Pages

Tuesday, August 2, 2016

कथा


अमेरिका की बात हैं. एक युवक को व्यापार में बहुत नुकसान उठाना पड़ा.

उसपर बहुत कर्ज चढ़ गया, तमाम जमीन जायदाद गिरवी रखना पड़ी . दोस्तों ने भी मुंह फेर लिया,

जाहिर हैं वह बहुत हताश था. कही से कोई राह नहीं सूझ रही थी.

आशा की कोई किरण दिखाई न देती थी.

एक दिन वह एक park में बैठा अपनी परिस्थितियो पर चिंता कर रहा था.

तभी एक बुजुर्ग वहां पहुंचे. कपड़ो से और चेहरे से वे काफी अमीर लग रहे थे.

बुजुर्ग ने चिंता का कारण पूछा तो उसने अपनी सारी कहानी बता दी.

बुजुर्ग बोले -” चिंता मत करो. मेरा नाम John D. Rockefeller है.
मैं तुम्हे नहीं जानता,पर तुम मुझे सच्चे और ईमानदार लग रहे हो. इसलिए मैं तुम्हे दस लाख डॉलर का कर्ज देने को तैयार हूँ.”

फिर जेब से checkbook निकाल कर उन्होंने रकम दर्ज की और उस व्यक्ति को देते हुए बोले, “नौजवान, आज से ठीक एक साल बाद हम ठीक इसी जगह मिलेंगे. तब तुम मेरा कर्ज चुका देना.”

इतना कहकर वो चले गए.

युवक shocked था. Rockefeller
तब america के सबसे अमीर व्यक्तियों में से एक थे.

युवक को तो भरोसा ही नहीं हो रहा था की उसकी लगभग सारी मुश्किल हल हो गयी.

उसके पैरो को पंख लग गये.

घर पहुंचकर वह अपने कर्जो का हिसाब लगाने लगा.

बीसवी सदी की शुरुआत में 10 लाख डॉलर बहुत बड़ी धनराशि होती थी और आज भी है.

अचानक उसके मन में ख्याल आया. उसने सोचा एक अपरिचित व्यक्ति ने मुझपे भरोसा किया,

पर मैं खुद पर भरोसा नहीं कर रहा हूँ.

यह ख्याल आते ही उसने चेक को संभाल कर रख लिया.

उसने निश्चय कर लिया की पहले वह अपनी तरफ से पूरी कोशिश करेगा,

पूरी मेहनत करेगा की इस मुश्किल से
निकल जाए. उसके बाद भी अगर कोई चारा न बचे तो वो check use करेगा.

उस दिन के बाद युवक ने खुद को झोंक दिया.

बस एक ही धुन थी,

किसी तरह सारे कर्ज चुकाकर अपनी प्रतिष्ठा को फिर से पाना हैं.

उसकी कोशिशे रंग लाने लगी. कारोबार उबरने लगा, कर्ज चुकने लगा. साल भर बाद तो वो पहले से भी अच्छी स्तिथि में था.

निर्धारित दिन ठीक समय वह बगीचे में पहुँच गया.

वह चेक लेकर Rockefeller की राह देख रहा था

की वे दूर से आते दिखे.

जब वे पास पहुंचे तो युवक ने बड़ी श्रद्धा से उनका अभिवादन किया.

उनकी ओर चेक बढाकर उसने कुछ कहने के लिए मुंह खोल ही था की एक नर्स भागते हुए आई

और

झपट्टा मरकर वृद्ध को पकड़ लिया.

युवक हैरान रह गया.

नर्स बोली, “यह पागल बार बार पागलखाने से भाग जाता हैं

और

लोगो को जॉन डी . Rockefeller के रूप में check बाँटता फिरता हैं. ”

अब वह युवक पहले से भी ज्यादा हैरान रह गया.

जिस check के बल पर उसने अपना पूरा डूबता कारोबार फिर से खड़ा किया,वह

फर्जी था.

पर यह बात जरुर साबित हुई की वास्तविक जीत हमारे इरादे , हौंसले और प्रयास में ही होती हैं.

हम सभी यदि खुद पर विश्वास रखे तो यक़ीनन

किसी भी असुविधा से, situation से निपट सकते है.

" हमेशा हँसते रहिये,
एक दिन ज़िंदगी भी
आपको परेशान
करते करते थक जाएगी ।"


कथा - स्व

॥ स्व ॥

"एक मूर्तिकार फार थोर कलावंत म्हणून विख्यात होता.
त्याने बनवलेल्या मूर्ती इतक्या हुबेहूब असत की पाहणारा चक्रावून जात असेल.
त्याच्या हातून साकारलेली मूर्ती आणि ज्याची मूर्ती बनवली तो माणूस एकमेकांशेजारी उभे केले आणि त्या माणसाने श्वास रोखून धरला,
तर मूर्ती कोणती आणि माणूस कोणता, हे सांगणं कठीण व्हायचं.
हळुहळू मूर्तिकार म्हातारा झाला. मरणाच्या चाहुलीने त्याच्या मनात
काहूर उठलं. आता लवकरच आपला मृत्यू निश्चित आहे, म्हटल्यावर
त्याच्या मनात मृत्यूला चकवण्याचा विचार सुरू झाला. त्यासाठी त्याने
आपल्या हातातली कलाच वापरण्याचा निर्णय केला. हुबेहूब दिसणाऱ्या
आपल्या ११ मूर्ती त्याने तयार केल्या.
आता त्याच्या मृत्यूची रात्र आली. आज मृत्यू आपल्यावर घाला घालायला
येणार, याची त्याला खात्री होती. त्याने दालनात सगळ्या मूर्ती उभ्या केल्या
आणि त्यांच्यातच जाऊन उभा राहिला.
मृत्यूचा दूत दालनात आला आणि एकाच्या जागी १२ मूर्तिकार पाहून
चक्रावून गेला. यात मूर्ती कोणती आणि माणूस कोणता, हे त्याला
कळेना. तो परतून यमराजांकडे गेला. झालेली पंचाईत त्यांना सांगितली.
यमराज हसून म्हणाले, उद्या रात्री पुन्हा जा. त्याला कसा बाहेर आणायचा,
ते मी सांगतो.
दुसऱ्या दिवशी मृत्युदूत पुन्हा त्या दालनात गेला. पुन्हा अगदी हुबेहूब
एकमेकांसारख्या दिसणाऱ्या १२ मूर्ती पाहून चक्रावला. मात्र, तो थबकून
म्हणाला, अहाहा, काय सुंदर कारागिरी! कोणीही या कलेला दादच देईल.
फक्त एक चूक सोडली तर...
कोणती चूक, समोरून प्रश्न आला.
मृत्यूचा दूत मूर्तिकाराचा हात हातात घेऊन म्हणाला,
हीच ती चूक...
तुला स्वत:चा विसर पडू शकला नाही.
ज्याचा स्व जिवंत आहे, त्याचा मृत्यू अटळ आहे."

Sunday, July 31, 2016

विद्वतेने अहंकारी बनू नका

विद्वत्तेने अहंकारी बनू नका


कालिदासांना ही जाणीव झाली होती कि ते खूप मोठे ज्ञानी झालेत. एकदा प्रवासात त्यांना तहान लागली, त्यांनी पाहिलं कि जवळच एक वृद्ध स्त्री विहिरीवरच पाणी भरत आहे. कालिदास म्हणाले, माते मला पाणी देशील तर तुला खूप पुण्य मिळेल. वृद्ध स्त्री म्हणाली बाळा मी तुला ओळखलं नाही, कृपया तू तुझा परिचय दे, मग मी तुला पाणी देते. मग कालिदासाने परिचय देण्यास सुरवात केली.

कालिदास म्हणाले मी प्रवासी आहे.

वृद्ध स्त्री म्हणाली प्रवासी तर फक्त दोनच आहेत एक चंद्र आणि दुसरा सूर्य जे दिवस रात्र चालतच असतात.

कालिदास म्हणाले मी अतिथी आहे. पाणी मिळेल ?

वृद्ध स्त्री म्हणाली अरे अतिथी तर फक्त दोनच आहेत एक धन आणि दुसर तारुण्य ते निघून जातात. खरं सांग तू कोण आहेस ?

कालिदास म्हणाले मी सहनशील आहे. आता तरी पाणी मिळेल ?

वृद्ध स्त्री म्हणाली अरे सहनशील तर तर फक्त दोनच आहेत एक धरती आणि दुसर झाडं. धरती जी पुण्यवाण लोकांच्या बरोबर पापी लोकांच देखील ओझं घेऊन आहे. आणि झाडं ज्यांना दगडं मारली तरी ती मधुर फळच देतात.

कालिदास आता हतबल झाले,    

कालिदास म्हणाले मी हट्टी आहे.

वृद्ध स्त्री म्हणाली नाही तू हट्टी कसा असशील, हट्टी तर फक्त दोनच आहेत एक नखं आणि दुसरे केस, कितीही कापले तरी परत वाढतातच.

कालिदास आता कंटाळले  आणि

कालिदास म्हणाले मी मूर्ख आहे.

वृद्ध स्त्री म्हणाली मूर्ख तर  फक्त दोनच आहेत एक राजा ज्याची योग्यता नसताना तो सर्वांच्यावर राज्य करतो आणि दुसरा दरबारातील पंडित जो त्या राजाला रिझवण्यासाठी चुकीच्या गोष्टीला खरं सिद्ध करण्याची चेष्टा करतो.

कालिदास आता काही ही बोलण्याच्या मनःस्तिथीतीत नव्हते, ते त्या स्त्रीच्या पायावर डोकं ठेऊन पाण्यासाठी विनवनी करू लागले.

वृद्ध स्त्री म्हणाली उठ बाळा, आवाज ऐकूण कालिदासांनी वर पाहिलं तर त्या स्त्रीच्या जागी साक्षात सरस्वती देवी उभी होती, कालिदास आता नतमस्तक झाले.

सरस्वती देवी कालिदासांना म्हणाली, शिक्षणाने ज्ञान येते, अहंकार नाही. शिक्षणाच्या बळावर मिळालेला मान, सन्मान आणि प्रतिष्ठा यालाच तू सर्वस्व समजलास आणि त्याचा तुला अहंकार आला. तुझे डोळे उघडणे आवश्यक होते. कालिदासांना त्यांची चूक समजली, ते भरपूर पाणी पिऊन पुढील प्रवासाला निघाले.

तात्पर्य: विद्वत्तेवर कधीच गर्व करू नका,
अहंकारी बनू नका,
अन्यथा हाच गर्व आणि अहंकार तुमची विद्वत्ता नष्ट करू शकतो.

Wednesday, July 27, 2016

डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

विज्ञानेश्वराचे प्रस्थान

क्रायोजेनिक इंजिनांच्या साहाय्याने मोठे उपग्रह अवकाशात सोडण्याचे क्षेत्र असो की अणुस्फोट चाचणी, डॉ. अब्दुल कलाम यांचा त्यात मोठा वाटा होता. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक मानसन्मान मिळाल्यानंतर ते राष्ट्रपती बनले. तेथेही त्यांच्या कार्यामुळे त्या पदाची उंची वाढली. कलाम असे उंचच राहिले. या उंचीचा त्यांना ध्यास होता. ते त्यांचे प्रेयस होते आणि आपल्या जगण्याने त्यांनी ते श्रेयसही केले.
कोळ्याच्या पोटी जन्माला आलेल्या अवुल पकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम या पोरास वैमानिक व्हावयाचे होते. तशी संधी आली असता ती त्यास नाकारली गेली. हवाई दलाचे वैमानिक होण्यासाठी ते अपात्र ठरले. ते योग्यच झाले. कारण विमानास पृथ्वीचा गुरुत्वाकर्षण बंध तोडण्याचा अधिकार नसतो. कितीही शक्तिशाली असले तरी विमान पृथ्वीच्या वातावरणाच्या मर्यादा सोडत नाही. एखादा काँकार्ड विमानाचा अपवाद. अन्यथा विमान आपल्या अंगभूत मर्यादेतच घुटमळत राहते. एपीजे कलाम यांच्या आकांक्षेस ती मर्यादा मानवली नसती. त्यांना अवकाश खुणावत होते. साध्या समूहगानास अपात्र ठरलेल्या एखाद्या गायकाने पुढे स्वत:ची एकल बठक भरवण्याइतकी गाण्यात प्रगती करावी, तसे हे झाले. आकाशयानासाठी अपात्र ठरलेले एपीजे पुढे इतके वाढले की ते आकाशाच्या सीमा ओलांडून अवकाशाकडे झेपावले. कलाम यांचे उड्डाणप्रेम इतके तीव्र की वैमानिक म्हणून नाकारले गेल्यानंतर त्यांनी या क्षेत्राशी संबंध राहावा म्हणून िहदुस्थान एअरोनॉटिक्समध्ये कनिष्ठ पदाची नोकरी पत्करली. रामेश्वरसारख्या दूरस्थ खेडय़ात जन्मलेला, साध्या शालेय शिक्षणासाठीदेखील वर्तमानपत्र टाकण्याचे काम करून अर्थार्जन करावे लागलेला एक गरीब मुलगा देशाचा राष्ट्रपती आणि अवकाश क्षेत्राचा चेहरा बनून जातो, ही कहाणीच विलक्षण प्रेरणादायी आहे. कलाम यांच्याभोवती जी काही प्रभावळ तयार झाली ती या पाश्र्वभूमीमुळे. ज्या समाजात प्रचंड मोठय़ा घटकास वंचित राहावे लागते, ज्या समाजात प्रगतीच्या संधीचा सुग्रास घास मूठभरांच्याच ताटात सहज पडतो त्या समाजात रामेश्वरात मुसलमान कुटुंबात जन्माला येऊन धर्म, जात, प्रांत, भाषा अशी सर्व बंधने ओलांडून अवकाशाकडे झेपावणारे कलाम आदर्श आणि अनुकरणीय ठरतात यात नवल नाही.
वास्तविक कलाम यांच्या आधी अवकाश वा तत्संबंधी क्षेत्रात भारतात काही घडत नव्हते असे नाही. विक्रम साराभाई, त्यांचे पूर्वसुरी होमी भाभा आदींनी विज्ञानक्षेत्राची मजबूत पायाउभारणी आपल्याकडे केली होतीच. या धुरंधरांना पं. जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या द्रष्टय़ाचे नेतृत्व लाभल्याने त्या काळातील प्रगती खरोखरच वाखाणण्याजोगी होती. परंतु तरीही या सर्व महानुभावांना कलाम यांच्यासारखी लोकप्रियता मिळाली नाही. ते सर्वच आदरणीय होते. पण त्यांच्याविषयीचा आदर दडपणाच्या कोंदणातून यायचा. कलाम यांचे तसे नाही. त्यांची तुलनाच करावयाची झाल्यास ती महात्मा गांधी यांच्या राजकीय नेतृत्वाशी करावी लागेल. महात्मा गांधी यांच्या आधीही लोकप्रिय राजकारणी होते. परंतु एक बाळ गंगाधर टिळक यांचा अपवाद वगळता ते जनसामान्यांना आपलेसे वाटत नसत. महात्मा गांधी यांनी रस्त्यावरच्या जनसामान्यांच्या देशप्रेमासही किंमत दिली. देशासाठी आपणही काही करू शकतो असे सामान्यांतल्या सामान्यास वाटू लागणे हे महात्मा गांधी यांचे यश. विज्ञान क्षेत्राच्याबाबत हे पुण्य कलाम यांच्या खाती जमा होते. आपणास जे साध्य करावयाचे आहे ते होईपर्यंत प्रयत्न करीत राहणे हे त्यांचे वैशिष्टय़. अशा प्रयत्नांवर निष्ठा असणाऱ्यांना फार दूरचे दिसते. कलामांना तसे दिसत असे. त्यामुळे अमेरिका आदी बडय़ा देशांनी भारतावर र्निबध घातले तरी भारतीय तंत्रज्ञ त्यातून मार्ग काढू शकतात, हा विश्वास त्यांना होता आणि स्वत:चाच विश्वास सार्थ ठरवून दाखवण्याची धमक त्यांच्यात होती. बडय़ा देशांनी १९७४ साली अणुचाचण्या केल्या म्हणून भारतास युरेनियमपुरवठा बंद करण्याची शिक्षा दिली. त्यानंतरही न डगमगता भारतात.. त्यातही रामेश्वरच्या किनारपट्टी परिसरात.. प्रचंड प्रमाणावर आढळणाऱ्या थोरियमचा वापर करून युरेनियम तयार करता येऊ शकते, हे सिद्ध करून दाखवण्याचे महान कार्य ज्या तंत्रज्ञांनी करून दाखवले त्यात कलाम यांचा अंतर्भाव होतो. सामान्य नागरिकास कदाचित याचे महत्त्व कळणार नाही. परंतु थोरियमचे हे गुणदर्शन भारतासाठी अत्यंत दूरगामी महत्त्वाचे आहे, हे नि:संशय. याच काळात भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रात मोठय़ा घडामोडी घडत होत्या. क्रायोजेनिक इंजिनांच्या साहाय्याने मोठे उपग्रह कसे अवकाशात सोडता येतील, यासाठी बरेच संशोधन सुरू होते. कलाम यांचा त्यात मोठा वाटा आहे. आज या क्षेत्रात पाच बडय़ा देशांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची योग्यता ज्या देशांनी मिळवली त्यात भारतासारख्या दरिद्री देशाचा समावेश होतो. हे यश कलाम, डॉ. अनिल काकोडकर अशा तंत्रज्ञांचे. त्या अर्थाने कलाम हे उच्च दर्जाचे अभियंते होते. आपल्याकडे विज्ञानक्षेत्राशी संबंधित सर्वानाच वैज्ञानिक म्हटले जाते. कलाम हे तसे वैज्ञानिक नव्हते. हे काही त्यांच्यातील न्यून नाही. खुद्द कलाम यांना आपल्यातील या तंत्रज्ञाची जाणीव होती. तरीही एखादा वैज्ञानिकही करू शकणार नाही, असे एक मोठे काम त्यांच्या हातून घडले.
ते म्हणजे विज्ञान प्रसाराचे. कलाम मूíतमंत विज्ञानवादी, प्रयत्नवादी होते. ही बाब आपल्यासारख्या दांभिक समाजात अत्यंत महत्त्वाची. याचे कारण विज्ञान आणि धर्मातील कर्मकांड या दोन्ही डगरींवर तोल सांभाळत जगणाऱ्यांची संख्याच आपल्या समाजात जास्त. ही कसरत कलाम यांनी कधीही केली नाही. जाणीवपूर्वक. देशातील सर्वोच्च पदावर निवड झाल्यावर त्यांनी राष्ट्रपती भवनात निवास करणे क्रमप्राप्त होते. तेव्हा कोणत्या मुहूर्तावर आपण राष्ट्रपती भवनात राहावयास येणार असे सरकारने विचारले असता, कलाम यांनी उत्तर दिले.. प्रत्येक दिवस माझ्यासाठी सुमुहूर्त असतो. आकाशस्थ ग्रहताऱ्यांचे त्याच्याशी काहीही देणे-घेणे नाही. कलाम त्याप्रमाणेच वागले. भूमिका अशी घ्यावयाची आणि चोरून मुहूर्त पाहावयाचा असली लबाडी करण्याची वेळ त्यांच्यावर कधीही आली नाही. विचार आणि वागणे यांच्याशी त्यांचा थेट संबंध होता. त्यामुळे वेगवेगळ्या श्रेयांसाठी ओळखले जात असतानाही आपल्याला विज्ञानवादी शिक्षक ही ओळख सर्वात प्रिय आहे, असे कलाम म्हणत. विज्ञानाची विविध गुह्य़े जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे त्यांना मनापासून आवडे. ते हे काम न कंटाळता करीत. अणुऊर्जा आयोगाशी संबंधित असताना मुंबईत त्यांचे वारंवार येणे असे. त्या वेळी कलाम यांच्याशी अनेकदा संवाद झाला. विज्ञानविषयक वार्ताकन करणारे वार्ताहर त्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडत. परंतु त्यातील एकाही प्रश्नाला वा प्रश्नकर्त्यांला कलाम यांनी कमी लेखले असे झाल्याचे एकही उदाहरण नाही. काही काही विषयांवर भाष्य करण्यात त्यांना अंगभूत मर्यादा येत. ते कलाम पाळत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याने कधीही वाद वगरे झाले नाहीत.
हे त्यांचे स्वभाववैशिष्टय़ होते. त्यांच्या हयातीत के. संथानम, होमी सेठना आदींनी कलाम यांच्यावर थेट टीका केली आणि त्यांच्या क्षमतेसंदर्भात काही प्रश्नही उपस्थित केले. त्यास उत्तर देण्याच्या फंदात कलाम कधी पडले नाहीत. खरे तर अत्यंत महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय कालखंडात कलाम भारतीय अणुऊर्जा क्षेत्राच्या केंद्रस्थानी होते. अमेरिका ते सोविएत रशिया या टापूत बरेच काही घडत होते आणि बऱ्याचदा भारतही त्या घडामोडींच्या केंद्रस्थानी होता. परंतु यातील कशाचीही वाच्यता कलाम यांच्या आत्मचरित्रात नाही. एका अर्थाने ही त्यांची मर्यादादेखील ठरते. पण अशा मर्यादेची एक बाजू चांगुलपणाची असते. कलाम यांच्या राष्ट्रपती भवनातील वास्तव्यात ती दिसून आली. २००४ सालच्या निवडणुकीत काँग्रेस बहुमताच्या जवळ गेल्यावर पंतप्रधानपदी सोनिया गांधी यांची निवड होणार हे स्पष्ट होते. परंतु तसे झाले नाही. गांधी यांनी ऐन वेळी माघार घेतली. त्या वेळी त्यांचे परदेशी मूळ लक्षात घेऊन राष्ट्रपती कलाम यांनी त्यांना पंतप्रधानपद न स्वीकारण्याची मसलत दिली, असे बोलले गेले. कलाम यांनी त्या विषयी कधीही ब्रदेखील काढला नाही. राष्ट्रपती म्हणून मुदत संपल्यावर त्यांना आणखी एक संधी दिली जाणार होती. ती खुद्द कलाम यांनी अव्हेरली. पद नाकारणारे भारतासारख्या देशात दुर्लभच ठरतात आणि तसे कोणी आढळल्यास भाबडी जनता अशा व्यक्तीस आनंदाने ऋषिपद बहाल करते. कलाम यांना ते तसे मिळाले. त्यांचा मोठेपणा हा की या ऋषिपदास तडा जाईल अशी एकही कृती कलाम यांच्या हातून घडली नाही. त्यात जोडीला असलेला अंगभूत साधेपणा. भारतात लोकप्रियतेच्या शिखराचे कायमस्वरूपी नागरिकत्व मिळण्यासाठी या बाबी पुरेशा ठरतात. अशा व्यक्तींना पदासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत, पदच त्यांचा शोध घेत येते. कलाम यांचे तसे झाले. त्यामुळे पीसी अलेक्झांडर यांच्या ऐवजी राष्ट्रपतिपदाचे सर्वसंमत उमेदवार म्हणून कलाम यांची निवड झाली. अलेक्झांडर हे एके काळी काँग्रेसला जवळचे. दिवंगत इंदिरा गांधी यांचे विश्वासू. तेव्हा त्यांच्या नावास काँग्रेस आक्षेप घेणार नाही, हा अटलबिहारी वाजपेयी सरकारातील प्रमोद महाजन यांचा होरा. तो चुकला. कारण सोनिया गांधी यांनी अलेक्झांडर यांना पािठबा नाकारला. त्यानंतर कलाम यांचे नाव पुढे केले गेले. ते मान्य झाले. त्यांना राष्ट्रपतिपदासाठी उभे करण्यात खरे तर एक राजकारण होते. परंतु या राजकारणाचा गंध राष्ट्रपतिपदावर विराजमान झाल्यावर दूरान्वयानेही कलाम यांच्या वागण्यास आला नाही. ते होते तसेच राहिले. उलट त्यांच्यामुळे त्या पदाची उंची वाढली.
कलाम हे असे उंचच राहिले. या उंचीचा, अनंत उंचीचा त्यांना ध्यास होता. ते त्यांचे प्रेयस होते आणि आपल्या जगण्याने त्यांनी ते श्रेयसही केले. ते विविधांगी जगले. या सर्व अवतारांत एक सूत्र समान होते. ते म्हणजे विज्ञानप्रेम. ते कधीही आटले नाही. त्या प्रेमाचाच आविष्कार होता विद्यार्थाशी गप्पा. या अशा गप्पांतच त्यांच्या आयुष्याची इतिश्री व्हावी हा एक विलक्षण योगायोग. तो आणखी एका कारणाने उठून दिसतो. भद्र-अभद्र, शुभ-अशुभ वगरे काहीही न मानणाऱ्या कलाम यांचे सोमवारी निधन झाले. श्रद्धाळू, धर्म-अधर्माच्या गत्रेत अडकलेला जनसमुदाय आषाढी एकादशी पाळून आपल्या खात्यात काही पुण्य जमा व्हावे यासाठी मग्न असताना या विज्ञानेश्वराने अनंताच्या प्रवासासाठी प्रस्थान ठेवले. लोकसत्ता परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली.

Monday, July 25, 2016

NFC Technology

सर्व मित्रांना *कैलास गवळे*चा नमस्कार 🙏🏻🙏🏻
   नाशिक येथील कार्यशाळेत *संदीप गुंड* सरांनी *NFC* चा उल्लेख करुन काही माहिती दिली.
        त्यात भर म्हणून मी त्याविषयी अधिक माहिती मिळवली
ती आपल्यासाठी share करतो👇👇

एनएफसी (NFC) ही एक मस्त नवीन टेक्नॉलॉजी आहे. आजकालच्या बहुतेक आघाडीच्या स्मार्टफोन्समध्ये हे एनएफसी फीचर असतंच. एनएफसी म्हणजे निअर फिल्ड कम्युनिकेशन. वायफाय, ब्लुटूथ कसं असतं तसंच हे, मात्र एनएफसीची  रेंज आणि क्षमता मात्र या दोन्हीपेक्षाही कमी असते. वायफायची रेंज वायफायचा प्रकार आणि राऊटरवर अवलंबून असली तरी ती साधारण 3 मीटरच्या घरात असते. ब्लुटूथची रेंज 5 मीटर्पयत असते. एनएफसी तंत्रज्ञान मात्र 1क् सेमी इतक्या कमी रेंजमध्ये काम करते.

एनएफसीसाठी दोन गोष्टी लागतात.
एक म्हणजे एनएफसी चिप असणारे, आपल्या स्मार्टफोनसारखे, डिव्हाइस आणि  या डिव्हाइसला ठरावीक काम करण्याच्या सूचना देणारा एनएफसी टॅग. या टॅगमध्ये ठरावीक सूचना प्रोग्रॅम केलेल्या असतात. उदाहरणार्थ, स्क्र ीन ऑफ करणो किंवा मोबाइल वॉलेटमधून ठरावीक रक्कम वसूल करणो वगैरे. या सूचना प्रोग्रॅम करणो सोपे असते. यासाठी काही अॅप्स असतात जे वापरून आपण एनएफसी टॅगमध्ये सूचना स्टोअर करू शकतो. यात कळीचा मुद्दा असा आहे की, एक एनएफसी टॅग फक्त एकच काम करतो.

एनएफसी वापरायचं कसं?
एनएफसी वापरण्यासाठी तुम्हाला या गोष्टी लागतील.
1) एनएफसी असलेला फोन.
तुमच्या फोनमध्ये एनएफसी आहे की नाही, हे बघण्यासाठी सेटिंग्जमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ वगैरेनंतर असलेल्या ‘मोअर’वर टॅप करा. यात एनएफसी ऑन-ऑफ करण्याचे स्विच असते. काही ठरावीक कामांसाठी दोन  एनएफसी फोन असले तरी काम होते. काही विशिष्ट कामांसाठी मात्र तुम्हाला एनएफसी  टॅग्ज लागतात. या एनएफसी टॅग्जमध्ये काही अॅप्स वापरून तुम्हाला विशिष्ट सूचना स्टोअर करता येतात. तुमचा एनएफसी एनेबल्ड फोन या टॅगजवळ नेला की त्यातील सूचनांची अंमलबजावणी फोनमध्ये होते. अमॅझॉन सारख्या वेबसाइटवर हे टॅग शंभर रुपयांपासून  उपलब्ध आहेत. काही टॅग्जमध्ये आधीच विशिष्ट सूचना प्रोग्रॅम केलेल्या असतात तर काही टॅग्जना आपण प्ले स्टोअरमधील अॅप्स वापरून प्रोग्रॅम करू शकतो. यापैकी ट्रीगर हे अॅप एनएफसी टॅग प्रोग्रॅमिंगसाठी लोकप्रिय आहे.

एनएफसी काही इंटरेस्टिंग उपयोग
हे सगळं वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल की या एनएफसीचा नक्की उपयोग काय? तर त्याचे काही भन्नाट उपयोग आहेत.

अॅण्ड्रॉइड बीम
बीमचा वापर दोन एनएफसी फोनमध्ये कन्टेंट शेअर करण्यासाठी होतो. सेटिंग्जमध्ये एनएफसीच्या खाली अॅण्ड्रॉइड बीमचे स्विच असते. बीम ऑन केलेले दोन फोन एकमेकांना टच केल्यावर आपल्या फोनवर ओपन असलेले वेब पेज, अॅप, व्हिडीओ किंवा कॉन्टॅक्ट डिटेल्स लगोलग शेअर होतात. दुस:या फोनमध्ये जर ते अॅप इन्स्टॉल नसेल तर प्ले स्टोअरमधील त्या अॅपचे पेज शेअर होते. सॅमसंगसारखे काही फोन मात्र एनएफसीचा वापर फक्त पेअरिंगसाठी करतात आणि कन्टेंट शेअर होतो ब्लूटूथवरून.

एनएफसी टॅग्ज
एनएफसीची खरी मजा आहे ती या टॅग्जमध्ये. पूर्वीच्या एका लेखात सांगितल्याप्रमाणो तुमचा स्मार्टफोन स्मार्टर बनविण्यासाठी एनएफसी टॅग्ज वापरता येतात. वर सांगितल्याप्रमाणो एखाद्या इकॉमर्स वेबसाइटवरून हे टॅग खरेदी करा आणि एनएफसीसारखे अॅप वापरून ते टॅग खालील वापरांसाठी प्रोग्रॅम करा.
1) झोपताना
एनएफसी टॅग तुमच्या बेडजवळ चिटकवा. झोपण्यापूर्वी फोन त्या टॅगवर ठेवल्यावर किंवा टॅगला स्पर्श केल्यावर फोन वायफाय टर्न ऑफ करणं किंवा फोन सायलेंट करणं यासारखी कामं बिनबोभाट होतात.
2) कारमध्ये
 कारमध्ये तुमच्या मोबाइल होल्डरवर हा टॅग चिकटवा. नेव्हिगेशन ऑन करणं किंवा म्युङिाक प्लेअर ऑन करणं किंवा बॅटरी वाचवण्यासाठी वायफाय ऑफ करणं यासारख्या सूचना तुम्ही या टॅगमध्ये वापरू शकता.
3) पाहुण्यांसाठी
 ‘वायफाय पासवर्ड काय आहे?’ हा कुठेही गेल्यावर विचारला जाणारा परवलीचा प्रश्न झाला आहे. तो पासवर्ड सांगा किंवा स्वत:च टाइप करून द्या, यासारखी कामं घरातला टेककर्ता माणूस या नात्यानं आपल्यालाच करावी लागतात. या सगळ्यातून सुटका करून घेण्यासाठी तुमच्या वायफाय राऊटरजवळ एक टॅग चिकटवा आणि वायफायप्रेमी पाहुण्यांना या टॅगला स्पर्श करून तुमच्या टेक सॅव्हीनेसचा परिचय करून द्या.

याशिवाय इंटेलिजंट लॉकजवळ फोन नेऊन लॉक उघडणं, लाइट्स ऑन करणं, ब्लुटूथ स्पिकरजवळ फोन नेल्यास म्युङिाक प्लेअर ऑन करणं, बिझनेस कार्ड शेअर करणं यासारखी अनेक कामे तत्परतेने होतात.

एनएफसी पेमेंट
भारतात कॅशबरोबर कार्डचा वापर आता चांगलाच प्रचलित झाला आहे. त्याहीपुढे जाऊन, आपण आता पेटीएमसारखे मोबाइल वॉलेटदेखील वापरू लागलो आहोत. पेमेंट करण्यातला सुटसुटीतपणा ही यातली मुख्य गोष्ट आहे. येत्या काही वर्षात पेटीएमसारखी वॉलेट्स, दुकानात आपण कार्ड स्वाईप करतो त्याप्रमाणो, सर्वदूर प्रचलित होतील. फक्त कार्ड स्वाईप करण्याऐवजी तुमचा एनएफसी एनेबल्ड फोन काउंटरवरील पेमेंट टर्मिनलजवळ नेल्यावर आपण मोबाइल वॉलेटमध्ये टाकलेली रक्कम आपोआप दुकानदाराला मिळेल. म्हणजे नोटाच काय पण कार्डदेखील सांभाळायची कटकट नाही.
   *KAILAS                              GAVALE*
*ʐ.ք.ֆcɦօօʟ- ӄօcɦaʀɢaօռ,  ɖɨռɖօʀɨ,ռaֆɦɨӄ*

Tuesday, July 19, 2016

पायाभूत चाचणी मराठी प्रश्नपत्रिका

https://drive.google.com/drive/mobile/folders/0B1BKrwucMaz6bEstcVItcjFMdlk/0B1BKrwucMaz6NXBxaE5qQ2RBS0k/0B1BKrwucMaz6RElMWTYxZHRkT1E?tab=jo&sort=13&direction=a

Monday, July 11, 2016

पायाभूत चाचणी सराव प्रश्नपत्रिका

प्रश्नपत्रिका
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या पायाभूत चाचणीच्या  प्रश्नपत्रिका पाहण्यासाठीची लिंक खालीलप्रमाणे  यामध्ये प्रत्येक इयत्तेसाठी विद्यार्थी प्रश्नपत्रिका व शिक्षक सूचनापत्र असे साहित्य आहे …

गणितासाठी - https://goo.gl/OlQSgq

भाषासाठी - https://goo.gl/SXaWms 

शिक्षण आणि करिअर

*आपली मुलं खरेच मनापासून शिकतातयेत की त्यांनी काहीतरी शिकलंच पाहिजे, असा *'बळस्कार' व्यवस्था त्यांच्यावर करतेय?*

शिक्षण क्षेत्रातील एका संवेदनशील कार्यकर्त्यांनं *तुम्ही आम्ही पालक* मासिकासाठी लिहिलेलं हे दीर्घ टिपण जरुर वाचाल.

*करिअर म्हंजी काय रं भाऊ?*

लेखक: *भाऊसाहेब चासकर*

तुम्ही शिकता कशासाठी? असा प्रश्न मी आजवर शेकडो युवक-युवतींना विचारलाय. शिकल्यावर नोकरी मिळते, पैसे मिळतात, चांगले करिअर होते. बहूतेक मुलांचे असेच उत्तर असते! तात्विक आणि सैद्धांतिक पातळीवर शिक्षणाची थिअरी मांडताना देशातील शिक्षणतज्ज्ञांनी, धोरणकर्त्यांनी काहीतरी वेगळीच मांडणी केलेली असते. तसले काही असले तरी आजचे पालक मुलांना शिकवताहेत किंवा मुलंही शिकताहेत, यामागची मूळ प्रेरणा शिकल्यावर नोकरी मिळते, दोन पैसे हातात येतात, पैसे आले की गरजा भागवता येतात, आयुष्य नीट जगता येते, पैशाशिवाय जगणे मुश्किल आहे. वगैरे... शिकण्यामागची अशी पक्की ठोकळेबाज धारणा बनली आहे. विशेषतः ज्या कुटुंबातील पहिली किंवा दुसरी पिढी शिकतेय, तिथे हे जास्त ठळकपणे दिसतेय. अर्थात हे वाटणे अजिबात चुकीचे नाही. शिक्षणातून अनेक कुटुंबांचा उत्कर्ष झालेला त्यांनी बघितलाय.

शिक्षणातून जबाबदार नागरिक घडवणे वगैरे असा शिक्षणामागचा महनीय विचार बिचार सांगणारे यच्चयावत दस्ताऐवज असले तरीही ‘शिक्षण = नोकरी’ (करिअर) हे समीकरण कोणालाही नाकारता येणार नाही, हा सांगायचा मुद्दा आहे. किंबहूना तसे केल्यास ती आपणच आपली फसवणूक करून घेतल्यासारखे होईल. करिअरच्या कमानीखालून आत शिरायला पदवीचे भेंडोळे मुलांना, पालकांना हातात लागतेय. या शिकण्याचा ज्ञान मिळवणे, बौद्धिकदृष्ट्या उन्नत होणे, काही विशेष गोष्टी अवगत होणे, जबाबदार नागरिक घडवणे याशी काडीमात्र संबंध उरलेला नाहीये, हे नक्की!

दुसरा मुद्दा म्हणजे बारावीनंतरच्या शिक्षणातील सगळे ‘यश’ आपल्याकडे संपूर्णपणे परीक्षेत मिळालेल्या गुणांशी जोडले गेलेले आहे. ‘गुण आणि गुणवत्तेचा फारसा संबंध नसतो’, अशी वाक्ये फार फार तर सुविचार म्हणून शाळेच्या भिंतीवर लिहायला भाषणात बोलायला ठीक! आज परीक्षेत मिळालेले मार्क्स हेच मुलांच्या शैक्षणिक आयुष्यातले अत्यंत क्रूर वास्तव आहे. त्याचा आयुष्यावर भलाबुरा परिणाम होतो, हेच तंतोतंत खरे आहे.
तरुण मित्रांशी बोलताना नेहमी जाणवते की, बहूतेक मुलं जे शिकताहेत, ती स्वतःची आवड म्हणून नव्हे, तर व्यवस्थेने त्यांच्यावर केलेली ती एकप्रकारची बळजबरीच आहे! भारतीय शिक्षणात अत्यंत दुर्दैवाने मुलांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचा विचार कुठेही होताना दिसत नाहीये. कलचाचण्या कशाशी खातात हे आपल्याकडे माहीत नाही. मोठ्या मोठ्या शाळांत साधी समुपदेशनाची सोय नाही. आज विविध शाखांमध्ये जी काही मुलं शिक्षण घेताहेत, त्यांचा एखादा सर्वे कोणीतरी करायलाच हवा म्हणजे आपल्याला समजेल की, किती मुलं आपल्या आवडीनिवडीनुसार शाखा निवडताहेत ते!

‘लाईफमध्ये तुम्ही शाळा-कॉलेजात जाऊन काहीतरी शिकायलाच पाहिजे, असं पॅरेंन्टसचं आणि मेन म्हणजे सिस्टीमचं जाम प्रेशर असतं. प्रेशरपेक्षाही ते कम्बल्शनच असतं म्हणा. अनेकदा काय शिकायचं याचाही चॉईस आम्हा मुलांना नसतोच. आमचे अनेक प्रोजेक्टस् म्हणजे निव्वळ डॉन्की वर्क असते! सो मग काय करणार?’ उच्च शिक्षण घेणारी नेहा सांगत होती.

मुलांना आवडेल तसे शिकवायचे. त्यात गरजेइतके पैसे मिळवून आनंदाने जीवन जगता येईल, अशी व्यवस्थाच आपण निर्माण करू शकलेलो नाहीये. व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था या मुंबई येथील संस्थेची सद्यस्थिती कशी आहे, तिथले लोकं नेमके काय करत आहेत, याचा जरा कानोसा घेतला म्हणजे आपण आपल्या 'भविष्या'वर किती गांभीर्यपूर्वक काम करतोय हे समजेल.

करिअरच्या हजारो वाटा असतात. पण आम्ही मात्र वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि स्पर्धा परीक्षांवरच अडून बसलेलो असतो. केवळ यात यशस्वी झालेल्यांवर आम्ही यशाची, गुणवत्तेची मोहर लावतो! मग यातले यशस्वी मुलं आयडॉल बनून राहतात. मग याचेच अनुकरण केले जाते. मागून येणारे पालक आणि शिक्षण व्यवस्था या दलदलीत विद्यार्थ्यांना ढकलत राहतात. वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या क्षेत्रांत गुणवत्तेवर एकूण संख्येपैकी किती टक्के मुलांना प्रवेश मिळणं शक्य आहे? अधिकारी होऊन होऊन किती होऊ शकतात? म्हणूनच शिक्षण घेणाऱ्या मुलांची संख्या याशी जोडून पाहिल्यावर लोकप्रिय कोर्सेसला मुकलेल्या मुलांना काय झेलावं लागत असेल याचा अंदाज बांधता येतो. मुलभूत विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रात आम्ही भरपूर मार खातो वगैरे आशा चर्चा होत राहतात. यासाठी वातावरण, सुविधा आणि आवश्यक पैसा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कोणाची? याचा विचार करायला कोणाला सवड आहे कोणाकडे?

करिअरचे भूत पालकांच्या मानगुटीवर बसले आहे. ते उतरायला तयार नाहीये. शिकणाऱ्या मुलांच्या मनावर पिअर्सचे मोठे प्रेशर असते. अभ्यास केलाच पाहिजे, त्या कठोर शिस्तीतल्या परीक्षा दिल्याच पाहिजेत, चांगले मार्क्स/ग्रेडस मिळवलेच पाहिजेत. मगच नोकरी मिळण्याची शक्यता असते. असे झाले तरच आयुष्याची इतिकर्तव्यता होते! यातून होतंय असं की, आपल्या देशातील आजचं तरुण मनं अभ्यासाच्या मोठ्या ओझ्याखाली दबलेली दिसताहेत. मनातल्या मनात चरफडताहेत. ‘सांगता येत नाही आणि सहनही होत नाही’, अशी त्यांची दारुण मनोवस्था आहे.

मुग्धा म्हणाली “बारावी सायन्सला फक्त केमिस्ट्रीचं पाचशे पेजेसचं पुस्तक आहे. हजारो वर्षांत फिजिक्समध्ये जे काही घडलेय, शोध लागलेत, ते आख्खं कंटेंट कंसेप्टसह आम्ही पोरांनी फक्त दोन वर्षांत कसे काय अभ्यासायचे? शिकवणारे शिक्षकही नीट समजून सांगण्याचे स्किल्स असलेले मिळतीलच असे नाही. अनेक प्राध्यापकांनाच कंसेप्टस क्लिअर आहेत का, असा प्रश्न अनेकदा पडतो. त्यांना पोर्शन कंप्लिट करायचा असतो, बस्स. कधी लॅबमध्ये नीट प्रॅक्टिकल धड होत नाही. शिकवलेले मुलांना समजतेय की नाही? याचा विचार फारसा होत नाही. यात आम्हा मुलांच्या डोक्याचा पार भुगा होतो. पण आमची कोणाला काहीच पडलेली नाहीये. न्यूटन जन्माला आला नसता तर बरे झाले असते असे वाटते कधी कधी..!"

आपल्याकडे बारावीनंतरच्या वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांवर मुलांचे ‘भविष्य’ ठरते. बारावीनंतरच्या JEE mains आणि advance याशिवाय अभियांत्रिकी प्रवेशासाठीची सीईटी, वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठीची ‘नीट’ याशिवाय अन्य चांगल्या शैक्षणिक संस्था/महाविद्यालयांत प्रवेश मिळवण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या प्रवेश परीक्षा वेगळ्या. या निरनिराळ्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सध्याच्या शिक्षणाला समांतर अशी बाजारू शिक्षण व्यवस्था उभी राहिलीय. यात मुलांचे मानसिक, भावनिक, बौद्धिक, शारीरिक आणि पालकांचं आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणावर सुरू असतं. काही लाख रुपये ओतले. मुलांना एकदा तिकडे घातले की, आपल्या मुलांचे करिअर बनून जाईल, अशी पालकांची अपेक्षा असते. यामुळे झालेय असे की, शहरांतील कनिष्ठ महाविद्यालये जवळजवळ ओस पडलेली दिसताहेत. या प्रकारच्या परीक्षांची तयारी करून घेणारे गल्लाभरू कोचिंग क्लासेस सध्या जोरात सुरू आहेत. त्यातल्या काहींचा वर्षाचा टर्न ओव्हर पाचशे ते हजार कोटींच्या घरात आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणांवर प्रभाव टाकण्यापर्यंत यांची मजल गेली आहे! या इथल्या व्यवस्थेने मुलांना आणि पालकांनाही शब्दशः वेठीला धरले आहे.

“एखाद्या विषयात/शाखेत आवड असणं निराळं आणि त्या कोर्सला अॅडमिशन मिळवायला सीईटीसारखी अत्यंत टफ अशी एखादी इंट्रास एक्झाम क्रॅक करावी लागणं वेगळं. खरे तर ते एक टेक्निक असतं. काही मुलांना ते साधतं, स्मरणात ठेवून उत्तर लिहिता येते. काही मुलांची अक्षरशः वाट लागते. विषयातील आवड कोणच विचारत नाही. अशा वेळी खूप चिडचिड होते. त्रास होतो. पण आमचं ऐकतंय कोण." शुभम सांगत होता...

"मला चौथीपर्यंत शाळा शिकायला आवडायचं, पुढे शिकताना मी आनंदानं कधी शाळा/कॉलेजात गेली नाही!"
मनस्वीनी सांगते.

मुलांच्या मौनातला आकांत खरेच शिक्षक-पालकांना ऐकू येईनासा का झालाय ?  आपली कॉलेजेस, विद्यालयं भयालंय तर झालेली नाहीयेत ना? मुलांशी बोलताना प्रश्न पडतो आणि आता याचा गंभीर विचार करायची वेळ आता आलीये.

“आठवीपासून JEEची तयारी करणारा एक मुलगा या सगळ्यातून जाताना अपयश पदरी पडल्याने खूपच डिप्रेशनमध्ये गेला. पुढची दोन वर्षे तो मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार घेत होता...” धनेश सांगत होता.

राज्यस्थानातील कोट्यामध्ये या प्रकारच्या प्रवेश परीक्षांची तयारी करण्यासाठी गेलेल्या मुलांना अभ्यासाचे दडपण आणि कथित अपयशाने पछाडले आहे. तिकडे आत्महत्या वाढत आहेत. २०१५मध्ये १९ तर २०१६ मध्ये चार महिन्यांत पाच विद्यार्थ्यांनी आपली इहलोकीची जीवनयात्रा संपवलीये. या परिस्थितीमुळे अस्वस्थ झालेल्या रविकुमार सुरपूर या कोट्याच्या कलेक्टर महोदयांनी तिथं कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या तब्बल दीड लाख पालकांना आणि क्लास चालकांना भावनिक आवाहन करणारे पत्र अलीकडेच लिहिलेय.

‘अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रं वगळून इतर क्षेत्रं निवडण्याचा सल्ला त्यांनी मुलांना-पालकांना दिला आहे. जीवन खूप सुंदर आहे, आयुष्यात परीक्षा हेच सर्वस्व नाही!’ असेही त्यांनी सांगितले आहे. प्रशासनाला अशाप्रकारची दखल घ्यावी लागणं म्हणजे ही एका अर्थाने ‘शैक्षणिक आणीबाणी’ नाहीतर काय आहे? परीक्षेला बसलेल्यांपैकी किती टक्के मुलांना अशा परीक्षांतून प्रवेश मिळतो, याचा विचार ना पालक करतात. ना त्याचे इथल्या धुरिणांना किंवा व्यवस्थेला काही घेणे देणे आहे.

एक अभ्यास असं सांगतो की भारतातले सुमारे पाच लाख मुलं JEE मेन्स ही प्रवेश परीक्षा देतात. त्यातले दहा हजार मुलं निवडले जातात, तेव्हा चार लाख ९० हजार मुलं ऑलरेडी बाहेर फेकले गेलेले असतात. राज्यातल्या २६ हजार कनिष्ठ महाविद्यालयांतून शिकणारी मुलं संख्येने किती आहेत आणि त्यांच्यासाठी एमबीबीएसच्या राज्यात सर्व मिळून जागा आहेत त्या २५ हजार! या रॅट रेसमध्ये मुलं स्वतःही सहभागी होतात, पण जास्तकरुन पालक ढकलतात! उसाचं टिपरु चरकात घातल्यावर त्याचं जसं चिपाड होतं तसं मुलांचं होताना दिसतं, हळहळ व्यक्त करण्यापलीकडे आपल्या हातात काहीच नाही का?

मुलं ज्या घरातली आहे, तेच लोकं बघून घेतील, असा आपला त्रयस्थ दृष्टीकोन असतो. मुलं म्हणजे आपली राष्ट्रीय संपत्ती आहे, या देशाचं भविष्य आहे, त्यांना चांगल्या प्रकारे वाढवणे ही आपली सामुहिक जबाबदारी आहे, असं आपल्याकडे मानलंच जात नाही. म्हणूनच जेव्हा जेव्हा मुलांना काही विचित्र प्रकारच्या निर्णयांमुळे त्रासाला सामोरे जावे लागते तेव्हा, आपली सबंध व्यवस्था याबाबत फारशी संवेदनशील नसल्याचा अनुभव वारंवार येत राहतो. अनेकदा तर केंद्र आणि राज्य सरकारं एकमेकांकडे बोट दाखवत राहतात. तेव्हा खूप चीड, अस्वस्थता येते, वाईट वाटते. ‘तरुण आपल्या देशाचे बलस्थान आहेत,’ अशा बाता आपले कारभारी भाषणांतून मारतात. कृतीचा दुष्काळ मुलांसाठी अक्षरशः जीवघेणा ठरतो. हे तरुण मन जर असे पोखरले गेलेले असेल, तर त्यांनी भविष्यात देशासाठी काहीतरी भव्यदिव्य करून दाखवावे, अशी अपेक्षा तरी कशी ठेवावी?

जीवनात सहजासहजी कोणाला काहीही मिळत नाही, हे खरेच आहे. आयुष्य अनपेक्षित घटितांनी भरलेले आहे. आयुष्याला सामोरे जाण्याची, संघर्ष करायची मुलांची तयारी असली पाहिजे. यात अजिबात दुमत नाही. मुलांनी आपला अभ्यास केला पाहिजे, परीक्षा दिल्याच पाहिजेत, मार्क्स/ग्रेडस मिळवलेच पाहिजे. नोकरी, उद्योग, व्यवसाय काहीतरी करुन जगायपुरते पैसे कमावलेच पाहिजेत, हे खरेय. पण त्यासाठी असा जुगार का खेळायला लागावा? इतकी जबर किंमत का मोजायला लागावी? आपले आयुष्य डावाला लावायला लागणे, ही म्हणजे एकूण शिक्षण व्यवस्थेला लांच्छन आणणारी शर्मनाक गोष्ट आहे.

ज्या मुलांची स्मरणशक्ती उत्तम असते, त्या ‘हुशार’ मुलांनाही परीक्षा नावाच्या कठोर व्यवस्थेची इतकी भीती का वाटावी? कारण अनिश्चितता आणि असुरक्षितता हीच जणू आपल्या देशातील शिक्षण व्यवस्थेने मुलांसाठी दिलेली ‘देण’ आहे. त्या भोवऱ्यात मुलं गोलगोल फिरत राहतात. अनेक मुलांच्या नाकातोंडात पाणी शिरून ते गटांगळ्या खात राहतात. आम्ही काठावर बसून ‘मला काय त्याचे’, म्हणत शांतपणे बघत असतो.

बरं आपल्याकडे JEE, NEET यासारख्या प्रवेश परीक्षा द्यायला केवळ दोन संधी दिलेल्या आहेत. त्यात दुसरी संधी घेतली की आधीचे मिळालेले मार्क्स पुसून जातात. अमेरिकेसारख्या प्रगत देशांत SAT, ACT यांसारख्या प्रवेश परीक्षा द्यायला विद्यार्थ्यांना सहा वेळा संधी दिली जातेच. शिवाय आधीच्या दिलेल्या परीक्षेतले तुलनेनं जे जास्त मार्क्स मिळालेत ते तिकडे ग्राह्य धरले जातात. गणित आणि भाषेची मुलभूत क्षमता तपासण्यासाठी आधी युरोपियन देशांत घेतली जाणारी PISA ही परीक्षा आता जगभरातल्या बऱ्याच देशांत घेतली जाते. जगभर नावाजलेल्या या परीक्षेत फिनलंड हा लहान देश जगभरात आघाडीवर आहे. या परीक्षेची तयारी करून घेताना फिनलंडमध्ये मुलांमागे ‘स्ट्रॉँग सपोर्ट सिस्टीम’ उभी केली जाते. आपल्याकडे अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करणे अवघड नाहीये. पण गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची! मुलांना समजून घेण्याची आणि त्यांच्या संवेदनशील मनाला आणि मेंदूला जपण्याचीही...

‘दुःख परीक्षा असण्याचं नाहीये. परीक्षा जरूर असाव्यात. वैताग त्यात नावीन्य नसल्याचा आहे. इतक्या मास स्केलवर मुलांचे मूल्यमापन करायला असे काहीतरी टूल लागणारच. आक्षेप त्याच्या स्वरूपावर आहेत. आपला अभ्यासक्रमही application based असायला हवा. रिसर्चसाठी पोषक वातावरणाची गरज आहे. थिअरीसोबतच प्रॅक्टीकल्सचं, प्रोजेक्ट्सचं महत्त्व वाढायला हवं. पण हा फक्त चर्चेचा विषय म्हणून काही काळ टिकतो, पुढे काय होतं आपल्याला माहितीच आहे!’ मुंबई विद्यापीठात शिकणारी अश्विनी सांगत होती...

अमुक इतके मार्क्स मिळाले म्हणजे अमुक कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल? कोणत्या प्रकारचं शिक्षण घेतलं म्हणजे छानपैकी करिअर होईल? याविषयी मुलं आणि पालक यांच्यात प्रचंड संभ्रम आहे. या संभ्रमाची कडू गोड फळे (इच्छा असो अगर नसो!) मुलांना चाखावीच लागतात. बरं एक गंमत म्हणजे इतके सारे शिकायचेय ते तरी कशासाठी? तर दूर देशात किंवा मोठ्या बहुराष्ट्रीय  कंपनीत मोठे पॅकेज देणारी नोकरी मिळावी यासाठी! जे शिकल्यावर नोकरी मिळते तितकेच शिकायचे असते! (कारण हा देश/समाज नोकरदारांचा आहे, हे ब्रिटिशांनी आधीच आपल्या समाजमनावर पक्के बिंबवलेय.) पैसा मोठा झालाय. आपण त्या दुष्टचक्रात फसलोत. फार मार्क्स नसले तरी तुम्ही आयुष्यात छान काही करु शकता, थोडे कमी पैसे मिळाले तरी मस्त आनंदात जगू शकता, हा विश्वास आपण मुलांना द्यायला हवा. पुढच्या काळात ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत त्यांचे नव्हे तर ज्यांचे आरोग्य चांगले असेल ते 'श्रीमंत' असतील, हे पण मनावर ठसवावे लागेल. मुख्य म्हणजे पालकांनी हे ठरवायला हवे की, आपल्याला कोणासोबत जगायचेय? मुलांनी आधी कमावलेल्या गुणांबरोबर आणि नंतर कमावलेल्या पैशांबरोबर की मुलांसोबत?

शेवटी असे आहे की, आपली मुलं शिकत असताना ‘मार्क्स मशीन्स’ आणि कमावती होतात तेव्हा ‘मनी मशीन्स’ नसतात.... एकदा पैसे आले की, मग पुढे तेच पाश्चिमात्यांचे आंधळे अनुकरण सुरू होते. महागड्या गाड्या, ब्रँडेड कपडे, ते चंगळवादी पर्यटन, त्या लखलखीत्या चंदेरी दुनियेत जगणं. पुढे जाऊन आयुष्याच्या एका टप्प्यावर यातला फोलपणा लक्षात येतो. ताणतणाव, आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले असतात. तेव्हा बराच उशीर झालेला असतो, तेव्हा पश्चाताप करणं, दु:खी होणं, माघारी फिरणं...  (म्हणजे याला अपवाद असू शकतील.) मग स्वभाविकच करिअर म्हणजे काय, असा प्रश्न पडतोच. तिकडे दूर अमेरिकेत आर्थिक मंदी येते त्यांचे परिणाम इथल्या मुलांच्या करिअरवर आणि एकूण अर्थकारणावर होत राहतात.

वास्तविक कोणतीही व्यक्ती जेव्हा आवडीच्या क्षेत्रात काम करते. तेव्हा ती आपल्यातले जे बेस्ट आहे ते त्यात ओतत असते. पण आपल्याकडे असे आहे की अनेकांचा आवडीचा विषय एक असतो आणि उत्पन्नाचा विषय भलताच! यातून एकूण समाजातल्या बौद्धिक वैभवालाच ग्लानी येण्याची शक्यता असते. यामुळं आपल्या ज्ञान परंपरेचेही मोठे नुकसान झालेय. मान्य आहे की, ज्ञान मिळवण्यासाठी शिकणे, ही वंचित घटकांतील अनेक कुटुंबांतल्या मुलांसाठी 'चंगळ' असू शकेल! जागतिकीकरणासोबत आलेल्या बाजारव्यवस्थेचे आपत्य असलेला हा करिअरवाद सगळीकडे बोकाळलाय. बाजार माणसाला माणूस म्हणून ओळखतच नाही. वस्तू खरेदी करणारा ‘ग्राहक’ म्हणून ओळखतो. त्याचे केवळ आर्थिक नाही तर सामाजिक परिणामही झाले आहेत.

आपली प्राचीन कोणती ती 'ज्ञान परंपरा' वैभवशाली होती, असे खुपदा सांगितले जाते, हे म्हणणे ठीक. पण हा इतिहास ती किती दिवस उगाळत बसायचा? वर्तमानात तुम्ही काय करत आहात, त्यातून नवा इतिहास रचला जातो, याचे भान ठेवायला नको? आणि आपले वर्तमान अस्वस्थ करणारे आहे, हे निश्चित.

सिलिकॉन व्हॅलीमध्ये बहूतेक भारतीय अभियंते आणि तंत्रज्ञ काम करतात, त्यांना अमुक इतके पॅकेज मिळते वगैरे वगैरे... या गोष्टींचा वृथा अभिमान काय बाळगायचा? कारण त्यांच्या शिक्षणावर इथल्या सरकारने, समाजाने खर्च केलाय. ते तिकडच्या देशात जाऊन कुठल्यातरी कंपनीचा नफा वाढवायला हातभार लावत आहेत! त्यांचे ज्ञान, कौशल्य या देशाला विकासाकडे नेण्यासाठी उपयोगी पडायला हवे. मात्र तसे होत नाहीये.

मुलभूत विज्ञान संशोधनात तर आनंदी आनंद आहे. सरकार याविषयी गंभीर कधी होणार, हा अनुत्तरीत प्रश्न आहे. नोबेल पारितोषिके मिळालेल्या शास्रज्ञांमध्ये किती भारतीय संशोधकांची नावं आहेत? जागतिक कीर्तीचे कलावंत, ऑलिंपिकमध्ये पदके जिंकलेले खेळाडू, लेखक-साहित्यिक, उद्योग-व्यापारात नाव कमावलेले लोकं किती आहेत? याचे कारण आमच्याकडे गुणवत्ता असलेली मुलं अल्पसंतुष्ट किंवा स्वार्थी तरी आहेत. नाहीतर त्यांची बौद्धिक झेपच तितकीशी मोठी नाही! म्हणूनच आपल्याकडे ज्याला गुणवत्ता म्हणतात त्याचाच नीट विचार व्हायला हवा. कोणी याला मोघम विधानही म्हणेल. पण जे चित्र दिसते, त्याचे विश्लेषण करू जाता हेच वास्तव समोर उभे ठाकते. याविषयी कधी तरी बोलायला हवे. कारण शोधांनी, संशोधनाने जग बदलते. याकडे डोळेझाक करता कामा नये. ती आपणच आपली केलेली फसवणूक होईल.

करिअर म्हणजे काय तर आधी म्हटल्याप्रमाणे दूर शहरात किंवा परदेशात जाऊन नोकरी करणे आणि पैसे कमावणे, अशी आपली ठाम समजूत आहे. आजही हा देश खेड्यांचा आहे, याचे भानच उरलेले नसल्याने शहरांकडे बेकारांचे लोंढेच्या लोंढे जाताना दिसत आहेत. तिकडं नीट काम मिळत नसल्यानं शहरांवरील भार आणि बकालीकरण वाढत आहे. नागरी सोयी-सुविधांवर भलता ताण येत आहे. या तरुणांच्या हाताला हाताला काम मिळाले असते तर स्थलांतर रोखणे शक्य होऊ शकतं. याशिवाय ग्रामीण विकासाला हातभार लागेल. शेतीतील अन्न धान्य आणि इतर जीवनावश्यक उत्पादनं सर्वांना हवी असतात. ती उत्पादित कोणी करायची? आज शेती करायला तरुण धजावत नाहीत. कारण हातानं काम करणारे लोकं आम्ही हलकट लेखतो. डोक्यानं काम करणारे लोकं सर्वच अर्थानं श्रेष्ठ असल्याचं आपली व्यवस्था मनावर बिंबवत राहाते. आपल्या मूल्य व्यवस्थेच्या मोजपट्ट्याही तसंच अधोरेखित करत असतात. प्रतिष्ठा कोणाला, कशाला द्यायची याचा विचार करताना आपल्या एकूण मूल्यव्यवस्थेला देखील काही प्रश्न विचारावे लागतील.

वास्तविक आपल्या गावाची गरज ओळखून अनेक सेवा, उद्योगांच्या वाढीला, विस्ताराला आज मोठा वाव आहे. बँकांचे कर्ज उपलब्ध आहेत. पण अशा गोष्टी करायला आम्ही मुलांचं मानस घडवलं कुठंय? एकीकडे उद्योगांना, सेवा क्षेत्राला कुशल मनुष्यबळ मिळत नाहीये आणि दुसरीकडे तरुणांच्या हाताला काम नाहीये, अशा विचित्र कोंडीत आपण सापडलो आहोत. यासाठी करिअरच्या नव्या वाटा धुंडाळण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करावे लागेल. करिअर या कंसेप्टकडे व्यापक अर्थाने बघायला मुलांना शिकवावं लागेल.

आज समाजाला उपयोगी पडेल, असे संशोधन करणे किंवा तत्सम काहीतरी सामाजिक स्वरूपाचं काम करणे या गोष्टीला कथित यशस्वी करिअरमध्ये जागाच नाहीये. करिअरीस्टीक मुलं परीक्षार्थी बनून जगतात. अभ्यास एके अभ्यास करताना झापडबंद नजरेने आयुष्याकडे, समाजाकडे बघत असतात. अशा अनेक मुलांचं एकूण व्यक्तिमत्त्व सुमार दर्जाचे असल्याचे दिसते.

शेवटी असे आहे की, भरपूर पैसा मिळवून देणाऱ्या नोकऱ्यांतून वैयक्तिक कुटुंबाचा उत्कर्ष जरूर होऊ शकेल. पण ज्या देशाने/समाजाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च केलेला असतो त्या ऋणातून उतराई होण्यासाठी समाजोपयोगी गोष्टी करायचा प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवाये. आज तो होताना दिसत नाहीये, याचा खेद वाटतो. नोबेल पारितोषिक विजेते ख्यातनाम अर्थशास्रज्ञ अमर्त्य सेन म्हणतात की, ‘आपल्याकडील ज्ञान, कौशल्य आपल्या अवतीभोवतीच्या समाजाच्या उन्नयनासाठी, उत्थापनासाठी उपयोगी पडत नसेल तर ते कुचकामी ठरेल.”

*भाऊसाहेब चासकर,*
९४२२८५५१५१.
bhauchaskar@gmail.com
(लेखक जिल्हा परिषदेच्या शाळेत सहायक शिक्षक असून, शिक्षण क्षेत्रातील  कार्यकर्ते आहेत.)

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...