Pages

Showing posts with label सरल. Show all posts
Showing posts with label सरल. Show all posts

Saturday, October 1, 2016

Student Portal

*सरल महत्वाचे* :
*दिनांक* : *३० सप्टेंबर २०१६*
(अतिमहत्वाची माहिती असल्याने सर्वांना share करावी ही विनंती)

             *student पोर्टल विशेष*

या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता दिनांक ३० सप्टेंबर २०१६ या दिवशी भरलेली माहितीच्या आधारे होणार हे निश्चित झाले होते परंतु अद्याप काही शाळाचे पेंडिंग काम लक्षात घेता आज दिनांक 29 सप्टेंबर २०१६ रोजी *मा.डॉ.श्री सुनील मगर साहेब,अध्यक्ष ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा शिक्षण संचालक बालभारती* यांच्या उपस्थितीत झालेल्या मिटिंग मध्ये ही अंतिम मुदत *दिनांक ७ ऑक्टोंबर २०१६* रोजी पर्यंत सर्व शाळांना वाढवून देण्यात आलेली आहे.दिनांक ७ ऑक्टोंबर २०१६ रोजी मध्यरात्री १२ वाजेनंतर सर्व शाळांचे online माहिती भरण्याची सुविधा बंद करून शाळेच्या अंतिम पटाची माहिती cluster login ला verify करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे याची नोंद घ्यावी.तत्पूर्वी सर्व शाळांनी आपली माहिती व्यवस्थितरीत्या भरून पूर्ण करावी.आपण भरलेली माहिती जी *७ ऑक्टोंबर २०१६ ला cluster login ला system द्वारे automatic forward केली जाणार आहे* .दिनांक १ ऑक्टोंबर पासून मुख्याध्यापक login ला संच मान्यता या नावाची tab उपलब्ध करून दिली जाणार आहे यामध्ये आपली कोणती माहिती cluster ला पाठवली जाणार आहे याविषयीचा सविस्तर report दाखवला जाणार आहे.हा report पाहून मुख्याध्यापकाने आपल्या माहितीची खातरजमा करावी आणि कमी जास्त असलेली माहिती update करून घ्यावी.दिनांक ७ ऑक्टोंबर २०१६ रोजी मध्यरात्री सदर माहिती system द्वारे verify करण्यासाठी केंद्रप्रमुखांना verify करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे.मुख्याध्यापकांना सदर माहिती cluster लेवल ला forward करण्याची आवशकता नाही,ती माहिती system द्वारे पाठवण्यात येणार आहे.त्यामुळे दिनांक ७ ऑक्टो २०१६ रोजीपर्यंत आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांची अचूक माहिती भरून पूर्ण असणे गरजेचे आहे.यामध्ये कोणकोणती माहिती भरून पूर्ण असावी आणि ती कशा रीतीने पूर्ण करावी याबाबत सदर पोस्ट मध्ये सुचना करण्यात येत आहे,तरी सदर पोस्ट सविस्तर रीत्या सर्वांनी वाचावी अशा सुचना देण्यात येत आहे.

                  *New Entry*

*अ) इयत्ता १ ली च्या नविन मुलांची माहिती system ला भरणे* : या वर्षी नव्याने इयत्ता १ ली ला प्रवेश घेतलेला आहे अशा सर्व मुलांची माहिती offline excel शीट द्वारे भरण्याची सुविधा मुख्याध्यापक login ला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.मुख्याध्यापकाने सदर माहिती भरताना मुख्याध्यापक login मधून excel या tab मधून download personal या बटनावर क्लिक करून एक excel शीट download करून घ्यावी.आणि सदर शीट मध्ये offline पद्धतीने इयत्ता १ ली च्या सर्व मुलांची माहिती अचूक भरावी.आणि सदर शीट ही .csv(comma delimited) या format मध्ये रुपांतरीत करावी आणि पुन्हा मुख्याध्यापक login मधून excel या tab मधून upload personal या बटनावर क्लिक करून सदर file upload करावी.ही माहिती भरत असताना काही शाळांना नविन तुकडी तयार करण्यासाठीचा error दाखवण्यात येत आहे.ज्या शाळांनी मागील वर्षी तुकडी तयार करून पुन्हा delete केल्या आणि पुन्हा दुसरी तुकडी तयार केली आहे अशा शाळांना सदर error येत आहे.अशा शाळांनी excel या tab मधून download personal या बटनावर क्लिक करून एक excel शीट download करताना त्या सोबत एक word या format मध्ये असणारी read me file download होते ती काळजीपूर्वक वाचावी.या file मध्ये ६० ते ६२ व्या ओळीमध्ये आपल्या शाळेत पुढील प्रमाणे माहिती देण्यात आलेली आहे.आपणास सदर माहिती उदाहरणार्थ म्हणून दाखवण्यात येत आहे.ती वाचावी.

Select division number as,

*Stream* : Not Applicable
*Division No.* : 1
*Division* : A
*Medium* : Marathi

अशा प्रकारे आपल्या शाळेत इयत्ता १ ली च्या मुलांची माहिती भरताना stream,division no. , division आणि medium कोणते भरावे हे त्या word format मध्ये असणाऱ्या *read me* या file मध्ये देण्यात आलेले आह.अगदी त्याचप्रमाणे आपण मुलाची माहिती भरताना सदर माहिती भरावी.आणि त्यानंतर .csv format मध्ये सदर file रुपांतरीत करून system ला अपलोड करावी.म्हणजे आपणास वरील error येणार नाही.

काही विद्यार्थी हे मागील वर्षी १ ली होते आणि या वर्षी ते इयत्ता २ री ला आहेत परंतु पालकाने सदर मुलाला जुन्या शाळेतून काढून दुसऱ्या नविन शाळेत दाखल केले आहे परंतु अशा मुलाला त्यांनी नविन शाळेत इयत्ता १ ली च्या वर्गात प्रवेश घेतलेला आहे.अशा मुलांची मागील वर्षी नोंद झालेली असताना नविन शाळा पुन्हा १ ली ला new entry या सुवीधेमधून नोंदवत असल्याचे दिसून येत आहे.अशा शाळांनी हे लक्षात घ्यावे की आपण अशा मुलांची duplicate entry तयार करत आहात.हे योग्य नाही आहे.तरी अशा मुलांच्या बाबतीत अशा नविन शाळांनी जुन्या शाळेस ट्रान्स्फर ची request पाठवावी आणि सदर मुलाला standard updation या बटनावर क्लिक करून इयत्ता २ री तून इयत्ता १ ली करून घ्यावी.जुन्या शाळेतून नविन शाळेने दाखला घेतला नसेल तरी जुन्या शाळेने सदर मुलाला ट्रान्स्फर करन्यास हरकत नाही आहे.परंतु कोणत्याही परिस्थितीत नविन शाळेने कोणत्याही विद्यार्थ्यांची माहिती duplicate होणार नाही याची नोंद घ्यावी.अन्यथा अशी duplicate entry असलेले मुले हे संचमान्यता साठी गृहीत धरली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
 
*ब) इयत्ता २ ते १२ वी च्या मुलांची जी मुले मागील वर्षी student पोर्टल मध्ये नोंदवली गेली नाही आहे अशा मुलांची माहिती new entry म्हणून भरणे* :
   सन 2015-16 मध्ये आपण सरल मध्ये आपल्या विद्यार्थ्याची माहिती भरलेली आहे,ही माहिती भरत असताना अनावधानाने काही विद्यार्थ्याची नोंद सरल ला करायची राहून गेलेली आहे.सन 2016-17 या वर्षी फक्त 1 ली च्या नवीन मुलांची माहिती offline पद्धतीने सरल मध्ये नोंदवण्याची सुविधा यापूर्वीच उपलब्ध करून दिली आहे.परंतु मागील वर्षीचे राहिलेले विद्यार्थी आणि या वर्षी नव्याने दाखल झालेले इतर वर्गातील मुले *(परराज्यातील मुले/ वयानुरूप दाखल मुले/readmission)* या मुलांची माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आलेली आहे याची नोंद घ्यावी.ही सुविधा beo लॉगिन द्वारे शाळेला उपलब्ध करून दिली आहे.जर आपल्या शाळेत असे विद्यार्थी नोंद करावयाचे राहिले असतील तर आपण आपल्या गटशिक्षणाधिकारी म्हणजेच beo लॉगिन ला विनंती करावी की ही सुविधा आमच्या शाळेला उपलब्ध करून द्यावी. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी सदर शाळेला ही सुविधा देणे गरजेचे आहे किंवा नाही याची शहानिशा करतील आणि *खात्री करून* ती सुविधा आपल्या लॉगिन मधून उपलब्ध करून देतील,तशी सुविधा beo लॉगिन ला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.त्यानंतर ती शाळा त्यांच्याकडे असणाऱ्या कोणत्याही वर्गातील मुलांची माहिती ही online भरू शकतील याची नोंद घ्यावी. *गटशिक्षणाधिकारी आपल्या लॉगिन मधून एका वेळेला केवळ ३० शाळेलाच ही परवानगी देऊ शकत होते परंतु आता अशी मर्यादा १०० पर्यंत वाढवण्यात आलेली आहे* .ज्या शाळेला परवानगी दिली जाईल त्या शाळेला beo यांनी दिलेल्या विहित वेळेत ते काम पूर्ण करावयाचे आहे.किती तारखेपासून किती तारखेपर्यंत ही सुविधा त्या त्या शाळेला असेल हे beo त्या शाळेला परवानगी देताना ठरवू शकतील,तसे option त्यांच्या लॉगिन ला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.शाळेला अशी माहिती भरण्यासाठी किती काळ द्यावा हे beo यांनी काळजीपूर्वक ठरवावे जेणेकरून आपल्या कार्यक्षेत्रात सर्व शाळेची माहिती ही *दिनांक ०७ ऑक्टोंबर २०१६* पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावयाची आहे याची गामभीर्याने नोंद घ्यावी.अशा प्रकारे beo यांनी त्वरित या सुविधेचा उपयोग करून आपल्या कार्यक्षेत्रातील अशा शाळांना ही सुविधा शहानिशा करून उपलब्ध करून द्यावी.Beo login मधून सदर काम कसे करायचे याबाबत चे *मराठी मॅन्युअल* आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.कृपया या ब्लॉग ला भेट द्यावी.तसेच या सुविधेचा वापर करून काही शाळा इतर शाळेतून आपल्या शाळेत आलेल्या विद्यार्थ्याना ट्रान्सफर करून न घेता या सुविधेमधून add करत आहे अशा शाळेंना सूचना आहे की अशा पद्धतीने आपण जर विद्यार्थी add करून घेतले तर ते विद्यार्थी सिस्टिम द्वारे यथावकाश काढण्यात येतील.त्यामुळे भविष्यात जर आपले हे विद्यार्थी आपल्या कॅटलॉग ला दिसले नाही तर यासाठी केवळ संबंधितास जबाबदार धरले जाईल याची गाम्भीर्याने नोंद घ्यावी तसेच असे विद्यार्थी संच मान्यतेसाठी गृहीत धरली जाणार नाही याची नोंद घ्यावी.आपण भरलेल्या प्रत्येक मुलाचे verification होणार आहे याची नोंद घ्यावी.

*महत्वाचे* : आपल्या शाळेला आलेली विद्यार्थी ट्रान्स्फर request ही approve करणे हे सर्व शाळांवर बंधनकारक आहे.जर एखाद्या मुलासाठी ज्या शाळेने request पाठवायला हवी परंतु त्या ऐवजी दुसऱ्याच शाळेने request पाठवली असेल तर सदर विद्यार्थी जोपर्यंत approve अथवा reject होत नाही तोपर्यंत कोणत्याही शाळेस अशा विद्यार्थ्यांसाठी request पाठवण्यासाठी दिसत नव्हता.अशा वेळी नविन शाळेला असे वाटत होते की सदर विद्यार्थ्याची मागील वर्षी नोंद झालेली नाही आहे तरी आपण या विद्यार्थ्यांची new entry म्हणून नोंद करून घ्यावी.असे वाटणे सहाजिक आहे हे लक्षात घेऊन आता अशा केस मध्ये एक नविन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.जर एखाद्या शाळेने आपल्या आधी student ट्रान्स्फर ची request पाठवली असेल तरी तो विद्यार्थी आता इतर शालेना देखील दिसून येईल.त्या विद्यार्थ्याला इतर कोणत्या शाळेने request पाठवली आहे हे देखील दिसेल.अशा मुलाच्या बाबतीत त्यांच्या गटशिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापक यांची संपर्क माहिती आपणास दाखवण्यात येणार आहे जेणेकरून आपण सदर गटशिक्षणाधिकारी याना संपर्क करून सदर request ही reject करण्यास सांगु शकाल जेणेकरून request पाठवण्याकरता सदर विद्यार्थी त्याच्या नविन शाळेस उपलब्ध होऊ शकेल.

तसेच कालपासून सर्व गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्या login मध्ये student search करण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.या मधून student सरल id असलेले विद्यार्थी परंतु student पोर्टल मध्ये दिसत नसलेले विद्यार्थी शोधता येतील.

      *३)विद्यार्थी out of school करणे*

      मागील वर्षी student पोर्टलमध्ये नोंद केलेले आपल्या शाळेतील मुले काही कारणास्तव शाळा सोडून गेले आहेत आणि अशा मुलांना त्या वर्गाच्या पटामधून कमी करणे गरजेचे आहे यासाठी एक नविन सुविधा म्हणजेच त्या विद्यार्थ्याला out of school करण्याची सुविधा student पोर्टल मध्ये मुख्याध्यापक login मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.यासाठी खालील माहिती वाचा.

सर्वप्रथम आपल्या शाळेचे login करावे आणि maintenance tab मधील update standard data या बटनावर क्लिक करावे.यानंतर दिसून येणाऱ्या Type या tab मधील out of school हा पर्याय निवडावा आणि select reason मध्ये  विद्यार्थ्याला आपण आपल्या शाळेतून म्हणजेच या वर्षी लागणाऱ्या संच मान्यतेसाठीच्या विद्यार्थी संख्येमधून कमी करण्यासाठी ज्या कारणामुळे कमी करणार आहोत ते कारण select करावे.
सदर कारणामध्ये खालील कारणांचा समावेश करण्यात आलेला आहे.

*Absent Since Long Period* : असे विद्यार्थी जे बऱ्याच दिवसापासून शाळेत येत नाही.(कायम गैरहजर)

*Couldn’t Continue Higher Education* : पुढील शिक्षण पूर्ण करू शकला नाही आणि शाळा सोडून गेला आहे असे विद्यार्थी.

*Died* : मयत विद्यार्थी.

*Don’t Have Higher Standard And Not Requested For Transfer* : शिक्षणासाठी पुढील वर्ग उपलब्ध नाही आणि इतर शाळेत शिकण्यास गेला नाही किंवा नवीन शाळेत शिकण्यास गेला आहे पण नविन शाळेची ट्रान्स्फर ची विनंती आलेली नाही असे विद्यार्थी.

*Not Required Transfer* : विद्यार्थी ट्रान्स्फर ची आवशकता नसलेले विद्यार्थी.

*10th Fail* : १० वी इयत्ता अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी.

*12th Fail* : १२ वी इयत्ता अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी.

*12th pass* : १२ वी उत्तीर्ण असलेले विद्यार्थी.

select reason मध्ये वरील योग्य कारणाचा पर्याय निवडावा आणि त्या समोर असलेल्या Enter Remark या बटनासमोर असलेल्या रकान्यात शक्य असेल तर शेरा (remark) लिहावा.

यानंतर आपणास ज्या विद्यार्थ्याला कमी करावयाचे आहे अशा विद्यार्थ्याला शोधावयाचे आहे.तो विद्यार्थी शोधण्यासाठी आपण दिलेल्या कोणत्याही पर्यायाचा वापर करू शकाल.अशा विद्यार्थ्यास शक्य तो त्याच्या standard निहाय शोधणे योग्य असते. यामध्ये शैक्षणिक वर्ष,इयत्ता,शाखा आणि तुकडी या बटनासमोर आपणास लागू असलेला पर्याय निवडा आणि शेवटी असलेल्या submit  बटनावर क्लिक करा.शेवटी असलेल्या submit  बटनावर क्लिक केल्यावर विद्यार्थी यादी  उपलब्ध होते.ज्या विद्यार्थ्याला आपणास कमी करावयाचे आहे अशा विद्यार्थ्यास आपण select करून घ्यावे.विद्यार्थ्यास select केल्यावर शेवटी असणाऱ्या submit बटनावर क्लिक करावे.त्यानंतर विद्यार्थी त्या तुकडीमधून out of school केलेला आहे अशा अर्थाची सुचना पहावयास मिळेल.म्हणजेच विद्यार्थ्यास out of school करण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली असे समजावे.

आता सदर विद्यार्थी आपल्या शाळेच्या सन २०१६-१७ च्या कॅटलॉग  मध्ये दिसून येणार नाही हे लक्षात घ्यावे.विद्यार्थी out of school केला म्हणजे system मधून कायमचा delete केलेला आहे असे समजणे चुकीचे आहे.out of school केलेले विद्यार्थी हे फक्त या वर्षीच्या संचमाण्यतेसाठी गृहीत धरण्यात येणार नाही आहे.असे विद्यार्थी पुन्हा शाळेत आणण्यासाठी शाळेने प्रयत्न करावयाचे आहेत.तसेच सदर मुलांची यादी ही सर्व login ला दाखवण्यात येणार आहे.
महत्वाचे : चुकून एखादा विद्यार्थी हा out of school झालेला असेल तर त्या विद्यार्थ्याला पुन्हा त्याच शाळेत घेता येईल.तसेच out of school   केलेले विद्यार्थी इतर शाळेला ट्रान्सफर साठी उपलब्ध असतील हे लक्षात घ्यावे.
तसेच विद्यार्थ्याला out of school कसे करावे याबाबत whatsapp वर बऱ्याच वेगवेगळ्या पोस्ट share होताना दिसत आहेत.सदर माहिती ही केवळ समजुतीचा घोटाळा आहे. *काही post मध्ये विद्यार्थ्याला notknown तुकडीत update केल्याने विद्यार्थी out of school करता येईल असे सांगण्यात आलेले आहे जे पूर्णपणे चुकीचे आहे* .तरी सर्वांना सूचित करण्यात येत आहे की अशा कोणत्याही पद्धतीने विद्यार्थी out of school करू नये.आणि जर या चुकीच्या माहितीच्या आधारे जर यापूर्वीच आपण सदर विद्यार्थी out of school केला असेल तर तर आता वरती सांगितलेल्या पद्धतीने विद्यार्थ्यास out of school करावे.अधिकृत सुचना आणि post व्यतिरीक्त कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवू नये अशा सुचना या post द्वारे देण्यात येत आहे.

महत्वाचे : out of school चे काम कसे करावे हे समजून घेण्यासाठी कृपया आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या. अथवा out of school चे manual mobile मध्ये download करून घेण्यासाठी पुढील लिंक ला क्लीक करा.
*लिंक* :  https://goo.gl/ZnYYRR

                     *४)प्रमोशन*

इयत्ता १ ते ८ चे system द्वारे *ऑटो प्रमोशन* आणि इयत्ता ९ ते १२ चे मुख्याध्यापकाने करावयाचे *manual प्रमोशन* या दोन प्रकारे सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशन होणे अपेक्षित होते.परंतु हे प्रमोशन होत असताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे काही विद्यार्थ्यांचे प्रमोशन होऊ शकले नाही त्यासाठी प्रमोशन मध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आलेले आहे,हे बदल समजून घ्यावेत.

अ) इयत्ता १ ते ८ चे ऑटो प्रमोशन केल्यावर देखील काही मुलांचे प्रमोशन अद्याप झालेले नाही अशा मुलांचे प्रमोशन होऊ न शकल्याने सदर मुले हे कॅटलॉग मध्ये सं २०१५-१६ ला दिसत आहे.त्यामुळे सन २०१६-१७ च्या होणाऱ्या संच मान्यतेसाठी सदर मुलांना system गृहीत धरणार नाही त्यासाठी या मुलांना सन २०१६-१७ या वर्षीच्या कॅटलॉग मध्ये घेऊन जाणे गरजेचे आहे हे लक्षात घ्यावे.ही मुले २०१६-१७ च्या कॅटलॉग मध्ये कसे घेऊन जावे यासाठी पुढील केस चा विचार करून काम करावे.

*जर विद्यार्थी सध्या आहे त्याच वर्गात दिसत असेल म्हणजेच योग्य वर्गात दिसत असेल परंतु २०१५-१६ च्या कॅटलॉगला दिसत असेल तर अशा मुलांना आपण प्रमोशन या सुविधेचा उपयोग करून पुढील वर्गात घेऊन जावे.अशा रीतीने तो विद्यार्थी आता सं २०१६-१७ च्या कॅटलॉग मध्ये दिसेल परंतु तो विद्यार्थी त्याच्या आहे त्या वर्गापेक्षा पुढील वर्गात दिसून येईल.त्यासाठी मुख्याध्यापक login ला असलेल्या standard change या बटनाचा वापर करून आपण सदर मुलास पुन्हा आहे त्या वर्गात घेऊन येऊ शकाल.
या ठीकानी एक बाब लक्षात ठेवणे गरजेचे आहे की student प्रमोशन मध्ये विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष बदलते परंतु student ट्रान्स्फर मध्ये आणि standard अपडेशन मध्ये मात्र शैक्षणिक वर्ष बदलत नाही याची नोंद घ्यावी*

*जर विद्यार्थी २०१६-१७ च्या कॅटलॉग ला दिसत आहे परंतु मागील वर्गात आहे अशा मुलांना आपण standard अपडेशन या सुविधेद्वारेच पुढील वर्गात घेऊन जावे.अशा केस मध्ये student प्रमोशन करू नये.अशी मुले आपणास प्रमोशन मध्ये दिसणार नाही* .

*जर विद्यार्थी २०१६-१७ च्या कॅटलॉग ला दिसत आहे परंतु खऱ्या वर्गापेक्षा पुढील वर्गात दिसत आहे अशा मुलांना आपण standard अपडेशन या सुविधेद्वारेच मागील वर्गात घेऊन यावे* .

*महत्वाचे* : जे विद्यार्थी आपणास २०१५-१६ च्या कॅटलॉग मध्ये दिसत आहे परंतु आता ते विद्यार्थी manual प्रमोशन करताना मात्र दिसत नाही असे फार थोडे विद्यार्थी आहेत असे दिसत आहे.फक्त अशा केस मधील विद्यार्थी आपण आम्हाला त्वरीत कळवावे.यासाठी आपण idreambest@gmail.com या आय डी वर email करू शकाल.आपली समस्या सोडवण्यात येईल अन्यथा या  http://goo.gl/9vBAQ8  लिंक वर क्लिक करा आणि आम्हाला आपली समस्या कळवा.ती दूर केली जाईल.

ब) इयत्ता ९ ते १२ वीच्या manual प्रमोशन मध्ये प्रमोशन करताना काही शाळांनी इयत्ता १० वीचे प्रमोशन ११ वी ला करताना same school ला करण्याऐवजी चुकून different school ला केले आहे आणि आता ते मुले त्याच शाळेत same school ला हवी आहेत अशा केस मध्ये ही मुले त्या शाळेला दिसत नाही.अशा केस मध्ये बऱ्याच शाळा इतर शाळांना ही मुले ट्रान्स्फर करतात आणि पुन्हा आपल्या शाळांना परत ट्रान्स्फर करून मुलांना आपल्या शाळेत आणतात.कारण different school ला प्रमोट केलेली मुले ही जरी त्या शाळेला दिसत नसतील तरी इतर शाळांना ही मुले ट्रान्स्फर साठी दिसतात.ही प्रोसेस पूर्णपणे चुकीची आहे हे लक्षात घ्यावे.अशा मुलांना पुन्हा आपल्या शाळेत दाखवण्यासाठी येत्या दोन दिवसात आपणास नविन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे,त्या द्वारे आपण सदर मुलांना आपल्या शाळेत दाखवू शकाल याची नोंद घ्यावी.

१० वी आणि १२ वी चे विद्यार्थी जर प्रमोशन करून देखील त्याच वर्गात दिसत असेल तर असे विद्यार्थी वरील email id वर मेल द्वारे कळवा अन्यथा या http://goo.gl/9vBAQ8  लिंक वर क्लिक करा आणि आम्हाला आपली समस्या कळवा.ती दूर केली जाईल.

            *५) Student Transfer*

विद्यार्थी जर एका शाळेतून दुसऱ्या शाळेत शिकण्यासाठी गेला असेल तर नविन शाळेने जुन्या शाळेस student पोर्टल मध्ये त्या विद्यार्थ्याची भरलेली माहिती online ट्रान्स्फर करण्यासाठी request पाठवावी.सदर request जुनी शाळा खात्री करून approve करेल.त्यानंतर ट्रान्स्फर झालेली सदर मुलाची माहिती ही नविन शाळा update करेल आणि सदर विद्यार्थी ट्रान्स्फर करण्याची प्रोसेस पूर्ण होईल.
परंतु या प्रोसेस मध्ये खालील प्रकारच्या केस दिसून येत आहे.

 *नविन शाळांनी जुन्या शाळेस request न पाठवणे* :

या केस मध्ये जुन्या शाळेच्या पटावर तो मुलगा दिसून येत आहे पण खर आर तो मुलगा शिकण्यासाठी इतर शाळेमध्ये गेलेला आहे.अशा जुन्या शाळांनी सदर मुलगा maintanance  या tab मध्ये जाऊन update standard data या tab चा वापर करून सदर मुलास out of school करून घ्यावे.अशाने सदर मुलगा आपल्या कॅटलॉग मध्ये दिसणार नाही आणि जेंव्हा नविन शाळा त्या विद्यार्थ्याची ट्रान्स्फर साठी request करेल तेंव्हा या मुलांना जुन्या शाळेच्या मुख्याध्यापकाने ट्रान्स्फर करावे.  out of school कसे करावे हे जाणून घेण्यासाठी या post मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहेच.तसेच अधिक आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या तेथे या विषयीचे manual उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

*ट्रान्स्फर साठी आलेली request approve न करणे* :

काही शाळा अद्याप देखील आपल्या शाळेस आलेल्या request या approve करत नाही असे दिसते.अशा केस कारण नसताना नविन शाळेस विद्यार्थी आपल्या कॅटलॉग ला दिसत नाही आहे.त्यामुळे आपल्या संच मान्यतेसाठी सदर विद्यार्थी येईल की नाही अशी भीती या शाळांना वाटत आहे.परंतु नविन शाळेने अशा बाबतीत अजिबात न गोंधळता संयमाने घ्यावे.बऱ्याच शाळा अशा मुलांना new entry द्वारे नोंद करून duplication करत आहे.हे योग्य नाही आहे.एकत्र ज्या शाळा आपल्याला आलेल्या request approve करत नाही आहे अशा मुख्याध्यापकाला आणि त्या शाळेच्या गटशिक्षणाधिकारी यांना यासाठी जबाबदार धरण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.तरी सर्व शाळांनी आणि गटशिक्षणाधिकारी यांनी आपणास आलेल्या सर्व request त्वरीत approve कराव्यात अशा सूचना मा.डॉ.मगर साहेब,अध्यक्ष ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य यांच्याकडून परवा झालेल्या व्ही सी मध्ये दिलेल्या आहेत.

*विद्यार्थी ट्रान्स्फर होऊन आलेला आहे परंतु नविन शाळांनी तो विद्यार्थी अद्याप update केलेला नाही आहे* :

या केस मध्ये जुन्या शाळेने विद्यार्थी request approve केलेली आहे परंतु नविन शाळेने सदर मुलास अद्याप update केलेले नाही आहे.जोपर्यंत ट्रान्स्फर झालेला मुलगा update केला जात नाही तोपर्यंत मुलगा हा कॅटलॉग ला दिसनार नाही याची नोंद घ्यावी.असे लाखो विद्यार्थी अद्याप update करावयाचे बाकी आहे हे student पोर्टल च्या dash बोर्ड वरील आकड्यावरून समजते.तरी सर्व मुख्याध्यापकांनी आपली ही मुले update करून घ्यावी.मुलाना update कशी करावी हे जाणून घेण्यासाठी आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या तेथे या विषयीचे manual उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

*चुकीच्या ट्रान्स्फर request करणे/approve करणे* :

 काही शाळांनी चुकीच्या मुलांच्या ट्रान्स्फर request केलेल्या आहेत त्या गटशिक्षणाधिकारी यांनी त्वरीत reject करून देणे गरजेचे आहे.कारण जोपर्यंत सदर ट्रान्स्फर request reject होत नाही तोपर्यत इतर शाळांना तो मुलगा ट्रान्स्फर request साठी लिस्ट मध्ये दिसून येत नाही.अशा वेळी नविन शाळांना असे वाटणे सहाजिक आहे की सदर विद्यार्थी हा मागील वर्षी नोंदवला गेला नाही आहे.अशा केस मध्ये मग नविन शाळा या विद्यार्थ्याला new entry मधून नोंदवत आहे. अशाने विद्यार्थ्यांचे dulpication वाढत असल्याचे दिसत आहे.यासाठी आता एका शाळेने ट्रान्स्फर request केली असले तर इतर शाळांना देखील तो मुलगा दिसेल अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.सदर मुलास कोणत्या शाळेने ट्रान्स्फर request केलेली आहे त्या शालांचे आणि त्या शाळेच्या गटशिक्षणाधिकारी यांचे डिटेल देखील दाखवण्यात येणार आहे.त्याना संपर्क करून सदर ट्रान्स्फर request reject करण्यास सांगावे आणि मुलाला आपण ट्रान्स्फर करून घ्यावे.कोणत्याही परिएथितीत मुलाच्या नोंदी दुबार होऊ नये ही प्रत्येकाची जबाबदारी आहे हे लक्षात घ्यावे.

*ट्रान्स्फर request केलेली मुले जुन्या शाळेने approve केली आहे परंतु update ला नविन शाळेला न दिसणे* .:

अशा केस मध्ये जुनी शाळा बऱ्याचदा असे म्हणते की आम्ही ट्रान्स्फर request approve केलेली आहे परंतु प्रत्यक्षात मात्र तसे केलेले नसते.यासाठी आधी खात्री करून घ्यावी की जुन्या शाळेने आपण पाठवलेले ट्रान्स्फर request approve केले आहे की नाही.यासाठी आपल्याच login ला आपण ट्रान्स्फर request status या tab चा वापर करून  सदर बाबीची खातरजमा करू शकतो.आणि खरोखर असे झाले असेल तर कृपया  http://goo.gl/9vBAQ8   या लिंक ला क्लिक करा आणि आम्हाला डिटेल कळवा.आपली समस्या सोडवण्यात येईल.

*६) जनरल रजिस्टर चुकून create  झाल्याबाबत* :

बऱ्याच शाळांनी माहिती भरत असताना आपणास लागू नसताना जनरल रजिस्टर create केले आहे.त्यामुळे पूर्वी येत असणारे entire रजिस्टर न येता नविन create केलेले रजिस्टर येत आहे असे दिसून येत आहे.अशा वेळी पुन्हा चुकून केलेले रजिस्टर delete करता येत नाही.आणि नविन मुले upadate करताना समस्या येत आहे.तरी अशा शाळाना सुचना आहे की जर आपले जनरल रजिस्टर वेगळेच दिसत असले तरी त्या रजिस्टर ला select करून आपल्या शाळेतील मुलांना update करून घ्यावे.कॅटलॉग आणि संच मान्यता साठी ही सर्व मुले गृहीत धरली जाणार आहेत.तसेच सदर जनरल रजिस्टर दुरुस्थ/update करण्याची सुविधा देखील लवकरच दिली जाणार आहे.त्यामुळे गोंधळून न जाता आपले काम सुरु ठेवावे.

*७) Exceptions या नविन tab विषयी* .:

आपल्या शाळेतील मागील वर्षीचा रेकॉर्ड पाहता या वर्षी ज्या प्रोसेस होणे गरजेचे होते परंतु काही कारणास्तव प्रमोशन सारख्या प्रोसेस अद्याप झालेल्या नाही आहे अशा मुलांची आकडेवारी आणि सविस्तर माहती या tab मध्ये देण्यात आलेली आहे म्हणजेच आपली पेंडिंग कामे आपणास दाखवण्यात आलेली आहे.ही माहिती पाहून आपण आपली कामे पूरम करून घ्यावी.

*student पोर्टल बद्दल काही समस्या असेल तर पुढील लिंक वर क्लिक करा आणि आपली समस्या सविस्तर मांडा.आपली समस्या सोडवण्यात येईल.*
लिंक : http://goo.gl/9vBAQ8

आमच्या राज्यस्तरीय सरल whatsapp ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी पुढील लिंक ला क्लिक करा किंवा havelieducation.blogspot.in   या ब्लॉग ला भेट द्या तेथे उपलब्ध करून दिलेल्या लिंक ला क्लिक करा आणि आमच्या ग्रुपचे सदस्य व्हा.या ग्रुपवर सरल संदर्भात update माहिती मिळेल आणि आपल्या समस्या थेट आमच्यापर्यंत पोहचतील.

राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी *लिंक* :  
https://goo.gl/6CiLy0

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
 (Dont call,only whatsapp message)
Email: idreambest@gmail.com
Blog: havelieducation.blogspot.in

Saturday, September 10, 2016

School Portal

*सरल शाळा माहिती भरणे*

💎💎💎💎💎💎💎💎

*माहिती भरणे लवकरच सुरु होणार आहे*

*सन २०१६-१७ या साठी शाळा माहिती offline पद्धतीने भरायचे आहे*

*माहिती भरण्याचे स्टेप मी थोडक्यात सांगत आहे*

*या माहिती भरण्यासाठी आपले संगणाकात internet explorer हा browser चे वर्सन ९ किंवा त्या पेक्षा जास्त असावे*

*१)Internet explorer  open करा*

*२)होम पेज ओपन होईल त्या मध्ये उजव्या बाजूला वर setting चा symbol असेल त्या वर click करा*

*३)दिसणाऱ्या बरेच options पैकी internet option या वर click करा*

*४) या नंतर वरचे बाजूला General चे पुढे Security आहे त्या वर click करा*

५)त्या खाली custom म्हणून लिहले असेल
त्या खाली  एक box आहे त्या मद्ये right mark ✔ असेल.
त्या समोर
*Enable protected mode आहे.आता फक्त तुम्ही त्या box मध्ये असलेले right mark काढून टाका(box वर click करा box खाली होईल)*

*६)custem level या button वर click करा*

*आता Active X control and plug ins वर खालील प्रमाणे change करुन घ्या*

७)Allow. Active x filtering = *enable*

८)Allow priviosely used Active X = *enable*

९)Allow Scriptlet = *Disable*

१०) Atomatic prompting for ActiveX control = *Disable*

११)Binary and script behaviors= *Enable*

१२) Display video and animation = *Disable*

१३)Download signed Active x control= *Prompt*

१४) Download unsigned Active x control= *Prompt*

१५)Initialize and script Active X control = *Prompt*

१६) Only Allow approved domains = *Enable*

१७) Run Active X control and plug ins = *Enable*

१८) Run anti malware software on amActive X control = *Enable*


१९)  Only Allow approved domains = *Enable*


२०) Run Active x control and plug ins = *Enable*

२१)Run anti malware software in Active X control = *Enable*

२२) Run antiMalware software on Active X Control = *Enable*

२३) Script Active x control marked safe for = *Enable*

२४) *Ok या button वर  click करा, नंतर Apply या button वर click करा*

२५)  *browser बंद करुन ,परत एकदा चालु करा (Restart)*

२६) *internet explorer 9+ ने* education.maharashtra.gov.in
*वेवसाईट ओपन करा*

२७) *शाळा या button वर click करा व login व्हा*


२८) *होम tab मध्ये offline project आहे त्या वर click करा*

२९) *आपले ज्या भाषेत offline school data भरणे सोपे वाटते ते भाषा English, किंवा Marathi एका वर click करा*


३०) *Download offline data या button वर click करा*

३१) *file download करायचा का* ? विचारतो
*OK वर click करा*

३२) *आपले शाळेचा Udise code चा एक Zip file (तीन पुस्तक चिन्ह) दिसतो*

*Save या button वर click करा*


३३) *file पूर्ण download होई पर्यत वाट पाहा.*


३४) *file download झाल्यावर त्याला select करुन right click करा*


३५) *extract to udise code असतो त्या वर click करा*

३६)तुमच्या शाळेचा udise क्रमांकाच्या एक folder तयार होईल

३७) *पण file extract करण्यासाठी तुमचे संगणकात Winzip किंवा WinRAR हे software असणे आवश्यक आहे*

३७) *अता तुमच्या शाळेचा udise code असणाऱ्या folder select करुन open  करा*

*Open केल्या नंतर तिथे बरेच folder दिसेल*

३८) *आता Index.html या folder ला select करुन right click, open with, internet explorer करा*

३९)तुमच्या शाळेची माहीती भरायची offline project ओपन होईल

४०) *वेब पेज वर Allow blocked content या button वर click करा*

४१) *डाव्या बाजुचे सहा tab शाळा संबंधित आहे, व उजव्या  बाजुचे सहा tab student summery संबंधित आहे*


 ४२) *दोन्ही input format वर*
*Click करून आपली शाळेची माहिती print करुन घ्या*

४३) *School data entry प्रत्येक पेज ओपन करा,माहिती भरा सेव करा, finalize करा*

४४) *progress बार वर आपण किती माहिती भरले तपासा*

*१००% finalize झाले असेल तर prepare data for school वर click करा*

*एक नविन file तयार होईल ते file school portal login करुन upload करा*

४५) *जसे शाळा माहीती सेव finalize केले तसेच students summary data entry करा*

४६) *माहिती १००% finalize झाले तर Prepare data for student वर click करा, तयार झालेला नविन file school portal वर त्याच ठिकाणी upload करा*

४७) *लक्षात असु द्या आपण file download एक वेळ करुन upload दोन वेळ करायचा आहे*

४८) *शाळा इमारत व क्रिडांगणाच्या फोटो online upload करायचा आहे*


*हा मेसेज जतन star करुन ठेवा माहिती भरताना उपयोग होईल*

*धन्यवाद*

Saturday, August 27, 2016

सरल माहिती भरणे

Mobile वरून MDM भरण्यासाठी सोपा मार्ग guttedattatray.blogspot.com वर क्लिक करा माझा blog open होईल, त्यानंतर सर्वात खाली vew web version वर क्लिक करा म्हणजे PC वरील blog open होईल त्यानंतरblog वर प्रथम उजव्या बाजूला शैक्षणिक websites मुद्यामध्ये सरल या शब्दावर क्लिक करा, सरल website open होईल त्यातील म भो यो (MDM)वर क्लिक करा login करा व mobile वरून MDM माहिती भरा

Thursday, August 25, 2016

आधार माहिती भरणे शंका आणि समाधान. Student Portal

*आधारकार्ड माहिती शंका आणि समाधान*

(पोस्ट मोठी आहे पण काळजीपूर्वक वाचा. आपल्या शंकांचे निरसन होईल. आणि योग्य वाटली तर नक्कीच इतर अनेक ग्रुपवर शेअर करा. )
  🔵🔶 *आपलाच तंत्रस्नेही मित्र*🔶🔵  
              *शिवाजी नवाळे सर*
                 *राहुरी अ'नगर*
▶ *डाउनलोड केलेल्या फाईल मधील सर्वच मुलांचे आधारकार्ड उपलब्ध नसेल तर काय करावे*

➡ *उत्तर*- सर्वात प्रथम हे लक्षात घ्या की आपल्याला *100% मुलांचे आधार माहिती भरायची आहे.* पण जर काही कारणाने सर्वच मुलांची आधार माहिती उपलब्ध नसेल तर *जेवढ्या मुलांची माहिती उपलब्ध आहे तेवढ्या मुलांची माहिती भरून ती फाईल लगेच अपलोड करावी.* त्यानंतर राहिलेल्या मुलांची माहिती जमा करावी. आणि पुन्हा एकदा फाईल डाउनलोड करून पुन्हा राहिलेल्या मुलांची माहिती भरण्यासाठी हीच प्रोसेस परत एकदा करायची आहे.

▶ *मागील वर्षी आधार नंबर बरोबर असलेल्या मुलांची माहिती कोठे पाहावी*

➡  *उत्तर* - Student portal open केल्यानंतर Report tab मधील HM Level दिसते. त्यातील Adhar Report ला click करा.यामध्ये  *All Adhar निवडा. आता तुम्हाला ज्या वर्गाची माहिती पाहायची आहे तो वर्ग टाका. तुकडी निवडा. खालील Show report ला click* करा.
       आता तुम्हाला तुमच्या वर्गातील सर्व मुले दिसतात. ज्या मुलांच्या पुढे valid Adhar असे दिसते. अशा मुलांचे आधार नंबर योग्य आहे हे आपल्याला कळेल.

▶ *आधार च्या डाउनलोड केलेल्या Excel file मध्ये पटसंख्येपेक्षा मुले कमी का दिसतात?*

➡  *उत्तर* - मागील वर्षी आपण मुलांची माहिती भरलेली होती. त्यामधील काही मुलांचे आधार नंबर valid (म्हणजे बरोबर) झालेले होते. ज्या मुलांचे आधार नंबर बरोबर आहेत अशा मुलांची नावे परत आधार नंबर भरण्यासाठी येणार नाहीत. म्हणून मुलांची नावे कमी दिसतात.

▶ *आणि आधार डाउनलोड फाईल मध्ये जर मुले कमी दिसत असली तर काय करावे?*

➡  *उत्तर* - मुले कमी दिसत असली तरी आपण त्याठिकाणी वाढीव मुले अॅड करू शकत नाही. म्हणून डाउनलोड फाईल मध्ये जे मुलं दिसत असतील तेवढ्या मुलांची आधार माहिती भरून फाईल अपलोड करुन टाका.

▶ *file upload केल्यानंतर longer file name असा error आला तर काय करावे?*

➡  *उत्तर* - असा Error आलेली फाईल ज्या फोल्डर मध्ये ठेवली आहे ते फोल्डर ओपन करा. आपली फाईल कोठे आहे ते बघा. त्या फाईल च्या नावावर Right click करा. आणि नावात थोडा बदल करा. *लक्षात ठेवा की हे पूर्ण नांव delete करायचे नाही. फक्त त्यातील काही भाग कट करुन छोटे करायचे आहे.*
    उदा. पूर्वी चे 2री च्या वर्गाच्या फाईलचे नाव *UID27260607202_02_0_(3)* असे आहे तर यामध्ये बदल कसा केला ते खाली बघा.
*UID27260607202_02_0*
म्हणजे तुमच्या लक्षात येईल की शून्याच्या पुढे काहीच ठेवायचे नाही. आता *Enter* दाबा. फाईल्स चे नाव ओके होईल. आता ही फाईल अपलोड करा.
   
▶ *आधारकार्ड चुकीची माहिती असली तरीही आपल्याला भरायची आहे. यामुळे आपल्या शाळेचा विद्यार्थी डाटा बदलेल का?*
                         
➡ *उत्तर* - *अजिबात बदलणार नाही.* आपण हे लक्षात घ्या की आधारकार्ड वरील जशी आहे तशी माहिती भरण्यामागे एकच उद्देश आहे की ही माहिती *UID department* कडे *Verification* साठी जाणार आहे. आपण जशी आहे तशी माहिती भरल्यामुळे आपल्या मुलांचे आधार नंबर *valid* (म्हणजे बरोबर) ठरतील. आणि *तो मुलगा किंवा मुलगी हे याच शाळेत शिक्षण घेत आहेत हे सिद्ध करणे हाच शासनाचा हेतू आहे.*

▶  *विद्यार्थी आधार माहिती भरली की ती  uid मध्ये दिसते. पण आधार रिपोर्ट मध्ये दिसत नाही यासाठी काय करावे लागेल?*

 ➡ *उत्तर* - आपण भरलेली माहिती ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर *UID department कडे Verification साठी जाणार आहे.* त्यांच्याकडून *Verification* झाल्यानंतरच त्याचा *Report* आधार रिपोर्ट मध्ये येईल. यासाठी मोठा कालावधी लागतो. म्हणून *आपण भरलेली माहिती लगेच आधार रिपोर्ट मध्ये येऊ शकत नाही. म्हणून आपल्याला ही माहिती UID Details मधून दिसते.*

▶ *आपल्या आधार कामासाठी माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.*
      🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
        🙏 आपलाच तंत्रस्नेही मित्र 🙏
              *शिवाजी नवाळे सर*
                  राहुरी अ'नगर
      प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र समूह प्रमुख
            *मो. नं. 7758074275*
  

आधार माहिती भरणे Student Portal

*आधार फाईल भरतांना व अपलोड करताना घ्यायची काळजी*
        (मित्रांनो पोस्ट काळजीपूर्वक वाचा.)
   🔵🔶 *आपलाच तंत्रस्नेही मित्र*🔶🔵
              *शिवाजी नवाळे सर*
                 *राहुरी अ'नगर*
▶  *save as करताना फाईल नाव सोप्या पद्धतीने कसे घ्यावे?*

*उत्तर* - अगदी सोपे आहे. फाईल नाव ज्या रकान्यात लिहायचे आहे तेथे फक्त *U* हे अक्षर टाईप करा. लगेच खाली नावे येतात. त्यामधील *आपण ज्या वर्गाची फाईल Save as करत आहोत त्याच वर्गाचे नाव सिलेक्ट करा.* लक्षात घ्या की नावात गडबड झाली की अपलोड करताना *Error* येणार.

▶ *मित्रांनो फाईल अपलोड करताना अनेकदा Error येत आहे. अशा वेळी कोणती काळजी घ्यावी?*

 *मित्रांनो आधार फाईल्स अपलोड Error चे प्रमाण खूप वाढले आहे. अशा वेळी आपल्याला संपूर्ण माहिती पुन्हा नव्याने भरावी लागते आणि यामध्ये आपल्याला प्रचंड मनस्ताप होतो. सर्वच डाटा पुन्हा भरणे सोपी गोष्ट नाही.*
    *तसेच अनेकदा वर्गात जर जास्त मुले असतील तर सर्व मुलांची माहिती एकाच वेळी भरणे शक्य होणार नाही अशा वेळी जेवढ्या मुलांची माहिती भराल त्यावेळी फाईल नेहमीच्या साध्या पद्धतीने Save करा. (save as नाही बरं का) त्यानंतर पुन्हा पुढच्या वेळी राहिलेली माहिती भरा. सर्व माहिती भरल्यानंतर परत एकदा साध्या पद्धतीने Save करा.*
    *आता सर्वात महत्वाची गोष्ट करायची आहे. तुमची फाईल ज्या फोल्डर मध्ये आहे. तिथे या आणि आपण साध्या पद्धतीने Save करून ठेवलेल्या फाईल copy करा आणि PC, Laptop च्या दुसर्‍या Drive मध्ये किंवा pendrive यामध्ये paste करून घ्या. म्हणजे आपला भरलेला डाटा 100% सुरक्षित झाला.*
     *हे केल्यानंतर आता आपण भरलेली मूळ फाईल ओपन करा. आणि ही फाईल Save as करून csv comma delimited मध्ये CONVERT करा.*
         *अशी प्रोसेस केल्याने जरी फाईल अपलोड केल्यानंतर Error आला तरी दुरूस्ती करण्यासाठी आपल्याला सर्व माहिती पुन्हा नव्याने भरायची गरज लागणार नाही कारण ही फाईल आपण दुसरीकडे Save करून ठेवलेली आहे.*
     *Error आला की काय चुकले ते दुरूस्त करावे लागेल. मग आपण दुसरीकडे Save करून ठेवलेली फाईल उघडा आणि दुरूस्ती करून Save as ची प्रोसेस करून फाईल पून्हा अपलोड करा.*
   🔵 *हे सर्व करताना घ्यायची काळजी* 🔵
*फाईल Error आली की आपल्याला दुरूस्ती करायची आहे. ही करताना आपण त्या वर्गाची अगोदर csv केलेली फाईल delete करून टाका आणि मगच दुसरीकडे Save करून ठेवलेल्या फाईल मध्ये नवीन दुरुस्ती करा.आणि नवी फाईल अपलोड करुन टाका.*

▶ *file upload केल्यानंतर longer file name असा error आला तर काय करावे?*

*उत्तर* - असा Error आलेली फाईल ज्या फोल्डर मध्ये ठेवली आहे ते फोल्डर ओपन करा. आपली फाईल कोठे आहे ते बघा. त्या फाईल च्या नावावर Right click करा. आणि नावात थोडा बदल करा. *लक्षात ठेवा की हे पूर्ण नांव delete करायचे नाही. फक्त त्यातील काही भाग कट करुन छोटे करायचे आहे.*
    उदा. पूर्वी चे 2री च्या वर्गाच्या फाईलचे नाव *UID27260607202_02_0_(3)* असे आहे तर यामध्ये बदल कसा केला ते खाली बघा.
*UID27260607202_02_0*
म्हणजे तुमच्या लक्षात येईल की *शून्याच्या पुढे काहीच ठेवायचे नाही.* आता Enter दाबा. फाईल्स चे नाव ओके होईल. आता ही फाईल अपलोड करा.

▶ *आधारकार्ड Excel file download करताना शाळेतील काही वर्गाच्या तुकडीतील मुलांची नावे येत नाही अशा वेळी काय करावे?*

*उत्तर* -  मित्रांनो तुमच्या शाळेत समजा मागील वर्षी 3 री च्या A व B अशा 2 तुकड्या होत्या व 4 थी ची 1 च तुकडी होती. अशा वेळी 3री मधील मुले 4थी ला आली. पण सरल रेकॉर्ड ला तर 4थी ची एकच तुकडी कार्यरत असल्याने मागील एकाच तुकडीतील मुले फक्त A तुकडीत दिसतात. पण 4 थी ची B तुकडी सरलला नोंदणी केलेली नसल्याने मागील 3री B मधील मुले मुले कोठेच दिसत नाही व आधार डाउनलोड फाईल मध्ये सुद्धा येत नाही.
    म्हणून अशा वेळी आपल्याला 4थी च्या B तुकडीची सरल मध्ये अॉनलाईन निर्मिती करावी लागणार आहे. याची प्रोसेस खालीलप्रमाणे आहे.
1) Student portal open ला लॉगिन करा.
2) Master tab मधून division निवडा.
3) Standard 4 थी निवडा.
4) तुकडी टाकताना *B* न विसरता टाका.
यामधील बाकी सर्व माहिती सिलेक्ट करा. शेवटी सध्याच्या B तुकडीतील मुलांची संख्या टाका व खालील *Add* बटनाला  क्लिक करा. *Successfully* असा मेसेज येईल.
       आता तुमची 4थी ची B तुकडी तयार झाली. ही माहिती अपडेट होण्यास थोडा वेळ लागेल. *नंतर आपोआप मागील वर्षीच्या 3री B तुकडीची मुले 4थी B तुकडीत येतील.* व आधार Excel डाउनलोड फाईल मध्ये पण मुले येतील.
▶ *आपल्या आधार कामासाठी माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.*
      राहुरी 🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
        🙏 आपलाच तंत्रस्नेही मित्र 🙏
              *शिवाजी नवाळे सर*
                  राहुरी अ'नगर
      प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र समूह प्रमुख
            *मो. नं. 7758074275*
  

इ.1ली नवीन विद्यार्थी Student Portal वर माहिती भरणे, सन 2016-17

*सरल महत्वाचे* :
*दिनांक : २४/०८/२०१६*
(कृपया सर्व बांधवांना share करावे ही विनंती)

*student पोर्टल* :

१)सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामधील इयत्ता १ ली च्या मुलांची सरल student पोर्टल मध्ये माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.दिनांक २३ ऑगस्ट पासून  पुणे जिल्ह्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.दिनांक 24 ऑगस्ट पासून ही सुविधा संपूर्ण राज्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता लवकरच पूर्ण करावयाची असल्याने ही माहिती दिलेल्या वेळेत भरणे अत्यावश्यक आहे.या माहितीसाठी मुदत वाढ देण्यात येणार नाही आहे ही बाब या वेळी लक्षात घ्यावी.

२)नविन विद्यार्थ्यांची माहिती कशी भरावी याबाबत सखोल आणि विस्तृत माहिती आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे याची नोंद घ्यावी.

*नवीन विद्यार्थी माहिती कशी भरावी यासाठीचे Manual डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा* : http://goo.gl/qikIvJ

३)इयत्ता १ ली व्यतिरीक्त इतर वर्गातील मुले जी मागील वर्षी भरावयाची राहून गेलेली आहे त्या मुलांची माहिती भरण्यासाठीची सुविधा योग्य वेळी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.त्याविषयी काळजी करू नये.

४)इयत्ता पहिली वगळता ज्या मुलांची माहिती मागील वर्षी नोंद झालेली आहे अशा ट्रान्स्फर झालेल्या मुलांची माहिती त्या जुन्या शाळेतून ट्रान्स्फर करून घेणे बंधनकारक आहे.काही शाळा ट्रान्स्फर झालेल्या मुलांची माहिती नविन विद्यार्थी म्हणून भरण्याचा प्रयत्न करतील म्हणून सध्या फक्त पहिलीचे विद्यार्थी भरण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.तसेच इतर इयत्तांच्या मुलांची माहिती जे मागील वर्षी नोंद झालेले नव्हते त्यांची माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्या नंतर फक्त अशाच मुलांची माहिती आपणास भरता येणार आहे ज्यांची खरोखर मागील वर्षी नोंद झालेली नव्हती.जर मागील वर्षी नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची इतर शाळेत ट्रान्स्फर झाली असेल आणि नविन शाळेच्या मुख्याध्यापकाने जर त्या विद्यार्थ्याला जुन्या शाळेतून ट्रान्स्फर करून न घेता नविन विद्यार्थी म्हणून भरावयाचा प्रयत्न केला तर system अशा मुलांची माहिती स्वीकारणार नाहे याची गांभीर्याने नोंद घ्यावे.त्यासाठी आपण ट्रान्स्फर होऊन आलेल्या मुलांची माहिती त्वरीत जुन्या शाळेतून ट्रान्स्फर करून घ्यावी.

५)जर आपण ट्रान्स्फर विनंती केलेल्या मुलाची माहिती जुन्या शाळेतले मुख्याध्यापक ट्रान्स्फर विनंती approve करत नसतील आणि त्यामुळे जर नविन शाळेला संच मान्यतामध्ये काही समस्या निर्माण झाल्या तर त्यासाठी  जुन्या शाळेतल्या मुख्याध्यापकाला दोषी धरण्यात येईल याची नोंद घ्यावी.

६)ट्रान्स्फर विनंती पाठवली जात नाही,ट्रान्स्फर विनंती approve होत नाही,approve होऊन आलेले विद्यार्थी update ला दिसत नाही अशा समस्या काही शाळांना येताना दिसून येत आहे,अशा समस्या अशाच शाळांना आहे ज्यांची मागील वर्षीच्या data मध्ये technical error आलेला आहे.उदाहरणार्थ रजिस्टर नंबर लिहिताना अंका सोबत अक्षरे भरलेले असणे,तुकडी भरताना चुकीच्या format मध्ये भरणे,मुलांची माहिती .csv मध्ये convert करून upload करताना चुका झालेल्या असणे इत्यादी.अशा शाळांना विनंती आहे की आपणास अशा समस्या असतील तर कृपया आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्या समस्या सविस्तर लिहून पाठवा.आपल्या माहितीमध्ये पूर्वी झालेल्या चुका दुरुस्थ करून आपल्या या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.आपण या बाबीचा गांभीर्याने विचार केला नाही तर आपणास संच मान्यता,udise,पायाभूत चाचणी व अन्य परीक्षेचे गुण भरताना अथवा मुलाच्या लाभाच्या शासकीय योजना राबवताना online माहितीमध्ये समस्या निर्माण होऊ शकणार आहे.यासाठी आपण पुढील लिंक ला क्लिक करून आपली समस्या त्वरीत कळवा.समस्या मांडताना समस्येविषयी सविस्तर माहिती भरा.माहिती भरत असताना समस्या नसताना विनाकारण काहीही लिहित बसू नये,त्रास होईल असे लिखाण करू नये.आम्ही आपणास केवळ आणि केवळ मदत करण्याच्या हेतूने ही सुविधा उपलब्ध करून देत आहोत याची नोंद घ्यावी.

*समस्या कळवण्यासाठीची लिंक* :
http://goo.gl/9vBAQ8

७)नविन विद्यार्थी माहिती भरताना जर इयत्ता पहिलीला मागील वर्षीपेक्षा या वर्षी तुकडीची संख्या वाढली असेल तर आपणास या वर्षी तुकडी वाढवून घ्यावी लागेल.तुकडी वाढवली तरच आपल्याला excel sheet उपलब्ध होईल.तुकडी वाढवण्यासाठी create division ची tab आपणास उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

८) या वर्षी नविन शाळा चालू झालेली असेल तर आपल्या शाळेचा udise आणि password साठी आपल्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

९)अद्यापही बऱ्याच गटशिक्षणाधिकारी लेवल वर ट्रान्स्फर च्या विनंती पेंडिंग आहे.तरी सर्व गटशिक्षणाधिकारी यांना विनंती आहे की आपण त्वरीत या सर्व विद्यार्थ्यांची शहानिशा करून त्याना ट्रान्स्फर करावे.तालुकानिहाय पेंडिंग स्थिती बाबतच्या आकडेवारीची माहिती शिक्षणाधिकारी यांच्या login ला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.अशा पेंडिंग कामाच्या पूर्ततेबाबत शिक्षणाधीकारी यांनी त्वरीत कार्यवाही करावी अशा सुचना E-GOVERNANCE सेल चे अध्यक्ष तथा शिक्षण संचालक ,बालभारती मा.डॉ.सुनील मगर साहेब यांच्याकडून या पोस्ट द्वारे देण्यात येत आहे याची नोंद घ्यावी.आपले काम अपूर्ण राहिल्यास भविष्यात होणाऱ्या online कामात अडचण निर्माण झाल्यास संबंधिताना जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी.

१०)आपणास हे देखील कळविण्यात येत आहे की मागील १० दिवसापूर्वी विद्यार्थांची आधार माहिती भरण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.अद्यापही बऱ्याच मुलांची माहिती भरली गेलेली नाही आहे.तरी ती माहिती त्वरीत भरण्यात यावी.या वर्षी आपणास १००% मुलांची आधार माहिती भरावयाची आहे.ज्या मुलांनी अद्याप आधार नंबर मिळवला नसेल अशा मुलांच्या पालकांचे प्रबोधन करून त्याच्याकडून त्वरीत आधार नंबर मिळविण्याचा प्रयत्न मुख्याध्यापक यांनी करावयाचा आहे.आधार नंबर कसे भरावयाचे आहे याबाबत सविस्तर माहितीपत्रक मॅन्युअल havelieducation.blogspot.in  या ब्लॉग ला उपलब्ध करून दिलेले आहे.

११)student पोर्टल संदर्भात सर्व प्रकारच्या कामासाठीचे manual पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.तसेच आपण havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट देऊन याबाबत सविस्तर माहिती मिळवू शकाल.

12) *duplicate विद्यार्थी सिस्टिम मधून कसे काढावे यासाठीचे मॅन्युअल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा* :
http://goo.gl/7lSj8b

*school पोर्टल*  :

१3)या शैक्षणिक वर्षात शाळा पोर्टल मध्ये आपणास माहिती भरण्यासाठीची सुविधा येत्या २ दिवसात उपलब्ध करून दिली जाणार आहे.या वर्षी माहिती भरण्यासाठी आपणास ही सुविधा offline पद्धतीने उपलब्ध करून दिली जाणार आहे याची नोंद घ्यावी.offline पद्धतीने माहिती कशी भरावी यासाठीची काही दिवसापूर्वीच
E-GOVERNANCE सेल कडून राज्यस्तरीय विभागीय ट्रेनिंग घेण्यात आलेल्या आहे.सर्व शिक्षक बांधवाना या ट्रेनिंग जिल्हा,तालुका पातळीवरून दिल्या जाव्यात अशा सुचना E-GOVERNANCE सेल चे अध्यक्ष तथा शिक्षण संचालक ,बालभारती मा.डॉ.सुनील मगर साहेब यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत.आपणास सदर बाबतीत ट्रेनिंग मिळाली नसेल अथवा अडचण निर्माण होत असेल तर कृपया आपल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा ही विनंती.तसेच या बाबतीत school पोर्टल ला लवकरच manual देखील उपलब्ध करून देण्यात येईल याची नोंद घ्यावी.याबाबत आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट देऊन याबाबत सविस्तर माहिती मिळवू शकाल.

*MDM (शालेय पोषण आहार पोर्टल)* :

१४)शालेय पोषण आहार योजनेंतर्गत opening balance, daily attendance, stock inward बाबत माहिती सरल पोर्टल मध्ये नोंद्विन्याबाबत या शैक्षणिक वर्षापासून सूचना देण्यात आलेल्या आहेत.परंतु अद्यापही काही शाळांची माहिती पूर्ण झालेली नाही आहे असे दिसून आले आहे.अशा शाळांची माहिती पूर्ण करण्याच्या हेतूने शासनाने अंतिम मुदत वाढवून दिनांक २५ ऑगस्ट २०१६  दिलेली आहे.या नंतर आपणास मुदत वाढवून देण्यात येणार नाही अशा सुचना वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आहे याची नोंद घ्यावी.

१५)मुख्याध्यापकाच्या दुर्लक्षामुळे जर सदर माहिती भरण्याची अपूर्ण राहिल्यास संबंधित आहाराचे बील देण्याची जबाबदारी मुख्याध्यापकाची असेल असेही वरिष्ठ कार्यालयाकडून कळविण्यात आलेले आहे.त्यामुळे सर्वाना विनंती आहे की दिनांक २५ ऑगस्ट पर्यंत आपली माहिती भरण्यात यावी.

१६)ज्या शाळेचा ओपेनिंग balance चुकला असेल आणि beo लेवल वरून verify झालेला असेल तसेच stock inward भरून beo ने verify केलेला असेल तर अशा शाळेचा ओपेनिंग balance व stock inward दुरुस्थ करण्यासाठी तो ओपेनिंग balance व stock inward शिक्षणाधिकारी यांना परत पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

१७)daily attendance ची माहिती शाळेला रोजच्या रोज पाठवणे बंधनकारक आहे.ही माहिती भरण्यासाठी एक मोठा बदल करण्यात आलेला आहे.आपण ही माहिती रोज सकाळी ९:३० नंतर भरू शकणार आहात.त्या अगोदर आपणास ही माहिती भरता येणार नाही.

१८)एखाद्या दिवशी काही महत्वाच्या अडचणीमुळे शालेय पोषण आहार शिजवून दिला नसेल तो का देण्यात आलेला नाही याबाबत system मध्ये कारण नमूद करावे लागतात.या कारणाच्या लिस्ट मध्ये आता other या नविन कारणाचा समावेश करण्यात आला आहे याची नोंद घ्यावी.

19)✏राज्यस्तरीय whatsapp ग्रुप मध्ये add होण्यासाठी महत्वाचे :

आम्ही सरल संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी राज्यस्तरीय whatsapp चे   ग्रुप तयार केलेले आहेत.या ग्रुप मध्ये फक्त कोणत्याही शैक्षणिक ग्रुपचे admin अथवा सरल चे cluster अथवा तालुका स्तरावर काम करणारे मार्गदर्शक सहभागी होऊ शकतात. यासाठी http://havelieducation.blogspot.in
या ब्लॉग वर व्हाट्सएप्प समुहात सामिल होण्यासाठी एक फॉर्म देण्यात आलेला आहे त्या फॉर्म मध्ये मध्ये विचारलेली आपली माहिती आणि व्हाट्सएप्प मोबाइल क्रमांक  भरून आम्हाला ऑनलाइन पाठवा.आपणास यथावकाश ग्रुप मध्ये add करुन घेतले जाईल व वेळोवेळी आपणास सरल बाबत माहिती पाठवली जाईल.
(सुचना : या ग्रुपवर सरल व्यतिरीक्त कोणतीही माहिती दिली जाणार नाही अथवा या ग्रुप वर सरल व्यतिरिक्त कोणतीही post टाकण्यास परवानगी नाही आहे याची नोंद घ्यावी.)

 20) आपणास सरल बाबत असलेल्या अडचणी ईमेल,व्हाट्सएप्प वर कळवाव्या,त्या सोडवन्यात येईल.अडचणी कळवन्यासाठी ईमेल :
a) Sanchmanyata@gamil.com
b) idreambest@gmail.com  किंवा
c)support.education@maharashtra.gov.in

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
 (Dont call,only whatsapp message)
Email: idreambest@gmail.com
Blog: havelieducation.blogspot.in
Apps link of my blog's for download : Www.appsgeyser.com/2460364

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...