Pages

Thursday, August 25, 2016

आधार माहिती भरणे शंका आणि समाधान. Student Portal

*आधारकार्ड माहिती शंका आणि समाधान*

(पोस्ट मोठी आहे पण काळजीपूर्वक वाचा. आपल्या शंकांचे निरसन होईल. आणि योग्य वाटली तर नक्कीच इतर अनेक ग्रुपवर शेअर करा. )
  🔵🔶 *आपलाच तंत्रस्नेही मित्र*🔶🔵  
              *शिवाजी नवाळे सर*
                 *राहुरी अ'नगर*
▶ *डाउनलोड केलेल्या फाईल मधील सर्वच मुलांचे आधारकार्ड उपलब्ध नसेल तर काय करावे*

➡ *उत्तर*- सर्वात प्रथम हे लक्षात घ्या की आपल्याला *100% मुलांचे आधार माहिती भरायची आहे.* पण जर काही कारणाने सर्वच मुलांची आधार माहिती उपलब्ध नसेल तर *जेवढ्या मुलांची माहिती उपलब्ध आहे तेवढ्या मुलांची माहिती भरून ती फाईल लगेच अपलोड करावी.* त्यानंतर राहिलेल्या मुलांची माहिती जमा करावी. आणि पुन्हा एकदा फाईल डाउनलोड करून पुन्हा राहिलेल्या मुलांची माहिती भरण्यासाठी हीच प्रोसेस परत एकदा करायची आहे.

▶ *मागील वर्षी आधार नंबर बरोबर असलेल्या मुलांची माहिती कोठे पाहावी*

➡  *उत्तर* - Student portal open केल्यानंतर Report tab मधील HM Level दिसते. त्यातील Adhar Report ला click करा.यामध्ये  *All Adhar निवडा. आता तुम्हाला ज्या वर्गाची माहिती पाहायची आहे तो वर्ग टाका. तुकडी निवडा. खालील Show report ला click* करा.
       आता तुम्हाला तुमच्या वर्गातील सर्व मुले दिसतात. ज्या मुलांच्या पुढे valid Adhar असे दिसते. अशा मुलांचे आधार नंबर योग्य आहे हे आपल्याला कळेल.

▶ *आधार च्या डाउनलोड केलेल्या Excel file मध्ये पटसंख्येपेक्षा मुले कमी का दिसतात?*

➡  *उत्तर* - मागील वर्षी आपण मुलांची माहिती भरलेली होती. त्यामधील काही मुलांचे आधार नंबर valid (म्हणजे बरोबर) झालेले होते. ज्या मुलांचे आधार नंबर बरोबर आहेत अशा मुलांची नावे परत आधार नंबर भरण्यासाठी येणार नाहीत. म्हणून मुलांची नावे कमी दिसतात.

▶ *आणि आधार डाउनलोड फाईल मध्ये जर मुले कमी दिसत असली तर काय करावे?*

➡  *उत्तर* - मुले कमी दिसत असली तरी आपण त्याठिकाणी वाढीव मुले अॅड करू शकत नाही. म्हणून डाउनलोड फाईल मध्ये जे मुलं दिसत असतील तेवढ्या मुलांची आधार माहिती भरून फाईल अपलोड करुन टाका.

▶ *file upload केल्यानंतर longer file name असा error आला तर काय करावे?*

➡  *उत्तर* - असा Error आलेली फाईल ज्या फोल्डर मध्ये ठेवली आहे ते फोल्डर ओपन करा. आपली फाईल कोठे आहे ते बघा. त्या फाईल च्या नावावर Right click करा. आणि नावात थोडा बदल करा. *लक्षात ठेवा की हे पूर्ण नांव delete करायचे नाही. फक्त त्यातील काही भाग कट करुन छोटे करायचे आहे.*
    उदा. पूर्वी चे 2री च्या वर्गाच्या फाईलचे नाव *UID27260607202_02_0_(3)* असे आहे तर यामध्ये बदल कसा केला ते खाली बघा.
*UID27260607202_02_0*
म्हणजे तुमच्या लक्षात येईल की शून्याच्या पुढे काहीच ठेवायचे नाही. आता *Enter* दाबा. फाईल्स चे नाव ओके होईल. आता ही फाईल अपलोड करा.
   
▶ *आधारकार्ड चुकीची माहिती असली तरीही आपल्याला भरायची आहे. यामुळे आपल्या शाळेचा विद्यार्थी डाटा बदलेल का?*
                         
➡ *उत्तर* - *अजिबात बदलणार नाही.* आपण हे लक्षात घ्या की आधारकार्ड वरील जशी आहे तशी माहिती भरण्यामागे एकच उद्देश आहे की ही माहिती *UID department* कडे *Verification* साठी जाणार आहे. आपण जशी आहे तशी माहिती भरल्यामुळे आपल्या मुलांचे आधार नंबर *valid* (म्हणजे बरोबर) ठरतील. आणि *तो मुलगा किंवा मुलगी हे याच शाळेत शिक्षण घेत आहेत हे सिद्ध करणे हाच शासनाचा हेतू आहे.*

▶  *विद्यार्थी आधार माहिती भरली की ती  uid मध्ये दिसते. पण आधार रिपोर्ट मध्ये दिसत नाही यासाठी काय करावे लागेल?*

 ➡ *उत्तर* - आपण भरलेली माहिती ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर *UID department कडे Verification साठी जाणार आहे.* त्यांच्याकडून *Verification* झाल्यानंतरच त्याचा *Report* आधार रिपोर्ट मध्ये येईल. यासाठी मोठा कालावधी लागतो. म्हणून *आपण भरलेली माहिती लगेच आधार रिपोर्ट मध्ये येऊ शकत नाही. म्हणून आपल्याला ही माहिती UID Details मधून दिसते.*

▶ *आपल्या आधार कामासाठी माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.*
      🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
        🙏 आपलाच तंत्रस्नेही मित्र 🙏
              *शिवाजी नवाळे सर*
                  राहुरी अ'नगर
      प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र समूह प्रमुख
            *मो. नं. 7758074275*
  

आधार माहिती भरणे Student Portal

*आधार फाईल भरतांना व अपलोड करताना घ्यायची काळजी*
        (मित्रांनो पोस्ट काळजीपूर्वक वाचा.)
   🔵🔶 *आपलाच तंत्रस्नेही मित्र*🔶🔵
              *शिवाजी नवाळे सर*
                 *राहुरी अ'नगर*
▶  *save as करताना फाईल नाव सोप्या पद्धतीने कसे घ्यावे?*

*उत्तर* - अगदी सोपे आहे. फाईल नाव ज्या रकान्यात लिहायचे आहे तेथे फक्त *U* हे अक्षर टाईप करा. लगेच खाली नावे येतात. त्यामधील *आपण ज्या वर्गाची फाईल Save as करत आहोत त्याच वर्गाचे नाव सिलेक्ट करा.* लक्षात घ्या की नावात गडबड झाली की अपलोड करताना *Error* येणार.

▶ *मित्रांनो फाईल अपलोड करताना अनेकदा Error येत आहे. अशा वेळी कोणती काळजी घ्यावी?*

 *मित्रांनो आधार फाईल्स अपलोड Error चे प्रमाण खूप वाढले आहे. अशा वेळी आपल्याला संपूर्ण माहिती पुन्हा नव्याने भरावी लागते आणि यामध्ये आपल्याला प्रचंड मनस्ताप होतो. सर्वच डाटा पुन्हा भरणे सोपी गोष्ट नाही.*
    *तसेच अनेकदा वर्गात जर जास्त मुले असतील तर सर्व मुलांची माहिती एकाच वेळी भरणे शक्य होणार नाही अशा वेळी जेवढ्या मुलांची माहिती भराल त्यावेळी फाईल नेहमीच्या साध्या पद्धतीने Save करा. (save as नाही बरं का) त्यानंतर पुन्हा पुढच्या वेळी राहिलेली माहिती भरा. सर्व माहिती भरल्यानंतर परत एकदा साध्या पद्धतीने Save करा.*
    *आता सर्वात महत्वाची गोष्ट करायची आहे. तुमची फाईल ज्या फोल्डर मध्ये आहे. तिथे या आणि आपण साध्या पद्धतीने Save करून ठेवलेल्या फाईल copy करा आणि PC, Laptop च्या दुसर्‍या Drive मध्ये किंवा pendrive यामध्ये paste करून घ्या. म्हणजे आपला भरलेला डाटा 100% सुरक्षित झाला.*
     *हे केल्यानंतर आता आपण भरलेली मूळ फाईल ओपन करा. आणि ही फाईल Save as करून csv comma delimited मध्ये CONVERT करा.*
         *अशी प्रोसेस केल्याने जरी फाईल अपलोड केल्यानंतर Error आला तरी दुरूस्ती करण्यासाठी आपल्याला सर्व माहिती पुन्हा नव्याने भरायची गरज लागणार नाही कारण ही फाईल आपण दुसरीकडे Save करून ठेवलेली आहे.*
     *Error आला की काय चुकले ते दुरूस्त करावे लागेल. मग आपण दुसरीकडे Save करून ठेवलेली फाईल उघडा आणि दुरूस्ती करून Save as ची प्रोसेस करून फाईल पून्हा अपलोड करा.*
   🔵 *हे सर्व करताना घ्यायची काळजी* 🔵
*फाईल Error आली की आपल्याला दुरूस्ती करायची आहे. ही करताना आपण त्या वर्गाची अगोदर csv केलेली फाईल delete करून टाका आणि मगच दुसरीकडे Save करून ठेवलेल्या फाईल मध्ये नवीन दुरुस्ती करा.आणि नवी फाईल अपलोड करुन टाका.*

▶ *file upload केल्यानंतर longer file name असा error आला तर काय करावे?*

*उत्तर* - असा Error आलेली फाईल ज्या फोल्डर मध्ये ठेवली आहे ते फोल्डर ओपन करा. आपली फाईल कोठे आहे ते बघा. त्या फाईल च्या नावावर Right click करा. आणि नावात थोडा बदल करा. *लक्षात ठेवा की हे पूर्ण नांव delete करायचे नाही. फक्त त्यातील काही भाग कट करुन छोटे करायचे आहे.*
    उदा. पूर्वी चे 2री च्या वर्गाच्या फाईलचे नाव *UID27260607202_02_0_(3)* असे आहे तर यामध्ये बदल कसा केला ते खाली बघा.
*UID27260607202_02_0*
म्हणजे तुमच्या लक्षात येईल की *शून्याच्या पुढे काहीच ठेवायचे नाही.* आता Enter दाबा. फाईल्स चे नाव ओके होईल. आता ही फाईल अपलोड करा.

▶ *आधारकार्ड Excel file download करताना शाळेतील काही वर्गाच्या तुकडीतील मुलांची नावे येत नाही अशा वेळी काय करावे?*

*उत्तर* -  मित्रांनो तुमच्या शाळेत समजा मागील वर्षी 3 री च्या A व B अशा 2 तुकड्या होत्या व 4 थी ची 1 च तुकडी होती. अशा वेळी 3री मधील मुले 4थी ला आली. पण सरल रेकॉर्ड ला तर 4थी ची एकच तुकडी कार्यरत असल्याने मागील एकाच तुकडीतील मुले फक्त A तुकडीत दिसतात. पण 4 थी ची B तुकडी सरलला नोंदणी केलेली नसल्याने मागील 3री B मधील मुले मुले कोठेच दिसत नाही व आधार डाउनलोड फाईल मध्ये सुद्धा येत नाही.
    म्हणून अशा वेळी आपल्याला 4थी च्या B तुकडीची सरल मध्ये अॉनलाईन निर्मिती करावी लागणार आहे. याची प्रोसेस खालीलप्रमाणे आहे.
1) Student portal open ला लॉगिन करा.
2) Master tab मधून division निवडा.
3) Standard 4 थी निवडा.
4) तुकडी टाकताना *B* न विसरता टाका.
यामधील बाकी सर्व माहिती सिलेक्ट करा. शेवटी सध्याच्या B तुकडीतील मुलांची संख्या टाका व खालील *Add* बटनाला  क्लिक करा. *Successfully* असा मेसेज येईल.
       आता तुमची 4थी ची B तुकडी तयार झाली. ही माहिती अपडेट होण्यास थोडा वेळ लागेल. *नंतर आपोआप मागील वर्षीच्या 3री B तुकडीची मुले 4थी B तुकडीत येतील.* व आधार Excel डाउनलोड फाईल मध्ये पण मुले येतील.
▶ *आपल्या आधार कामासाठी माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.*
      राहुरी 🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
        🙏 आपलाच तंत्रस्नेही मित्र 🙏
              *शिवाजी नवाळे सर*
                  राहुरी अ'नगर
      प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र समूह प्रमुख
            *मो. नं. 7758074275*
  

इ.1ली नवीन विद्यार्थी Student Portal वर माहिती भरणे, सन 2016-17

*सरल महत्वाचे* :
*दिनांक : २४/०८/२०१६*
(कृपया सर्व बांधवांना share करावे ही विनंती)

*student पोर्टल* :

१)सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामधील इयत्ता १ ली च्या मुलांची सरल student पोर्टल मध्ये माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.दिनांक २३ ऑगस्ट पासून  पुणे जिल्ह्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.दिनांक 24 ऑगस्ट पासून ही सुविधा संपूर्ण राज्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता लवकरच पूर्ण करावयाची असल्याने ही माहिती दिलेल्या वेळेत भरणे अत्यावश्यक आहे.या माहितीसाठी मुदत वाढ देण्यात येणार नाही आहे ही बाब या वेळी लक्षात घ्यावी.

२)नविन विद्यार्थ्यांची माहिती कशी भरावी याबाबत सखोल आणि विस्तृत माहिती आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे याची नोंद घ्यावी.

*नवीन विद्यार्थी माहिती कशी भरावी यासाठीचे Manual डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा* : http://goo.gl/qikIvJ

३)इयत्ता १ ली व्यतिरीक्त इतर वर्गातील मुले जी मागील वर्षी भरावयाची राहून गेलेली आहे त्या मुलांची माहिती भरण्यासाठीची सुविधा योग्य वेळी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.त्याविषयी काळजी करू नये.

४)इयत्ता पहिली वगळता ज्या मुलांची माहिती मागील वर्षी नोंद झालेली आहे अशा ट्रान्स्फर झालेल्या मुलांची माहिती त्या जुन्या शाळेतून ट्रान्स्फर करून घेणे बंधनकारक आहे.काही शाळा ट्रान्स्फर झालेल्या मुलांची माहिती नविन विद्यार्थी म्हणून भरण्याचा प्रयत्न करतील म्हणून सध्या फक्त पहिलीचे विद्यार्थी भरण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.तसेच इतर इयत्तांच्या मुलांची माहिती जे मागील वर्षी नोंद झालेले नव्हते त्यांची माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्या नंतर फक्त अशाच मुलांची माहिती आपणास भरता येणार आहे ज्यांची खरोखर मागील वर्षी नोंद झालेली नव्हती.जर मागील वर्षी नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची इतर शाळेत ट्रान्स्फर झाली असेल आणि नविन शाळेच्या मुख्याध्यापकाने जर त्या विद्यार्थ्याला जुन्या शाळेतून ट्रान्स्फर करून न घेता नविन विद्यार्थी म्हणून भरावयाचा प्रयत्न केला तर system अशा मुलांची माहिती स्वीकारणार नाहे याची गांभीर्याने नोंद घ्यावे.त्यासाठी आपण ट्रान्स्फर होऊन आलेल्या मुलांची माहिती त्वरीत जुन्या शाळेतून ट्रान्स्फर करून घ्यावी.

५)जर आपण ट्रान्स्फर विनंती केलेल्या मुलाची माहिती जुन्या शाळेतले मुख्याध्यापक ट्रान्स्फर विनंती approve करत नसतील आणि त्यामुळे जर नविन शाळेला संच मान्यतामध्ये काही समस्या निर्माण झाल्या तर त्यासाठी  जुन्या शाळेतल्या मुख्याध्यापकाला दोषी धरण्यात येईल याची नोंद घ्यावी.

६)ट्रान्स्फर विनंती पाठवली जात नाही,ट्रान्स्फर विनंती approve होत नाही,approve होऊन आलेले विद्यार्थी update ला दिसत नाही अशा समस्या काही शाळांना येताना दिसून येत आहे,अशा समस्या अशाच शाळांना आहे ज्यांची मागील वर्षीच्या data मध्ये technical error आलेला आहे.उदाहरणार्थ रजिस्टर नंबर लिहिताना अंका सोबत अक्षरे भरलेले असणे,तुकडी भरताना चुकीच्या format मध्ये भरणे,मुलांची माहिती .csv मध्ये convert करून upload करताना चुका झालेल्या असणे इत्यादी.अशा शाळांना विनंती आहे की आपणास अशा समस्या असतील तर कृपया आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्या समस्या सविस्तर लिहून पाठवा.आपल्या माहितीमध्ये पूर्वी झालेल्या चुका दुरुस्थ करून आपल्या या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.आपण या बाबीचा गांभीर्याने विचार केला नाही तर आपणास संच मान्यता,udise,पायाभूत चाचणी व अन्य परीक्षेचे गुण भरताना अथवा मुलाच्या लाभाच्या शासकीय योजना राबवताना online माहितीमध्ये समस्या निर्माण होऊ शकणार आहे.यासाठी आपण पुढील लिंक ला क्लिक करून आपली समस्या त्वरीत कळवा.समस्या मांडताना समस्येविषयी सविस्तर माहिती भरा.माहिती भरत असताना समस्या नसताना विनाकारण काहीही लिहित बसू नये,त्रास होईल असे लिखाण करू नये.आम्ही आपणास केवळ आणि केवळ मदत करण्याच्या हेतूने ही सुविधा उपलब्ध करून देत आहोत याची नोंद घ्यावी.

*समस्या कळवण्यासाठीची लिंक* :
http://goo.gl/9vBAQ8

७)नविन विद्यार्थी माहिती भरताना जर इयत्ता पहिलीला मागील वर्षीपेक्षा या वर्षी तुकडीची संख्या वाढली असेल तर आपणास या वर्षी तुकडी वाढवून घ्यावी लागेल.तुकडी वाढवली तरच आपल्याला excel sheet उपलब्ध होईल.तुकडी वाढवण्यासाठी create division ची tab आपणास उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

८) या वर्षी नविन शाळा चालू झालेली असेल तर आपल्या शाळेचा udise आणि password साठी आपल्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

९)अद्यापही बऱ्याच गटशिक्षणाधिकारी लेवल वर ट्रान्स्फर च्या विनंती पेंडिंग आहे.तरी सर्व गटशिक्षणाधिकारी यांना विनंती आहे की आपण त्वरीत या सर्व विद्यार्थ्यांची शहानिशा करून त्याना ट्रान्स्फर करावे.तालुकानिहाय पेंडिंग स्थिती बाबतच्या आकडेवारीची माहिती शिक्षणाधिकारी यांच्या login ला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.अशा पेंडिंग कामाच्या पूर्ततेबाबत शिक्षणाधीकारी यांनी त्वरीत कार्यवाही करावी अशा सुचना E-GOVERNANCE सेल चे अध्यक्ष तथा शिक्षण संचालक ,बालभारती मा.डॉ.सुनील मगर साहेब यांच्याकडून या पोस्ट द्वारे देण्यात येत आहे याची नोंद घ्यावी.आपले काम अपूर्ण राहिल्यास भविष्यात होणाऱ्या online कामात अडचण निर्माण झाल्यास संबंधिताना जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी.

१०)आपणास हे देखील कळविण्यात येत आहे की मागील १० दिवसापूर्वी विद्यार्थांची आधार माहिती भरण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.अद्यापही बऱ्याच मुलांची माहिती भरली गेलेली नाही आहे.तरी ती माहिती त्वरीत भरण्यात यावी.या वर्षी आपणास १००% मुलांची आधार माहिती भरावयाची आहे.ज्या मुलांनी अद्याप आधार नंबर मिळवला नसेल अशा मुलांच्या पालकांचे प्रबोधन करून त्याच्याकडून त्वरीत आधार नंबर मिळविण्याचा प्रयत्न मुख्याध्यापक यांनी करावयाचा आहे.आधार नंबर कसे भरावयाचे आहे याबाबत सविस्तर माहितीपत्रक मॅन्युअल havelieducation.blogspot.in  या ब्लॉग ला उपलब्ध करून दिलेले आहे.

११)student पोर्टल संदर्भात सर्व प्रकारच्या कामासाठीचे manual पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.तसेच आपण havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट देऊन याबाबत सविस्तर माहिती मिळवू शकाल.

12) *duplicate विद्यार्थी सिस्टिम मधून कसे काढावे यासाठीचे मॅन्युअल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा* :
http://goo.gl/7lSj8b

*school पोर्टल*  :

१3)या शैक्षणिक वर्षात शाळा पोर्टल मध्ये आपणास माहिती भरण्यासाठीची सुविधा येत्या २ दिवसात उपलब्ध करून दिली जाणार आहे.या वर्षी माहिती भरण्यासाठी आपणास ही सुविधा offline पद्धतीने उपलब्ध करून दिली जाणार आहे याची नोंद घ्यावी.offline पद्धतीने माहिती कशी भरावी यासाठीची काही दिवसापूर्वीच
E-GOVERNANCE सेल कडून राज्यस्तरीय विभागीय ट्रेनिंग घेण्यात आलेल्या आहे.सर्व शिक्षक बांधवाना या ट्रेनिंग जिल्हा,तालुका पातळीवरून दिल्या जाव्यात अशा सुचना E-GOVERNANCE सेल चे अध्यक्ष तथा शिक्षण संचालक ,बालभारती मा.डॉ.सुनील मगर साहेब यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत.आपणास सदर बाबतीत ट्रेनिंग मिळाली नसेल अथवा अडचण निर्माण होत असेल तर कृपया आपल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा ही विनंती.तसेच या बाबतीत school पोर्टल ला लवकरच manual देखील उपलब्ध करून देण्यात येईल याची नोंद घ्यावी.याबाबत आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट देऊन याबाबत सविस्तर माहिती मिळवू शकाल.

*MDM (शालेय पोषण आहार पोर्टल)* :

१४)शालेय पोषण आहार योजनेंतर्गत opening balance, daily attendance, stock inward बाबत माहिती सरल पोर्टल मध्ये नोंद्विन्याबाबत या शैक्षणिक वर्षापासून सूचना देण्यात आलेल्या आहेत.परंतु अद्यापही काही शाळांची माहिती पूर्ण झालेली नाही आहे असे दिसून आले आहे.अशा शाळांची माहिती पूर्ण करण्याच्या हेतूने शासनाने अंतिम मुदत वाढवून दिनांक २५ ऑगस्ट २०१६  दिलेली आहे.या नंतर आपणास मुदत वाढवून देण्यात येणार नाही अशा सुचना वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आहे याची नोंद घ्यावी.

१५)मुख्याध्यापकाच्या दुर्लक्षामुळे जर सदर माहिती भरण्याची अपूर्ण राहिल्यास संबंधित आहाराचे बील देण्याची जबाबदारी मुख्याध्यापकाची असेल असेही वरिष्ठ कार्यालयाकडून कळविण्यात आलेले आहे.त्यामुळे सर्वाना विनंती आहे की दिनांक २५ ऑगस्ट पर्यंत आपली माहिती भरण्यात यावी.

१६)ज्या शाळेचा ओपेनिंग balance चुकला असेल आणि beo लेवल वरून verify झालेला असेल तसेच stock inward भरून beo ने verify केलेला असेल तर अशा शाळेचा ओपेनिंग balance व stock inward दुरुस्थ करण्यासाठी तो ओपेनिंग balance व stock inward शिक्षणाधिकारी यांना परत पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

१७)daily attendance ची माहिती शाळेला रोजच्या रोज पाठवणे बंधनकारक आहे.ही माहिती भरण्यासाठी एक मोठा बदल करण्यात आलेला आहे.आपण ही माहिती रोज सकाळी ९:३० नंतर भरू शकणार आहात.त्या अगोदर आपणास ही माहिती भरता येणार नाही.

१८)एखाद्या दिवशी काही महत्वाच्या अडचणीमुळे शालेय पोषण आहार शिजवून दिला नसेल तो का देण्यात आलेला नाही याबाबत system मध्ये कारण नमूद करावे लागतात.या कारणाच्या लिस्ट मध्ये आता other या नविन कारणाचा समावेश करण्यात आला आहे याची नोंद घ्यावी.

19)✏राज्यस्तरीय whatsapp ग्रुप मध्ये add होण्यासाठी महत्वाचे :

आम्ही सरल संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी राज्यस्तरीय whatsapp चे   ग्रुप तयार केलेले आहेत.या ग्रुप मध्ये फक्त कोणत्याही शैक्षणिक ग्रुपचे admin अथवा सरल चे cluster अथवा तालुका स्तरावर काम करणारे मार्गदर्शक सहभागी होऊ शकतात. यासाठी http://havelieducation.blogspot.in
या ब्लॉग वर व्हाट्सएप्प समुहात सामिल होण्यासाठी एक फॉर्म देण्यात आलेला आहे त्या फॉर्म मध्ये मध्ये विचारलेली आपली माहिती आणि व्हाट्सएप्प मोबाइल क्रमांक  भरून आम्हाला ऑनलाइन पाठवा.आपणास यथावकाश ग्रुप मध्ये add करुन घेतले जाईल व वेळोवेळी आपणास सरल बाबत माहिती पाठवली जाईल.
(सुचना : या ग्रुपवर सरल व्यतिरीक्त कोणतीही माहिती दिली जाणार नाही अथवा या ग्रुप वर सरल व्यतिरिक्त कोणतीही post टाकण्यास परवानगी नाही आहे याची नोंद घ्यावी.)

 20) आपणास सरल बाबत असलेल्या अडचणी ईमेल,व्हाट्सएप्प वर कळवाव्या,त्या सोडवन्यात येईल.अडचणी कळवन्यासाठी ईमेल :
a) Sanchmanyata@gamil.com
b) idreambest@gmail.com  किंवा
c)support.education@maharashtra.gov.in

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
 (Dont call,only whatsapp message)
Email: idreambest@gmail.com
Blog: havelieducation.blogspot.in
Apps link of my blog's for download : Www.appsgeyser.com/2460364

Saturday, August 20, 2016

तपश्चर्या गुरूशिष्येची

तपश्चर्या गुरूशिष्येची!

अकादमीची प्रेरणा आणि गुरू गोपीचंद

 August 20, 2016



अकादमीची प्रेरणा आणि गुरू गोपीचंद

ही घटना आहे २००१ मधील. बॅडमिंटन विश्वातील अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा ऑल इंग्लंड स्पर्धेचं जेतेपद पटकावलेला तो तरुण खेळाडू विमानतळावर उतरला. पायाभूत सुविधांचीही वानवा असताना आणि दुखापतींनी सातत्यानं सतावूनही या तरुणानं अवघड असं जेतेपद नावावर केलं होतं. विमानतळावर स्वागताला त्याची आई आली होती. जेतेपदाचा चषक उंचावत मुलगा बाहेर येईल अशी आईची अपेक्षा. परंतु तो तरुण शांतपणे बाहेर आला. आईला नमस्कार केला. पण मुलगा वेगळ्याच विचारात असल्याचं आईला जाणवलं. आईनं काळजीनं विचारलं- ‘‘काय झालं?’’ तो तरुण बॅडमिंटनपटू म्हणाला, ‘‘हे जेतेपद अतिशय आनंद आणि समाधान देणारं आहे. यासाठी तुम्ही केलेला त्याग मला आठवतो आहे. अडथळ्यांच्या शर्यती पार करत सातत्यानं संघर्ष करत मला या जेतेपदापर्यंत वाटचाल करावी लागली. दुखापतीमुळे मी आणखी किती दिवस खेळू शकेन ठाऊक नाही. परंतु पुढच्या पिढीतील खेळाडूंना हा त्रास होऊ नये, यासाठी मी काही तरी करणार आहे.’’

तो तरुण होता पुल्लेला गोपीचंद. ते निव्वळ बोलून थांबले नाहीत. गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे त्यांनी लवकरच निवृत्ती स्वीकारली. त्याआधीच प्रशिक्षण सुरू केलेल्या गोपीचंद यांच्या मनात अकादमीचा विचार होता. खेळ म्हणजे क्रिकेट असं समीकरण असताना बॅडमिंटन अकादमीचा विचार धाडसाचा होता. ऑल इंग्लंड जेतेपदाच्या निमित्तानं आंध्र प्रदेश सरकारनं गोपीचंद यांना अकादमीसाठी हैदराबादजवळच्या गच्चीबाऊली इथं पाच एकर जागा देण्याचं जाहीर केलं. जागेचा प्रश्न सुटला, पण वास्तू उभारणीसाठी निधी नव्हता. उद्योजक आणि नातेवाईक निम्मगडा प्रसाद यांनी गोपीचंद यांची तळमळ लक्षात घेऊन पाच कोटी रुपये रक्कम दिली. अन्य नातेवाईकांच्या मदतीनं दीड कोटी रुपये जमले, पण तरीही पैसे कमी पडत होते. अखेर गोपीचंद यांनी स्वत:चं राहतं घर गहाण ठेवलं. गोपीचंद यांचे वडील, आई आणि पत्नी यांनी त्यांच्या अभियानात पुरेपूर साथ दिली. यातूनच उभी राहिली गोपीचंद अकादमी. एकापेक्षा एक प्रतिभावान बॅडमिंटनपटूंना घडवणारी बॅडमिंटन पंढरी. १२व्या वर्षांपासून याच अकादमीत गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या पी. व्ही. सिंधूने ऑलिम्पिक पदकाला गवसणी घालत पदक परंपरा कायम राखली आहे. ऑलिम्पिक पदकाच्या निमित्ताने या गुरूशिष्य जोडीच्या तपश्चर्येला फळ मिळालं आहे.

Sunday, August 14, 2016

सुंदर सीख

👉 *_सुंदर सीख_* 👈
*एक दिन स्कूल में छुट्टी की घोषणा होने के कारण, एक दर्जी का बेटा, अपने पापा की दुकान पर चला गया ।वहाँ जाकर वह बड़े ध्यान से अपने पापा को काम करते हुए देखने लगा । उसने देखा कि उसके पापा कैंची से कपड़े को काटते हैं और कैंची को पैर के पास टांग से दबा कर रख देते हैं । फिर सुई से उसको सीते हैं और सीने के बाद सुई को अपनी टोपी पर लगा लेते हैं । जब उसने इसी क्रिया को चार-पाँच बार देखा तो उससे रहा नहीं गया, तो उसने अपने पापा से कहा कि वह एक बात उनसे पूछना चाहता है ?*
*पापा ने कहा- बेटा बोलो क्या पूछना चाहते हो ? बेटा बोला- पापा मैं बड़ी देर से आपको देख रहा हूं, आप जब भी कपड़ा काटते हैं, उसके बाद कैंची को पैर के नीचे दबा देते हैं, और सुई से कपड़ा सीने के बाद, उसे टोपी पर लगा लेते हैं, ऐसा क्यों ? इसका जो उत्तर पापा ने दिया- उन दो पंक्तियाँ में मानों उसने ज़िन्दगी का सार समझा दिया।*
*उत्तर था- ” बेटा, कैंची काटने का काम करती है, और सुई जोड़ने का काम करती है, और काटने वाले की जगह हमेशा नीची होती है परन्तु जोड़ने वाले की जगह हमेशा ऊपर होती है । यही कारण है कि मैं सुई को टोपी पर लगाता हूं और कैंची को पैर के नीचे रखता हूं ।”*
*_इस लिये अगर जीवन में ऊँचाइयों को छुना हो तो, जोड़ने वाले बने तोड़ने वाले नहीं।_*

Monday, August 8, 2016

तंत्रज्ञान माहिती

HTTP का अर्थ क्या है?
उत्तर:- Hyper Text Transfer Protocol.
☞. P D F का मतलब है?
उत्तर:- Portable Document Format.
☞. H T M L का मतलब है?
उत्तर:- Hyper Text Mark up Language.
☞. N E F T का मतलब है?
उत्तर:- National Electronic Fund Transfer.
☞. M I C R का मतलब है?
उत्तर:- Magnetic Inc Character Recognition.
☞. I F S C का मतलब है?
उत्तर:- Indian Financial System Code.
☞. I S P का मतलब है?
उत्तर:- Internet Service Provider.
☞. E C S का मतलब है?
उत्तर:- Electronic Clearing System.
☞. C S T का मतलब है?
उत्तर:- Central Sales Tax.
☞.CRR का मतलब है?
उत्तर:- Cash Reserve Ratio.
☞.U D P का मतलब है?
उत्तर:- User Datagram Protocol.
☞. R T C का मतलब है?
उत्तर:- Real Time Clock.
☞. I P का मतलब है?
उत्तर:- Internet Protocol.
☞. C A G का मतलब है?
उत्तर:- Comptroller and Auditor General.
☞. F E R A का मतलब है?
उत्तर:- Foreign Exchange Regulation Act.
☞. I S R O का मतलब है?
उत्तर:- International Space Research organization.
☞. I S D N का मतलब है?
उत्तर:- Integrated Services Digital Network.
☞. SAARC का मतलब है?
उत्तर:- South Asian Association for Regional co –operation.
☞. O M R का मतलब है?
उत्तर:- Optical Mark Recognition.
☞. A H R L का मतलब है?
उत्तर:- Asian Human Right Commission.
☞. J P E G का मतलब है?
उत्तर:- Joint photo Expert Group.
☞. U. R. L. का मतलब है?
उत्तर:- Uniform Resource Locator.
☞. I R D P का मतलब है?
उत्तर:- Integrated Rural Development programme.
☞. A. S. L. V. का मतलब है?
उत्तर:- Augmented satellite Launch vehicle.
☞. I. C. U. का मतलब है?
उत्तर:- Intensive Care Unit.
☞. A. T. M. का मतलब है?
उत्तर:- Automated Teller Machine.
☞. C. T. S.का मतलब है?
उत्तर:- Cheque Transaction System.
☞. C. T. R का मतलब है?
उत्तर:- Cash Transaction Receipt.
☞. NEFT का मतलब है?
उत्तर:- National Electronic Funds Transfer.
☞. GDP का मतलब है?
उत्तर:- Gross Domestic Product.
☞. FDI का मतलब है?
उत्तर:- Foreign Direct Investment .
☞. EPFO का मतलब है?
उत्तर:- Employees Provident Fund Organization.
☞. CRR का मतलब है?
उत्तर:- Cash Reserve Ratio.
☞. CFRA का मतलब है?
उत्तर:- Combined Finance & Revenue Accounts.
☞. GPF का मतलब है?
उत्तर:- General Provident Fund.
☞. GMT का मतलब है?
उत्तर:- Global Mean Time.
☞. GPS का मतलब है?
उत्तर:- Global Positioning System .
☞. GNP का मतलब है?
उत्तर:- Gross National Product.
☞. SEU का मतलब है?
उत्तर:- Slightly Enriched Uranium.
☞. GST का मतलब है?
उत्तर:- गुड्स एण्ड सर्विस टैक्स (Goods and ServiceTax).
☞. GOOGLE का मतलब है?
उत्तर:- Global Organization Of Oriented GroupLanguage Of Earth.
☞. YAHOO का मतलब है?
उत्तर:- Yet Another Hierarchical Officious Oracle .
☞. WINDOW का मतलब है?
उत्तर:- Wide Interactive Network Development forOffice work Solution .
☞. COMPUTER का मतलब है?
उत्तर:- Common Oriented Machine ParticularlyUnited and used under Technical and EducationalResearch.
☞. VIRUS का मतलब है?
उत्तर:- Vital Information Resources Under Siege.                
🇮🇳🙏🇮🇳

Sunday, August 7, 2016

मराठी व्याकरण. वर्णमाला

मराठी व्याकरण:
वर्णमाला

वर्ण - आपल्या तोंडावाटे पडणार्‍या मूल ध्वनीला वर्ण असे म्हणतात.

      मराठीत एकूण 48 वर्ण आहेत.
1. स्वर
2. स्वरादी
3. व्यंजन

1. स्वर : ज्यांचा उच्चार करतांना जिभेचा मुखातील कोठल्याही अवयवांशी स्पर्श होत नाही त्यांना स्वर असे म्हणतात.
         अ, आ, इ, ई, ल्र, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, ऋ

    स्वरांचे मुख्य प्रकार दोन आहेत.
1. र्‍हस्व स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्या स्वरांना र्‍हस्व स्वर असे म्हणतात.
              अ, इ, ऋ, उ


2. दीर्घ स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात.
         आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ

    स्वरांचे इतर प्रकार
1. सजातीय स्वर : एकाच उच्चार स्थांनामधून जाणार्‍या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात.
                 अ-आ, उ-ऊ, ओ-औ, इ-ई, ए-ऐ

2. विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थांनामधून उच्चारल्या जाणार्‍या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात.
                  अ-ई, उ-ए, ओ-ऋ

3. संयुक्त स्वर : दोन स्वर मिळून तयार होणार्‍या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात.
               याचे 4 स्वर आहेत.
               ए - अ+इ/ई
               ऐ - आ+इ/ई
               ओ - अ+उ/ऊ
               औ - आ+उ/ऊ

2. स्वरादी :  ज्याचा उच्चार करण्याअधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात.
            स्वर + आदी - स्वरादी
            दोन स्वरादी - अं, अः
            स्वरादी मध्ये अनुस्वार व विसर्ग यांचा समावेश होतो.
  दोन नवे स्वरदी : ओ, औ
  हे नवे स्वरादी इंग्लिश भाषेतून आलेले आहेत.
  उदा. बॅट, बॉल

3.व्यंजन : एकूण व्यंजन 34 आहेत.
          ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मुर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात.
          व्यंजनाचे पाच प्रकारात वर्णन केले जाते.
1. स्पर्श व्यंजन (25)
2. अर्धस्वर व्यंजन (4)
3. उष्मा, घर्षक व्यंजन (3)
4. महाप्राण व्यंजन (1)
5. स्वतंत्र व्यंजन (1)

1. स्पर्श व्यंजन : एकूण व्यंजन 25 आहेत.
                ज्याचा उच्चार करतांना फुफुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडतांना टाळू, कंठ, मुर्धा, दात, व ओठ यांचा स्पर्श
                करून बाहेर निघते म्हणून त्यांना स्पर्श व्यंजन म्हणतात.
                उदा. क, ख, ग, घ, ड
                    च, छ, ज, झ, त्र
                    ट, ठ, ड, द, ण
                    त, थ, द, ध, न
                    प, फ, ब, भ, म
     स्पर्श व्यंजनाचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते.
1. कठोर वर्ण
2. मृदु वर्ण
3. अनुनासिक वर्ण

1. कठोर वर्ण - ज्या वर्णाचा उच्चार करण्यास जोर द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात.
              उदा. क, ख
                  च, छ
                  ट, ठ
                  त, थ
                  प, फ

2. मृद वर्ण - ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो त्यांना मृद वर्ण असे म्हणतात.
            उदा. ग, घ
                ज, झ
                ड, ढ
                द, ध
                ब ,भ

3. अनुनासिक वर्ण - ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चार स्थानासोबत काही अंशी नाकातूनही केल्या जातो त्यास अनुनासिक असे म्हणतात.
                  उदा. ड, त्र, ण, न, म      

Friday, August 5, 2016

राष्ट्रीय प्रतिज्ञा

*राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली?*

- राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली? भारतातील प्रत्येक भाषेतील , प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर ठळक अक्षरात राष्ट्रीय प्रतिज्ञा छापलेली असते.

- पण आजवर ती कुणी लिहिली, तेच ठाऊक नव्हते. अगदी पाठ्यपुस्तक मंडळालादेखील.

- परंतु गेल्या वर्षी या प्रतिज्ञेच्या कर्त्याचे नाव अचानक उजेडात आले. त्याची शोधकथा... देशभरातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये सर्वत्र एकसमान प्रतिज्ञा प्रत्येक विषयाच्या पुस्तकामध्ये सुरुवातीलाच दिलेली असते.

- अनेक वर्षांपासून आपण नित्याचा परिपाठ म्हणून शाळा भरताना ही प्रतिज्ञा घेत असतो. परंतु ही प्रतिज्ञा कोणी लिहिली ? कधी लिहिली ? ती केव्हापासून देशभरातील पाठ्यपुस्तकांमध्ये आली , याची माहिती जवळपास कोणालाच दिसत नाही.

- मीही ही प्रतिज्ञा शालेय जीवनापासून म्हणत आलो.

- बालवयात पाठ्यपुस्तकातील एखादा धडा किंवा कविता वाचली की, त्या पाठाखाली किंवा धड्याखाली त्या-त्या लेखकाचे, कवीचे नाव दिलेले असते. त्यामुळे मला बालपणापासूनच पाठ्यपुस्तकातली ही प्रतिज्ञा कोणी लिहिली असेल , असा प्रश्न पडला होता.

- मला शिकविणाऱ्या प्रत्येक वर्गातील शिक्षकाला मी हा प्रश्न विचारीत असे. परंतु कुणीच मला उत्तर देऊ शकले नाही.

- पुढे बऱ्याच शिक्षणाधिकाऱ्यांना, विद्वानांना, पाठ्यपुस्तक मंडळातील तज्ज्ञांना, शिक्षणमंत्री, साहित्यिक, लेखक , अ. भा. मराठी साहित्य महामंडळावरील सदस्य , तसेच जवळपास प्रत्येक शिक्षणतज्ज्ञाला या प्रश्नाचे उत्तर विचारले. सगळीकडूनच नकारघंटा आली. काहींनी सानेगुरुजी , यदुनाथ थत्ते असावेत असे सांगितले. पण समग्र सानेगुरुजी वाचल्यावरही संदर्भ लागला नाही. यदुनाथ थत्तेंनी या प्रतिज्ञेच्या आठ वाक्यांचा सविस्तर अर्थ विशद करणारे ' प्रतिज्ञा ' नावाचे पुस्तकच लिहिले आहे. या पुस्तकातही या प्रतिज्ञेच्या लेखकाचा कुठे उल्लेख आढळला नाही. पाठ्यपुस्तक मंडळातील काही व्यक्तींनी सुचविले की , ती केव्हापासून पाठ्यपुस्तकात आली , याचा आमच्याकडे संदर्भच नाही. त्यामुळे ती कदाचित पाठ्यपुस्तक मंडळानेच कधीतरी मनात आले म्हणून तयार करून छापली असेल व पुढे तिचा हिंदी व इंग्रजी भाषेतही अनुवाद झाला असेल!

- परंतु प्रत्यक्ष शोधानंतर ते तसे नसल्याचे सिद्ध झाले. ' भारत माझा देश आहे , सारे भारतीय माझे बांधव आहेत... ' ही प्रतिज्ञा भारतीय पातळीवर प्रत्येक राज्याच्या राजभाषेत भाषांतरित झालेली आहे. भारतात लिपी असणाऱ्या सर्व भाषांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये ती दिसते. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून मी या प्रतिज्ञेच्या जनकाचा प्रश्नाचा शोध घेत होतो आणि शेवटी एकदाचा त्याच्या उगमापर्यंत पोहोचलो!

- *आंध्र प्रदेशचे सुप्रसिद्ध तेलगू साहित्यिक पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी १९६२ मध्ये तेलगू भाषेत ही प्रतिज्ञा पहिल्यांदा लिहिली.*

- परंतु त्यांचा नामोल्लेखही पाठ्यपुस्तकात कुठे आढळत नाही , याची खंत वाटते. आंध्रप्रदेशच्या नालगोंडा जिल्ह्यातील अन्नेपर्थी या गावच्या पेदेमरी व्यंकट सुब्बारावांचे संस्कृत, तेलगू, इंग्रजी आणि अरेबिक भाषांमध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण झाले होते. ते नॅचरोपॅथीचे तज्ज्ञ म्हणूनही परिचित होते. याचबरोबर विशाखापट्टणम् जिल्ह्याचे अनेक वर्षं ते जिल्हा कोषागार अधिकारी म्हणून सरकारी नोकरीत होते. त्यांची ' कालाभरवाहू ' नावाची तेलगू कादंबरी विशेष गाजली. मुळात राष्ट्रप्रेमाने प्रेरित झालेले , स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतले कवी पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी आपल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी म्हणावी म्हणून ही प्रतिज्ञा १९६२ मध्ये लिहिली.

- त्यांच्या शिक्षण खात्यातील एका मित्राला ही कल्पना खूपच आवडली. त्याने आंध्रप्रदेशचे तत्कालीन शिक्षणमंत्री पी. व्ही. जी. राजू यांना ही प्रतिज्ञा दाखविली.

- शिक्षणमंत्र्यांनाही ती आवडली आणि त्यांनी ती शाळाशाळांमध्ये घेण्याचा आदेश दिला.

- केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत देशातील शिक्षणखाते कार्य करीत असते. या खात्याच्या वतीने शिक्षणामध्ये सातत्याने नवनव्या सुधारणा सुचविल्या जातात. यासाठी ' डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडिया ' या समितीची स्थापना केलेली आहे. या समितीचे अध्यक्ष केंद्रीय शिक्षणमंत्री असतात. या डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडियाची ३१वी सभा तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री एम. सी. छागला यांच्या अध्यक्षतेखाली ११-१२ ऑक्टोबर १९६४ला बेंगळुरू येथे झाली होती. या मिटिंगच्या वृत्तांतामध्ये (डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडिया - ए हिस्टॉरिकल सर्व्हे ऑफ एज्युकेशन डॉक्युमेंट बिफोर अॅण्ड आफ्टर इंडिपेन्डन्ट - या पुस्तकाच्या पान १४० वर) मुद्दा क्र. १८ मध्ये उल्लेख आढळतो की , विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना सदोदित जागृत राहण्यासाठी समितीच्या शिफारशीनुसार शाळा-महाविद्यालयांमध्ये , तसेच राष्ट्रीय दिवसांच्या शुभपर्वावर विद्यार्थ्यांसाठी एक प्रतिज्ञा असावी. याला अनसुरूनच पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी लिहिलेली India is My Country, All Indians are my brothers & sisters... ही प्रतिज्ञा देशपातळीवर स्वीकारण्याची शिफारस करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

- पुढे असेही सूचित करण्यात आले की , ही प्रतिज्ञा देशपातळीवर २६ जानेवारी १९६५ पासून लागू करावी.

- या प्रतिज्ञेचा देशपातळीवरील विविध भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आणि १९६५ पासून देशातील सर्वच राज्यांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये तिचा समावेश करण्यात आला.

- तसेच , या प्रतिज्ञेला फक्त पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेचा दर्जा न देता, तिला राष्ट्रीय प्रतिज्ञेचा दर्जा देशपातळीवर देण्यात आला.

- पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी ही प्रतिज्ञा १९६२ मध्ये प्रथम तेलगू भाषेत लिहिली होती.

- २६ जानेवारी २०१२ला या प्रतिज्ञेचा सुवर्ण महोत्सव सुब्बारावांच्या मित्र परिवाराने साजरा केला. तेव्हा ' टाइम्स ऑफ इंडिया ' आणि दैनिक ' हिंदू ' या इंग्रजी वृत्तपत्रांत त्याविषयीची छोटीशी बातमी प्रकाशित झाली. या बातमीमुळेच माझ्यासारख्या आजच्या पिढीतील अनेकांना आपल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेचा खरा लेखक कोण , याची माहिती मिळाली.

- आपले राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान जसे अनुक्रमे रवींद्रनाथ टागोर आणि बंकिमचंद्र चटर्जी यांच्या नावे ओळखले जाते. तशीच ही राष्ट्रीय प्रतिज्ञाही पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांच्या नावाने ओळखली जायला हवी.

- सुब्बारावांचे नाव या राष्ट्रीय प्रतिज्ञेशी जोडले जायला हवे. कारण प्रतिज्ञेचा जो आशय आहे , जे विचार आहेत ते प्रचंड विवेकवादी , समतावादी , एकात्म समाज घडविण्याचा वस्तुपाठ दर्शवितात. हा राष्ट्रीय प्रतिभेचा अमूल्य वारसा या प्रतिज्ञेच्या माध्यमातून भविष्यातही भावी पिढ्यांसाठी आपण जतन करणार आहोतच.

- यासाठी तरी पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांच्या प्रतिभेचा सम्मान म्हणून या प्रतिज्ञेच्या खाली त्यांची नाममुद्रा असणे गरजेचे वाटते , म्हणजे भविष्यात आपल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेचा लेखक कोण ? हा प्रश्न इतरांना पडणार नाही. याचे उत्तर प्रत्येक भारतीय नागरिकाजवळ असेल.

*ही माहिती मला आवडली ती सर्वांना कळावी म्हणून पाठवत आहे*

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...