॥ स्व ॥
"एक मूर्तिकार फार थोर कलावंत म्हणून विख्यात होता.
त्याने बनवलेल्या मूर्ती इतक्या हुबेहूब असत की पाहणारा चक्रावून जात असेल.
त्याच्या हातून साकारलेली मूर्ती आणि ज्याची मूर्ती बनवली तो माणूस एकमेकांशेजारी उभे केले आणि त्या माणसाने श्वास रोखून धरला,
तर मूर्ती कोणती आणि माणूस कोणता, हे सांगणं कठीण व्हायचं.
हळुहळू मूर्तिकार म्हातारा झाला. मरणाच्या चाहुलीने त्याच्या मनात
काहूर उठलं. आता लवकरच आपला मृत्यू निश्चित आहे, म्हटल्यावर
त्याच्या मनात मृत्यूला चकवण्याचा विचार सुरू झाला. त्यासाठी त्याने
आपल्या हातातली कलाच वापरण्याचा निर्णय केला. हुबेहूब दिसणाऱ्या
आपल्या ११ मूर्ती त्याने तयार केल्या.
आता त्याच्या मृत्यूची रात्र आली. आज मृत्यू आपल्यावर घाला घालायला
येणार, याची त्याला खात्री होती. त्याने दालनात सगळ्या मूर्ती उभ्या केल्या
आणि त्यांच्यातच जाऊन उभा राहिला.
मृत्यूचा दूत दालनात आला आणि एकाच्या जागी १२ मूर्तिकार पाहून
चक्रावून गेला. यात मूर्ती कोणती आणि माणूस कोणता, हे त्याला
कळेना. तो परतून यमराजांकडे गेला. झालेली पंचाईत त्यांना सांगितली.
यमराज हसून म्हणाले, उद्या रात्री पुन्हा जा. त्याला कसा बाहेर आणायचा,
ते मी सांगतो.
दुसऱ्या दिवशी मृत्युदूत पुन्हा त्या दालनात गेला. पुन्हा अगदी हुबेहूब
एकमेकांसारख्या दिसणाऱ्या १२ मूर्ती पाहून चक्रावला. मात्र, तो थबकून
म्हणाला, अहाहा, काय सुंदर कारागिरी! कोणीही या कलेला दादच देईल.
फक्त एक चूक सोडली तर...
कोणती चूक, समोरून प्रश्न आला.
मृत्यूचा दूत मूर्तिकाराचा हात हातात घेऊन म्हणाला,
हीच ती चूक...
तुला स्वत:चा विसर पडू शकला नाही.
ज्याचा स्व जिवंत आहे, त्याचा मृत्यू अटळ आहे."

No comments:
Post a Comment