Pages

Friday, September 2, 2016

झिका रोग

ब्राझिलमध्ये थैमान घालणारा झिका रोग आशियायी खंडात देखील पसरत आहे. आशिया खंडातील काही देशांमध्ये हा रोग अधिक जलद गतीने पसरू शकतो असे नव्या संशोधनातून समोर आहे आहे. एडिस एजिप्ती या डासामुळे होणा-या झिकाने आधिच ब्राझिल आणि दक्षिण अमेरिकी देशांत थैमान घातले आहे. पण नव्या माहितीप्रमाणे भारतात देखील हा रोग पसण्याची शक्यता आहे. भारताबरोबर चीन, फिलीपिन्स, इंडोनेशिया, पाकिस्तान, नाजेरिया, व्हिएतनाम यांसारख्या देशांना या झिकाचा धोका अधिक आहे.
या देशांमध्ये पर्यटकांचा राबता हा जास्त आहे. ज्या देशांत झिकाचा प्रार्दुभाव आहे अशाच देशांतून भारत आणि वर नमूद करण्यात आलेल्या देशांत अधिक पर्यटक येतात त्यामुळे झिकाचा प्रसार या देशांत होऊ शकतो अशी भिती या संशोधातून व्यक्त करण्यात आली आहे. कमरन खान यांनी केलेल्या संशोधनातील प्रंबधात याविषयी अधिक माहिती मांडण्यात आली आहे. तसेच झिकाचा विषाणूचा प्रसार होण्यासाठी या देशातील बदलते हवामान कारणीभूत आहे त्यामुळे झिकाचा धोका या देशांना अधिक असल्याचे म्हटले आहे. या देशांतील लोकसंख्या ही सगळ्यात जास्त असल्याने यातून होणारे नुकसान हे मोठे असणार आहे असेही त्यात म्हटले आहे. झिकाची लागण होऊ नये यासाठी अनेक देशांत आधीच उपाययोजना केल्या आहेत पण मानवी शरीरातील रोगप्रतिकार शक्तीवर हे अवलंबून असल्याचेही या संशोधनात नमूद करण्यात आले आहे. गेल्याच आठवड्यात सिंगापूरमध्ये झिकाचा पहिला रुग्ण आढळला होता, त्यानंतर गुरूवारीच तेथील १३ भारतीयांना झिकाची लागण झाल्याचे पराराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. मलेशियामध्ये देखील झिकाचा रुग्ण आढळला त्यामुळे आशियायी देशांत झिकाचा प्रसार होण्यास सुरूवात झाली हे नक्की. आता भारतासहित अनेक देशांची नावे समोर आल्याने भारताला सुरक्षेच्या दृष्टीने अधिक उपायोजना कराव्या लागणार आहेत.

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...