Pages

Thursday, August 25, 2016

आधार माहिती भरणे Student Portal

*आधार फाईल भरतांना व अपलोड करताना घ्यायची काळजी*
        (मित्रांनो पोस्ट काळजीपूर्वक वाचा.)
   🔵🔶 *आपलाच तंत्रस्नेही मित्र*🔶🔵
              *शिवाजी नवाळे सर*
                 *राहुरी अ'नगर*
▶  *save as करताना फाईल नाव सोप्या पद्धतीने कसे घ्यावे?*

*उत्तर* - अगदी सोपे आहे. फाईल नाव ज्या रकान्यात लिहायचे आहे तेथे फक्त *U* हे अक्षर टाईप करा. लगेच खाली नावे येतात. त्यामधील *आपण ज्या वर्गाची फाईल Save as करत आहोत त्याच वर्गाचे नाव सिलेक्ट करा.* लक्षात घ्या की नावात गडबड झाली की अपलोड करताना *Error* येणार.

▶ *मित्रांनो फाईल अपलोड करताना अनेकदा Error येत आहे. अशा वेळी कोणती काळजी घ्यावी?*

 *मित्रांनो आधार फाईल्स अपलोड Error चे प्रमाण खूप वाढले आहे. अशा वेळी आपल्याला संपूर्ण माहिती पुन्हा नव्याने भरावी लागते आणि यामध्ये आपल्याला प्रचंड मनस्ताप होतो. सर्वच डाटा पुन्हा भरणे सोपी गोष्ट नाही.*
    *तसेच अनेकदा वर्गात जर जास्त मुले असतील तर सर्व मुलांची माहिती एकाच वेळी भरणे शक्य होणार नाही अशा वेळी जेवढ्या मुलांची माहिती भराल त्यावेळी फाईल नेहमीच्या साध्या पद्धतीने Save करा. (save as नाही बरं का) त्यानंतर पुन्हा पुढच्या वेळी राहिलेली माहिती भरा. सर्व माहिती भरल्यानंतर परत एकदा साध्या पद्धतीने Save करा.*
    *आता सर्वात महत्वाची गोष्ट करायची आहे. तुमची फाईल ज्या फोल्डर मध्ये आहे. तिथे या आणि आपण साध्या पद्धतीने Save करून ठेवलेल्या फाईल copy करा आणि PC, Laptop च्या दुसर्‍या Drive मध्ये किंवा pendrive यामध्ये paste करून घ्या. म्हणजे आपला भरलेला डाटा 100% सुरक्षित झाला.*
     *हे केल्यानंतर आता आपण भरलेली मूळ फाईल ओपन करा. आणि ही फाईल Save as करून csv comma delimited मध्ये CONVERT करा.*
         *अशी प्रोसेस केल्याने जरी फाईल अपलोड केल्यानंतर Error आला तरी दुरूस्ती करण्यासाठी आपल्याला सर्व माहिती पुन्हा नव्याने भरायची गरज लागणार नाही कारण ही फाईल आपण दुसरीकडे Save करून ठेवलेली आहे.*
     *Error आला की काय चुकले ते दुरूस्त करावे लागेल. मग आपण दुसरीकडे Save करून ठेवलेली फाईल उघडा आणि दुरूस्ती करून Save as ची प्रोसेस करून फाईल पून्हा अपलोड करा.*
   🔵 *हे सर्व करताना घ्यायची काळजी* 🔵
*फाईल Error आली की आपल्याला दुरूस्ती करायची आहे. ही करताना आपण त्या वर्गाची अगोदर csv केलेली फाईल delete करून टाका आणि मगच दुसरीकडे Save करून ठेवलेल्या फाईल मध्ये नवीन दुरुस्ती करा.आणि नवी फाईल अपलोड करुन टाका.*

▶ *file upload केल्यानंतर longer file name असा error आला तर काय करावे?*

*उत्तर* - असा Error आलेली फाईल ज्या फोल्डर मध्ये ठेवली आहे ते फोल्डर ओपन करा. आपली फाईल कोठे आहे ते बघा. त्या फाईल च्या नावावर Right click करा. आणि नावात थोडा बदल करा. *लक्षात ठेवा की हे पूर्ण नांव delete करायचे नाही. फक्त त्यातील काही भाग कट करुन छोटे करायचे आहे.*
    उदा. पूर्वी चे 2री च्या वर्गाच्या फाईलचे नाव *UID27260607202_02_0_(3)* असे आहे तर यामध्ये बदल कसा केला ते खाली बघा.
*UID27260607202_02_0*
म्हणजे तुमच्या लक्षात येईल की *शून्याच्या पुढे काहीच ठेवायचे नाही.* आता Enter दाबा. फाईल्स चे नाव ओके होईल. आता ही फाईल अपलोड करा.

▶ *आधारकार्ड Excel file download करताना शाळेतील काही वर्गाच्या तुकडीतील मुलांची नावे येत नाही अशा वेळी काय करावे?*

*उत्तर* -  मित्रांनो तुमच्या शाळेत समजा मागील वर्षी 3 री च्या A व B अशा 2 तुकड्या होत्या व 4 थी ची 1 च तुकडी होती. अशा वेळी 3री मधील मुले 4थी ला आली. पण सरल रेकॉर्ड ला तर 4थी ची एकच तुकडी कार्यरत असल्याने मागील एकाच तुकडीतील मुले फक्त A तुकडीत दिसतात. पण 4 थी ची B तुकडी सरलला नोंदणी केलेली नसल्याने मागील 3री B मधील मुले मुले कोठेच दिसत नाही व आधार डाउनलोड फाईल मध्ये सुद्धा येत नाही.
    म्हणून अशा वेळी आपल्याला 4थी च्या B तुकडीची सरल मध्ये अॉनलाईन निर्मिती करावी लागणार आहे. याची प्रोसेस खालीलप्रमाणे आहे.
1) Student portal open ला लॉगिन करा.
2) Master tab मधून division निवडा.
3) Standard 4 थी निवडा.
4) तुकडी टाकताना *B* न विसरता टाका.
यामधील बाकी सर्व माहिती सिलेक्ट करा. शेवटी सध्याच्या B तुकडीतील मुलांची संख्या टाका व खालील *Add* बटनाला  क्लिक करा. *Successfully* असा मेसेज येईल.
       आता तुमची 4थी ची B तुकडी तयार झाली. ही माहिती अपडेट होण्यास थोडा वेळ लागेल. *नंतर आपोआप मागील वर्षीच्या 3री B तुकडीची मुले 4थी B तुकडीत येतील.* व आधार Excel डाउनलोड फाईल मध्ये पण मुले येतील.
▶ *आपल्या आधार कामासाठी माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.*
      राहुरी 🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
        🙏 आपलाच तंत्रस्नेही मित्र 🙏
              *शिवाजी नवाळे सर*
                  राहुरी अ'नगर
      प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र समूह प्रमुख
            *मो. नं. 7758074275*
  

No comments:

Post a Comment

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...