Pages

Friday, June 3, 2016

ज्ञानरचनावाद

रचनावादाचं शास्त्र आत्मसात करायला हवं!
- रमेश पानसे

रविवार, 22 मे 2016

Share Link:
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=N769KN
Tags: saptarang, ramesh panse

*जिल्हा परिषदांच्या शाळांमधून रचनावादी शिक्षणपद्धती आता मूळ धरू लागली आहे. क्रमिक पुस्तकांच्या स्वरूपात बदल, मूल्यवर्धन कार्यक्रमांची अंमलबजावणी आदींच्या माध्यमातून ती रुजत आहे. मूल्यवर्धनाचे कार्यक्रम शाळांमधून राबवणं हे या शिक्षणपद्धतीमधलं पुढचं पाऊल म्हणता येईल. महाराष्ट्राच्या ३४ जिल्ह्यांमधल्या काही शाळांमधून पुढच्या महिन्यापासून (जून २०१६) मूल्यवर्धनाचे कार्यक्रम पथदर्शी स्वरूपात सुरू होणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर या रचनावादी शिक्षणपद्धतीविषयी...*



मध्यंतरी माझ्याकडं एका शहरातले एका क्‍लबचे प्रमुख भेटायला आले. मागं पडलेल्या शाळांमधल्या काही निवडक शिक्षकांसाठी त्यांना प्रशिक्षण घ्यायचं होतं. तसं ते ठरवून आले होते. ते म्हणाले ः ‘‘मी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांशी बोलून, त्यांच्या शिक्षकांना प्रशिक्षणासाठी बोलावणार आहे’’ नकारार्थी मान हलवली. मी त्यांना सुचवलं ः *‘‘मागं पडलेल्या शाळांच्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण द्यायचं असेल, तर तुम्ही तथाकथित मान्यवर मराठी शाळा आणि इंग्लिश माध्यमाच्या शाळा निवडा. सध्याच्या परिस्थितीत त्याच ‘मागासलेल्या’ शाळा आहेत, असा माझा कयास आहे.’’*

आज बहुतांश खासगी मराठी शाळांतून आणि इंग्लिश माध्यमांच्या शाळांतून, ६० वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेली आणि त्याहीपूर्वी ६० वर्षं जन्माला आलेली, तत्कालीन मानसशास्त्राचा बळकट पाया असलेली वर्तनवादी विचारसरणी अजूनही त्यांच्या व्यवहारात टिकून आहे. पठडीबद्ध, बंदिस्त आणि थोड्यांना यश देऊन, अनेक मुलांना वेगवेगळ्या स्तरांवरचे अपयशी ठरवणारी अशी ही जीवनपद्धती अजूनही अवलंबली जात आहे. या पद्धतीची भलामण करणारे लोक आज जगभरातच फारसे उरलेले नाहीत. फक्त, जुना चर्मरोग जसा खूप काळ टिकतो, तशी ही पद्धती काही शाळांतून टिकून आहे. काही लोक ती अट्टहासानं, तर काही लोक, शालेय शिक्षक व व्यवस्थापन यांच्या सोईसाठी, तर अन्य काही लोक आर्थिक स्वार्थापोटी या जुन्या पद्धतीलाच चिकटून आहेत. त्यामुळं साहजिकच अशा शाळा त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यात कमी पडत आहेत.

या खासगी शाळांच्या पार्श्‍वभूमीवर, महाराष्ट्रात जिल्हा परिषदांच्या शेकडो शाळा आपापल्या विद्यार्थ्यांना शिकतं करण्यात आणि आनंदी करण्यात उठून दिसत आहेत.
मी अलीकडं जिल्हा परिषदांच्या शाळांच्या संपर्कात असतो; त्यांच्या शिक्षकांशी बोलतो, त्यांचे वर्ग व विद्यार्थी न्याहाळतो. माझ्या असं लक्षात आलं आहे, की जिल्हा परिषदांचे बरेचसे शिक्षक आणि शिक्षिका, स्वयंप्ररणेनं, प्रत्यक्ष वर्गांमधल्या शिकण्या-शिकवण्याच्या व्यवहारात खूप मोठे, उपयुक्त असे बदल करत आहेत. त्यात त्यांची मानसिक गुंतवणूक मला दिसतं आहे. शिक्षणाच्या वाढत्या गुणवत्तेत त्यांच्याकडून होणारं वर्धितमूल्याचं (व्हॅल्यू ॲडिशन) प्रमाण आहे, हे कदाचित त्यांनाही माहीत नसेल. ‘महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या शाळांमधला शिक्षणाचा दर्जा सुधारत आहे,’ असं ठाम विधान आजच्या घडीला मी स्पष्टपणे करू शकतो.

शिक्षण हक्क कायद्याच्या (२००९) पाचव्या प्रकरणातल्या २९ व्या कलमात म्हटलं आहे ः ‘‘जर विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाची निर्मिती करता येईल, अशा रीतीनं वर्गांमधल्या अनुभवांची मांडणी व्हायची असेल तर, शालेय व्यवस्थेत अंगभूत स्वरूपाचे मोठे बदल करावे लागतील.’’
इथं म्हटल्याप्रमाणे, महाराष्ट्रात असे बदल होऊ लागले आहेत असं मला वाटतं.
या बदलांचा थोडासा आढावा घेता येईल.
शालेय शिक्षणात, रचनावाद तीन स्तरांवर दृष्टीस पडतो.
एक ः वर्गाच्या, शाळेच्या रचनेत
दोन ः वर्गातल्या शिक्षणप्रक्रियेत
तीन ः शिक्षक-शिक्षिकांच्या मनात
वरील तीनपैकी पहिल्या स्तरावरच्या, म्हणजे शालेय वर्गातल्या-शाळेतल्या रचनेत किंवा व्यवस्थेत, रचनावाद बऱ्यापैकी पसरलेला आहे, असं आज आढळून येतं. अनेक शाळांनी जमिनी हा एरवी शिक्षणप्रक्रियेत न वापरलेला घटक वापरायला सुरवात केली आहे. कित्येकांनी जमिनी शैक्षणिक अंगानं रंगवल्या आहेत. काही खेळ, काही उपक्रम या जमिनीवर बसून विद्यार्थ्यांना आकर्षित करू पाहत आहेत. जे काही रंगवलेले आहे, ते छान दिसत आहे; त्यामुळं शाळेत काही बदल होत आहे, हे शाळेत येणाऱ्या पाहुण्यांना-गावकऱ्यांना सहजपणे कळतं. सुरवात म्हणून ही गोष्ट चांगलीच आहे.

शाळांच्या भिंतींवर मात्र वर्तनवादी आणि रचनावादी अशा दोन्ही विचारांना स्थान दिलेलं दिसतं. अनेक तक्ते, सुविचार, माहिती, शासकीय सूचना अशा गोष्टी प्रामुख्यानं दिसून येतात. हा बदलाचा सुरवातीचा काळ म्हणून मानता येईल. भिंतीच्या वापराबद्दल फारसा सयुक्तिक विचार मात्र होत नाही, असं जाणवतं. रचनावादी शिक्षणात जमिनींवर, भिंतींवर कोणत्याही गोष्टी कायमस्वरूपी असू नयेत, असा संकेत आहे. काही गोष्टी रोज किंवा आठवड्याला बदलतील आणि काही गोष्टी महिना-दोन महिन्यांनी. शाळांच्या भिंतींवर बरेचसे फोटो टांगलेले असतात, त्यातले शक्‍य तेवढे काढून टाकले, तर मुलांना अशा जागा त्यांच्या अभिव्यक्तीसाठी उपलब्ध होतील. (शाळेत केवळ शिक्षणतज्ज्ञांचे फोटो - भारतीय आणि पाश्‍चात्य - का लावले जात नाहीत?) इयत्तांनुसार भिंतींवरच्या जागांची वाटणी अर्थातच करता येईल. भिंतींवर काय नसावं, याचबरोबर काय असावं, हे महत्त्वाचं आहे. यासाठी दोन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. एक म्हणजे, भिंती हा वर्गवातावरणाचा भाग आहे. त्यामुळं वर्गाच्या शैक्षणिक वातावरणात भिंतींना सामावून घेणं इष्ट ठरतं; तसंच विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीसाठी भिंत ही एक सोईस्कर जागा असते आणि भिंतींवरचं आपल्या कामाचं प्रदर्शन हे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित व प्रेरित करणारं असतं.

बाकं हटवून जमिनीवर बसण्याची पद्धत
शासकीय प्राथमिक शाळांमध्ये आणखी एक होत असलेला बदल ठळकपणे लक्षात येत आहे, तो म्हणजे वर्गातल्या बाकांना रजा देऊन मुलांना छोट्या गटांत बसवायला अनेक ठिकाणी सुरवात झाली आहे. कित्येक ठिकाणी, वर्गातून बाकं हलवण्यात काही अडचणी आहेत; पण तिथंसुद्धा बाकं भिंतींशी लावून मध्यभागी मुलांना जमिनीवर बसण्यासाठी जागा मोकळी केलेली आहे. विद्यार्थ्यांनी जमिनीवर छोट्या गटांत बसण्याची पद्धत आता रुळायला लागलेली दिसते. तरीसुद्धा शिक्षकांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायला हवी आहे व ती म्हणजे, गट हे त्या त्या वेळच्या अध्ययनाच्या हेतूंनुसार असावे लागतात. गट हे अनेक कारणांनी बदलतही जातात आणि मुख्य म्हणजे गट हे सहकारी शिक्षणाला पायाभूत असल्यामुळं सहकारी शिक्षणातल्या तत्त्वांचीही झालर त्यांना असावी लागते. या दिशेनं शिक्षक-शिक्षकांनी अधिक माहिती घेणं उपयोगाचं ठरेल.

शैक्षणिक साधनांचा मोठ्या प्रमाणात उपयोग
चौथा महत्त्वाचा आणि सगळीकडं सर्रास आढणारा बदल म्हणजे, आता शाळांतून शैक्षणिक साधनांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. काही साधनं शासनानं पुरवलेली, काही साधनं शाळांनी विकत घेतलेली, तर काही शिक्षकांनी स्वतः केलेली आहेत. बऱ्याचदा ही साधनं, अन्य ठिकाणी पाहून तशी तयार करून वापरली जात आहेत, तर काही साधनं शिक्षकांनी आपल्या कल्पकतेतून नव्यानं निर्माण केलेली आहेत. उत्साहानं साधने निर्माण होणं वेगळं आणि त्यांच्या निर्मितीमागं काही शास्त्रीय दृष्टिकोन असणं वेगळं. जे साधन आपण वर्गात मुलांसाठी वापरू इच्छितो, त्याचं स्वरूप मुलांना हाताळण्यास सोईचं, सुरक्षित आणि मुलांना आवडेल असं तर असायलाच हवं; पण तेवढंच पुरेसं नाही. शैक्षणिक साधनांची शास्त्रीयता ही त्यांच्या हेतुपूर्ण वापरात आणि हेतुपूर्ण विद्यार्थि-प्रतिसादात असते. साधनाकरवी जे घडवायचं, ते नेमकं व स्पष्ट असलं पाहिजे आणि तसं त्यातून अंतिमतः घडलंही पाहिजे. साधनांबाबत काळजी घ्यायला हवी ती अशी, की साधन हे केवळ आपल्याला काय वाटतं यावर किंवा इतरांच्या ऐकीव अनुभवांवर बेतलेलं असून चालणार नाही. त्यामागचा दृष्टिकोन अशास्त्रीय तर नाही ना, याची शहानिशा होणं आवश्‍यक आहे. साधनं वयानुरूप, शिकण्याच्या घटकांनुरूप, तसंच ती विद्यार्थ्यांना आव्हानरूप वाटतील अशी अर्थातच असायला हवीत. साधननिर्मिती आणि साधनांचा वापर याबद्दल शिक्षकांचंही सातत्यपूर्ण प्रशिक्षण व्हायला हवं. राज्यस्तरावर नवनवीन साधनांची सूची सतत तयार होत जाऊन ती सर्वांना उपलब्ध होत गेली पाहिजे.

महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या शाळांतून, शालेय रचनेत होत असलेल्या बदलांचं समाधान देणारं स्वरूप आणि त्याविषयी घ्यायची काही शास्त्रस्वरूपी काळजी इथं व्यक्त केल्यानंतर आजच्या बदलाच्या या पायरीवरून आता अधिक वरच्या पातळीवर जाणं गरजेचं आहे.

शिकण्या-शिकवण्याच्या प्रक्रियेवर आता लक्ष हवं
आता वर्गातल्या शिकविण्या-शिकण्याच्या प्रत्यक्ष चालणाऱ्या प्रक्रियांवर लक्ष केंद्रित करायला हवं. रचनावादातल्या या शिक्षणप्रक्रिया प्रामुख्यानं गेल्या ५०-६०- वर्षांतल्या, विविध शास्त्रांमधल्या सिद्धान्तांमधून उगम पावलेल्या आहेत. नेहमीच शिक्षणपद्धतींचा फार मोठा संबंध त्यामध्ये असणाऱ्या सैद्धान्तिक विश्‍वाशी असतो. १९५० च्या दशकापर्यंत वर्तनवादी सैद्धान्तिक विचारसरणी आणि स्किनर यांच्या स्वेच्छाप्रतिक्रियेच्या (ऑपरंट कंडिशनिंग) तत्त्वाची चलती होती. म्हणजे असं, की तत्कालीन सारा शिक्षणव्यवहार या अशा तत्त्वांना मध्यवर्ती ठेवून बेतला जात असे. तीच विचारसरणी अनेक शाळांतून आजही ठळकपणे अस्तित्वात असलेली दिसून येते. ती बदलणं हेच तर खरं आजच्या शिक्षणक्षेत्रासमोरचं आव्हान आहे. पियाजे यांचं १९६० पूर्वीचं संशोधन व बौद्धिक विकासाच्या पायऱ्यांचं सिद्धान्तन (थिअरी), त्यावर व अन्य शास्त्रीय संशोधनावर आधारलेलं १९६० च्या दशकातलं आकलनशास्त्र, वायगोटस्की यांच्या समाजसाह्याचा विचार, त्यानंतरच्या काळातल्या ब्रुनर यांच्या आकलनविषयक विकासाचा सैद्धान्तिक विचार, १९७० च्या दशकापासून वेग आलेली मेंदूविषयक संशोधनाची मांदियाळी, १९८० च्या दशकांतला रॉबर्ट गॅग्ने यांचा अध्यापनविषयक सिद्धान्त व त्यांचे शिकण्याविषयीचे निष्कर्ष, मेल लेवाईन यांचा चेताविषयक रचनांचा विचार या आणि अशा अनेकांच्या सैद्धान्तिक विचारांनी अध्यापन आणि अध्ययन या वर्गशिक्षणातला मध्यवर्ती संकल्पनांचा चेहरामोहराच पार बदलून टाकला आहे. त्यांना नेमकेपणा देऊन शिक्षणव्यवहारांच्या संदर्भात अधिक स्पष्टता आणण्यात आली आहे. गेल्या शतकभरात सारा शिक्षणव्यवहार वर्तनवादाकडून आकलनवादाकडं आणि तिथून तो ज्ञानरचनावादाकडं वळला आहे.

बदलांमागचं तत्त्वज्ञान आत्मसात व्हायला हवं
महाराष्ट्रातल्या शासकीय शिक्षणातल्या बदलांमागचं हे तत्त्वज्ञान, सिद्धान्तन आणि दृष्टिकोन हा शिक्षकवर्ग व अधिकारीवर्ग यांना पुरेसा आत्मसात होण्याची गरज आहे. त्याशिवाय त्यांच्या हातून घडणाऱ्या शिक्षणप्रक्रियांना शास्त्रीय रूप मिळणे दुरापास्त होईल. आणखी एक गोष्ट अशी, की शिक्षकांनी सैद्धान्तिक विचार आत्मसात करून त्यांची दैनंदिन शिक्षणव्यवहारांशी सांगड घालत गेल्याशिवाय सिद्धान्तन (थिअरी) आणि व्यवहार (प्रॅक्‍टिस) यात आज असलेलं फार मोठे अंतर भरून निघणार नाही आणि अर्थातच शिक्षणात अपेक्षित असलेली उच्च प्रतीची गुणवत्ताही साध्य होणार नाही.

आजवरच्या पठडीबद्ध शिक्षणकेंद्री शिक्षणात सर्वात मोठी उणीव होती ती म्हणजे, शिक्षकांच्या जबाबदारीबाबतची. आजवर शिक्षकांवर केवळ विषय शिकवण्याचीच जबाबदारी होती. मुलांच्या शिकण्याची जबाबदारी त्यांच्यावर नव्हती. त्यामुळं विद्यार्थ्यांचं शिकणं ही सर्वस्वी विद्यार्थ्यांचीच जबाबदारी मानली गेली होती. वास्तविक, शाळा ही शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच असते. शिक्षकांची नेमणूक व त्यांना दिले जाणारे पगारही विद्यार्थी शिकावेत म्हणूनच दिले जातात. अशा वेळी त्यांनी करायचं काम हे आपसूकच विद्यार्थ्यांच्या शिकण्याशी जोडलं जातं. शालेय प्रक्रियेत विद्यार्थ्यांचं शिकणं महत्त्वाचं असतं आणि ते नीटपणे व सर्व विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडेल हे पाहण्याची, ते घडवून आणण्याची अंतिम जबाबदारी शिक्षकांचीच असते. शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीत असं काही घडवून आणतात की नाही, हे पाहण्याची जबाबदारी केंद्रप्रमुख, विस्तार-अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांची असते. या अंगाने या संबंधित मंडळींचं प्रशिक्षण होत राहिलं पाहिजे. वर्गांतल्या शिक्षणप्रक्रिया शास्त्रीय आहेत की नाही आणि विद्यार्थी शिकत जात आहेत की नाही, याची तपासणी तपासनीसांनी प्रामुख्यानं करायची आहे. रचनावादी शिक्षणपद्धतीत हे सोपंही आहे. वर्गात विषयांमधले घटक रचनात्मक पद्धतीनं विद्यार्थ्यांपुढं येत आहेत की नाही आणि सर्व विद्यार्थी एकाग्रतेनं, आनंदानं त्यात भाग घेत आहेत की नाही, हे तरी सुरवातीला पाहणं गरजेचं आहे.

उदाहरणार्थ ः कुणी पाहुणे, अधिकारी वर्गात शिरले तर त्यांना मुलं शिकण्यात रमली आहेत, एकाग्र झाली आहेत, परस्परांशी त्यांचा शैक्षणिक विचारविनिमय चालला आहे, असं दृश्‍य दिसलं पाहिजे. आत्ताच्या सारखं कुणीही, केव्हाही वर्गात शिरो, मुलं उठून ‘गुड मॉर्निंग...’ म्हणतात, त्यांच्या स्वतःच्या कामाचा त्यात अनाठायी वेळ जातो आणि एकाग्रताही भंगते. त्यामुळं अशा औपचारिकता पाळल्या जाणार नाहीत, याची दक्षता शिक्षक, अधिकारी यांनी घेतली पाहिजे.

क्रमिक पुस्तकांचं बदलतं स्वरूप रचनावादाला पूरक
शालेय वर्गांमधले (आणि अगदी महाविद्यालयीन व विद्यापीठीय वर्गांमधलेही!) विद्यार्थी आपणहून शिकण्यास प्रवृत्त होणं ही घटना शिक्षणात मूलभूत आहे. रचनावादी पद्धती ही विद्यार्थ्यांना आनंदानं कृतीयुक्ततेनं स्वयंशिक्षणाला प्रवृत्त करते ही या पद्धतीची जमेची बाजू आहे. आज असंख्य शाळांमधले रचनावादी वर्ग मुलांच्या चेहऱ्यांवर समाधान, उत्सुकता, शिकण्याची ऊर्मी दर्शवत आहेत. याचा अर्थ मुलांना शिकायला आवडत आहे. शाळांचं बाह्य रूपही आकर्षक, सौंदर्यपूर्ण असेल तर विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी पूरक वातावरण निर्माण होतं, हे आता अनेक सरकारी शाळांना आणि त्यांमधल्या शिक्षकांना चांगलं समजलं आहे. शाळा अधिक सौंदर्यसंपन्न व साधनसंपन्न होत आहेत. बऱ्याच ठिकाणी पालकवर्ग आणि गावकरी मंडळी शाळा ‘आपली’ मानू लागले आहेत. शाळांच्या आंतर्बाह्य विकासासाठी त्यांच्याकडून भरभरून मदत येत आहे हे शालेय शिक्षणाबाबतची समाजाची मानसिकता बदलत असल्याचं द्योतक आहे.

विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना रचनात्मक शिक्षणाकडं नेण्याचा एक खूप मोठा, जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे तो क्रमिक पुस्तकांच्या बदलत्या स्वरूपांतून. धड्यांखालचे प्रश्‍न काही प्रमाणात वर्तनवादी स्वरूपाचे असले तरी, म्हणजे या प्रश्‍नांची उत्तरं धड्यांमध्येच आहेत अशी असली, तरीही त्याचबरोबर मुलांना शोध घ्यायला लावणारे आणि कृती करायला लावणारे असेही प्रश्‍न आले आहेत. शिक्षकांनी त्यांचं नीटस पालन केलं तरी मुलांच्या शिकण्याची प्रक्रिया अधिक सघन होईल.

वर्गखोल्यांबरोबरच जीवनव्यवहारातूनही शिक्षण
शासनाने क्रमाक्रमानं दरवर्षी क्रमिक पुस्तकं नव्यानं तयार केली. त्यात एक वैचारिक प्रवाहीपणा दिसून येत आहे. क्रमिक पुस्तकांचं स्वरूप अधिकाधिक रचनावादी शिक्षणाच्या अंगानं बदललं जात आहे. नुकतीच आलेली सहावीची पुस्तकं याच मालिकेत पुढचं पाऊल टाकणारी आहेत. या पुस्तकांमधून विषयांतल्या घटकांना भिडणारे पाठ तर आहेतच; परंतु मुलांना केवळ पाठातच गुंतवून न ठेवता, त्यांना वैयक्तिक आणि सार्वजनिक कृतींकडं वळवण्याचा आणि त्याकरवी वर्गाबाहेरच्या समाजजीवनाशी जोडण्याचाही प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यानं मुलांच्या शिकण्यासाठीचा परिसर वर्गखोल्यांपुरता मर्यादित न राहता त्यांचं अंगणच विस्तारलं आहे. मुलांचं शिक्षण केवळ वर्गांमधून न होता ते आता काही प्रमाणात बाह्य जीवनव्यवहारांतून व्हावं, असा प्रयत्न यात करण्यात आलेला आहे. हे रचनात्मक शिक्षणाचं पडलेलं पुढचं पाऊल आहे.

विषयशिक्षणाला नागरिकत्वाच्या मूल्यांची जोड
आजवरचं शालेय शिक्षण नैतिक आणि नागरिकत्वाच्या मूल्यांबाबत उदासीन होतं आणि ही शालेय शिक्षणामधील फार मोठी उणीव होती. मूल्यशिक्षणाची सामाजिक जाणीवही फारशी व्यक्त होत नव्हती. शासकीय स्तरांवरून याबाबतचे काही विचार व्यक्त होत होते, काही तुटक आणि त्रोटक प्रयत्नही केले जात होते; पण शाळांमधून ते फारसे गंभीरपणे कधी घेतले गेले नाहीत आणि शिक्षकवर्गानंही ते आवर्जून मनावर घेतले नाहीत. त्यामुळं, क्षमताधिष्ठित शिक्षणाचा प्रयत्न झाला; पण मूल्याधिष्ठित शिक्षणाला वर्गाबाहेर समाजावरच सोपवलं गेलं.

आता आलेल्या सहावीच्या क्रमिक पुस्तकांनी एक मोठा प्रयोग हाती घेतला आहे, असा निष्कर्ष मला काढावासा वाटतो. हा प्रयोग म्हणजे, विषयशिक्षणाला नागरिकत्वाच्या मूल्यांची दिलेली जोड होय. भाषांच्या पुस्तकांमधून हे ठळकपणे प्रत्ययाला येत आहे.

मूल्यवर्धन ः रचनावादी शिक्षणपद्धतीचं पुढचं पाऊल
महाराष्ट्र शासनानं याचबरोबर आणखी एक महत्त्वाकांक्षी आणि जीवनोपयोगी निर्णय घेतला आहे आणि येत्या जूनपासून, म्हणजे जून २०१६ च्या नव्या शालेय वर्षापासून, मूल्यवर्धनाचा नवा कार्यक्रम शाळांमधून सुरू होत आहे. महाराष्ट्र शासनाचा हा कालोचित कार्यक्रम महाराष्ट्राच्या ३४ जिल्ह्यांमधल्या प्रत्येकी एका केंद्रपातळीवरच्या शाळांमधून पथदर्शी स्वरूपात होणार आहे. बीड जिल्ह्यांतल्या सुमारे ५०० शाळांतून हा मूल्यवर्धनाचा प्रयोग गेल्या सात वर्षांपासून हाताळला जात आहे. रचनावादी पद्धतीच्या शिक्षणानं, मुलांच्या मुक्त वातावरणातल्या शिकण्याला एकीकडं उठाव येईल, मुलं स्वयंशिक्षणाला उद्युक्त होतील, ती ‘शिकणं’ या हेतूनंच शिकतील, तर दुसरीकडं अनुभवाधारित मूल्यवर्धनाच्या कार्यक्रमांतून ती अधिक विचारपूर्वक वागायला शिकतील. या पद्धतीनं भारतीय राज्यघटनेतली पायाभूत नागरी मूल्यं, भावी समाजाच्या दैनंदिन व्यवहारांत उतरतील, अशी आशा आपण करू शकतो.

आजच्या शिक्षणानं नेहमीच उद्याच्या जीवनाची घडी घालून द्यायची असते. मुलांच्या शिकण्या-वागण्याला वळण देऊनच हे साध्य होण्यासारखे असतं. महाराष्ट्रात या दिशेनं पडू लागलेली दमदार पावले, उद्याच्या गरजा भागवण्यासाठी उपयुक्त ठरतील.

Thursday, June 2, 2016

प्राचीन साहित्यकृती

प्राचीन साहित्यकृती :

महाभारत - महर्षी व्यास
  रामायण - वाल्मीक ऋषी
  तुलसी रामायण - तुलसीदास
  पंचतंत्र - विष्णु शर्मा
  गीतगोविंद - जयदेव
  मुद्रराक्षस - विशाखादत्त
  स्वप्न, वासवदत्ता - भास
  अकबरनामा, ऐने अकबरी - अब्दुल फजल
  अर्थशास्त्र - कौटिल्य
  मृच्छकटिक - शुद्रक
  बृहत्कथा - गुणाढय
  शाकुंतल, कुमारसंभव, मेघदुत - कालीदास
  भवभुत्ती - मालती माधव
  शाहनामा - फिरदौसी
  बुद्ध चरितम - अश्वघोष
  नाट्य शास्त्र - भरतमुनी
  नितीशतक - भर्तूहरी
  राजरंगिणी - कल्हन
  कादंबरी, हर्षचरित - बाणभट्ट
  अष्टाधायी - पाणीनी

Wednesday, June 1, 2016

अच्छाई

अच्छाई पलटकर आती है:-

ब्रिटेन में फ्लेमिंग नाम का एक किसान था. एक दिन वह अपने खेत में काम फकर रहा था. तभी उसने किसी के चीखने की आवाज़ सुनी. आवाज़ की दिशा में जाने से किसान ने देखा एक बच्चा दलदल में धस रहा है. आनन-फानन में उसने एक लंबी सी टहनी खोजी और उसके सहारे से बच्चे को दलदल से बाहर निकाला।

दूसरे दिन किसान के घर के पास एक घोड़ागाड़ी आकर रुकी. उसमे से एक अमीर आदमी उतरा और बोला मैं उसी बच्चे का पिता हूँ, जिसे कल फ्लेमिंग ने बचाया था. अमीर व्यक्ति ने आगे कहा मैं इस अहसान को चुकाना चाहता हूँ, लेकिन फ्लेमिंग ने कुछ भी लेने से साफ मना कर दिया और कहा यह तो मेरा कर्तव्य था. इसी दौरान फ्लेमिंग का बेटा बाहर आया. उसे देखते ही अमीर व्यक्ति के मन में एक विचार आया. उसने कहा मैं तुम्हारे बेटे को अपने बेटे की तरह पालना चाहता हूँ. उसे भी वो सारी सुख-सुविधायें और उच्च शिक्षा दी जायेगी, जो मेरे बेटे के लिये होगी. ताकि भविष्य में वह एक बड़ा आदमी बन सके. बच्चे के भविष्य की खातिर फ्लेमिंग भी मान गया।

कुछ वर्षो बाद किसान फ्लेमिंग का बेटा लंदन के प्रतिष्ठित सेंट मेरीज हॉस्पिटल मेडिकल स्कूल से स्नातक हुआ और पूरी दुनिया ने उसे महान वैज्ञानिक, पेनिसिलिन के आविष्कारक ‘सर अलेक्जेंडर फ्लेमिंग’ के रूप में जाना।

कहानी अभी बाकी है. कई बरसों बाद, उस अमीर व्यक्ति का बेटा बहुत ही गंभीर रूप से बीमार हुआ. तब उसकी जान पेनिसिलिन से बचाई गई. उस अमीर व्यक्ति का नाम, रैंडोल्फ़ चर्चिल और बेटे का नाम, विंस्टन चर्चिल था, जो दो बार ब्रिटेन के प्रधानमंत्री भी रहे।

इस कहानी से यह प्रेरणा मिलती है कि जीवन में किसी भी तरह किसी की मदद की जायें, तो अच्छाई पलट-पलट कर आपके जीवन में ज़रूर आती है।

Computer /Laptop Shortcut Keys

कुंजी (Shortcut Keys)
Ctrl + N
नई फ़ाइल बनाने के किए
Ctrl + Shift + A
केपीटलाइज करने के लिए
Ctrl + O
फाइल खोलने के लिए
Alt + Ctrl + M
कमेंट देने के लिए
Ctrl + W
फाइल को बंद करने के लिए
Alt + F10
एप्लिकेशन को मिनीमाइज़ करने के लिए
Ctrl + S
वर्ड डॉकयुमेंट को सेव करने के लिए
Ctrl + F
फ़ाइल में किसी भी अक्षर या शब्द को ढूंढने के लिए
Alt + Ctrl + Y
कर्सर को अगले पेज पर ले जाने के लिए
Alt + F5
एप्लिकेशन को रिस्टोर करने के लिए
Alt + Ctrl + 1 - Apply Heading 1
( टेक्स्ट की स्टाइल हेडिंग 1 के लिए )
Alt + Ctrl + 2 - Apply Heading 2
टेक्स्ट की स्टाइल हेडिंग के लिए )
ctrl +H
टेक्स्ट को रिप्लेक्स करने के लिए
Ctrl+ G
दिये गए पेज नंबर पर पाहुचने के लिए
Alt + Ctrl + Home
डॉकयुमेंट को ब्राउज करने के लिए
Ctrl + Z
अन्डु करने के लिए
Ctrl + y
रिडु करने के लिए
Ctrl + Shift + L
लिस्ट में बुलेट देने के लिए
Alt + Ctrl + K
ऑटो फॉरमेट के लिए
F3 or Alt + Ctrl + V
ऑटो टेक्स्ट के लिए
Ctrl + B or Ctrl + Shift + B
बोल्ड करने के लिए
Ctrl + Shift + F5
बुकमार्क देने के लिए
Ctrl + Page Down
अगले पेज पर जाने के लिए
Ctrl + Shift + F
फॉन्ट को बदलने के लिए
Ctrl + Shift + P
फॉन्ट की साइज को बदलने के लिए
Ctrl + Shift + >l >
फॉन्ट की साइज को 2 प्वाइंट बड़ाने के लिए
Ctrl + Shift + l
फॉन्ट की साइज को 2 प्वाइंट घटाने के लिए
Ctrl + ]
फॉन्ट की साइज को एक-एक प्वाइंट बड़ाने के लिए
Ctrl + [
फॉन्ट की साइज को एक एक प्वाइंट घटाने के लिए
Ctrl + I
फॉन्ट को इटालिक करने के लिए
Ctrl + U
फॉन्ट को अंडरलाइन करने के लिए
Ctrl + Shift + D
फॉन्ट को डबल अंडरलाइन करने के लिए
Ctrl + Shift + K
फॉन्ट स्टाइल को बदलने के लिए
Ctrl + = Ctrl + =
सबस्क्रिप्ट करने के लिए
Ctrl + Shift + +Ctrl + Shift + +
सुपर स्क्रिप्ट करने के लिए
Ctrl + 1
एक लाइन स्पेस देने के लिए
Ctrl + 2 Ctrl + 2
दो लाइन स्पेस देने के लिए
Ctrl + 5
1.5 लाइन स्पेस देने के लिए
Ctrl + 0
लाइन के स्पेस को लगाने व हटाने के लिए
Ctrl + E
पेरेग्राफ को सेंटर एलाइन मेंट मे सेट करने के लिए
Ctrl + J
पेरेग्राफ को जस्टीफाइ करने के लिए
Ctrl + L
पेरेग्राफ को दायां एलाइन मेंट मे सेट करने के लिए
Ctrl + R
पेरेग्राफ को बायां एलाइन मेंट मे सेट करने के लिए
Ctrl + Shift + Enter
कॉलम को ब्रेक करने के लिए
Ctrl + Shift + F8
कॉलम को सलेक्ट करने के लिए
Ctrl + C
किसी भी फ़ाइल, फोल्डर व टेक्स्ट मेटर को कॉपी करने के लिए
Ctrl + Shift + C
किसी भी टेक्स्ट फारमेट को कॉपी करने के लिए
Alt + Shift + F7
डिस्कनरी को ऑपन करने के लिए
Ctrl + F5
डॉकयुमेंट को रिस्टोर करने के लिए
Ctrl + T
हेन्डिंग इन्डेंन्ट करने के लिए
F1
किसी प्रकार की मदद के लिए
Ctrl + Shift + H
छिपाने (Hidden करने) के लिए
Alt + F8
मेक्रो को ओपेन करने के लिए
Alt + Shift + K
मेल मर्ज को चेक करने के लिए
Alt + Shift + E
मेल मर्ज मे डेटा सोर्स को बदलने के लिए
Alt + Shift + M
मेल मर्ज को प्रिंट करने के लिए
Ctrl + Enter
पेज को ब्रेक करने के लिए
F2
सलेक्टेड फाइल व फोल्डर को रिनेम करने के लिए
F4
लास्ट एक्सन को रिपिट करने के लिए
F9
सलेक्टेड फिल्ड को अपडेट करने के लिए
F10
मीनू बार को एक्टिव करने के लिए
F11
अगली फिल्ड पर जाने के लिए
F12
फाइल को सेव एज करने के लिए.

मैत्र जीवांचे

॥ मैत्र जीवांचे…….. तसे पण ........॥
-:श्रीरंग चितळे

पुण्यात घडलेली सत्त्य घटना....
सुमारे ७-८ महिन्यांपूर्वी एका मुलानी इयत्ता ४ थी मधे शाळेतल्या त्याच्या वर्गातील मुला-मुलींचा ग्रुप फोटो फेसबुकवर टाकला आणि आवाहन केलं की 'ह्यात जे जे कोण आहेत त्यांनी संपर्क करा'. एक महिन्यात सुमारे ३०-३५ मित्र-मैत्रिणी  ४० वर्षांनी पहिल्यांदा कनेक्ट झाले. पुढे व्हॉट्स अपवर ग्रुप झाला. सगळ्यांचे स्मार्ट फोन दिवसभर किणकीणायला किंवा खणखणायला लागले. मग “हा कुठे आहे?” “ती कुठे असते?” अशी शोधाशोध पण होत राहिली. हळूहळू बालपणीचा वर्ग स्मार्ट फोनवर ‘भरायला’ लागला. नंतर त्यांचं एक गेट टुगेदरपण झालं. बालपणीच्या वर्ग मैत्रिणी नव्या रुपात भेटल्यानी आणि आता पुढेही भेटत राहतील ह्या कल्पनेनी मुलं जास्त एक्सायटेड होती...

एकदा ग्रुपवर कोणीतरी विचारलं "हल्ली मीना कुठे असते?" दुसऱ्या दिवशी रीस्पोंस आला "मीना तिच्या घरीच बेड रिडन आहे. पाच वर्षानपूर्वी अर्धांगवायूच्या झटक्यामुळे विकल होऊन पडलीय. तिला चालता पण येत नाही. नवरा आणि दोन मुलं हेच तिचं सर्व काही करत आहेत." ग्रुपला शॉक आणि मग सन्नाटा…..

मग चार-पाच मित्र मैत्रीणीत पर्सनल मेसेजेसची देवाण घेवाण झाली. ग्रुपवर मेसेज आला की "आपण मीनाला भेटायला जाऊया". सगळ्यांनी जाणं व्यवहार्य नव्हतं, म्हणून मग मीनाशी फोनवर आगाऊ वेळ ठरवून १०-१२ मित्र-मैत्रिणी तिच्या घरी गेले. तिच्या छोट्या घरात गेल्यावर आपली ही बाल मैत्रीण अशी अंथरुणाला खिळलेली पाहून बराच वेळ सगळे निशब्द होते.....पण हीच कोंडी फोडायची होती !! एकेकांनी तिच्याशी संवाद सुरु केला. तिची चौकशी केली....अंथरुणावर पडून राहिलेली मीना भरभरून बोलत होती.....तिचं चेहरा, तिचे डोळे....सगळंच बोलत होतं....मैत्रिणीनी तिचा हात हातात घेतल्यावर मात्र मीनाचा बांध फुटला.....ते आनंदाश्रू होते? का तिला उठून बसता येत नाहीये ह्याचं दुख्ख होतं? हे काही कळत नव्हतं. सगळ्यांचेच डोळे भरून आले. ह्या मित्र-मैत्रिणींचा तिच्याशी संवाद चालू असताना तिच्या नवऱ्यानी आणि मुलांनी खाण्या पिण्याची व्यवस्था केली. ते पाहून सगळ्यांना कौतुक वाटणं आणि गहिवरून येणं हे एकदमचं झालं. "कोणी मदतीला नसताना कसं करत असतील हे सगळे इतकी वर्ष? आणि मीनाचं काय?" हे भाव सर्वजण लपवायचा प्रयत्न करत होते. मित्र- मैत्रिणी परत जाताना मीनाला सांगून गेले की ह्यातून तिला बाहेर पडायला हवं. त्यांपैकी कोणी न कोणीतरी तिला दर आठवड्यात येउन भेटून जातील, तिच्याशी बोलतील आणि तिला अंथरूणमुक्त व्हायला मदत करतील.

त्या दिवसानंतरची बदललेली मीना ही नवऱ्यानी आणि मुलांनी पाच वर्षांनंतर पहिल्यांदा पहिली होती. तिच्या मनानी आता उभारी घ्यायला सुरुवात केली. "आता ह्यातून बाहेर पडायला पाहिजे" असं तिला "आतून" वाटायला लागलं होतं. ह्यात तिला साथ द्यायला तिचं "मैत्र" होतं !! दिलेल्या शब्दाला जागून मित्र मैत्रिणी दर आठवड्याला तिला भेटत राहिले. तिचा आत्मविश्वास दुणावला.

दोन महिने झालेत, ती आता घरातल्या घरत चालायला लागलीय. पंधरा दिवसांपूर्वी मीनानी आपणहून एका मैत्रिणीला फोन करून सांगितलंय की "तुझ्या नविन गाडीतून मला चक्कर मारून आण". मीनाच्या
बरोबर गाडीतून सोबतीला कोणी कोणी जायचं ह्यावरून ग्रुपवर प्रेमळ भांडणं सुरु झालीयत.
……………………..मैत्र जीवांचे, तसे पण !!

तंत्रस्नेही शिक्षण, ब्राझील

🔵जगभरातील  तन्त्रस्नेही शिक्षण पद्धतीचा आढावा घेणारा  लेख आजच्या महाराष्ट्र टाइम्स मधे🔵



 तंत्रस्नेही शिक्षणाचा ‘ब्राझिलियन’
प्रयोग….@ रणजितसिंह डिसले




ब्राझील म्हटले
कि लगेच फुटबॉल आठवतो.पेले,रोनाल्डो सारखे
आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणजे या देशाने जगाला
दिलेली देणगीच.पण आज ब्राझील ची एक वेगळी
ओळख जगासमोर आली आहे.एप्रिल २०१६ मध्ये या
देशाने माध्यमिक स्तरावरील सर्वच बालकांना
गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे उद्दिष्ट गाठणारा
जगातील पहिला देश हा बहुमान मिळवला
आहे.संयुक्त राष्ट्र संघाने नुकत्याच प्रकशित केलेल्या
अहवालात या प्रयोगाची विशेष दखल घेतली गेली
आहे. याच प्रयोगाची ओळख करून देणारा हा लेख.
सेंट लुईस हा
अमेझॉन च्या खोऱ्यात वसलेल्या खेड्यात राहणारा
मुलगा.गावात एकूण २० कुटुंबे अन लोकसंख्या ७६.लुईस
अन त्याचा मित्र फर्नांडीस हे दोघे यावर्षी ११
वी मध्ये शिकत आहे.त्यांच्या गावातील हे दोघेच
उच्च शिक्षित युवक.10 वर्षापूर्वी ची
परिस्थिती मात्र वेगळी होती.माध्यमिक शिक्षण
घ्यायचे असेल तर लुईस समोर दोनच पर्याय
होते.एक म्हणजे १०० मैल दूर असणाऱ्या शहरात जाणे
—जिथे पोहचायला तब्बल २ आठवडे लागतात,किंवा
मग शिक्षण सोडून देणे.माध्यमिक स्तरावर होणारी
गळती हा ब्राझील च्या सरकार समोरचा चिंतेचा
प्रश्न होता.ही गळती रोखण्यासाठी सरकारने
अंमलात आणलेला कृती आराखडा म्हणजेच ‘तंत्रस्नेही
शिक्षणाचा ब्राझिलियन प्रयोग’.
सन २००९
साली आपला भारत देश १४ वर्षाखालील मुलांना
मोफत व सक्तीचे शिक्षण देणारा कायदा केला
म्हणून आनंदोत्सव साजरा करत होता , त्याच वर्षी
ब्राझील ने माध्यमिक स्तरावरील मुलांना
गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारा कायदा केला अन
याची उदिष्टे गाठण्याची कालमर्यादा सन २०१६
अशी ठरवण्यात आली.ब्राझील च्या कायद्यात
गुणवत्तापूर्ण शिक्षण हा मुलभूत घटक मनाला
गेला.तसेच निश्चित कालमर्यादेत हे उदिष्ट साध्य
करावयाचे असल्याने विचार व कृती यांमध्ये
एकवाक्यता साधली गेली. अमेझॉन च्या खोऱ्यात
वसलेल्या २३०० खेड्यातील तब्बल ३,००,०००
मुलांना पुन्हा शिक्षण प्रवाहात आणण्यात ब्राझील
ला यश आले आहे.माध्यमिक स्तरावर होणाऱ्या
गळती मागील महत्वाचे कारण होते – माध्यमिक
स्तरावरील शिक्षणासाठी करावा लागणारा
शेकडो मैलांचा प्रवास.यावर उपाय म्हणून ही मुले
ज्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होती त्याच
शाळेत माध्यमिक शिक्षणासाठी थेट प्रक्षेपण केंद्रे
उभारण्यात आली.सरकारी मालकीची
दूरचित्रवाहिनी ,उपग्रह सेवा पुरवठादार व
स्थानिक केबल चालक यांच्या मदतीने पहिल्या
टप्प्यात तब्बल २३०० खेड्यामधील शाळेत ही
सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.केवळ पायाभूत
सुविधा उपलब्ध करून देण्यावर हा देश थांबला
नाही तर थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून शिक्षण
देण्याच्या यापूर्वीच्या अयशस्वी प्रयोगांवर मात
कारणासाठी विशिष्ट कार्ययोजना आखली
गेली.ब्राझील मधील विख्यात
शिक्षणतज्ञ,बालमानसशास्त्रज्ञ व शिक्षण शास्त्र
अभ्यासक यांच्या मदतीने असे शिक्षण घेणाऱ्या
मुलांसाठी वेगळा अभ्यासक्रम तयार केला गेला.या
मुलांची भौगोलिक
परिस्थिती,परंपरा,बोलीभाषा,पालकांचे व्यवसाय
यांच्या अभ्यासातून व्यवसायाभिमुख कौशल्ये
विकसित करत शिक्षणातून अर्थार्जन हे उदिष्ट
साध्य करणारा अभ्यासकम आखला गेला.
कौशल्याधीष्ठीत अभ्यासक्रमाच्या आखणी नंतर थेट
प्रक्षेपणाच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी
ब्राझील मधील सर्वोत्कृष्ट ५० शिक्षकांची निवड
केली गेली. अमेझॉन ची राजधानी मानौस मधील
केंद्रातून हे शिक्षक रोज ४ तास अध्यापन करत
राहिले. हे थेट प्रक्षेपण ज्या शाळेत दाखवले जात
होते त्या शाळेतील शिक्षकांना वर्ग व्यवस्थापन
(Classroom-Management ) व
मूल्यमापनाचे ( Evaluation) चे विशेष
प्रशिक्षण देण्यात आले.थेट प्रक्षेपण वर्ग रटाळ न
होता अधिक परिणामकारक होण्यासाठी
द्विमार्गी संवादाची सुविधा देखील पुरवण्यात
आली.यामुळे कोणताही विद्यार्थी त्याला आलेली
अडचण तज्ञ मार्गदर्शकाना विचारू शकत
होता.त्यामुळेच हे अध्यापन अधिक प्रभावी
ठरले.पारंपारिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या
मुल्यमापनाला फाटा देत कौशल्याधारित
मुल्यमापनाचा अवलंब करण्यात आला.मुलांचे
मूल्यमापन हे सार्वत्रिक न करता ते वैयक्तिक
करण्यात आले.त्यामुळे प्रत्येक मुलाच्या प्रगतीच्या
आलेखाची तुलना इतरांशी होण्याचा धोका टाळला
गेला. प्रत्येक आठवडा अखेर या प्रत्येक मुलाच्या
आठवड्यातील कामगिरीचा आढावा घेवून पुढील
आठवड्यातील पाठ्य्क्रमाची आखणी केली गेली.
प्रत्येक शाळेला पुढील आठवड्याचे वेळापत्रक
अगोदरच पाठवले जाई त्यामुळे तेथील शिक्षकांना
वर्ग व्यवस्थापन करणे अधिक सुलभ जाई.
सलग ३ वर्षे
याची अंमलबजावणी केल्यानंतर याची उपयुक्तता
पाहून ब्राझील मधील इतर ६ राज्यांनी देखील
याच मॉडेलचा स्वीकार केला.मागील 10 वर्षे हा
प्रयोग सुरळीत सुरु आहे.याचाच परिणाम म्हणून
संयुक्त राष्ट्राने ब्राझील मधील एक ही मूल
माध्यमिक स्तरावरील गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून
वंचित नाही असे प्रशस्तीपत्र दिले.संयुक्त
राष्ट्राने घोषित केलेली शाश्वत विकासाची
उद्दिष्टे गाठण्यासाठी सारे जग प्रयत्न करत
असतानाचा ब्राझीलच्या या यशाने सर्वांसमोर
आदर्श उभा राहिला आहे.
लोकसंख्या व
अर्थव्यवस्थेचा आकार याबाबत भारताशी काही
प्रमाणात साम्य असणारा हा देश जे यश साध्य करू
शकला ते आपल्यासाठी निश्चितच प्रेरणादायी
आहे.ब्राझीलच्या या शैक्षणिक मॉडेल मधील बऱ्याच
बाबी आपल्या देशाला मार्गदर्शक आहेत.जिथे
वैद्यकीय शिक्षणासाठी सबंध भारतभर ‘नीट’
नेटकी परीक्षा असावी असा आग्रह आम्ही धरत
असतानाच स्थानिक गरजांचे प्रतिबिंब
अभ्यासक्रमात उमटले तर त्याची उपयुक्तता वाढते
हेच ब्राझील च्या नव्या मॉडेल ने दाखवून दिले
आहे.पारंपारिक शिक्षण व अभ्यासक्रम यांची
वास्तविक जीवनाशी असणारी फारकत या
निमित्ताने पुढे आली आहे.महाराष्ट्रासारख्या
राज्यात जिथे मराठवाड्यातून दरवर्षी लाखो मुले
उसतोडीच्या निमित्ताने किमान ६ महिन्यासाठी
शाळाबाह्य राहतात. या मुलांच्या गरजा,
कौटुंबिक परिस्थिती यांचा अभ्यास करून वेगळा
अभ्यासक्रम आखला जाणे गरजेचे आहे.बीड सारख्या
जिल्ह्यात या धर्तीवर पथदर्शी प्रयोग राबवता
येवू शकेल.या पायलट प्रोजेक्ट मधील येणाऱ्या
समस्यांचा अभ्यास करून काही उपाय निश्चितपणे
समोर येतील.या पर्यायांची उपयुक्तता पडताळून
मगच याचे सार्वत्रिकीकरण केले जाणे उचित
ठरेल.मुलांचे होणारे स्थलांतर व गळती
रोखण्यासाठी पालकांचे मन वळवण्याचा पर्याय
दरवर्षीच लागू पडेल याबाबत शंकाच वाटते.मात्र
साखर शाळांचे पुनरुज्जीवन करून तिथे या मुलांच्या
गरजानुरूप अभ्यासक्रम आखून त्याच्या
अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाऊ
शकेल.केवळ शैक्षणिक सुविधा पुरवण्यात RTE चे यश
मानणे म्हणजे अल्प संतुष्टपणा ठरेल.शैक्षणिक
सुविधांची उपलब्धता याही पुढे जाऊन आपल्याला
गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने वाटचाल
करायला हवीय.. ब्राझीलचा हा पॅटर्न आपल्या
गरजानुरूप बदल करून अंमलात आणायला काहीच
हरकत नाही. स्थलांतर स्थानिक गरजा लक्षात घेत
अर्थार्जनासाठी शिक्षण देण्याबाबत आम्हा
भारतीयांना विचार करावा लागेल.असे शिक्षण
देताना ते अधिक लवचिक असण्याची गरज
आहे.संगणक,टॅबलेट आदी साधनाच्या मदतीने
तंत्रस्नेही शिक्षण देण्यात बाबत आपला देश
गोंधळलेल्या अवस्थेत असताना ब्राझील चे
तंत्रस्नेही प्रारूप मार्गदर्शक आहे. तंत्रज्ञानाचा
प्रभावी वापर करून घनदाट जंगलात देखील
गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गंगा अव्याहतपणे वाहू
शकते हे यातून दिसून येते. प्रचंड पाऊस व महापूर
हा जीवनाचा अविभाज्य भाग असणाऱ्या अमेझॉन
मधील मुलांच्या अभ्यासक्रमात आपत्ती
व्यवस्थापन,पर्यावरण संरक्षण यांचा जाणीवपूर्वक
समावेश केला गेला. विषारी साप ओळखणे व साप
पकडण्याचे तंत्र अवगत करण्यासाठी सिम्युलेशन ची
मदत घेतली गेली.त्यामुळे सर्प दंशाने मृत्युमुखी
पडण्याचे प्रमाण ब्राझील मध्ये लक्षणीयरीत्या
घटले आहे, असेही निरीक्षण संयुक्त राष्ट्राने
नोंदवले आहे.मुलांना शाळेत शिकण्यासाठी त्यांचे
सामाजिक अभिसरण होणे महत्वाचे असते हा आपला
भारतीय समज देखील यानिमित्ताने फोल ठरला
आहे.कारण अमेझॉन मधील अनेक शाळांमध्ये केवळ २-४
मुलेही शिक्षण घेत आहेत.मुलाच्या दैनंदिन जीवनाशी
निगडीत शिक्षण असेल तर ते शाश्वत शिक्षण ठरते
हेच या निमित्ताने समोर आले आहे.

Tuesday, May 31, 2016

शिक्षण व्यवहाराशी जोडताना

📝शिक्षण व्यवहाराशी जोडताना...
   प्रसाद मणेरीकर📝

मुले शाळेत जे शिकतात, त्यापेक्षा कितीतरी जास्त घरात, परिसरात, समाजात वावरताना शिकतात. तेव्हा विषयातील संकल्पना पाठ्यपुस्तकातून शिकता येत नाहीत, तर प्रत्यक्ष व्यवहारातून शिकता येतात, हे एकदा समजून घेतले, की अभ्यासक्रमाची रचना करणे सोपे होईल.
मुले शिकावीत, अधिक चांगल्या पद्धतीने शिकावीत, यासाठी केलेल्या विविध व्यवस्थांपैकी शाळा ही एक व्यवस्था. मुले शाळेत यावीत, तिथे शिक्षकांकरवी शिकती व्हावीत आणि उत्तम गुणांनी उत्तीर्ण व्हावीत, यासाठी सगळी धडपड असते. मात्र तरीही काही मुले मागे पडतात, काही नापास होतात, काही अर्ध्यावरच शाळा सोडतात, हे वास्तव आहे. मुलांना शाळेत शिकायला आवडत नाही, तिथे त्यांना कंटाळा येतो, असा सार्वत्रिक समज आहे आणि तो काहीसा खराही आहे. वर्गातील अमुक मुले काहीच शिकत नाहीत, त्यांना काहीच येत नाही, असे सांगणारे शिक्षक आहेत. सरकारलाही याची जाणीव आहे, म्हणून तर सरकार अप्रगत मुलांसाठी स्वतंत्र वेळ देऊन उपक्रम राबवते; पण तरीही मुले मागे पडतात, हे वास्तव उरतेच.
हे असे का होते याचा धांडोळा घेतल्यास अनेक कारणे पुढे येतात. यातले एक कारण, मुले शाळेत जे शिकतात ते व प्रत्यक्ष व्यवहारात जे करतात ते, यांची सांगड घातलेली त्यांना दिसत नाही व त्यांनाही ती घालता येत नाही. त्यामुळे शाळेतले शिकणे त्यांना समजत नाही आणि त्यामुळे ते कंटाळवाणे होते. वास्तविक मुले शाळेत जे शिकतात, त्यापेक्षा कितीतरी जास्त घरात, परिसरात, समाजात वावरताना शिकतात. परिसरातील घटना पाहत, समजून घेत, उपक्रमांत सहभागी होत, विविध व्यक्तींशी संवाद साधत असताना ही शिकण्याची प्रक्रिया सुरू असते. किंबहुना शाळेत जायच्या कितीतरी आधीपासूनच ही प्रक्रिया सुरू होते. परिसरात वावरताना सहजपणे, कुणीही न शिकविता त्यांच्या अनेक संकल्पना स्पष्ट होत असतात. मुद्दा असा, की परिसरातून अनुभव घेत मूल शिकत असेल, तर ते "शिकत नाही‘ असे आपण का म्हणतो आणि त्याला "ढ‘ का ठरवतो? म्हणजेच इथे आपली शिक्षक म्हणून जबाबदारी सुरू होते आणि ती दुहेरी स्वरूपाची आहे. एक, मूल ज्या वातावरणातून आले आहे, ते वातावरण समजून घेणे आणि दुसरे मुलाचे अनुभवविश्व लक्षात घेऊन तशी अभ्यासक्रमाची रचना करणे. मूल परिसरातून ज्या प्रकारचे अनुभव घेते आहे, त्याचे शालेय शिक्षणात पर्यवसान कसे करायचे, असा तो मुद्दा आहे.
वरवर पाहता ही अवघड बाब वाटेल, कारण प्रत्येक मुलाचा विचार करायचा आणि तशी प्रत्येकासाठी अभ्यासक्रमाची आखणी करायची हे सोपे काम नाही. मात्र अगदी तसेच करायची गरज नाही. कारण ज्या परिसरातून शाळेत मुले येतात, तो परिसर बहुतांश मुलांचा समानच असतो किंवा तसा समान परिसर असणाऱ्या मुलांचे गट करता येतात व त्या आधारे अभ्यासक्रम आखता येतो.
उदा. ग्रामीण व निमशहरी भागांतील मुलांसाठी शेती हा रोजचा अनुभव असतो. ती शेतात वावरतात, शेतीशी संबंधित अनेक क्रिया त्यांना माहिती असतात. याचा आधार घेत भाषा, गणित, परिसर अभ्यास यांतील अनेक संकल्पना मुलांना सोप्या करून सांगता येतील. असेच घरातील व्यवहारांचेही असते. मग या मुलांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला तर शालेय विषयांतील संकल्पना समजणे सोपे जाईल. तो अभ्यासक्रम अवघड वाटणार नाही आणि दुसरे म्हणजे घरचे आणि परिसरातले व्यवहार ती अधिक समजून-उमजून करतील. या दोन्हीतून मुलांचे आकलन वाढेल.
आपली गफलत झालेली आहे, ती पाठ्यपुस्तक केंद्रिभूत मानून सगळे व्यवहार करण्यातून. खरे तर सरकारही आता त्या मानसिकतेतून बाहेर पडू पाहतेय. विषयातील संकल्पना पाठ्यपुस्तकातून शिकता येत नाहीत, तर व्यवहारातून शिकता येतात, हे एकदा समजून घेतले, की पुढची रचना करणे सोपे जाईल.
महाराष्ट्राच्या विविध भागांतील मुलांना पाठ्यपुस्तकातील धडे समजत नाहीत व वर्गात चालणाऱ्या गणिती क्रियाही समजत नाहीत, हे त्या त्या भागांतले शिक्षकही मान्य करतात. याचाच परिणाम मुलांना शिकण्यात रस वाटण्यावर होतो. नाहीतर दुकानात जाऊन रोजचे व्यवहार करणाऱ्या मुलांना, किंवा आई-वडिलांना भाजीच्या दुकानात मदत करणाऱ्या मुलांना शाळेतील बेरीज-वजाबाकी येणार नाही असे कसे होईल? आणि हे व्यवहाराशी जोडून शिकणे केवळ प्राथमिक इयत्तेच्या टप्प्यावरच नाही, तर माध्यमिक इयत्तांसाठीसुद्धा लागू आहे. कारण न्यूटनचे नियम आपल्याला तोंडपाठ असतात, पण ते रोजच्या जगण्याला लावता येत नाहीत. रस्सीखेच करताना दोरी तुटून पडल्याचा अनुभव अनेक मुलांना असतो. बस सुरू झाल्यावर ढकलले गेल्याचा अनुभवही असतो, पण याच्याशी नियमांचा संबंध ते शिकूनही मुलांना लावता येत नाही. या अशा रोजच्या अनुभवातून नियमांकडे गेलो, तर शब्दश: नियम कदाचित नाही लक्षात राहणार; पण ती संकल्पना समजेल आणि नियम पाठ करण्यापेक्षा ते केव्हाही महत्त्वाचे!
हे मान्य असेल तर यापुढे आपल्याला अभ्यासक्रमाचा विचार वेगळा करावा लागेल. शाळेत जाऊन मुलांना काय आले पाहिजे, हे नीट ठरवावे लागेल. म्हणजे मुलांना पाठ्यपुस्तक वाचता आले पाहिजे, की मुलांची वाचन क्षमता विकसित व्हायला हवी? आणि वाचन क्षमता विकसित व्हायला हवी असेल, तर वाचनाचे कोणते किती आणि विविधांगी अनुभव मुलांना देता येतील, जे सुरवातीच्या टप्प्यावर परिसराशी जोडलेले असतील, हे पाहावे लागेल. कारण ज्या वयात वाचनाची गोडी लागायची त्या वयात अनाकलनीय वाचावे लागले, तर मुले वाचनापासून दूर जाण्याची शक्यताच जास्त. कारण वाचन ही आपली आपण करण्याची व समजून घेण्याची बाब आहे.
सरकारने शिक्षकांचा पाठ्यपुस्तकाधारित शिक्षणाचा भ्रम लवकरात लवकर दूर करायची गरज आहे. प्रत्येक वयोगटासाठीच्या क्षमता निश्चित कराव्यात. या क्षमतांपर्यंत पोचण्यासाठी साह्यभूत होतील, अशा क्रमबद्धपणे घ्यायच्या उपक्रमांची यादी करावी आणि शिक्षकांना अधिकाधिक मोकळीक द्यावी. सुरवातीला शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे लागेलही कदाचित, पण तो सरकारचा हातखंडा आहे. मुलांना शालेय शिक्षणाची गोडी लावण्याचा हा एक मार्ग ठरू शकेल.

Monday, May 30, 2016

शिक्षण लेख

पालकनीतीमध्ये आलेला शिक्षणशास्त्रlचे अभ्यासक किशोर दरक यांचा हा लेख जरा वेळ काढून जरुर वाचाल.

 ऑन द शोल्डर्स ऑफ जायंट्स

 · भाषा शिक्षण
 · शिक्षण
 · शिक्षण - माध्यम

सांस्कृतिक भांडवल आणि पिअर बोर्द्यू
शिक्षण, संस्कृती आणि त्यांच्या परस्परसंबंधांतून होणार्‍या सामाजिक विषमतेच्या पुनर्निर्मितीचं भान निर्माण करणार्‍या पिअर बोर्द्यू आणि त्यांची सांस्कृतिक भांडवलाची संकल्पना यांची चर्चा करणारा हा लेख.
"The point of my work is to show that culture and education aren’t simply hobbies or minor influences. They are hugely important in the affirmation of differences between groups and social classes and in the reproduction of those differences." - Pierre Bourdieu
“आठाठ वर्षं शाळेत जात असूनही काही मुलं शिकती होत नाहीत”, हा मुद्दा किती प्रमाणात सत्य आहे यावर मतभिन्नता आहे. मात्र हा मुद्दा पूर्णपणे असत्य आहे असं आज देशात कुणीही म्हणू शकत नाही. आर. टी. ई. कायदा लागू झाल्यापासून देशात अनेक राज्यांत गुणवत्ता विकासाचे जे विविध कार्यक्रम चालू आहेत ते सर्व कार्यक्रम सगळी मुलं शिकती करणं हे उद्दिष्ट (किमान कागदोपत्री तरी) समोर ठेवून चालतायत. मुलं शाळेत जातात, किमान एका शाळेत किंवा एका वर्गात तरी एकसमान शिक्षण मिळतं, एकसारख्या सोयी-सुविधा मिळतात तरी मुलं शिक्षणातून एकसारखी किमान गुणवत्ता प्राप्त करताना दिसत नाहीत. असं का होत असावं, याची अनेकविध मानसशास्त्रीय कारणं आहेतच, शिवाय सामाजिक, सांस्कृतिक कारणं देखील आहेत.
शाळांमधून मिळणारं शिक्षण कुणासाठी फायदेशीर ठरतं, तर कुणासाठी गैरसोयीचं. ते नेमकं कुणाच्या फायद्याचं असतं आणि कुणासाठी नुकसानकारक, त्यातून समाजात समता, सामाजिक न्याय अशी आधुनिक मूल्यं प्रस्थापित होतात की विषमता निर्माण होत राहते, शिक्षणाच्या प्रक्रियेतली सामाजिक जटिलता समजावून कशी घ्यायची, अशा गुंतागुंतीच्या प्रश्नांची समाजशास्त्रीय उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार्या विसाव्या शतकातल्या महत्त्वाच्या काही नावांपैकी एक अग्रणी नाव म्हणजे पिएर बोर्द्यू (Pierre Bourdieu, 1930-2002). गेल्या शतकातील एक महत्त्वाचे फ्रेंच समाजशास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ते, मानववंशशास्त्रज्ञ म्हणून बोर्द्यू ओळखले जातात. कला, संस्कृती, शिक्षण, भाषा, सार्वजनिक माध्यमं, सामाजिक संरचना, समाजातले सत्तासंबंध अशा अनेक विषयांमध्ये मूलभूत संशोधन करून सामाजिक महत्त्वाच्या या विषयांच्या विश्लेषणासाठी नवे सिद्धांत जगापुढे मांडण्याचं महत्त्वाचं काम बोर्द्यू यांनी केलं.
1960 च्या दशकाच्या पूर्वार्धात फ्रान्सध्ये प्राथमिक शिक्षण क्षेत्रात विविध सामाजिक वर्गांतील मुलांच्या संपादणुकीतील फरकाविषयी घमासान चर्चा सुरू होत्या. शिक्षणातील संपादणुकीचा अभ्यास करण्यासाठी उपलब्ध शैक्षणिक-समाजशास्त्रीय साधनं अपुरी पडू लागली होती. बुध्यांकासारख्या (आय. क्यू.) बोधनक्षमतेवर (cognitive ability) आधारित पद्धतीची मर्यादा अधिकाधिक प्रमाणात लक्षात येऊ लागली होती. अशा वेळी बोर्द्यूंनी संख्याशास्त्रीय पृथक्करणाचा आधार घेऊन शिक्षणक्षेत्रावर दूरगामी परिणाम करणारी समाजशास्त्रीय मांडणी केली.
एखाद्या क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक आणि मिळणार्या नफ्याचा वाटा हे एकमेकांशी समानुपाती असतात. ज्याचं भांडवल जास्त त्याचा/तिचा नफ्यातला वाटा जास्त, हा अर्थशास्त्रीय व्यवहारातला ढोबळ सिद्धांत. या सिद्धांताशी साधर्म्य सांगणारासांस्कृतिक भांडवलाचा (cultural capital) सिद्धांत बोर्द्यूंनी मांडला. त्यांच्या म्हणण्यानुसार औपचारिक शिक्षणातली परिस्थिती समाजातल्या वर्चस्वधारी वर्गातली (dominant class) किंवा उच्च वर्गातील मुलांना समाजातील कनिष्ठ वर्गीय मुलांपेक्षा अधिक फायदा देणारी असते. उच्च वर्गीय मुलं शिक्षणप्रक्रियेत दाखल होतानाच त्यांच्या यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते. यामध्ये त्यांच्या बुद्धिमत्तेचा संबंध नसतो. अशा मुलांसाठी घरची संस्कृती आणि शाळेची संस्कृती यात सातत्य (continuity) असतं, साम्य असतं. या मुलांची भाषा, सामाजिक आंतरक्रियेची पद्धत, सौंदर्यदृष्टी असे सर्व सांस्कृतिक जडणघडणीचे घटक शाळेच्या संस्कृतीशी मिळतेजुळते असतात. शिक्षणाचा आशय (content) आणि वापरलं जाणारं अध्यापनशास्त्र (pedagogy) या दोन्ही गोष्टी समाजातील वर्चस्वधारी गटातल्या मुलांना परक्या वाटत नाहीत. या उलट कनिष्ठ वर्गीय किंवा कामगार वर्गीय मुलांना शाळेचं वातावरण परकं, विरोधी वाटू लागतं. त्यांच्यामध्ये उपरेपणाची भावना वाढीला लागते आणि ते शालेय प्रक्रियेपासून तुटत जातात, किंवा शालेय प्रक्रियेशी कधी जोडलेच जात नाहीत. त्यांच्या घरची संस्कृती आणि शाळेची संस्कृती यात खूप तफावत असते म्हणूनदेखील त्यांची शैक्षणिक संपादणूक कमी प्रतीची असते.
शाळेत येताना प्रत्येक मूल आपल्यासोबत जी संस्कृती - म्हणजे त्याची भाषा, बोलण्या-वागण्याच्या पद्धती, आवडी-नावडीच्या गोष्टी, खाण्या-पिण्याचे प्रकार, गाणी, गोष्टी - घेऊन येतं ते झालं त्याचं सांस्कृतिक भांडवल. शाळा मात्र या भांडवलाबाबत पक्षपाती धोरण अवलंबतात. म्हणजे उच्चवर्गीयांच्या सांस्कृतिक भांडवलाचा सन्मान राखत त्या मुलांना संस्कृतीसातत्याचा फायदा देतात. त्याचवेळी खालच्या सामाजिक स्तरातील मुलांच्या संस्कृतीला नाकारतात, त्यात सुधारणा सुचवतात किंवा तिचा तिरस्कार करतात. याचाच दुसरा अर्थ उच्चवर्गीयांचं सांस्कृतिक भांडवल स्वीकारार्ह म्हणून त्यांना शिक्षणातून नफा मिळवून देणारं ठरतं. हानफा शैक्षणिक यशाच्या स्वरूपात असतो आणि भविष्यात त्याचं रूपांतर आर्थिक यशात होतं. याउलट, कनिष्ठ वर्गाची संस्कृतीच त्यांच्या यशात अडसर ठरते आहे, असं भासवलं जातं. शाळा उच्चवर्गीयांच्या सांस्कृतिक भांडवलाला महत्त्व देत असल्यामुळे उच्चवर्गीय मुलं पुढील आयुष्यात आर्थिक दृष्ट्या सक्षम होताना दिसतात. अशा प्रकारे विषमताधारित समाजात शिक्षणातून विषमतेचं पुनरुत्पादन होतं.
सांस्कृतिक भांडवलाची बोर्द्यूंची ही संकल्पना भारतासारख्या बहुविधतेच्या (plurality) देशांना अनेक अर्थांनी उपयुक्त आहे. ही संकल्पना आपण आपल्या शैक्षणिक संदर्भातली काही उदाहरणं घेऊन समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात. भारतातील विषमता बहुआयामी आहे. जात, लिंग, धर्म या तीन आधारांवरची विषमता वर्गीय विषमतेपेक्षा जटिल असल्याचं अभ्यासक मानतात. शाळांचा विचार करता तिथं शिकवला जाणारा आशय सहसा उच्चजात, उच्चवर्ग धार्जिणा असतो.
प्रसिद्ध विचारवंत कांचा आयलया यांनी ‘व्हाय आय एम नॉट अ हिंदू’ या नावाचा एक ग्रंथ लिहिलाय. ब्राम्हणी हिंदू धर्माची चिकित्सा करणार्या या पुस्तकात स्वतःच्या शाळेचा अनुभव सांगताना ते म्हणतात, ... पाठ्यपुस्तकांमधून ज्या कथा सांगितल्या जात असत त्या आम्ही कधीही ऐकलेल्या नव्हत्या. राम आणि कृष्ण यांच्या कथा, रामायण आणि महाभारत ही काव्ये शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात वारंवार समोर येत राहिली..... ब्राम्हण आणि वैश्य वगैरे मुलांसाठी या कथा अगदी परिचित, त्यांच्या देवांच्या होत्या..... ही नावं आमच्यासाठी किती परकी होती ते मला अजूनही ठळकपणे आठवतं. कालिदास हे नाव आमच्यासाठी शेक्सपिअर इतकंच परकं होतं. फरक इतकाच की एक नाव तेलगु पाठ्यपुस्तकात असे तर एक इंग्रजी पाठ्यपुस्तकात..... आजतागायत मला कधीही कोणत्याही पाठ्यपुस्तकात एकाही पाठात पोचम्मा, पोतराजु, कट्टमैसम्मा, काटम्माराजु, बिरप्पा अशी आमच्या देवांची नावं आढळली नाहीत.... त्यांच्याविषयी कथाच उपलब्ध नाहीत असं नाही पण पाठ्यपुस्तक लेखकांना ती नावं पुस्तकांत देण्याच्या लायकीची वाटत नाहीत. (संदर्भ: कांचा आयलया, व्हाय आय एम नॉट अ हिंदू, पान 13, साम्या प्रकाशन, कलकत्ता, 1996) शिक्षणाच्या आशयामध्ये अशा प्रकारे उच्चजातीय सांस्कृतिक भांडवलाचंच प्रतिबिंब पडत राहतं. साहजिकच कनिष्ठ जात किंवा कनिष्ठ वर्गीय मुलं शाळेच्या पहिल्या दिवसापासून मागे पडू लागतात.
सांस्कृतिक भांडवलाची कल्पना केवळ शिक्षणाच्या आशयाचं नियंत्रण करते असं नाही तर शिक्षणाचा एकूण व्यवहार नियंत्रित करते. उदाहरणार्थ, परीक्षा हा शिक्षणाचा गाभा समजला जातो. परीक्षा घ्यायची पद्धत बदलली की शिक्षणाचा सगळा व्यवहार बदलतो कारण अधिकाधिक गुण मिळवून परीक्षा उत्तीर्ण होणं म्हणजे शिक्षण, असं आपण मानतो. 2015-16 या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रात सुरू झालेल्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमांतर्गत ज्या सार्वत्रिक परीक्षा घेण्यात आल्यात त्यांच्या स्वरूपामुळे पहिल्यांदा पाठांतरावरचा भर कमी झालेला दिसतोय. अर्थात यातून संपादणूक पातळी वाढायला हवी असेल तर अजून बरीच मजल मारायची आहे. पण दहावी किंवा बारावी बोर्डाची परीक्षा मुख्यत: पाठांतर या एकमेव कौशल्यावर आधारित असते. भारतीय संदर्भात अशा प्रकारच्या परीक्षादेखील उच्चजातीय सांस्कृतिक भांडवलाला स्वीकारार्ह मानणार्या आहेत. पुढील उदाहरण हा मुद्दा स्पष्ट व्हायला मदत करेल.
अभिजन महाराष्ट्र आजही ज्या एकमेव आईच्या स्मरणरंजनात गुंगतो त्याश्यामची आई या पुस्तकातलं हे उदाहरण आहे. आपल्या बालपणाची आठवण सांगतांना पुस्तकाचे लेखक म्हणतात - आमच्या घरी एक अशी पध्दत होती की, रोज दुपारच्या मुख्य जेवणाच्या वेळी प्रत्येकाने श्लोक म्हणावयाचा. जेवताना श्लोक म्हटला नाही तर वडील रागे भरत. वडील आम्हाला श्लोकही सुंदर सुंदर शिकवीत असत...... रोज एखादा नवीन श्लोक ते शिकवायचे....... वडील पहाटे शिकवीत तर सायंकाळी आई शिकवी. .... आम्हालाही त्यामुळे पाठ करण्याचा नाद लागे. दुपारी जेवणाचे वेळी जर वडिलांनी न शिकविलेला परंतु आम्हीच पाठ केलेला श्लोक आम्ही म्हटला तर वडील शाबासकी देत. त्यामुळे आम्हास उत्तेजन मिळे. गावात कोठे लग्नमुंजी पंगत असली किंवा उत्सवाची समाराधना असली तेथेही मुले श्लोक म्हणत. जो श्लोक चांगला म्हणे त्याची सारे स्तुती करीत. अशा रीतीने घरीदारी श्लोक पाठ करावयास उत्तेजन मिळे. (संदर्भ: पां.स.साने, श्यामची आई, रात्र सातवी - पत्रावळी,http://saneguruji.net/या संकेतस्थळावर उपलब्ध) स्वतः जातीभेद न मानणारे साने गुरुजीदेखील उच्चजातीतील जन्मामुळे मिळणार्या सांस्कृतिक सवयीजन्य फायद्याचे धनी होते. भारतात कोट्यावधी घरांमध्ये पाठांतराला प्रोत्साहन तर सोडा, पाठांतराचा विचारही नसतो आणि जगण्याच्या संघर्षात तशी उसंतही नसते. अशा घरांतली मुलंदेखील केवळ अफाटपाठांतराधारीत परीक्षा देतात तेव्हा पुढं कोण जाणार हे परीक्षेआधीच ठरलेलं असतं.
सांस्कृतिक सवयी या सांस्कृतिक भांडवालाचा अविभाज्य भाग असतात. देवा-धर्माच्या नावाने लागलेली अर्थ न समजता पाठांतर करण्याची सवय सांस्कृतिक भांडवल बनून अभिजन मुलांचा शैक्षणिक नफा वाढवत राहते. अर्थात् हे योगायोगाने घडत नाही. समाजातले अभिजन घटक आपल्या हितसंबंधांची जपणूक करण्यासाठी आपल्या सांस्कृतिक भांडवलाला अधिकाधिक स्वीकारार्ह बनवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी लागणारं आर्थिक भांडवलही त्यांच्याकडे असतं, अशा आशयाची मांडणी आपल्या फॉर्मस् ऑफ कपिटल या निबंधात बोर्द्यूंनी केली आहे. अभिजनांच्या सांस्कृतिक भांडवलाला केवळ त्यांचीच मान्यता असते असं नाही तर सांस्कृतिक प्रतीकांवरील (cultural symbols) प्रभुत्त्वामुळे हा वर्ग आपल्या सांस्कृतिक भांडवलाचं श्रेष्ठत्व राज्यकर्त्यांच्या गळी उतरवतो. थोडं दूरचं उदाहरण घेऊन या प्रक्रियेकडे पाहूयात.
1953-54 पासून देशात आदिवासी आश्रम शाळा चालवल्या जातात. या शाळांचं मुख्य उद्दिष्ट दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा व मद्यपान इत्यादीच्या कौटुंबिक पार्श्वभूमीपासून जनजातीतील मुलांना बाहेर काढून त्यांना शिक्षण, शिस्त व वैयक्तिक आरोग्य यासाठी उपयुक्त वातावरण निर्माण करणे असं आहे. (संदर्भ: आश्रमशाळा संहिता, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन, पान एक, 2006). आदिवासी मुलांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीत स्वीकारार्ह असं काहीही शासनाला दिसत नाही! त्यापासून मुलांना दूर काढून योग्य शिक्षण देणं हा वांशिक शुद्धीकरणाचा (ethnic sanitisation) एक प्रकार आहे. अशी आदिवासी मुलं जेव्हा शाळेत येतात तेव्हा शाळांनी आधीच अभिजनवर्गाचं सांस्कृतिक भांडवल स्वीकारलेलं असतं. इतकंच नव्हे तर आदिवासी मुलांचं सांस्कृतिक भांडवल केवळ दुरुस्तीयोग्य मानून किंवा त्याला पूर्णपणे नाकारून या मुलांच्या दाखल होण्याआधीच शाळा त्यांच्या अपयशाची सोय करून ठेवतात. अर्थात् शाळा आदिवासी मुलांसाठी असल्या तरी त्यांची रचना, आखणी, उभारणी आणि कार्य हे सगळं अभिजनांचं वर्चस्व असलेल्या विचारसरणीतून घडत असतं. आदिवासींच्या सांस्कृतिक भांडवलाला संपूर्ण नकार देऊन एका बाजूला प्रतीकात्मक हिंसा (symbolic violence)केली जाते आणि दुसर्या बाजूला अभिजनांच्या संस्कृतीजन्य ज्ञानाला वैध ज्ञानाचा दर्जा देऊन तेच एकमेव प्राप्य (desirable goal) बनवलं जातं. आर्थिक आणि सांस्कृतिक भांडवलाच्या पाठबळामुळं उच्चजात-वर्गीयांच्या किंवा अभिजनांच्या चवीच योग्य आहेत असं बहुजानांसकट सगळा समाज मानू लागतो. आपल्या .... जजमेंट ऑफ टेस्टया ग्रंथात बोर्द्यूंनी त्याचं गंभीर विश्लेषण केलंय.
आपले कपडे, घरांचे रंग, जेवणाच्या चवी, बोलण्याच्या लकबी, कलेची जाणीव, मनोरंजनाचे प्रकार, शिक्षणाचा अर्थ इत्यादी सर्वांमध्ये अभिजनांचं अनुकरण करणं म्हणजे उर्ध्वगमनशील (upwardly mobile) होणं, अशा विचाराला समाजात मान्यता मिळत जाते. जे जे अभिजनांचं ते ते उत्तम आणि दर्जेदार, अशी जाणीव समाजातल्या विविध घटकांमध्ये निर्माण होते. कनिष्ठ जात किंवा वर्गातले लोक देखील अभिजनमान्य तेच योग्य असं अगदी नैसर्गिक सूत्र असल्यासारखं मान्य करू लागतात. अर्थात या सर्व सवयी दर वेळी शाळेतून किंवा औपचारिकरीत्या शिकवल्या जातात असं नाही. ही प्रक्रिया निरंतर सुरू राहते. या प्रक्रियांच्या विश्लेषणासाठी उपयुक्त अशी हॅबिटससारखी संबोध चौकट (conceptual framework) देखील बोर्द्यूंनी मांडली.
सांस्कृतिक भांडवलाला गृहीत धरण्याची सवय तर जगभर इतकी मुरलेली आहे की शाळांच्या बाबतीत कोणताही वेगळा विचार अगदी गुलबकावलीच्या फुलासारखा वाटू लागतो. गेल्या वर्षी काही संशोधनाच्या निमित्ताने मी उत्तरेतील एक राज्य, दक्षिणेतील एक राज्य आणि महाराष्ट्रातील काही शाळांना भेटी दिल्या. मुख्यत: सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या आणि अधिकार्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलांच्या असमाधानकारक संपादणुकीचं कारण सांगताना जवळजवळ सगळे शिक्षक आणि अधिकारी ही मुलं गरीब घरांतली आहेत. त्यांचे आईवडील मोलमजुरी करतात. काही मुलं हलक्या जातींची आहेत. या मुलांच्या घरचं वातावरण शिक्षणाला पोषक नाहीय. कसं या मुलांना यश मिळणार? अशा आशयाचं बोलत होती. मुलांच्या शैक्षणिक अपयशाचा विचार करताना कुणीही शिक्षक, अधिकारी किंवा इतर प्रौढ शाळेत काही कमतरता असून ती दूर करायला हवी, असा विचारही करताना सहसा दिसत नाहीत. मुलांच्या घरचं वातावरण त्यांच्या शिक्षणाला पोषक नाही कारण ते शाळेसारखं नाही, असं सर्रास सांगितलं जातं. शाळेतलं वातावरण शिक्षणाला पोषक नाही कारण ते घरच्यासारखं नाही असा विचार, अगदी काल्पनिक प्रयोग म्हणूनही कुणी करत नाही. कारण शाळेचं वातावरण हे अभिजनांच्या किंवा भारतात बोलायचं झालं तर उच्चजातींच्या सांस्कृतिक भांडवलाला साजेसं असणार किंवा असायलाच हवं, असं आपण गृहीत धरलेलं आहे.
अभिजनांच्या सांस्कृतिक भांडवलाच्या अशा धाकाचं आणि त्यातून होणार्या विषमतांच्या पुनर्निर्मितीचं सखोल विश्लेषण बोर्द्यूंनी केलं. अर्थात् आधी उल्लेख केल्याप्रमाणे ते केवळ समाजशास्त्रज्ञ नव्हे तर तत्त्ववेत्ते, संस्कृतीचे उत्तम अभ्यासक होते. सत्तर वर्षांच्या अत्यंत उत्पादक आयुष्यात अभिजनांची कलेची चव, भाषेतील प्रतीकात्मकता, सौंदर्यदृष्टीवर आधारित सामाजिक स्तरीकरण, समाजातील संरचना आणि सत्तासंबंध, माध्यमं आणि सांस्कृतिक उत्पादनं अशा विविध विषयांचा सखोल आणि मूलभूत अभ्यास त्यांनी केला. तीसहून अधिक ग्रंथ लिहिले - Distinction: - Social Critique of the Judgment of Taste (1984), The Logic of Practice (1990), Homo academicus (1990), Language and Symbolic Power (1991), The Love of art: European art Museums and Their Public (1991), State Nobility: Elite Schools in the Field of Power (1998), On Television (1999) हे त्यातील काही प्रमुख ग्रंथ. (वरील यादीतील पुस्तकांचे साल हे त्यांच्या इंग्रजीतील प्रकाशनांचे आहेत. त्यांनी त्यांचं लेखन त्यांच्या शिक्षणाच्या भाषेतून म्हणजे फ्रेंच भाषेतून केलं होतं.)
भारतामध्ये गेलं दशकभर सरकारी शाळांतील म्हणजे गरीब, दलित, बहुजन, अल्पसंख्य वर्गातील मुलांच्या शैक्षणिक संपादणुकीचा प्रश्न मोठ्ठ्या प्रमाणावर चर्चिला जातोय. मुलांच्या घरचं अशैक्षणिक वातावरण जबाबदार असल्याचं सांगून शिक्षक आणि व्यवस्था या प्रश्नातून आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतायात. दुसर्या बाजूला केवळ आकडेवारीचा विचार न करणारे काही संवेदनशील अभ्यासक performance of government school children is same (or comparable) as that of private school children, when family background is controlled अशी मांडणी करतात. विश्लेषणाचे मार्ग भिन्न असले तरी शिक्षक आणि अभ्यासक हे दोन्ही घटक अप्रत्यक्षपणे बहुजन मुलांच्या सांस्कृतिक भांडवलाला शाळांतून फारशी किंमत दिली जात नसल्याचंच सांगत असतात.
मुलांचं शाळेतलं शिक्षण आणि संपादणूक पातळी केवळ शाळेतल्या प्रक्रियांवर अवलंबून नसतात तर या प्रक्रिया मुलांच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीबद्दल किती संवेदनशील आहेत, यावर देखील अवलंबून असतात. सांस्कृतिक भांडवलाचा विचार मांडून, त्याचा संपादणुकीशी संबंध दाखवून पिएर बोर्द्यूंनी जगाला चाळीसेक वर्षांपूर्वीच सावध केलंय. अशा जायंटच्या खांद्यावर उभं राहून आपल्या शैक्षणिक समस्येच्या मुळाला हात घालायचा की अल्पजीवी, अल्पकालीन, अल्पखर्चाच्या उपाययोजना करून अल्पसमाधानालाच उत्तुंग यश मानायचं, हे भारतासारख्या देशांनी ठरवायची वेळ उलटत चालली आहे.
******
लेखक परिचय: किशोर दरक हे शिक्षणशास्त्राचे अभ्यासक व विश्‍लेषक आहेत. अनेक संशोधन प्रबंधांबरोबरच विविध वृत्तपत्रे व मासिकांमधूनही त्यांनी शिक्षण व समाजशास्त्र या विषयांवर लेखन केले आहे.
Email :kishore_darak@yahoo.com

हेमलकसा : अंधारातून उजेडाकडे

हेमलकसा : अंधारातून उजेडाकडे - डॉ. प्रकाश आमटे | आपल्या पद्धतीचं आयुष्य जगताना आपले अनुभवही आपणच घ्यायचे असतात. त्याच्या बर्‍यावाईट परिणामांची जबाबदारीही स्वतःच घ्यायची असते. आणि हे सगळं तक्रार न करता सहज स्वीकारलं तर मिळणारं समाधान वेगळंच असतं, हे तत्त्व मला शिकवलं हेमलकशातल्या सुरुवातीच्या मुक्कामाने ... इथल्या निसर्गाने, जंगलाने, नदी-नाल्यांनी, प्राण्यांनी आणि अर्थातच माणसांनी!
••••••
आज आम्ही चाळीसहून अधिक वर्षं महाराष्ट्राच्या एका टोकाला, भामरागडच्या जंगलात- हेमलकशात राहतो आहोत. हा कालखंड कुठल्याही सुधारणेसाठी कमी असला, तरी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याच्या दृष्टीने तो खूप मोठा आहे. हेमलकशात स्थिरावण्याचा प्रवास हा फक्त अदिवासींसाठीच नव्हे, तर आम्हा सर्वांना शब्दशः अंधाराकडून उजेडाकडे नेणारा आहे. कारण इथे पहिली सतरा वर्षं वीज नव्हतीच!
भामरागड हा आनंदवनापासून २५० किलोमीटरवर असणारा चंद्रपूरच्या जिल्ह्यातला भाग. नंतर तो गडचिरोली जिल्ह्यात आला. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व मध्य प्रदेशच्या सीमेवरचा जंगलाने व्यापलेला हा प्रदेश. माडिया गोंड जमातीच्या आदिवासींची तिथे वस्ती आहे, एवढंच आम्हाला ऐकून माहीत होतं. १९७३ साली बाबांनी आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी इथे ‘लोकबिरादरी प्रकल्प’ सुरू केला. तेव्हा इथला परिसर सुंदर होता, पण ते सौंदर्य रौद्र होतं. जंगल एवढं दाट की सूर्यप्रकाशही आत येऊ शकायचा नाही. सगळीकडे नीरव शांतता. दुथडी भरून वाहणार्‍या नद्या आणि जंगली जनावरं यांच्या आवाजापलीकडे तिसरा आवाज या भागात ऐकू येत नसे. पावलापावलांवर साप आणि विंचू यांचं अस्तित्व होतं. हेमलकशाच्या जंगलात प्राण्यांनी, विशेषतः अस्वलांनी माणसांवर हल्ला करणं ही अगदी वारंवार घडणारी गोष्ट. गाव-शहरापासून संपूर्णपणे तुटलेला आणि एखादा प्रकल्प उभा करण्याच्या दृष्टीने अगदी प्रतिकूल असा हा भाग होता. इथे ना वीज होती, ना पाणी, ना राहण्यासाठी सपाट जागा. होतं फक्त जंगल, त्यात लपून बसलेले आदिवासी आणि जंगली श्‍वापदं. आनंदवनातल्या सुरुवातीच्या काळात अशाच परिस्थितीला तोंड द्यावं लागलं असल्याने मला अशा अडचणींची थोडीफार तरी सवय होती; पण माझी पत्नी मंदा आणि इतर कार्यकर्त्यांनी हेमलकशात स्थिरावण्यासाठी ज्या अडचणींना तोंड दिलं त्याला तोड नाही.
•••
हेमलकशातलं हवामान एकदम टोकाचं. उन्हाळा खूप कडक, तशीच थंडीही. पाऊस तर एकदा कोसळायला लागला की थांबायचं नावच घेत नाही. अफाट पावसामुळे आणि नंतर येणार्‍या पुरामुळे हेमलकशापासून पासष्ट किलोमीटरवर असलेला नागेपल्लीचा प्रकल्प हा आमचा ‘बेस कँप’ बनला. या प्रकल्पाची जबाबदारी जगन मचकले या आमच्या कार्यकर्त्याकडे होती. हेमलकसा ते नागेपल्ली हा रस्ता चढाचा होता. रस्ता कसला, जंगलातल्या वाटाच त्या. वाटेत आठ-दहा ओढे-नाले आणि बांदिया नदी. पाऊस सुरू झाला की बदाबदा कोसळायचा. ओढे-नद्यांना पूर यायचा आणि रस्ते बंद व्हायचे. मग आम्ही इकडे आणि बाकीचं जग तिकडे. एकमेकांशी काही संपर्कच नाही. पूर्णपणे ‘कट-ऑफ’. जून ते डिसेंबर या काळात सगळंच बंद असायचं. वाहतूक अशी नसायचीच. एखाद्याला त्या पावसात कुठे जायची वेळ आलीच तर तो त्या ठिकाणी किती दिवसांनी पोहोचेल याचा काही भरवसा नाही.
आम्ही ज्या भागात आमचं नवं जीवन थाटू पाहत होतो तिथून बाहेर पडण्यासाठी ना रस्ते होते ना वाहनं. इतरांशी संपर्क करण्यासाठी ना फोन होते ना पोस्टाची पेटी. उर्वरित जगाशी आणि तोही प्रामुख्याने आनंदवनाशी जोडणारा एकच दुवा होता, तो म्हणजे जगन मचकले. विशेषतः पावसाळ्यात जेव्हा संपर्क पूर्णपणे तुटायचा आणि काही महत्त्वाचा निरोप किंवा सामान पोचवायचं असेल तर आम्ही पूर्णपणे जगनवर अवलंबून असायचो. 

वर्षभरातील दिनविशेष

वर्षभरातील दिनविशेष

0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == बालिका दिन
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
————————————————————————–
१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन
————————————————————————-
०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दिन
————————————————————————-
०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन
————————————————————————-
०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन
०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन
————————————————————————-
०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२० जून == पित्र दिन
21 जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन
————————————————————————-
०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन
————————————————————————-
०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन
—————————————————————
०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०५ सप्टेंबर == शिक्षक दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन
————————————————————————
०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस
————————————————————————
०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन
——————————————————————
०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर == किसान दिन
२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...