज देखील यानिमित्ताने फोल ठरला
आहे.कारण अमेझॉन मधील अनेक शाळांमध्ये केवळ २-४
मुलेही शिक्षण घेत आहेत.मुलाच्या दैनंदिन जीवनाशी
निगडीत शिक्षण असेल तर ते शाश्वत शिक्षण ठरते
हेच या निमित्ताने समोर आले आहे.

Tuesday, May 31, 2016

शिक्षण व्यवहाराशी जोडताना

📝शिक्षण व्यवहाराशी जोडताना...
   प्रसाद मणेरीकर📝

मुले शाळेत जे शिकतात, त्यापेक्षा कितीतरी जास्त घरात, परिसरात, समाजात वावरताना शिकतात. तेव्हा विषयातील संकल्पना पाठ्यपुस्तकातून शिकता येत नाहीत, तर प्रत्यक्ष व्यवहारातून शिकता येतात, हे एकदा समजून घेतले, की अभ्यासक्रमाची रचना करणे सोपे होईल.
मुले शिकावीत, अधिक चांगल्या पद्धतीने शिकावीत, यासाठी केलेल्या विविध व्यवस्थांपैकी शाळा ही एक व्यवस्था. मुले शाळेत यावीत, तिथे शिक्षकांकरवी शिकती व्हावीत आणि उत्तम गुणांनी उत्तीर्ण व्हावीत, यासाठी सगळी धडपड असते. मात्र तरीही काही मुले मागे पडतात, काही नापास होतात, काही अर्ध्यावरच शाळा सोडतात, हे वास्तव आहे. मुलांना शाळेत शिकायला आवडत नाही, तिथे त्यांना कंटाळा येतो, असा सार्वत्रिक समज आहे आणि तो काहीसा खराही आहे. वर्गातील अमुक मुले काहीच शिकत नाहीत, त्यांना काहीच येत नाही, असे सांगणारे शिक्षक आहेत. सरकारलाही याची जाणीव आहे, म्हणून तर सरकार अप्रगत मुलांसाठी स्वतंत्र वेळ देऊन उपक्रम राबवते; पण तरीही मुले मागे पडतात, हे वास्तव उरतेच.
हे असे का होते याचा धांडोळा घेतल्यास अनेक कारणे पुढे येतात. यातले एक कारण, मुले शाळेत जे शिकतात ते व प्रत्यक्ष व्यवहारात जे करतात ते, यांची सांगड घातलेली त्यांना दिसत नाही व त्यांनाही ती घालता येत नाही. त्यामुळे शाळेतले शिकणे त्यांना समजत नाही आणि त्यामुळे ते कंटाळवाणे होते. वास्तविक मुले शाळेत जे शिकतात, त्यापेक्षा कितीतरी जास्त घरात, परिसरात, समाजात वावरताना शिकतात. परिसरातील घटना पाहत, समजून घेत, उपक्रमांत सहभागी होत, विविध व्यक्तींशी संवाद साधत असताना ही शिकण्याची प्रक्रिया सुरू असते. किंबहुना शाळेत जायच्या कितीतरी आधीपासूनच ही प्रक्रिया सुरू होते. परिसरात वावरताना सहजपणे, कुणीही न शिकविता त्यांच्या अनेक संकल्पना स्पष्ट होत असतात. मुद्दा असा, की परिसरातून अनुभव घेत मूल शिकत असेल, तर ते "शिकत नाही‘ असे आपण का म्हणतो आणि त्याला "ढ‘ का ठरवतो? म्हणजेच इथे आपली शिक्षक म्हणून जबाबदारी सुरू होते आणि ती दुहेरी स्वरूपाची आहे. एक, मूल ज्या वातावरणातून आले आहे, ते वातावरण समजून घेणे आणि दुसरे मुलाचे अनुभवविश्व लक्षात घेऊन तशी अभ्यासक्रमाची रचना करणे. मूल परिसरातून ज्या प्रकारचे अनुभव घेते आहे, त्याचे शालेय शिक्षणात पर्यवसान कसे करायचे, असा तो मुद्दा आहे.
वरवर पाहता ही अवघड बाब वाटेल, कारण प्रत्येक मुलाचा विचार करायचा आणि तशी प्रत्येकासाठी अभ्यासक्रमाची आखणी करायची हे सोपे काम नाही. मात्र अगदी तसेच करायची गरज नाही. कारण ज्या परिसरातून शाळेत मुले येतात, तो परिसर बहुतांश मुलांचा समानच असतो किंवा तसा समान परिसर असणाऱ्या मुलांचे गट करता येतात व त्या आधारे अभ्यासक्रम आखता येतो.
उदा. ग्रामीण व निमशहरी भागांतील मुलांसाठी शेती हा रोजचा अनुभव असतो. ती शेतात वावरतात, शेतीशी संबंधित अनेक क्रिया त्यांना माहिती असतात. याचा आधार घेत भाषा, गणित, परिसर अभ्यास यांतील अनेक संकल्पना मुलांना सोप्या करून सांगता येतील. असेच घरातील व्यवहारांचेही असते. मग या मुलांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला तर शालेय विषयांतील संकल्पना समजणे सोपे जाईल. तो अभ्यासक्रम अवघड वाटणार नाही आणि दुसरे म्हणजे घरचे आणि परिसरातले व्यवहार ती अधिक समजून-उमजून करतील. या दोन्हीतून मुलांचे आकलन वाढेल.
आपली गफलत झालेली आहे, ती पाठ्यपुस्तक केंद्रिभूत मानून सगळे व्यवहार करण्यातून. खरे तर सरकारही आता त्या मानसिकतेतून बाहेर पडू पाहतेय. विषयातील संकल्पना पाठ्यपुस्तकातून शिकता येत नाहीत, तर व्यवहारातून शिकता येतात, हे एकदा समजून घेतले, की पुढची रचना करणे सोपे जाईल.
महाराष्ट्राच्या विविध भागांतील मुलांना पाठ्यपुस्तकातील धडे समजत नाहीत व वर्गात चालणाऱ्या गणिती क्रियाही समजत नाहीत, हे त्या त्या भागांतले शिक्षकही मान्य करतात. याचाच परिणाम मुलांना शिकण्यात रस वाटण्यावर होतो. नाहीतर दुकानात जाऊन रोजचे व्यवहार करणाऱ्या मुलांना, किंवा आई-वडिलांना भाजीच्या दुकानात मदत करणाऱ्या मुलांना शाळेतील बेरीज-वजाबाकी येणार नाही असे कसे होईल? आणि हे व्यवहाराशी जोडून शिकणे केवळ प्राथमिक इयत्तेच्या टप्प्यावरच नाही, तर माध्यमिक इयत्तांसाठीसुद्धा लागू आहे. कारण न्यूटनचे नियम आपल्याला तोंडपाठ असतात, पण ते रोजच्या जगण्याला लावता येत नाहीत. रस्सीखेच करताना दोरी तुटून पडल्याचा अनुभव अनेक मुलांना असतो. बस सुरू झाल्यावर ढकलले गेल्याचा अनुभवही असतो, पण याच्याशी नियमांचा संबंध ते शिकूनही मुलांना लावता येत नाही. या अशा रोजच्या अनुभवातून नियमांकडे गेलो, तर शब्दश: नियम कदाचित नाही लक्षात राहणार; पण ती संकल्पना समजेल आणि नियम पाठ करण्यापेक्षा ते केव्हाही महत्त्वाचे!
हे मान्य असेल तर यापुढे आपल्याला अभ्यासक्रमाचा विचार वेगळा करावा लागेल. शाळेत जाऊन मुलांना काय आले पाहिजे, हे नीट ठरवावे लागेल. म्हणजे मुलांना पाठ्यपुस्तक वाचता आले पाहिजे, की मुलांची वाचन क्षमता विकसित व्हायला हवी? आणि वाचन क्षमता विकसित व्हायला हवी असेल, तर वाचनाचे कोणते किती आणि विविधांगी अनुभव मुलांना देता येतील, जे सुरवातीच्या टप्प्यावर परिसराशी जोडलेले असतील, हे पाहावे लागेल. कारण ज्या वयात वाचनाची गोडी लागायची त्या वयात अनाकलनीय वाचावे लागले, तर मुले वाचनापासून दूर जाण्याची शक्यताच जास्त. कारण वाचन ही आपली आपण करण्याची व समजून घेण्याची बाब आहे.
सरकारने शिक्षकांचा पाठ्यपुस्तकाधारित शिक्षणाचा भ्रम लवकरात लवकर दूर करायची गरज आहे. प्रत्येक वयोगटासाठीच्या क्षमता निश्चित कराव्यात. या क्षमतांपर्यंत पोचण्यासाठी साह्यभूत होतील, अशा क्रमबद्धपणे घ्यायच्या उपक्रमांची यादी करावी आणि शिक्षकांना अधिकाधिक मोकळीक द्यावी. सुरवातीला शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे लागेलही कदाचित, पण तो सरकारचा हातखंडा आहे. मुलांना शालेय शिक्षणाची गोडी लावण्याचा हा एक मार्ग ठरू शकेल.

Monday, May 30, 2016

शिक्षण लेख

पालकनीतीमध्ये आलेला शिक्षणशास्त्रlचे अभ्यासक किशोर दरक यांचा हा लेख जरा वेळ काढून जरुर वाचाल.

 ऑन द शोल्डर्स ऑफ जायंट्स

 · भाषा शिक्षण
 · शिक्षण
 · शिक्षण - माध्यम

सांस्कृतिक भांडवल आणि पिअर बोर्द्यू
शिक्षण, संस्कृती आणि त्यांच्या परस्परसंबंधांतून होणार्‍या सामाजिक विषमतेच्या पुनर्निर्मितीचं भान निर्माण करणार्‍या पिअर बोर्द्यू आणि त्यांची सांस्कृतिक भांडवलाची संकल्पना यांची चर्चा करणारा हा लेख.
"The point of my work is to show that culture and education aren’t simply hobbies or minor influences. They are hugely important in the affirmation of differences between groups and social classes and in the reproduction of those differences." - Pierre Bourdieu
“आठाठ वर्षं शाळेत जात असूनही काही मुलं शिकती होत नाहीत”, हा मुद्दा किती प्रमाणात सत्य आहे यावर मतभिन्नता आहे. मात्र हा मुद्दा पूर्णपणे असत्य आहे असं आज देशात कुणीही म्हणू शकत नाही. आर. टी. ई. कायदा लागू झाल्यापासून देशात अनेक राज्यांत गुणवत्ता विकासाचे जे विविध कार्यक्रम चालू आहेत ते सर्व कार्यक्रम सगळी मुलं शिकती करणं हे उद्दिष्ट (किमान कागदोपत्री तरी) समोर ठेवून चालतायत. मुलं शाळेत जातात, किमान एका शाळेत किंवा एका वर्गात तरी एकसमान शिक्षण मिळतं, एकसारख्या सोयी-सुविधा मिळतात तरी मुलं शिक्षणातून एकसारखी किमान गुणवत्ता प्राप्त करताना दिसत नाहीत. असं का होत असावं, याची अनेकविध मानसशास्त्रीय कारणं आहेतच, शिवाय सामाजिक, सांस्कृतिक कारणं देखील आहेत.
शाळांमधून मिळणारं शिक्षण कुणासाठी फायदेशीर ठरतं, तर कुणासाठी गैरसोयीचं. ते नेमकं कुणाच्या फायद्याचं असतं आणि कुणासाठी नुकसानकारक, त्यातून समाजात समता, सामाजिक न्याय अशी आधुनिक मूल्यं प्रस्थापित होतात की विषमता निर्माण होत राहते, शिक्षणाच्या प्रक्रियेतली सामाजिक जटिलता समजावून कशी घ्यायची, अशा गुंतागुंतीच्या प्रश्नांची समाजशास्त्रीय उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार्या विसाव्या शतकातल्या महत्त्वाच्या काही नावांपैकी एक अग्रणी नाव म्हणजे पिएर बोर्द्यू (Pierre Bourdieu, 1930-2002). गेल्या शतकातील एक महत्त्वाचे फ्रेंच समाजशास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ते, मानववंशशास्त्रज्ञ म्हणून बोर्द्यू ओळखले जातात. कला, संस्कृती, शिक्षण, भाषा, सार्वजनिक माध्यमं, सामाजिक संरचना, समाजातले सत्तासंबंध अशा अनेक विषयांमध्ये मूलभूत संशोधन करून सामाजिक महत्त्वाच्या या विषयांच्या विश्लेषणासाठी नवे सिद्धांत जगापुढे मांडण्याचं महत्त्वाचं काम बोर्द्यू यांनी केलं.
1960 च्या दशकाच्या पूर्वार्धात फ्रान्सध्ये प्राथमिक शिक्षण क्षेत्रात विविध सामाजिक वर्गांतील मुलांच्या संपादणुकीतील फरकाविषयी घमासान चर्चा सुरू होत्या. शिक्षणातील संपादणुकीचा अभ्यास करण्यासाठी उपलब्ध शैक्षणिक-समाजशास्त्रीय साधनं अपुरी पडू लागली होती. बुध्यांकासारख्या (आय. क्यू.) बोधनक्षमतेवर (cognitive ability) आधारित पद्धतीची मर्यादा अधिकाधिक प्रमाणात लक्षात येऊ लागली होती. अशा वेळी बोर्द्यूंनी संख्याशास्त्रीय पृथक्करणाचा आधार घेऊन शिक्षणक्षेत्रावर दूरगामी परिणाम करणारी समाजशास्त्रीय मांडणी केली.
एखाद्या क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक आणि मिळणार्या नफ्याचा वाटा हे एकमेकांशी समानुपाती असतात. ज्याचं भांडवल जास्त त्याचा/तिचा नफ्यातला वाटा जास्त, हा अर्थशास्त्रीय व्यवहारातला ढोबळ सिद्धांत. या सिद्धांताशी साधर्म्य सांगणारासांस्कृतिक भांडवलाचा (cultural capital) सिद्धांत बोर्द्यूंनी मांडला. त्यांच्या म्हणण्यानुसार औपचारिक शिक्षणातली परिस्थिती समाजातल्या वर्चस्वधारी वर्गातली (dominant class) किंवा उच्च वर्गातील मुलांना समाजातील कनिष्ठ वर्गीय मुलांपेक्षा अधिक फायदा देणारी असते. उच्च वर्गीय मुलं शिक्षणप्रक्रियेत दाखल होतानाच त्यांच्या यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते. यामध्ये त्यांच्या बुद्धिमत्तेचा संबंध नसतो. अशा मुलांसाठी घरची संस्कृती आणि शाळेची संस्कृती यात सातत्य (continuity) असतं, साम्य असतं. या मुलांची भाषा, सामाजिक आंतरक्रियेची पद्धत, सौंदर्यदृष्टी असे सर्व सांस्कृतिक जडणघडणीचे घटक शाळेच्या संस्कृतीशी मिळतेजुळते असतात. शिक्षणाचा आशय (content) आणि वापरलं जाणारं अध्यापनशास्त्र (pedagogy) या दोन्ही गोष्टी समाजातील वर्चस्वधारी गटातल्या मुलांना परक्या वाटत नाहीत. या उलट कनिष्ठ वर्गीय किंवा कामगार वर्गीय मुलांना शाळेचं वातावरण परकं, विरोधी वाटू लागतं. त्यांच्यामध्ये उपरेपणाची भावना वाढीला लागते आणि ते शालेय प्रक्रियेपासून तुटत जातात, किंवा शालेय प्रक्रियेशी कधी जोडलेच जात नाहीत. त्यांच्या घरची संस्कृती आणि शाळेची संस्कृती यात खूप तफावत असते म्हणूनदेखील त्यांची शैक्षणिक संपादणूक कमी प्रतीची असते.
शाळेत येताना प्रत्येक मूल आपल्यासोबत जी संस्कृती - म्हणजे त्याची भाषा, बोलण्या-वागण्याच्या पद्धती, आवडी-नावडीच्या गोष्टी, खाण्या-पिण्याचे प्रकार, गाणी, गोष्टी - घेऊन येतं ते झालं त्याचं सांस्कृतिक भांडवल. शाळा मात्र या भांडवलाबाबत पक्षपाती धोरण अवलंबतात. म्हणजे उच्चवर्गीयांच्या सांस्कृतिक भांडवलाचा सन्मान राखत त्या मुलांना संस्कृतीसातत्याचा फायदा देतात. त्याचवेळी खालच्या सामाजिक स्तरातील मुलांच्या संस्कृतीला नाकारतात, त्यात सुधारणा सुचवतात किंवा तिचा तिरस्कार करतात. याचाच दुसरा अर्थ उच्चवर्गीयांचं सांस्कृतिक भांडवल स्वीकारार्ह म्हणून त्यांना शिक्षणातून नफा मिळवून देणारं ठरतं. हानफा शैक्षणिक यशाच्या स्वरूपात असतो आणि भविष्यात त्याचं रूपांतर आर्थिक यशात होतं. याउलट, कनिष्ठ वर्गाची संस्कृतीच त्यांच्या यशात अडसर ठरते आहे, असं भासवलं जातं. शाळा उच्चवर्गीयांच्या सांस्कृतिक भांडवलाला महत्त्व देत असल्यामुळे उच्चवर्गीय मुलं पुढील आयुष्यात आर्थिक दृष्ट्या सक्षम होताना दिसतात. अशा प्रकारे विषमताधारित समाजात शिक्षणातून विषमतेचं पुनरुत्पादन होतं.
सांस्कृतिक भांडवलाची बोर्द्यूंची ही संकल्पना भारतासारख्या बहुविधतेच्या (plurality) देशांना अनेक अर्थांनी उपयुक्त आहे. ही संकल्पना आपण आपल्या शैक्षणिक संदर्भातली काही उदाहरणं घेऊन समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात. भारतातील विषमता बहुआयामी आहे. जात, लिंग, धर्म या तीन आधारांवरची विषमता वर्गीय विषमतेपेक्षा जटिल असल्याचं अभ्यासक मानतात. शाळांचा विचार करता तिथं शिकवला जाणारा आशय सहसा उच्चजात, उच्चवर्ग धार्जिणा असतो.
प्रसिद्ध विचारवंत कांचा आयलया यांनी ‘व्हाय आय एम नॉट अ हिंदू’ या नावाचा एक ग्रंथ लिहिलाय. ब्राम्हणी हिंदू धर्माची चिकित्सा करणार्या या पुस्तकात स्वतःच्या शाळेचा अनुभव सांगताना ते म्हणतात, ... पाठ्यपुस्तकांमधून ज्या कथा सांगितल्या जात असत त्या आम्ही कधीही ऐकलेल्या नव्हत्या. राम आणि कृष्ण यांच्या कथा, रामायण आणि महाभारत ही काव्ये शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात वारंवार समोर येत राहिली..... ब्राम्हण आणि वैश्य वगैरे मुलांसाठी या कथा अगदी परिचित, त्यांच्या देवांच्या होत्या..... ही नावं आमच्यासाठी किती परकी होती ते मला अजूनही ठळकपणे आठवतं. कालिदास हे नाव आमच्यासाठी शेक्सपिअर इतकंच परकं होतं. फरक इतकाच की एक नाव तेलगु पाठ्यपुस्तकात असे तर एक इंग्रजी पाठ्यपुस्तकात..... आजतागायत मला कधीही कोणत्याही पाठ्यपुस्तकात एकाही पाठात पोचम्मा, पोतराजु, कट्टमैसम्मा, काटम्माराजु, बिरप्पा अशी आमच्या देवांची नावं आढळली नाहीत.... त्यांच्याविषयी कथाच उपलब्ध नाहीत असं नाही पण पाठ्यपुस्तक लेखकांना ती नावं पुस्तकांत देण्याच्या लायकीची वाटत नाहीत. (संदर्भ: कांचा आयलया, व्हाय आय एम नॉट अ हिंदू, पान 13, साम्या प्रकाशन, कलकत्ता, 1996) शिक्षणाच्या आशयामध्ये अशा प्रकारे उच्चजातीय सांस्कृतिक भांडवलाचंच प्रतिबिंब पडत राहतं. साहजिकच कनिष्ठ जात किंवा कनिष्ठ वर्गीय मुलं शाळेच्या पहिल्या दिवसापासून मागे पडू लागतात.
सांस्कृतिक भांडवलाची कल्पना केवळ शिक्षणाच्या आशयाचं नियंत्रण करते असं नाही तर शिक्षणाचा एकूण व्यवहार नियंत्रित करते. उदाहरणार्थ, परीक्षा हा शिक्षणाचा गाभा समजला जातो. परीक्षा घ्यायची पद्धत बदलली की शिक्षणाचा सगळा व्यवहार बदलतो कारण अधिकाधिक गुण मिळवून परीक्षा उत्तीर्ण होणं म्हणजे शिक्षण, असं आपण मानतो. 2015-16 या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रात सुरू झालेल्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमांतर्गत ज्या सार्वत्रिक परीक्षा घेण्यात आल्यात त्यांच्या स्वरूपामुळे पहिल्यांदा पाठांतरावरचा भर कमी झालेला दिसतोय. अर्थात यातून संपादणूक पातळी वाढायला हवी असेल तर अजून बरीच मजल मारायची आहे. पण दहावी किंवा बारावी बोर्डाची परीक्षा मुख्यत: पाठांतर या एकमेव कौशल्यावर आधारित असते. भारतीय संदर्भात अशा प्रकारच्या परीक्षादेखील उच्चजातीय सांस्कृतिक भांडवलाला स्वीकारार्ह मानणार्या आहेत. पुढील उदाहरण हा मुद्दा स्पष्ट व्हायला मदत करेल.
अभिजन महाराष्ट्र आजही ज्या एकमेव आईच्या स्मरणरंजनात गुंगतो त्याश्यामची आई या पुस्तकातलं हे उदाहरण आहे. आपल्या बालपणाची आठवण सांगतांना पुस्तकाचे लेखक म्हणतात - आमच्या घरी एक अशी पध्दत होती की, रोज दुपारच्या मुख्य जेवणाच्या वेळी प्रत्येकाने श्लोक म्हणावयाचा. जेवताना श्लोक म्हटला नाही तर वडील रागे भरत. वडील आम्हाला श्लोकही सुंदर सुंदर शिकवीत असत...... रोज एखादा नवीन श्लोक ते शिकवायचे....... वडील पहाटे शिकवीत तर सायंकाळी आई शिकवी. .... आम्हालाही त्यामुळे पाठ करण्याचा नाद लागे. दुपारी जेवणाचे वेळी जर वडिलांनी न शिकविलेला परंतु आम्हीच पाठ केलेला श्लोक आम्ही म्हटला तर वडील शाबासकी देत. त्यामुळे आम्हास उत्तेजन मिळे. गावात कोठे लग्नमुंजी पंगत असली किंवा उत्सवाची समाराधना असली तेथेही मुले श्लोक म्हणत. जो श्लोक चांगला म्हणे त्याची सारे स्तुती करीत. अशा रीतीने घरीदारी श्लोक पाठ करावयास उत्तेजन मिळे. (संदर्भ: पां.स.साने, श्यामची आई, रात्र सातवी - पत्रावळी,http://saneguruji.net/या संकेतस्थळावर उपलब्ध) स्वतः जातीभेद न मानणारे साने गुरुजीदेखील उच्चजातीतील जन्मामुळे मिळणार्या सांस्कृतिक सवयीजन्य फायद्याचे धनी होते. भारतात कोट्यावधी घरांमध्ये पाठांतराला प्रोत्साहन तर सोडा, पाठांतराचा विचारही नसतो आणि जगण्याच्या संघर्षात तशी उसंतही नसते. अशा घरांतली मुलंदेखील केवळ अफाटपाठांतराधारीत परीक्षा देतात तेव्हा पुढं कोण जाणार हे परीक्षेआधीच ठरलेलं असतं.
सांस्कृतिक सवयी या सांस्कृतिक भांडवालाचा अविभाज्य भाग असतात. देवा-धर्माच्या नावाने लागलेली अर्थ न समजता पाठांतर करण्याची सवय सांस्कृतिक भांडवल बनून अभिजन मुलांचा शैक्षणिक नफा वाढवत राहते. अर्थात् हे योगायोगाने घडत नाही. समाजातले अभिजन घटक आपल्या हितसंबंधांची जपणूक करण्यासाठी आपल्या सांस्कृतिक भांडवलाला अधिकाधिक स्वीकारार्ह बनवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी लागणारं आर्थिक भांडवलही त्यांच्याकडे असतं, अशा आशयाची मांडणी आपल्या फॉर्मस् ऑफ कपिटल या निबंधात बोर्द्यूंनी केली आहे. अभिजनांच्या सांस्कृतिक भांडवलाला केवळ त्यांचीच मान्यता असते असं नाही तर सांस्कृतिक प्रतीकांवरील (cultural symbols) प्रभुत्त्वामुळे हा वर्ग आपल्या सांस्कृतिक भांडवलाचं श्रेष्ठत्व राज्यकर्त्यांच्या गळी उतरवतो. थोडं दूरचं उदाहरण घेऊन या प्रक्रियेकडे पाहूयात.
1953-54 पासून देशात आदिवासी आश्रम शाळा चालवल्या जातात. या शाळांचं मुख्य उद्दिष्ट दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा व मद्यपान इत्यादीच्या कौटुंबिक पार्श्वभूमीपासून जनजातीतील मुलांना बाहेर काढून त्यांना शिक्षण, शिस्त व वैयक्तिक आरोग्य यासाठी उपयुक्त वातावरण निर्माण करणे असं आहे. (संदर्भ: आश्रमशाळा संहिता, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन, पान एक, 2006). आदिवासी मुलांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीत स्वीकारार्ह असं काहीही शासनाला दिसत नाही! त्यापासून मुलांना दूर काढून योग्य शिक्षण देणं हा वांशिक शुद्धीकरणाचा (ethnic sanitisation) एक प्रकार आहे. अशी आदिवासी मुलं जेव्हा शाळेत येतात तेव्हा शाळांनी आधीच अभिजनवर्गाचं सांस्कृतिक भांडवल स्वीकारलेलं असतं. इतकंच नव्हे तर आदिवासी मुलांचं सांस्कृतिक भांडवल केवळ दुरुस्तीयोग्य मानून किंवा त्याला पूर्णपणे नाकारून या मुलांच्या दाखल होण्याआधीच शाळा त्यांच्या अपयशाची सोय करून ठेवतात. अर्थात् शाळा आदिवासी मुलांसाठी असल्या तरी त्यांची रचना, आखणी, उभारणी आणि कार्य हे सगळं अभिजनांचं वर्चस्व असलेल्या विचारसरणीतून घडत असतं. आदिवासींच्या सांस्कृतिक भांडवलाला संपूर्ण नकार देऊन एका बाजूला प्रतीकात्मक हिंसा (symbolic violence)केली जाते आणि दुसर्या बाजूला अभिजनांच्या संस्कृतीजन्य ज्ञानाला वैध ज्ञानाचा दर्जा देऊन तेच एकमेव प्राप्य (desirable goal) बनवलं जातं. आर्थिक आणि सांस्कृतिक भांडवलाच्या पाठबळामुळं उच्चजात-वर्गीयांच्या किंवा अभिजनांच्या चवीच योग्य आहेत असं बहुजानांसकट सगळा समाज मानू लागतो. आपल्या .... जजमेंट ऑफ टेस्टया ग्रंथात बोर्द्यूंनी त्याचं गंभीर विश्लेषण केलंय.
आपले कपडे, घरांचे रंग, जेवणाच्या चवी, बोलण्याच्या लकबी, कलेची जाणीव, मनोरंजनाचे प्रकार, शिक्षणाचा अर्थ इत्यादी सर्वांमध्ये अभिजनांचं अनुकरण करणं म्हणजे उर्ध्वगमनशील (upwardly mobile) होणं, अशा विचाराला समाजात मान्यता मिळत जाते. जे जे अभिजनांचं ते ते उत्तम आणि दर्जेदार, अशी जाणीव समाजातल्या विविध घटकांमध्ये निर्माण होते. कनिष्ठ जात किंवा वर्गातले लोक देखील अभिजनमान्य तेच योग्य असं अगदी नैसर्गिक सूत्र असल्यासारखं मान्य करू लागतात. अर्थात या सर्व सवयी दर वेळी शाळेतून किंवा औपचारिकरीत्या शिकवल्या जातात असं नाही. ही प्रक्रिया निरंतर सुरू राहते. या प्रक्रियांच्या विश्लेषणासाठी उपयुक्त अशी हॅबिटससारखी संबोध चौकट (conceptual framework) देखील बोर्द्यूंनी मांडली.
सांस्कृतिक भांडवलाला गृहीत धरण्याची सवय तर जगभर इतकी मुरलेली आहे की शाळांच्या बाबतीत कोणताही वेगळा विचार अगदी गुलबकावलीच्या फुलासारखा वाटू लागतो. गेल्या वर्षी काही संशोधनाच्या निमित्ताने मी उत्तरेतील एक राज्य, दक्षिणेतील एक राज्य आणि महाराष्ट्रातील काही शाळांना भेटी दिल्या. मुख्यत: सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या आणि अधिकार्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलांच्या असमाधानकारक संपादणुकीचं कारण सांगताना जवळजवळ सगळे शिक्षक आणि अधिकारी ही मुलं गरीब घरांतली आहेत. त्यांचे आईवडील मोलमजुरी करतात. काही मुलं हलक्या जातींची आहेत. या मुलांच्या घरचं वातावरण शिक्षणाला पोषक नाहीय. कसं या मुलांना यश मिळणार? अशा आशयाचं बोलत होती. मुलांच्या शैक्षणिक अपयशाचा विचार करताना कुणीही शिक्षक, अधिकारी किंवा इतर प्रौढ शाळेत काही कमतरता असून ती दूर करायला हवी, असा विचारही करताना सहसा दिसत नाहीत. मुलांच्या घरचं वातावरण त्यांच्या शिक्षणाला पोषक नाही कारण ते शाळेसारखं नाही, असं सर्रास सांगितलं जातं. शाळेतलं वातावरण शिक्षणाला पोषक नाही कारण ते घरच्यासारखं नाही असा विचार, अगदी काल्पनिक प्रयोग म्हणूनही कुणी करत नाही. कारण शाळेचं वातावरण हे अभिजनांच्या किंवा भारतात बोलायचं झालं तर उच्चजातींच्या सांस्कृतिक भांडवलाला साजेसं असणार किंवा असायलाच हवं, असं आपण गृहीत धरलेलं आहे.
अभिजनांच्या सांस्कृतिक भांडवलाच्या अशा धाकाचं आणि त्यातून होणार्या विषमतांच्या पुनर्निर्मितीचं सखोल विश्लेषण बोर्द्यूंनी केलं. अर्थात् आधी उल्लेख केल्याप्रमाणे ते केवळ समाजशास्त्रज्ञ नव्हे तर तत्त्ववेत्ते, संस्कृतीचे उत्तम अभ्यासक होते. सत्तर वर्षांच्या अत्यंत उत्पादक आयुष्यात अभिजनांची कलेची चव, भाषेतील प्रतीकात्मकता, सौंदर्यदृष्टीवर आधारित सामाजिक स्तरीकरण, समाजातील संरचना आणि सत्तासंबंध, माध्यमं आणि सांस्कृतिक उत्पादनं अशा विविध विषयांचा सखोल आणि मूलभूत अभ्यास त्यांनी केला. तीसहून अधिक ग्रंथ लिहिले - Distinction: - Social Critique of the Judgment of Taste (1984), The Logic of Practice (1990), Homo academicus (1990), Language and Symbolic Power (1991), The Love of art: European art Museums and Their Public (1991), State Nobility: Elite Schools in the Field of Power (1998), On Television (1999) हे त्यातील काही प्रमुख ग्रंथ. (वरील यादीतील पुस्तकांचे साल हे त्यांच्या इंग्रजीतील प्रकाशनांचे आहेत. त्यांनी त्यांचं लेखन त्यांच्या शिक्षणाच्या भाषेतून म्हणजे फ्रेंच भाषेतून केलं होतं.)
भारतामध्ये गेलं दशकभर सरकारी शाळांतील म्हणजे गरीब, दलित, बहुजन, अल्पसंख्य वर्गातील मुलांच्या शैक्षणिक संपादणुकीचा प्रश्न मोठ्ठ्या प्रमाणावर चर्चिला जातोय. मुलांच्या घरचं अशैक्षणिक वातावरण जबाबदार असल्याचं सांगून शिक्षक आणि व्यवस्था या प्रश्नातून आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतायात. दुसर्या बाजूला केवळ आकडेवारीचा विचार न करणारे काही संवेदनशील अभ्यासक performance of government school children is same (or comparable) as that of private school children, when family background is controlled अशी मांडणी करतात. विश्लेषणाचे मार्ग भिन्न असले तरी शिक्षक आणि अभ्यासक हे दोन्ही घटक अप्रत्यक्षपणे बहुजन मुलांच्या सांस्कृतिक भांडवलाला शाळांतून फारशी किंमत दिली जात नसल्याचंच सांगत असतात.
मुलांचं शाळेतलं शिक्षण आणि संपादणूक पातळी केवळ शाळेतल्या प्रक्रियांवर अवलंबून नसतात तर या प्रक्रिया मुलांच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीबद्दल किती संवेदनशील आहेत, यावर देखील अवलंबून असतात. सांस्कृतिक भांडवलाचा विचार मांडून, त्याचा संपादणुकीशी संबंध दाखवून पिएर बोर्द्यूंनी जगाला चाळीसेक वर्षांपूर्वीच सावध केलंय. अशा जायंटच्या खांद्यावर उभं राहून आपल्या शैक्षणिक समस्येच्या मुळाला हात घालायचा की अल्पजीवी, अल्पकालीन, अल्पखर्चाच्या उपाययोजना करून अल्पसमाधानालाच उत्तुंग यश मानायचं, हे भारतासारख्या देशांनी ठरवायची वेळ उलटत चालली आहे.
******
लेखक परिचय: किशोर दरक हे शिक्षणशास्त्राचे अभ्यासक व विश्‍लेषक आहेत. अनेक संशोधन प्रबंधांबरोबरच विविध वृत्तपत्रे व मासिकांमधूनही त्यांनी शिक्षण व समाजशास्त्र या विषयांवर लेखन केले आहे.
Email :kishore_darak@yahoo.com

Monday, April 18, 2016

शिक्षणविषयक free app
1st grade
35kids picture story
ABC English
ABC handwriting
About India
Amazing science
Animal encyopedia
Animal planet
Archaeoist
Bheem rupee game
Biology for kids
First learning game
 Brain trainer special
Country list
Doch sight words
English conversation
English for kids
Evomemo
Farm scratch
1st grade words
1st grade math
1st grade word play lite
Forts of Maharashtra
Fundoscience
Funny vitamins
Fun with dots
Gadwat
Fun easy learn English
First words
Hangama kids
IMO 1 maths
Hindi writing
Isro programs
Jr science master
Kids creation
Kids craft idea
Kids educational games
Kids encyclopedia
Kids gk test
Kids jigsaw2
Kids learning flowers names
Kids learning math lite
Kids measurements
Kids science experiments
Kids tangram free
Kids creative puzzle
Four seasons
Kids maths
Kidspedia
Kids zoo
Know abacus
Learn body part in English
Learn Hindi number
Learn to read
Learn to read lite
Lit charm pro
Lines and shapes free

Logic free
Logic with bheem
Marathi
Mharathi mhani
Marathi panchatratra
Match spell
Math art for kids
Math challenge
Math tricks
Mind games
Missing letters
Nao
Olypiad eng grade 1
Panchtratra
Phonics spelling and sight words
Piano lessons
Planet dino
Planets space
Play and learn
Play learn English
Play ground for kids
Sage kids
Sana Olympiad
Science experiments
Science lab
Science school
Shivaji &maratha empire
Simple drawing lessons
Singular plular
Sky guide for kids
Smarts kids
Space puzzle
Speakaboos
Spelling
Tabala master
True or false
Barakhadi

फिनलंडमधील शैक्षणिक प्रणाली

नवे प्रवाह : फिनलंडमधील शैक्षणिक प्रणाली

डॉ. हेमचंद्र प्रधान-होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र.
Published: Monday, March 18, 2013
१९६० पूर्वी फिनलंडमधील शिक्षणपद्धती साधारणत: आज आपल्याकडे आहे, तशीच होती. शाळा सरकारी आणि खासगी दोन्ही प्रकारच्या होत्या. शिक्षण सर्वसामान्यांना परवडेल असे नव्हते आणि ते अनिवार्यसुद्धा नव्हते. प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण मोठे होते. उच्च तसेच चांगले शिक्षण ही काही थोडय़ा लोकांचीच मक्तेदारी होती.
सहाशे वष्रे स्वीडनच्या आधिपत्याखाली राहिलेला फिनलंड देश स्वीडनच्या राजाने एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला रशियाच्या सार्वभौम झारला आंदण देऊन टाकला. झारने या देशाला रशियाच्या वर्चस्वाखालील मांडलिक, परंतु स्वायत्त राज्याचा दर्जा दिला. १९१८ साली साम्यवादी सोव्हिएट युनियनची स्थापना झाल्यानंतर फिनलंडने आपण संपूर्ण स्वतंत्र राष्ट्र असल्याची घोषणा केली. परिणामी, १९२० ते १९४५ या काळात रशियाबरोबरची दोन आणि जर्मनीबरोबरचे एक अशा युद्धांना फिनलंडला सामोरे जावे लागले. १९५० ते ६०च्या दशकात आपल्या देशाची नव्या उमेदीने उभारणी करण्यास फिनलंडच्या नागरिकांनी सुरुवात केली. याचाच एक भाग म्हणून १९६३ मध्ये त्यांनी नव्या शैक्षणिक धोरणाची आखणी केली. 'शिक्षण ही देशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे. शिक्षणात आणि शिक्षणासाठी केलेली गुंतवणूक देशाच्या भविष्यासाठी केलेली गुंतवणूक आहे,' या विचाराने याच काळात मूळ धरले. आज फिनलंडमधील सर्व राज्यकत्रे, मग ते सत्ताधारी पक्षाचे असोत किंवा विरोधी पक्षाचे, शिक्षणाचे महत्त्व जाणून आहेत आणि शैक्षणिक सुधारणांना नेहमीच पाठिंबा देत आहेत. गेली ५०-६० वष्रे विद्यार्थ्यांचे वाचन-लेखन, गणित आणि विज्ञान यातील पायभूत साक्षरता यात सातत्याने सुधारणा होत असून आजच्या या बदललेल्या चित्रामागे राजकीय इच्छाशक्ती दाखवून आखलेल्या धोरणांची सर्वसंमतीने केलेली अंमलबजावणी आहे.
या अंमलबजावणीचा आधास्तंभ आहे तो फिनलंडमधील अध्यापकवर्ग. शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर अध्यापन करणे हा फिनलंडच्या तरुणांमध्ये सर्वात प्रतिष्ठेचा व्यवसाय मानला जातो. तेथील अध्यापकांचे वेतनही इतर व्यावसायिकांना मिळणाऱ्या वेतनाइतके आहे.
फिनलंडमध्ये एकूण तीन हजार ५०० शाळा आाहेत आणि या शाळांमधून ६२ हजार अध्यापक आहेत. हे सगळे अध्यापक देशातल्या एकूण पदवीधरांपकी सगळ्यात वरच्या १० टक्के पदवीधरांमधून निवडले जातात. अध्यापक म्हणून निवड करण्यापूर्वी त्या उमेदवाराची शैक्षणिक प्रगती आणि आवड लक्षात घेतली जाते. त्याचबरोबर एक प्रवेश परीक्षा घेतली जाते. पण या प्रवेशपरीक्षांमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नांची लांबच लांब रांग नसते. या परीक्षा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने घेतल्या जातात आणि त्यामधून त्या विद्यार्थी उमेदवाराचे ज्ञान, समज आणि अध्यापक होण्याच्या दृष्टीने अभिव्यक्ती ज्याद्वारे तपासले जाईल असे अभिनव आणि व्यामिश्र प्रश्न असतात. या परीक्षेमधून निवड झालेल्या प्रत्येकाला 'मास्टर इन एज्युकेशन' हा दोन वर्षांचा प्रत्यक्ष अनुभवाधारित अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. समुपदेशन, विज्ञान व गणित विषयांचे अध्यापन, दृष्टिहीनता किंवा अन्य शारीरिक अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांचे विशेष शिक्षण या क्षेत्रात जायचे असल्यास मास्टर इन एज्युकेशन झाल्यानंतर आणखी एक-दोन वष्रे विशेष अभ्यास करावा लागतो.
फिनलंड हा लोकशाही देश असल्याने तेथे अध्यापकांच्या हक्कांसाठी झगडणारी मान्यताप्राप्त युनियन आहे. ही युनियन देशव्यापी आहे. या युनियनच्या जागरूकतेमुळे वर्गातील विद्यार्थीसंख्या मर्यादित राहते. एका वर्गात सर्वसाधारणपणे २०पेक्षा जास्त विद्यार्थी नसतात. अध्यापकांची क्षमता जपण्यावर आणि वाढवण्यावरसुद्धा युनियनचा भर असतो. आपल्या अध्यापकांची क्षमता चांगली असल्याचा युनियनला अभिमान आहे.
अध्यापकांच्या निवडीसाठी परीक्षा असली तरी फिनलंडच्या शैक्षणिक प्रणालीमध्ये मोठय़ा प्रमाणावर मानसिक ताण निर्माण होईल अशा कोणत्याही वार्षकि, सत्राच्या अंतिम किंवा प्रमाणित परीक्षाच नसतात. केवळ एक परीक्षा नऊ वर्षांच्या प्राथमिक शाळेनंतर माध्यमिक शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना द्यावी लागते.
फिनलंडच्या शाळांमध्ये शैक्षणिक स्पर्धा हा प्रकार तसा निषिद्ध आहे, असे म्हणता येईल. येथे कोणतीही 'मेरीट लिस्ट' प्रसिद्ध केली जात नाही. पण असे असले तरी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या क्षमतांची, त्यांच्या प्रगतीची काळजीपूर्वक नोंद केली जाते. मूल्यमापनासंदर्भात विद्यार्थ्यांना ग्रेडस् म्हणजे श्रेणी दिल्या जातात. ज्या विद्यार्थ्यांला कोणत्याही प्रकारच्या मदतीची आवश्यकता असेल तर अध्यापक स्वत: किंवा विशेष शिक्षक वा समुपदेशक योग्य ती मदत करतात.
जागतिक शैक्षणिक क्रमवारीत जेव्हा फिनलंड पहिल्या-दुसऱ्या क्रमांकावर असतो तेव्हा त्याचे अप्रूप इथल्या शिक्षकांना वाटत नाही. 'जगाने नोंद घेतली, ठीक झाले' अशी या शिक्षकांची यावर संयमित प्रतिक्रिया असते. कारण त्यांच्या मते, जगात प्रथम क्रमांक मिळवणे हे त्यांच्या कार्यपद्धतीचे उद्दिष्ट नाहीच! त्यांचे उद्दिष्ट आहे ते मुलांना 'शिकावे कसे' हे शिकवणे आणि त्यांना सकारात्मक व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी मदत करणे.
फिनलंडचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, इथले ७५ टक्के नागरिक नियमितपणे रोजचे वर्तमानपत्र वाचतात. या देशात एकूणच वाचन मोठय़ा प्रमाणावर केले जाते. ग्रंथालयांचा सर्वात जास्त
वापर होणारा देश अशीही या देशाची ओळख सांगता येईल. दर वर्षी इथले नागरिक सरासरी १७ पुस्तके वाचतात, असे निदर्शनास आले आहे.
ही आहेत शैक्षणिकदृष्टय़ा जगात अग्रणी असलेल्या फिनलंडच्या शालेय शिक्षण पद्धतीतील काही टिपणे. तेथील शिक्षणपद्धती संपूर्ण निर्दोष आहे असा दावा करणे कदाचित योग्य ठरणार नाही. परंतु आपल्याला काय हवे, हे त्यांच्याकडून शिकायला, त्यांच्याकडून स्फूर्ती घ्यायला प्रचंड वाव आहे, हे मात्र नक्की!

शिक्षणविषयक पुस्तके

शिक्षक म्हणून आपला बौध्दिक पाया पक्का करण्यासाठी काही
पुस्तके

शिक्षक व पालकांसाठी
वाचनीय व संग्राह्य पुस्तके-
अर्थातच ही यादी बरीच वाढवता येईल. आपण यात भर घालालच...

क्र.,पुस्तकाचे नाव, लेखक, प्रकशक, किमंत या क्रमाने-

1. शाळा भेट नामदेव माळी साधना 100
2. लिहणं मुलांचं शिकवणं शिक्षकांचं लिला पाटील उन्मेष 80
3 ऐलमा पैलमा शिक्षण देवा लिला पाटील उन्मेष 100
4 प्रवास ध्यासाचा....आनंद सृजनाचा लिला पाटील उन्मेष 280
5 परिवर्तनशिल शिक्षण लिला पाटील उन्मेष 150
6 शिक्षणातिल ओअँसिस लिला पाटील उन्मेष 140
7 शिक्षण देता,घेता लिला पाटील उन्मेष 120
8 शिक्षणातील  लावण्य लिला पाटील ग्रंथाली 100
9 बालकहक्क लिला पाटील ग्रंथाली 225
10 अनुताईंच्या सहवासात सिंधुताई अंबिके ग्राममंगल 80
11 वटवृक्षच्या सावलीत सिंधुताई अंबिके ग्राममंगल 175
12 मुलांच सृजनात्मक लिखाण मंजिरा निमकर जोत्स्ना 75
13 शिक्षणाच्या उगमापाशी सुचिता पडळकर मनोविकास 180
14 नीलची शाळा ए.एस.नील राजहंस 237
15 शिक्षण:विचारमंथन प्रा.रमेश पानसे डायमंड 150
16 रचनावादी शिक्षण प्रा.रमेश पानसे प्रा.रमेश पानसे 150
17 शिक्षण:परिवर्तनाची सामाजिक चळवळ प्रा.रमेश पानसे डायमंड 80
18 मुलांचे शिक्षण :पालक व शासन प्रा.रमेश पानसे डायमंड 100
19 गोष्टी सांगणार्‍यासाठी चार गोष्टी ताराबाई मोडक बालशिक्षण संशोधन केंद्र 25
20 बहुविध बुद्धिमत्तांचा विचार प्रा.रमेश पानसे बालशिक्षण संशोधन केंद्र 20
21 डॉ.मारिया मॉटेसोरी नवे दर्शन प्रा.रमेश पानसे बालशिक्षण संशोधन केंद्र 25
22 अल्पी कोहन यांचे काही लेख प्रा.रमेश पानसे बालशिक्षण संशोधन केंद्र 25
23 गृहपाठ श्रुति पानसे बालशिक्षण संशोधन केंद्र 25
24 मेंदु,भाषा आणि भाषा शिक्षण प्रा.रमेश पानसे बालशिक्षण 30
25 शोध घेते ते शिक्षण प्रा.रमेश पानसे अर्थबोध 50
26 बालशाळेचा विकासात्मक शिक्षणक्रम प्रा.रमेश पानसे महाराष्ट्र बालशिक्षण परिषद 150
27 निळे आकाश हिरवे झाड प्रा.रमेश पानसे ग्राममंगल 200
28 शिक्षण: आनंदक्षण प्रा.रमेश पानसे 200
29 लिहावे नेटके भाग 1,2 माधुरी पुरंदरे जोत्स्ना 400
30 वाचू आनंदे माधुरी पुरंदरे जोत्स्ना 200
31 शिकु या आनंदे रेणु दांडेकर मनोविकास 120
32 800 शालेय प्रकल्प रेणु दांडेकर 80
33 मुल घडताना घडविताना रेणु दांडेकर मनोविकास 120
34 निर्मितीचं आकाश रेणु दांडेकर मनोविकास 60
35 चिकनसुप जॅक कॉनफिल्ड मेह्ता 250
36 मुलांचे वालचंद ताराबाई मोडक ग्राममंगल 100
37 शिक्षणाचे मराठी माध्यम -अ‍नुभव.. डॉ. हेमा क्षिरसागर मराठी अभ्यास केंद्र ठाणे 150
38 गमंत शब्दांची डॉ द. दी.पुंडे
39 How to talk so kids will listen Adele Faber
40 जावे भावनांच्या गावा डॉ.संदीप केळकर राजहंस 150
41 एका समृध्द शाळेचा प्रवास कबीर वाजपेयी मनोविकास 400
42 सहज सोपे सुलभ विज्ञान प्रयोग अँण्डी बायर्स मनोविकास
43 टचिंग द व्हाइड ज्यो सिंप्सन मनोविकास 160
44 मुसाफिरी ज्ञान विज्ञान व शिक्षणाची प्रा.वसंतराव कर्डिले दिलीपराज 300
45 गणिती अच्युत गोडबोले मनोविकास 350
46 ख-या शिक्षणाच्या शोधात डेव्हिड ग्रिबल मनोविकास 350
47 का?कसं? ( 7 पुस्तके) डॉ.बाळ फोंडक मनोविकास 560
48 उद्योगी व्हा हृषिकेश गुप्ते मनोविकास 120
49 arvindguptatoys.com वरील free ebooks on education
50 मुलं नापास का होतात ? जॉन होल्ट मनोविकास 200
51 प्रिय बाई अ‍नुवाद सुधा कुलकर्णी मनोविकास 120
52 माय कंट्रीस्कुल डायरी जुलिया वेबर गार्डन मनोविकास 250
53 टीचर सिल्विया ऑश्टन मनोविकास 150
54 तोत्ताचान तेत्सुको कुरोयानागी नॅशनल बुक ट्रस्ट इंडीया 55
55 कोसबाडच्या टेकडीवरुन अनुताईं वाघ ऋचा 160
56 दिवास्वप्न गिजुभाई बधेका मनोविकास 100
57 शिक्षणाचे जादुई बेट डॉ. अभय बंग मनोविकास 40
58 बिचारी बालके तारबाई मोडक नुतन बाल शिक्षण संघ 20
59 धोका शाळा हेमलता होनवाड मनोविकास 70
60 अमादेर शांतिनिकेतन शिवानी कजा कजा मरु 60
61 शाळेपासुन मुक्ती वर्षापुरती राहुल अलवारिस मनोविकास
62 समरहिल ए.एस.नील
63 शिकवण्यायोग्य काय आहे? कृष्ण कुमार
64 मुलांची भाषा आणि शिक्षण कृष्ण कुमार मुलगामी 80
65 बाल साहित्य रविंद्र्नाथ ठाकुर साहित्य अकादमी 120
66 स्टीव्ह जॉब्ज अच्युत गोडबोले मेहता 140
67 प्रकाशवाटा डॉ.प्रकाश आमटे समकालीन 200
68 नेगल विलास मनोहर ग्रंथाली 120
69 आमचा काय गुन्हा रेणु गावस्कर शब्द 175
70 विचार तर कराल! डॉ. दाभोलकर राजहंस 120
71 युवा विज्ञान कुतुहल  आनंद घैसास
72 ठरल डोळ्स व्हायचं डॉ. दाभोलकर
73 कल्पक बनुया अशोक निरफराके ज्ञानप्रबोधिनी
74 विवेकी पालकत्व  अंजली जोशी शब्द पब्लिकेशन 200
75 मनश्री- सुमेध वडावाला राजहंस 200
76 पुण्यभूमी भारत सुधा मुर्ती मेहता 130
77 नापास मुलांची गोष्ट अरूण शेवते ऋतुरंग 225
78 माझी काटेमुंढरीची शाळा मो.ना.मुनघाटे साधना 100
79 माझा वेगळा उपक्रम नामदेव जरग
80 उपक्रम:वेचक वेधक डाॅ. वसंत काळपांडे
81 दीपस्तंभ प्रा. शिवाजीराव भोसले ओम अक्षरब्रम्ह 400
82 देशोदेशीचे दार्शनिक प्रा. शिवाजीराव भोसले ओम अक्षरब्रम्ह 200
83 सर्व प्रश्न अनिवार्य रमेश इंगळे शब्द 275
84 शोध नव्या दिशेचा संदीप वासलेकर
85 शतक शोधांचे मोहन आपटे 86 जोहड सुरेखा शहा सुमेरु 250
87 गुगलचा इतिहास अतुल कहाते
88 मला (न) कळलेले बाबा विलास मनोहर मनोविकास
89 श्रीमान योगी रणजित देसाई मेहता 400
90 सलाम मलाला संजय मेश्राम मनोविकास 100
91 खरडछाटणी नामदेव माळी मनोविकास
92. माझे सत्याचे प्रयोग m k गांधी
93. किमयागार अच्युत गोडबोले राजहंस
94. शिक्षक दिन पर्यायी सांस्कृतिक राजकारण हरिति प्रकाशन संपादन 200
95. आठवणीतील शाळा आणि शिक्षण scert पुणे 130
96. शिक्षा क्या है
जे कृष्णमूर्ति राजपाल 195
97. शिक्षण विचार विनोबा भावे पवनार आश्रम
98. शिक्षा में बदलाव का सवाल अनिल सदगोपाल ग्रंथशिल्पी दिल्ली 275
99. शिक्षा और लोकतंत्र जॉन डिवी ग्रंथशिल्पी 160
100. शर्यत शिक्षणाची व्ही रघुनाथ रोहन 150
101. कर्ता करविता मेंदू संशोधन रमेश पानसे इतर भारतीय अर्थ विज्ञान वर्धिनी पुणे 350
102. शिक्षण संपादन विलास रणसुभे लोकवाग़मयगृह 150
103. न पेटलेले दिवे राजा शिरगुप्पे साधना 100
104.अखंड प्रेरणा गांधी विचारांची सकाळ 165
105. अज्ञात गांधी नारायण भाई देसाई समकालीन 150
106. सृष्टी विज्ञान गाथा राजहंस 1100
107. मला उत्तर हवंय मोहन आपटे (सेरिज) राजहंस
108. वेध नक्षत्रांचा अतुल पाटणकर रोहन 125
109 विज्ञान जिज्ञासा खंड 1, 2 रा वि सोवनी  लोकवाग़मयगृह
110. विज्ञान तंत्रज्ञान कोश मराठी विज्ञान परिषद 385
111. निवडक किशोर खंड 4 बालभारती
112. डोंगर यात्रा आनंद पाळदे प्रफुल्लता पुणे 350
113. नो प्रॉब्लम अंजली पेंडसे अनुश्री प्रकाशन 150
114. गणित शिक्षणातील काही महत्त्वाची वाचने होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई
115.गारांचा पावूस शोभा भागवत उन्मेष 70
116. शिकवण्यायोग्य काय आहे? कृष्ण कुमार जोत्स्ना अनुवाद अरुण ठाकूर100
117. समनतेसाठी शिक्षण जीवन शिक्षण scert पुणे 50
118. आमचं बालपण उल्का राउत रोहन 150
119. माझा साक्षात्कारी हृदयरोग अभय बंग राजहंस 150
120.का कराचं शिकून? लक्ष्मण माने ग्रंथाली 70
121. वैखरी- अशोक केळकर- स्नेह वर्धन पुणे.250
122. दप्तरातल्या कविता संपादन तृप्ती अंधारे
123. करके देखो  समकालीन 250
124. खरे खुरे आयडॉल समकालीन225
125. हाती ज्यांच्या शून्य
होते समकालीन225
126.शिकण्याच्या वाटेवरचं आनंदवन

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...