Pages

Sunday, September 18, 2016

द्वेष

द्वेष

‘भावना’ या मानवाला ‘माणूस’ म्हणून ओळख बहाल करतात. इतके त्यांचे अस्तित्व महत्त्वाचे आहे

डॉ. केतकी गद्रे | September 18, 2016 1:01 AM



‘भावना’ या मानवाला ‘माणूस’ म्हणून ओळख बहाल करतात. इतके त्यांचे अस्तित्व महत्त्वाचे आहे; किंबहुना अनिवार्यच! कल्पनाविलासात रमलो की आपल्यातील बहुतांश लोकांना असेच वाटते की, मानवी जीवन हे प्रेम, करुणा, आनंद, उत्साह, विश्वास, आशा, कृतज्ञता या व अशा सकारात्मक भावनांनी भरलेलं असावं. या सकारात्मक भावनांमुळे किंवा तीव्रतेमुळे कदाचित आपण नकारात्मक भावनांचा स्वीकार करण्यास अधिक कचरतो, भितो. भीती हीसुद्धा एक ‘भावना’च आहे, परंतु अशीही एक भावना आहे जिला सगळेजण घाबरतात. ती म्हणजे ‘द्वेष’. फारसे न रुचणारे- नावडते-  न पटणारे- तिरस्कारास पात्र ठरणारे- दुस्वास  आणि अखेर द्वेष.. हे द्वेषापर्यंत पोहोचतानाचे काही टप्पे. पण बऱ्याचदा या टप्प्यांची जाणीव न होता, त्यांना थारा न देता, द्वेषाची ही सौम्य रुपांकडे लक्ष न देता आपण द्वेषयात्रेस निघतो. परंतु हाच द्वेष जेव्हा एखाद्या अन्याय, अत्याचार किंवा शोषणासंबंधी दर्शवला जातो, तेव्हा द्वेष सकारात्मक रूप धारण करतो. म्हणण्याचा अर्थ असा की, उदाहरणार्थ- ‘I hate a particular person, caste, religion’ (म्हणजे मी एखाद्या व्यक्तीचा, धर्माचा, पंथाचा, जातीचा द्वेष करतो) हे म्हणणे जसे तीक्ष्ण, घातक आणि ऐकण्यास,अनुभवण्यास नकोसे वाटणारेतसेच, ‘I hate unjust, abusive tendencies’ (अन्याय आणि शोषण करणाऱ्या प्रवृत्तींविषयी मला द्वेष वाटतो) याचे समर्थन होऊ शकते. द्वेषाची ही भावना इतरांप्रति किंवा स्वत:प्रति प्रदर्शित होऊ शकते. यात इतरांप्रति, स्वत:प्रति, एखाद्या गोष्टीप्रति, कल्पना -संकल्पनेविषयी किंवा एखाद्या विशिष्ट वर्तनाविषयी एक प्रकारची तीव्र, खोलवर रुजलेली, टोकाची अप्रीती व घृणा असते. ‘द्वेष’ हा बऱ्याचदा ‘राग’, ‘हिंसा’, ‘तिटकारा’, ‘किळस’ अशा भावना- वर्तनांशी संबंधित असतो. ‘द्वेष’ ही भावना अनेकांमध्ये दीर्घकाळ रुजणारी असल्याकारणाने मानसोपचारतज्ज्ञांच्या अंदाजानुसार, ती एका घटकेची भावनिक स्थिती नसून, ती एक प्रकारची वृत्ती आहे. ती एक प्रकारची मनोरचना आहे. कदाचित, साध्या ‘नावडी’पासून सुरू झालेल्या  द्वेषाच्या या प्रवासाला स्वैररीत्या वाढू दिल्याने, त्याला खतपाणी घातल्याने, वेळीच आळा न घातल्यान त्याचे रानटी रोपटे आपले भाव-वर्तनाचे विश्व व्यापून टाकत असावे. इतकंच नव्हे, तर मेंदूच्या चाचण्यांमधून नावडत्या व्यक्तींचे चेहरे पाहून होणारी मेंदूची हालचाल अभ्यासली गेली, तेव्हा मेंदूतील काही विशिष्ट स्थानं कार्यरत असल्याचे लक्षात आले. द्वेष हे ‘गुन्हा’ करण्यामागचं एक मोठं कारण समजलं जातं. बऱ्याचदा ‘आपण’ आणि ‘ते’/ ‘इतर’ असे विभाजन झाले की एकमेकांविषयी असहिष्णुता निर्माण होण्याचा संभव असतो. म्हणजे ‘आपण’, ‘आपल्यातील लोक’, ‘आपल्या’ लोकांचे मत, म्हणणे, मूल्य, दृष्टिकोन हे आपल्याला आपलेसे व श्रेष्ठ वाटतात. ज्या क्षणी ‘ते’, ‘त्यांचे’ लोक, ‘त्या’ लोकांचे मत, म्हणणे, मूल्य, दृष्टिकोन अशी विभागणी झाली की एक अदृश्य भिंत तयार होताना दिसते. विभाजन टिकवून ठेवणारी, भेदभावाचा पुरस्कार करणारी ही विशाल भिंत म्हणजेच आपण आपल्या मानलेल्या लोकांसारखा जो नाही, जो भिन्न आहे, तो द्वेषास पात्र  आहे असे मानणे. याचे मुख्य कारण म्हणजे, ही भिन्नता विविधतेच्या दुर्बिणीतून न पाहता उच्च-नीच या मापदंडातून पाहिली जाते. परिणामी विविधता स्वीकारण्यात आपण असमर्थ ठरतो, हे कटू सत्य आहे. म्हणजे प्रथम एखाद्या व्यक्तीबद्दल ‘ऐकिवातल्या’ मताप्रमाणे ग्रह करून घेणे, तो ग्रह ग्रा आहे हा ठाम विश्वास असणे; तसेच त्या ग्रहाला बळ देणारी बाजू उचलून धरणे आणि ग्रहाला छेद देणारी बाब दुर्लक्षित करणे- ही प्रक्रिया वारंवार करत राहणे. तसेच काही काळाने आपोआप (सवयीमुळे) घडणे आणि (नकारात्मक) ग्रह पक्का होत जाणे आणि कालांतराने अशीच वर्तनशैली बनणे ही विचारांची साखळी द्वेष वाटण्याच्या, वाटत राहण्याच्या संदर्भात आपला कार्यभाग जबाबदारीने सांभाळते. मग अशा व्यक्तीने केलेली वक्तव्ये, घेतलेल्या भूमिका, मांडलेली मतं, धरलेले आग्रह हे किती तीव्र, नकारात्मक असतील, याचा आपल्याला सहज अंदाज बांधता येईल. अशी  व्यक्ती जर ही मानसिकता समाजात रुजवू लागली तर  नातेसंबंध, त्यातील विश्वास, त्यातील सहिष्णुता, त्यातील स्वातंत्र्य यांची राखरांगोळी आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. ही जबाबदारी निष्ठेने पार पाडणारे, दुफळी निर्माण करून वातावरण धगधगतं ठेवू पाहणारे, थोडक्यात द्वेषाचे पुरस्कर्ते आपल्या आजूबाजूस बरेच पाहायला मिळतात. लोक त्यांच्या आहारीही जाताना दिसतात. कधी दबावामुळे, कधी सक्तीने, कधी स्वेच्छेने, कधी समविचाराने, तर कधी अजाणतेपणाने, अविवेकामुळे तर कधी निव्वळ मूर्खपणामुळे द्वेष ही भावना मानवाला स्वस्थ बसू देत नाही. ही भावना मग मनाचे स्थैर्य हिरावून नेते. द्वेष म्हणजे आदराचा अभाव. द्वेष भावना मनात जपणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या चुकांच्या प्रतीक्षेत असते. द्वेषभावनेच्या अंमलामुळे कोणावरही विश्वास ठेवणे अशा व्यक्तींना जड जाते. आणि त्यामुळे नातेसंबंधांच्या यशाबाबतीत यांची पाटी कोरीच राहते. ‘‘कोणाचाही द्वेष करू नये’’ हे या सर्वावरचं स्वाभाविक आणि सोपं उत्तर नाही का? पण म्हणणं जितकं सोपं, आचरणात आणणं तितकंच कठीण असतं.

धर्मग्रंथांनी द्वेष या भावनेला तुच्छ मानलं आहे हे सर्वश्रुत आहे. परंतु ‘धर्म’ जाणणाऱ्या, जोपासणाऱ्या तथाकथित व्यक्तींना या बोधाचा नेमका विसर पडताना दिसला की नवल वाटतं. परंतु हेही खरं की, आपल्या मनाशी ठरवून जोपासलेला सहेतुक द्वेष, कोणाच्यातरी चिथावणीमुळे उत्पन्न झालेली द्वेषाची भावना याला आळा घालणे, हे स्वाभाविक उत्पन्न होणाऱ्या द्वेषाच्या भावनेपेक्षा कठीण आहे. म्हणजे झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करणं हे गाढ झोपलेल्यापेक्षा कठीण, तसंच द्वेष या भावनेविषयी आहे. कोणाचाही द्वेष करू नका, हा विचार स्तुत्य आहे, परंतु ते एक ध्येय म्हणून गाठणे तितकेच कठीण आहे. हे ध्येय गाठणे मोठय़ा धैर्याचे काम आहे. परंतु हे ध्येय  जो गाठतो तो आपले जीवन प्रफुल्लित करण्याची क्षमता स्वत:मध्ये बाळगतो. हे ध्येय गाठण्याची प्रक्रिया वरकरणी कॉमन सेन्सची गोष्ट वाटेल. आहेसुद्धा.  पण ती, ते ध्येय गाठण्याचे टप्पे व्यक्तिमत्त्वावर आणि समाजावर दीर्घकालीन परिणाम करणारे आहेत.

सुरुवात द्वेष-केंद्र ओळखण्यापासून करू या. म्हणजे आपली ही भावना कोणत्या गोष्टीमुळे, व्यक्तीमुळे, घटनेमुळे, परिस्थितीमुळे, काय घडले वा न घडल्यामुळे उत्पन्न होते, याचा अंदाज घेऊ या. यांचे वर्गीकरण करू या. म्हणजे आधी चर्चिल्याप्रमाणे भावनिक तीव्रता लक्षात ठेवून मग वर्गीकरण करू या. उदा. एखादी गोष्ट मला रुचत नाही की आवडत नाही, एखाद्या गोष्टीचा तिरस्कार वाटतो.. म्हणजे दुस्वास की द्वेष वाटतो याची वर्गवारी केल्यास (विचारपूर्वक आणि प्रामाणिकपणे, प्रगल्भतेने केल्यास) द्वेषाची केंद्रे लक्षात येतील. हे वर्गीकरण महत्त्वाचं, कारण त्या तीव्रतेच्या अमलाप्रमाणेच त्याची उपचारपद्धती ठरते. यानंतर द्वेषाची भावना निर्माण होण्यामागचे नेमके कारण शोधावे. हे कारण काही ऐकिवातल्या तर काही प्रत्यक्षातल्या अनुभवांत दडलेले आहे का ते पाहावे. द्वेषभावना अभंग राखल्याने, मला स्वत:ला, आजूबाजूच्या व्यक्तींना, कुटुंबाला, समाजाला काय प्रकारच्या आव्हानांना, परिणामांना तोंड द्यावे लागत आहे? ही भावना जोपासून माझा (वरकरणी) फायदा झाला असला, तरी मी त्याला खऱ्याअर्थी फायदा म्हणू शकेन का? लाभ घेण्याच्या अट्टहासात एकीकडे काय गमावलं याचाही आलेख मांडलेला बरा. हा पारदर्शक आलेखच पुढे निर्माण होणाऱ्या (संभाव्य) द्वेषाच्या भावनेला उत्तेजन देण्यापूर्वी आपल्यापुढे, फी िर्रॠल्लं’ च्या  रूपात उभा राहील. या प्रक्रियेत, या प्रक्रियेवर अविश्वास असणाऱ्या व्यक्ती आपले पाय खेचतील, आपल्या पूर्वीच्या वचनांचा.. तथाकथित सिद्धान्तांचा, समूह-निष्ठेचा वगैरे दाखला देतील. याने आपण विचलित होऊ शकू. परंतु हे कायम लक्षात ठेवा की, आपल्या मानसिकतेचे नियंत्रण हे (जवळजवळ) नेहमी / बऱ्याचदा आपल्या अखत्यारीत असू  शकते आणि इतरांचा त्यावर प्रभाव व्हावा की न व्हावा, झालाच तर कितपत व्हावा, हे ठरवणे हेही बऱ्याच अंशी आपल्या हातात असते. परंतु आपण वाहवत जातो आणि आपल्या मनाला अंकित ठेवण्याचा हा मोठा अधिकार गमावून बसतो. हे कटाक्षाने टाळू या. या बाबीची सतत उजळणी केल्यास, ही बाब जास्त स्मरणात राहील आणि प्रत्यक्ष वर्तनात उतरेल.

द्वेषाने द्वेषच मिळतो, द्वेष वाढतो, वाढतच जातो, या वणव्याला वेळीच आळा घातला नाही, तर ही आग, आपल्या विचार – आचार – भावनांच्या डोलाऱ्याला राखेचं स्वरूप देण्यास वेळ लागणार नाही. द्वेष करणारी व्यक्ती काही काळ आपल्या आत्मविश्वासपूर्ण शब्द – विचार – वर्तनांनी लोकांना भुरळ घालू शकते. परंतु सुज्ञपणे विचार करणाऱ्या, प्रगल्भ आचार आणि सूक्ष्म दृष्टिकोन जोपासणाऱ्या व्यक्तीला हे अधिक काळ रुचणार नाही. त्यामुळे आता स्वत:ला कोणत्या साच्यात घालायचे आहे हे आपणच ठरवायचे आहे, नाही का? द्वेषभावना जोपासून स्वत:पासून, इतरांपासून दूर जायचे की सशक्त आणि स्वीकाराची मानसिकता बहरवण्याच्या प्रयत्नात राहावं हे वेळीच ठरवू. आपण स्वत:ला समाजाचा महत्त्वाचा घटक म्हणवत असू, तर तो घटक सहिष्णु आणि जबाबदार असणं अपेक्षित आहे- नीतिमत्तेच्या मापदंडांनी आणि सांविधानिकदृष्टय़ासुद्धा! त्यामुळे या सार्थ अपेक्षेस पोषक आणि साजेशा भावनांचा गुच्छ उराशी-दाराशी बाळगलेला बरा!

डॉ. केतकी गद्रे –

Friday, September 16, 2016

उल्कापाषाण

अर्जेटिनातील कॅम्पो डेल सिएलो येथे जगातील आतापर्यंतचा दुसरा मोठा उल्कापाषाण उत्खननात सापडला आहे. वैश्विक कचऱ्याचा तीस टनांचा भार यात समाविष्ट आहे. तो जगातील दुसरा मोठा उल्कापाषाण आहे. विशेष म्हणजे हा उल्कापाषाण अखंड आहे. कॅम्पो डेल सिएलो या ब्युनोस आयर्सच्या उत्तरेला असलेल्या भागात सापडलेला हा उल्कापाषाण मोठा असून, त्यामुळे २६ विवरे तयार झाली आहेत. ४ ते ५ हजार वर्षांपूर्वी हा उल्कापाषाण पडला असावा. त्याची पहिली नोंद स्पॅनिश गव्हर्नरांनी १५७६ मध्ये केली असून, काही लोक लोहखनिज गोळा करीत असताना त्यांना तो त्या वेळी दिसल्याचे सांगण्यात येते. हे लोह आकाशातून पडलेले आहे असे त्यांनी म्हटले होते व स्पॅनिश अधिकाऱ्यांना उल्कापाषाण कोसळला ते ठिकाण दाखवले होते. कॅप्टन डी मिरावेल यांच्या नेतृत्वाखालील मोहिमेत काही लोहयुक्त उल्कापाषाण आणण्यात आले. त्यातील मेसॉन ड फिएरो हा सर्वात मोठा लोहयुक्त उल्कापाषाण होता. भारतीय लोकांना तो सापडला होता व स्पॅनिश लोकांपेक्षा आकाशातून लोह पडते अशी भारतीय लोकांची परंपरागत समजूत होती. या गोष्टी हजारो वर्षांपूर्वीच्या असून, कॅम्पो हा त्यातील मोठा उल्कापाषाण आहे. तेथून काही टन भाग बाहेर काढण्यात यश आले आहे. कॅम्पो डेल सिएलो उल्कांमुळे काही छोटी विवरेही तयार झाली. त्यात ७८ बाय ६५ मीटरचे विवर सर्वात मोठे आहे. १० सप्टेंबरला या उल्कापाषाणाचे उत्खनन करण्यात आले. उल्कापाषाणांचे वजन मोजण्यासाठी काही शास्त्रीय पद्धती आहेत. त्यांची खनिजरचना व कालावधीही सांगता येतो. आतापर्यंत सापडलेला सर्वात मोठा उल्कापाषाण हा होबा नावाचा असून त्याचे वजन ६० टन होते, तर तो नामिबियातील एका शेतात पडला होता. ८० हजार वर्षांपूर्वी तो जेथे पडला तेथेच तो अजून आहे. अ‍ॅस्ट्रॉनॉमी असोसिएशन ऑफ चॅको या संस्थेने अलीकडेच एक मोठा उल्कापाषाण शोधला असून, तो १९६७ मध्ये सापडलेल्या ३७ टनांच्या उल्कापाषाणापेक्षा मोठा आहे. आतापर्यंत दुसरा मोठा उल्कापाषाण कोणता याबाबत वाद आहेत. अर्जेटिनात जगातील तीन मोठय़ा उल्कापाषाणांपैकी दोन आहेत. अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल असोसिएशनचे मॅरिओ वेस्कोनी यांनी सांगितले, की उल्कापाषाणांच्या वजनाची तुलना केली जात असते. आताच्या पाषाणाचे पुन्हा वजन केले जाईल. या उल्कापाषाणाचे वजन प्राथमिक अंदाजापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

Thursday, September 15, 2016

होम स्कूलिंग - शिक्षणाची नवी दिशा

होम स्कूलिंग – शिक्षणाची नवीन दिशा

मुलांचा पहिला वाढदिवस झाला की वेध लागतात शाळेचे ! आजच जग सुद्धा खूप फास्ट आहे, तेव्हा मूल स्मार्ट’च’ असायला हव.अगदी सकाळी सहा ते रात्री दहा – सगळे क्लास लावू आम्ही –त्याला सगळ यायला हव ; अभ्यास,खेळ ,डान्स ,गाण, गेलाबाजार कविता सुद्धा करता यायला हवी – किती विदारक आहे हे ? कधी स्वत:च लहानपण आठवून पाहिलं आहे ?किंवा कधी हा विचार केला आहे का ,की खरोखरच आपण जे शिकलो त्यातलं नक्की किती उपयोगाच आणि किती खर्डेघाशी होती ?
हाच विचार आम्ही केला- आणि ठरवलं मुलीला शाळेतून काढायचं ! शाळा छानच होती ,सगळ्या सुविधा ,लक्ष देणारे शिक्षक , जागतिक दर्जा – पण आम्हाला हवा होता –शिकण्यातला  मोकळेपणा !!
बरेचदा भारताबाहेर फिरताना होम-स्कूलिंग बद्दल ऐकल होत; पण तिथल्यासारखी आपल्याकडे ही पद्धती सर्वमान्य नाही ,तरीही एखाद वर्ष करून तरी बघू म्हणून ,हे शिवधनुष्य उचलल ,इथे ते मोडून चाणार नव्हत- पेलायच होत तोलायचं होत!! त्यातून आम्ही दोघही वर्किंग.तेव्हा पूर्ण विचारांती हा निर्णय घेतला.
शाळा नाही म्हटल्यावर सुरुवातीचा सगळा वेळ टीवी बघण्यात घालवला जाऊ लागला ,पण पंधरा दिवसातच त्याचा कंटाळा ही येऊ लागला ,मग भन्नाट खेळून झाल ,मग टिवल्याबावल्या करून झाल्या –दोनेक महिन्यांनी अभ्यासाला सुरुवात झाली .
पण नेमका अभ्यास करायचा म्हणजे तरी काय ? मग शुद्धलेखन ,पाढे, पुस्तक वाचन ,वेगवेगळ्या विषयावर घरात गप्पा सुरु झाल्या. कधीतरी मुख्य प्रवाहात यावच लागल तर म्हणून शालेय पुस्तक आणून ठेवलेली SSC /CBSE/ICSE सगळीच पुस्तक घरात असायची ,जे आवडेल त्याचा अभ्यास करायचा.भाषेच कोणताही बंधन नव्हत,दोन्ही भाषांमध्ये पुस्तक आणून ठेवली होती .
खरा होम-स्कूलिंगचा धडा सुरु झाला तो – प्रवासात ! आम्ही कामानिमित्त फिरत असतो – मग वेगवेगळे प्रदेश ,तिथली वैशिष्ट्य ,त्याची ऐतिहासिक-पौराणिक पार्श्वभूमी, तिथल्या भाषा ,मातीचे प्रकार,घरांचे प्रकार ,बोलीभाषा,वेशभूषा आणि मुख्य म्हणजे तिथले प्रसिध्द असे खाण्याचे पदार्थ – भूगोल,इतिहास,भाषा विषय असेच शिकवत आहोत. वेगवेगळी राज्य ,त्यांच्या सीमा ,त्या सीमाभागातील चालीरीतींची देवाण-घेवाण ,सगळचं मनोरंजक होऊ लागलं.
आपण वयाने मोठे असलो तरी ,आईवडील म्हणून आपण मुलांच्याच वयाचे असतो ,तेव्हा आपणही शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेत असतो- हा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरतो. मुलीच्या वयासोबत आमचा पण आईबाबा म्हणून त्याच वयाचा वाढदिवस असायचा. एक म्हटलं जात किंवा तसा एक गोड गैरसमज आहे ,जे आम्हाला मिळाल नाही ते मुलांना मिळायला हवं,आणि यासाठी आईवडील काहीही करायला तयार असतात. आम्ही जरा वेगळा विचार केला ,आपण किमान पक्षी एवढतरी नक्की देऊ जे आपल्याला आपल्या आईवडिलांनी दिल; हे खूप उपयोगी पडलं. आईवडील म्हणजे ’देव’ नव्हेत,आपल्यावर खूप प्रेम करणारी दोन माणस ,हा विचार आधी रुजवला.
मुळात एवढ्या चांगल्या शाळा असताना होम्स्कुलिंगच का ?घरातून-बाहेरून खूप विरोध झाला,तुमच्या भलत्या विचारांपायी तुम्ही मुलीच्या भवितव्याशी खेळताय; हे सगळ कानाआड करत आम्ही तिघेही पुढे निघालो. मुळात आपल्या पाल्याने ‘शिकायचं कसं ? ‘ एवढ आधी शिकव हा आमचा अट्टहास होता. अभ्यास आणि अभ्यासक्रम नंतर.
शिकायचं म्हणजे घोकंपट्टी किंवा भरपूर मार्क्स असली कोणतीच स्पर्धा नव्हे.एखादी गोष्ट शिकताना तिच्या मुळापर्यंत जाता यायला हवं. सगळेच विषय हे एकमेकांना धरून असतात हे दाखवून दिल.कशाला पाहिजे मराठी, किंवा इतिहास किंवा गणित ;असा नसत. उद्या मोठे होऊन इंटेरियर डिझाईनर झालात आणि मोगलकालीन डिझाईन करायचं असेल तर तुम्हाला इतिहासाची जाण हवीच ना !अशा पद्धतीने आमचा अभ्यास पुढे पुढे सरकत गेला.
घरीच अभ्यास असल्यामुळे, ठराविक काम ह्या आठवड्यात झालं पाहिजे,असा दंडक आहे.मग तुला हव तेव्हा कर.उरलेला वेळ तिने तिच्या छंदासाठी वापरावा.कधी रेडीओ जोकी तर कधी कार्यक्रमच निवेदन अशा गोष्टी ती यातून शिकत गेली.
आईवडील म्हणून आम्हा दोघांनी यातील जबाबदा-या चक्क वाटून घेतल्या.काही विषय त्याने तर काही मी घ्यायचे.मग आम्हीच तिला विचारलं तुला कोणत्या विषयासाठी कोण हवंय ते,तू निवड. अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धा हीच पद्धती वापरली. तिचा बाबा सोफ्टवेर इंजिनियर असल्यामुळे,कॉम्पुटर त्याने शिकवायचा,त्याचा आकाशदर्शनाचा अभ्यास आहे,तो उत्तम गातो ,गाणी कम्पोज करतो ,त्याला पेंटिंग मधल खूप कळत, खेळ कसा बघायचा ,मूवी पाहायचा दृष्टीकोन कसा असू शकतो ;हे सगळ ती बाबाकडून शिकतेय. इतिहास ,भाषा ,कविता, नीटनेटकेपणा ,उत्तम स्वयंपाक ,बिझनेस सुरु करणे म्हणजे काय.चालवताना येणा-या अनेक अडचणी ,त्यावर मात कशी करायची ? हे सगळ आईकडून . अर्थात ह्या गोष्टी काही पुढ्यात बसवून शिकवायच्या नसतातच ;इथे मोकळेपणा उपयोगी पडला. एकत्र बसून जेवताना नानाविध विषय मिळू लागले.
बरेचदा दोघांनाही कामासाठी जावं लागत ,कोणीतरी एकजण तिला सोबत घेवून जातो. त्यातूनही नकळत ती खूप शिकली. मान-सन्मान बघण ही एक बाजू झाली; कधीकधी घ्यावा लागणारा कमीपणा,अपमान तसेच त्या कामासाठी केले गेलेले कष्ट –सगळ तिला पाहता आलं. ह्याचा फायदा म्हणून आम्ही एकमेकांचे जिवलग मित्र झालो.
आपल मूल आत्मविश्वासी असाव , ही प्रत्येक पालकाची इच्छा असते . पण हा आत्मविश्वास येतो कुठून? एखाद्या गोष्टीच संपूर्ण ज्ञान ‘आत्मविश्वास’ निर्माण करत. उथळपणाने ,नको ती स्पर्धा करत, मला कसं सगळ्यांच्या आधी उत्तर आलं –असल्या गोष्टीना जागाच शिल्लक ठेवली नाही.
आता महत्त्वाचा मुद्दा आपण शिकतो ते पोटापाण्याच्या सोयीसाठी. त्याच काय? अशा शाळेत न गेलेल्या मुलीचं भवितव्य काय ? इथे सुद्धा आपण पालक मोठी चूक करतो,खरतर आपण मुलांना पाण्यापर्यंत नेऊ शकतो,पाणी पिऊन तहान भागावण,त्यांच्या हातात आहे. आज आम्ही मुलीला वेगवेगळ्या क्षेत्रातील संधीबद्दल नेहमी सांगत असतो. परंतु,तुला हेच करायचं आहे ,ह्यात प्रसिद्धी आहे, ह्यात पैसा आहे अश्या गोष्टी प्रकर्षाने टाळतो.
वेगवेगळ्या विषयांवर पुस्तक वाचायला उपलब्ध करून ठेवली आहेत,तिला हवं तर तिने वाचावीत. सुरुवातीला कंटाळा यायचा ;मग तिला त्यातली मज्जा दाखवून दिली.तू टीव्ही वर पाहतेस त्या कथा कोणाच्या तरी इम्याजीन करण्याचा पार्ट आहे,तेव्हा यामध्ये तुझ्या मेंदूला चालना मिळण्याच कामच राहत नाही.उलट पुस्तक वाचनात वर्णनानुसार आपला मेंदू आपण पाहिलेल्या आणि आपण इम्याजीन केलेली चित्र डोळ्यासमोर उभी करतो ; त्यातून चालना मिळत राहते, नवनवीन सुचत जात. हे मान्य आहे की व्हिडीओमुळे गोष्ट चटकन समजते, हाच त्यातील धोका पण आहे.
अभ्यास म्हणजे फक्त पाठ्यपुस्तक असू नये यावर आमचा आजही कटाक्ष आहे.चांगली भाषा बोलता येण,काळाची गरज आहे.भाषा कोणतीही असो.शब्दांचे उच्चार ,पाठांतर ,जीभ आणि मेंदूवरील हे संस्करण अतिशय आवश्यक आहे.ही जबाबदारी मात्र माझ्या आईबाबांनी पार पडली.संस्कृत श्लोक असोत की ज्ञानेश्वर ,तुकाराम आपली ज्ञानाची परंपरा जपलीच पाहिजे. ह्यात धर्म किंवा जातीचा कोणताही संबंध नाही ,हे सुद्धा तिला नीट समजावून सांगितले.
होम स्कूलिंगचे फायदे आहेत यात शंकाच नाही;परंतु ह्यासाठी आईवडिलांना मात्र शब्दशःतारेवरची कसरत करावी लागते. एकतर होम स्कूलिंग म्हणजे चोवीस तासांची शाळाच बनून जाते,शिकत राहणे या अर्थाने.
ह्यात बरेचदा मूल सोशल होत नाहीत ,त्यांना मधली सुट्टी –डब्बा ,मित्र मैत्रिणी ह्यातील आनंद उपभोगता येत नाही –असं ब-याचजणांनी विचारलं. खरतरंआमच्या बाबतीत असा अजिबात घडलेलं नाही.उत्तम ज्ञान असल्याने ती आत्मविश्वासाने बोलते ,गल्लीभर तिचे मित्रमैत्रिणी आहे. आतापर्यंत जिथे जिथे राहिलो तेथील मित्र मैत्रिणींशी आजही ती संपर्कात आहे. माझ्या मते सोशल असण एक स्वभाव आहे. राहिला प्रश्न डब्बा आणि शाळेतल्या गमतीजमतींचा –ह्या पेक्षा तिचं ‘परिपूर्ण’ होण आम्हाला जास्त महत्त्वाच वाटल.
गेली ६/७ वर्ष तिला होम स्कूलिंग आहे.सध्या ती रूढार्थाने सातवीला आहे.पण गणितात आठवीला आणि भूगोलात सहावीला आहे.अभ्यास उमजून पुढे जायचं आहे,तेव्हा हे होणारच.
तिच्या भवितव्यात तिने जे काही व्हायचं आहे ,त्यातील सगळी स्किल्स तिच्याकडे असण;हा यामागील हेतू आहे.
गम्मत म्हणून एक उदाहरण देते,कराटे क्लासला ती जात होती,आणि ज्या दिवशी त्यांची परीक्षा होती त्या दिवशीच नेमकी आजारी पडली,अर्थात परीक्षा बुडली म्हणजे सर्टिफिकेट नाही .तेव्हा तिला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली- उद्या तुला कुणी त्रास दिला तर तू सर्टिफिकेट दाखवणार आहेस का स्किल्स ? बस्स, तेव्हापासून सर्टिफिकेटची क्रेझ आमच्यातून हद्दपार झाली.
अलीकडेच अशा पद्धतीने शिकणाऱ्या एका भारतीय मुलीची अमेरिकन MIT मध्ये निवड झाली, त्या निमित्ताने आम्हालाही आपण योग्य दिशेने जातोय ह्याची जाणीव झाली.
अलीकडे CBSE/ICSE अशा बोर्डानी होम्स्कुलरसाठी थेट दहावीची सोय केली आहे.त्यामुळे बरेच अडथळे कमी झाले आहेत.
मुळात शिक्षणाचा उद्दात हेतू ,स्वतःला काहीतरी ज्ञान प्राप्त व्हाव, त्यातून चांगल काही घडावं हाच विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही इथपर्यंत पोहोचलो.समाजऋण अर्थात देशाची सेवा देशाचा विकास ही बीज रूजन अत्यंत आवश्यक आहे.’जरि उद्धरणी व्यय न तिचा हो साचा, हा व्यर्थ भर विद्येचा’ याप्रमाणे वाटचाल झाली तर आणखी काय हव?
अर्ध्या तपाहून जास्त सुरु असलेली आमची शाळा ,मुलीसोबत आम्हालाही आनंद देत आहे.शालेय अभ्यासक्रमाला धरून सोबतीने गाणी,चित्र,खेळ, वाचन आणि तिला आवडणा-या गोष्टीवर वेळ खर्च होतो आहे. ह्यातच समाधान आहे.
तसं पाहिलं तर प्रत्येकच पालक होम स्कूलिंग करत असतो,८ तासांची शाळा झाली की १६ तास मूल घरच्यांसोबत असतं. होम स्कूलिंग हा काही फोर्मुला नाही,ती वैयक्तिकरित्या आपल्या सोयीने आणि विचाराने करण्याचा भाग आहे.अगदी शाळा सोडूनच हे सगळ करायला हवं,असं अजिबात नाही.मुलांना आपला वेळ देऊन त्यांना त्यांच्या कलाने वाढू द्याव ,ह्या प्रक्रियेत आपणही ‘मोठे’होत जातो.मुलांना काय दिल पाहिजे तर हा चिरंतन ठेवा ,आनंदी जगण्याचा वसा द्यायला हवा
एक संस्कृत सुभाषित आहे –
 विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्नगुप्तं धनम्
विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरूणां गुरुः ।
विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या परं दैवतम्
विद्या राजसु पूज्यते न हि धनं विद्याविहीनः पशुः ॥

जान्हवीला घडवत असताना मी आणि ऋतुराज ही घडत गेलो,डोळ्यादेखत मूल वाढताना ,शिकताना पाहण-अनुपम्य सोहळाच तो !चला मुलांना घडवू या ,सोबतीने घडू या !!
 - नीलिमा देशपांडे

Saturday, September 10, 2016

School Portal

*सरल शाळा माहिती भरणे*

💎💎💎💎💎💎💎💎

*माहिती भरणे लवकरच सुरु होणार आहे*

*सन २०१६-१७ या साठी शाळा माहिती offline पद्धतीने भरायचे आहे*

*माहिती भरण्याचे स्टेप मी थोडक्यात सांगत आहे*

*या माहिती भरण्यासाठी आपले संगणाकात internet explorer हा browser चे वर्सन ९ किंवा त्या पेक्षा जास्त असावे*

*१)Internet explorer  open करा*

*२)होम पेज ओपन होईल त्या मध्ये उजव्या बाजूला वर setting चा symbol असेल त्या वर click करा*

*३)दिसणाऱ्या बरेच options पैकी internet option या वर click करा*

*४) या नंतर वरचे बाजूला General चे पुढे Security आहे त्या वर click करा*

५)त्या खाली custom म्हणून लिहले असेल
त्या खाली  एक box आहे त्या मद्ये right mark ✔ असेल.
त्या समोर
*Enable protected mode आहे.आता फक्त तुम्ही त्या box मध्ये असलेले right mark काढून टाका(box वर click करा box खाली होईल)*

*६)custem level या button वर click करा*

*आता Active X control and plug ins वर खालील प्रमाणे change करुन घ्या*

७)Allow. Active x filtering = *enable*

८)Allow priviosely used Active X = *enable*

९)Allow Scriptlet = *Disable*

१०) Atomatic prompting for ActiveX control = *Disable*

११)Binary and script behaviors= *Enable*

१२) Display video and animation = *Disable*

१३)Download signed Active x control= *Prompt*

१४) Download unsigned Active x control= *Prompt*

१५)Initialize and script Active X control = *Prompt*

१६) Only Allow approved domains = *Enable*

१७) Run Active X control and plug ins = *Enable*

१८) Run anti malware software on amActive X control = *Enable*


१९)  Only Allow approved domains = *Enable*


२०) Run Active x control and plug ins = *Enable*

२१)Run anti malware software in Active X control = *Enable*

२२) Run antiMalware software on Active X Control = *Enable*

२३) Script Active x control marked safe for = *Enable*

२४) *Ok या button वर  click करा, नंतर Apply या button वर click करा*

२५)  *browser बंद करुन ,परत एकदा चालु करा (Restart)*

२६) *internet explorer 9+ ने* education.maharashtra.gov.in
*वेवसाईट ओपन करा*

२७) *शाळा या button वर click करा व login व्हा*


२८) *होम tab मध्ये offline project आहे त्या वर click करा*

२९) *आपले ज्या भाषेत offline school data भरणे सोपे वाटते ते भाषा English, किंवा Marathi एका वर click करा*


३०) *Download offline data या button वर click करा*

३१) *file download करायचा का* ? विचारतो
*OK वर click करा*

३२) *आपले शाळेचा Udise code चा एक Zip file (तीन पुस्तक चिन्ह) दिसतो*

*Save या button वर click करा*


३३) *file पूर्ण download होई पर्यत वाट पाहा.*


३४) *file download झाल्यावर त्याला select करुन right click करा*


३५) *extract to udise code असतो त्या वर click करा*

३६)तुमच्या शाळेचा udise क्रमांकाच्या एक folder तयार होईल

३७) *पण file extract करण्यासाठी तुमचे संगणकात Winzip किंवा WinRAR हे software असणे आवश्यक आहे*

३७) *अता तुमच्या शाळेचा udise code असणाऱ्या folder select करुन open  करा*

*Open केल्या नंतर तिथे बरेच folder दिसेल*

३८) *आता Index.html या folder ला select करुन right click, open with, internet explorer करा*

३९)तुमच्या शाळेची माहीती भरायची offline project ओपन होईल

४०) *वेब पेज वर Allow blocked content या button वर click करा*

४१) *डाव्या बाजुचे सहा tab शाळा संबंधित आहे, व उजव्या  बाजुचे सहा tab student summery संबंधित आहे*


 ४२) *दोन्ही input format वर*
*Click करून आपली शाळेची माहिती print करुन घ्या*

४३) *School data entry प्रत्येक पेज ओपन करा,माहिती भरा सेव करा, finalize करा*

४४) *progress बार वर आपण किती माहिती भरले तपासा*

*१००% finalize झाले असेल तर prepare data for school वर click करा*

*एक नविन file तयार होईल ते file school portal login करुन upload करा*

४५) *जसे शाळा माहीती सेव finalize केले तसेच students summary data entry करा*

४६) *माहिती १००% finalize झाले तर Prepare data for student वर click करा, तयार झालेला नविन file school portal वर त्याच ठिकाणी upload करा*

४७) *लक्षात असु द्या आपण file download एक वेळ करुन upload दोन वेळ करायचा आहे*

४८) *शाळा इमारत व क्रिडांगणाच्या फोटो online upload करायचा आहे*


*हा मेसेज जतन star करुन ठेवा माहिती भरताना उपयोग होईल*

*धन्यवाद*

Tuesday, September 6, 2016

जपानमधील शिक्षण

माणसाला घडवण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. आपल्या देशातील नागरिक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी त्या त्या देशातील सरकार प्रयत्न करत असते. पण सध्या जपानमधल्या एका गावात जपान रेल्वे प्रशासनाने जो निर्णय घेतला त्याचे जगभर कौतुक होत आहे. जपानमधल्या एका गावातील रेल्वे सेवा प्रवासी नसल्यामुळे पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय जपान सरकारने घेतला होता. परंतु या मार्गावरील रेल्वे सेवेचा वापर शाळेत जाणारी एक मुलगी नियमितपणे करते हे रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आले. जर ही सेवा बंद झाली तर त्या मुलीला शिक्षणापासून वंचित राहावे लागले असते त्यामुळे प्रवासी नसतानाही फक्त त्या मुलीसाठी जपान रेल्वेने सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.
जपानमध्ये कामी शिराताकी नावाचे स्टेशन आहे. येथे प्रवासी नसल्याने या स्टेशनवरची रेल्वे सेवा थांबवण्याचा निर्णय जपान रेल्वे प्रशासनाने घेतला होता. पण या स्टेशनवरून एक मुलगी रोज शाळेत जात असल्याने रेल्वे प्रशासनाने ही सेवा सुरू ठेवली होती. या मुलीच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून रेल्वेचे नुकसान होत असताना देखील हा निर्णय घेण्यात आला. काहीही झाले तरी या मुलीचे शिक्षण जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ही सेवा सुरू ठेवण्याचे प्रशासनाने ठरवले. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून जपानमध्ये फक्त एका प्रवाशासाठी ही ट्रेन सुरू होती. याचवर्षी या मुलीचे शिक्षण पूर्ण झाले त्यामुळे या गावातील रेल्वे सेवा आतापूर्णपणे बंद झाली आहे. जपान रेल्वे प्रशासनाने या रेल्वेची वेळ या मुलीच्या शाळेच्या वेळेप्रमाणे ठरवली होती. ती सांगेल तेव्हा ही वेळ बदलण्यात यायची. जपानमधील शिक्षणाला प्राधान्य देण्याचा या निर्णयाची गोष्ट आज इंटरनेटवर फिरत आहे. या निर्णयातून खरेच शिकण्यासारखे आहे.

Monday, September 5, 2016

साने गुरुजींची शाळा

शिक्षक दिन विशेष


साने गुरुजी ६ वर्षे शिक्षक म्हणून अमळनेर ला होते..पण त्यांनी शिक्षक म्हणून कसे काम केले याविषयी फार माहिती नसते .शिक्षकदिनानिमित्त आज लोकमत च्या रविवार पुरवणीत मी साने गुरुजींनी शिक्षक म्हणून कोणते उपक्रम केले ?ते कसे शिकवत ?यावर लेख लिहिलाय ((शेअर करून शिक्षकापर्यंत हे पोहोचवावे


साने गुरुजींची शाळा

- हेरंब कुलकर्णी

आज  शिक्षक दिन. शिक्षकांचे शिक्षक असलेल्या साने गुरुजींनी सहा वर्षांच्या नोकरीत शिक्षक म्हणून जे प्रयोग केले त्यांची चर्चा फारशी झाली नाही. गुरुजींच्या हयातीचा अर्धशतकाचा कालखंड हा महाराष्ट्रातील शिक्षणाचा, शिक्षणविचारांचा, शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा अत्यंत महत्त्वाचा प्रयोगकाळ म्हणता येईल. टिळक, अण्णासाहेब विजापूरकर, महर्षी कर्वे, र. धों. कर्वे, भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख हे सारे मूलभूत प्रवृत्तीने शिक्षक व शैक्षणिक तत्त्वज्ञ होते.

साने गुरु जी अमळनेरला १९२४ ला शिक्षक झाले. त्यांचा स्वभाव संकोची होता. त्यामुळे त्यांच्याकडे शिक्षणशास्त्राची पदवी नसताना कसे शिकवणार हा प्रश्न होता. सुरुवातीला ते पाचवीला इंग्रजी व संस्कृत आणि सहावीला मराठी शिकवत. पुढे मॅट्रिकला इतिहास व मराठी शिकवत. गुरुजींचा स्वभाव शांत असूनही त्यांना वर्ग शांत करण्यासाठी फार काही करावे लागले नाही. बोलण्यात इतकी माहिती आणि जिव्हाळा असे की मुलांना त्यांचा तास संपूच नये असे वाटे. त्यांच्या बोलण्यात करुणरस असे आणि नकळत गुरु जींच्या डोळ्यात पाणी येत असे.

त्यांचे शिकवणे मुले पुढेही विसरली नाहीत. कवी दत्त यांचा शिकविलेला पाळणा आणि शेक्सपिअरच्या नाटकातला शायलॉकचा संवाद नंतर अनेक वर्षे मुले एकमेकांना सांगत असत. गुरुजींनी कवी दत्त यांचा पाळणा शिकवताना दारिद्र्यामुळे झालेल्या श्यामच्या आईच्या आशा- आकांक्षाचे उद्ध्वस्त स्मशान त्यांच्या डोळ्यांपुढे आले. गुरु जी म्हणाले की, ‘आई असणं ही मानवी जीवनातील अति महत्त्वाची घटना आहे. आईचे प्रेम तेच खरे प्रेम.’ गीत संपल्यावर गुरुजींनी आणि मुलांनी डोळे पुसले.

मधली सुटी सुरू झाली पण तरीही मुले हलली नाहीत. इतर वर्गातील मुले डोकावून बघत की हा वर्ग का सुटला नाही. ‘माझी जन्मभूमी’ ही कविता शिकवताना डोळे भरून आले. कवितेतील ‘नि:सत्त्व निर्धन तुला म्हणताती लोक’ ही ओळ त्यांनी म्हटली. डोळ्यातून अश्रू येऊ लागल्याने पुढे शिकविणेच त्यांना अशक्य झाले. पुस्तक बंद करून ते वर्गाच्या बाहेर निघून गेले.

गुरु जी शाळेत वेळ अजिबात वाया घालवत नसत. तास जेव्हा नसे तेव्हा ते थेट सरळ वाचनालयात जात. दररोज पाचपंचवीस पुस्तके आपल्या नावावर घेत असत. इतिहास हा विषय गुरुजी खूप छान शिकवत. यावेळी त्यांचा देशाभिमान, मातृभूमीवरील भक्ती उचंबळून येत असे. पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त किती तरी अवांतर माहिती ते विद्यार्थ्यांना देत असत. त्यांच्या इतिहासाच्या तासाला बसता येत नाही म्हणून इतर शिक्षक त्यांचा तास दाराच्या बाहेर लपून ऐकत असत. गुरु जी जरी शिक्षणशास्त्र शिकलेले नव्हते तरी त्यांनी त्यांचे स्वत:चेच तंत्र बनविले होते. ते आजच्या भाषेत ज्ञानरचनावादी होते. मुलांना ते खूप प्रश्न विचारून सतत विचार करायला भाग पाडत असत.

वात्सल्याशिवाय आणि प्रेमाशिवाय सद्गुणसंवर्धन करणे केवळ अशक्य असते यावर गुरुजींचा भर होता. त्यांनी छात्रालयाचे काम बघायला सुरुवात करताच छात्रालयाचे अनाथपण गेले. ते मुलांना शिस्तीतून बदलवण्यापेक्षा प्रेमाने बदलवण्याचा प्रयत्न करीत. गुरु जी गोड प्रार्थनागीते म्हणून मुलांना उठवत. ‘जागिये रघुनाथ कुवर, पंछी बन बोले’ अशी गाणी म्हणत गुरु जी मुलांना उठवत. कोरडेच रुक्ष उपदेशाचे घोट उठता बसता त्या बालजिवांना पाजण्याऐवजी वात्सल्यपूर्ण कृतीचा आश्रय देत.

छात्रालयात मुले कपडे धूत नसत. खोल्या स्वच्छ ठेवत नसत. पुस्तके, सामान इकडे तिकडे पडलेले असे. कंदिलाच्या काचा स्वच्छ केलेल्या नसत. मुले शाळेत गेली की साने गुरु जी गुपचूप मुलांच्या कपड्याच्या घड्या घालत, कंदिलाच्या काचा पुसून ठेवत. मुलांचे कपडे धुवून ठेवत. मुले म्हणायची, ‘‘आम्हाला लाजविण्यासाठी करता की काय?’’ तेव्हा ते म्हणायचे, ‘‘अरे, आई का मुलाला लाजविण्यासाठी हे सारे करत असते?’’

मुलांची त्यांना टोकाची काळजी असे. कृष्णा परळीकर हा विद्यार्थी आजारी पडला आणि गावाकडे गेला. गावाकडून तो पत्र पाठवायचा. पुढे पत्र येणे बंद झाले. तेव्हा गुरुजी त्याच्या गावाला गेले. त्याला विषमज्वर झालेला होता. गुरुजी तिथेच राहिले आणि त्याची सेवाशुश्रूषा केली. मुलांच्या मदतीने गुरु जींनी बाग तयार केली. एका गुलाबाला कळी लागली. त्या रात्री छात्रालयातील मुलांना घेऊन बगीच्यात बसून गुरुजींनी त्या गुलाबाच्या फुलाचा जन्मोत्सव साजरा केला. त्या रोपट्याला रंगीबेरंगी कापडाच्या तुकड्यांनी गुरु जींनी सजविले. मुलांनी गाणी म्हटली. बासरी वाजवली. यातून मुलांना निसर्गाविषयी वेगळेच प्रेम निर्माण झाले. गुरु जी एकदा शिकवत होते. तेवढ्यात पाऊस सुरू झाला.

गुरु जींनी शिकविणे थांबविले आणि म्हणाले, ‘‘बाहेर पाऊस पडताना मी का शिकवत बसू?’’ आणि त्यांनी वर्ग सोडून दिला. समानतेची शिकवण गुरु जी मुलांना कृतीतून देत. छात्रालयात जेवण एकाच पंगतीत दिले जाई. एकदा मुले आणि गुरु जी सहलीला गेली. रात्री झोपताना मुलांनी गुरुजींसाठी गादी आणली. पण गुरुजी म्हणाले, ‘‘जर मुले सतरंजीवर झोपली आहेत तर मग मी गादीवर झोपणार नाही.’’

सकाळ-संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळी गुरुजी खूप काही मुलांशी बोलत. जगातल्या विविध महापुरुषांची माहिती सांगत. वर्तमानपत्रात मुलांनी नेमके काय वाचावे यावर खुणा करून ठेवीत. महात्मा गांधींचा ‘यंग इंडिया’ तिथे येत असे. अमृतबझार पत्रिकाही तिथे येत असे. त्यातील निवडक माहिती मुले वाचत असत.

छात्रालय दैनिक अशी एक वेगळीच कल्पना गुरुजींना सुचली. ते रोज रात्री- पहाटे उठून दोन तास एकटेच ते संपूर्ण दैनिक लिहून काढत आणि सकाळी मुलांसाठी लावत. इतके टोकाचे कष्ट ते मुलांसाठी घेत होते. देश-विदेशातील विविध घटनांची नोंद असे. थोरांची चरित्रे, विज्ञानातील विविध प्रयोगांची माहिती, कधी आठवणी दिल्या जात. स्थानिक गावातील शाळेतील आणि छात्रालयात जे घडायचे तेसुद्धा या दैनिकात असायचे. एखाद्या विद्यार्थ्याने काही चांगले काम केले की त्याची माहिती असे आणि एखाद्याच्या वागण्यात काही उणेपणा असला तरी त्याचे नाव न घेता निनावी नोंद केलेली असे. यातून त्या मुलाला आपली चूक दुरुस्तीचा संदेश आपोआप मिळायचा.

या दैनिकात मुलांच्या खोल्यांची वर्णने येत. मुलांच्या गुण-दोषांची चर्चा असे. मुलांमधील भांडणे, अबोला सर्व काही असे. विनोद, कविता असे. देशाविषयी चिंतन असे. इतिहास, समाज, शिक्षण, धर्म असे नाना प्रश्न असत. कधी चरित्र, कधी निबंध, कधी गोष्ट, कधी संवाद, कधी चुटके, स्फुट विचार असे खूप काही असे. जगातील विविध देशांचे स्वातंत्र्यलढ्याचे वर्णन असे, तर कधी रवींद्रनाथ, इकबाल, व्हीटमन, गटे, बायरन, शेले यांच्या कवितांची सुंदर रूपांतरे असत.

मुले मैदानावर असताना गुरुजी तिथे जात. त्यांच्यात भाग घेऊन खेळत. विटीदांडूचाही खेळ खेळत. मुलांमध्ये भूतदया जागृत व्हावी म्हणून गुरुजींनी शिमग्याच्या दिवसांत मुले गाढवांना जो त्रास देतात त्याविरोधात काम करणाऱ्या ‘गर्दभ क्लेशनिवारण मोहिमे’ला प्रोत्साहन दिले. त्यानुसार मुलांनी गावात जाऊन अनेक ठिकाणी गाढवांची मुक्तता केली.

साने गुरु जींनी सुरुवातीला वाचनालय काढले. विद्यार्थ्यांना दरमहा दोन आणे वर्गणीत पुस्तके, मासिके वाचायला मिळत. गुरु जी मुलांनी गांधींचा ‘यंग इंडिया’ वाचावा म्हणून त्यावर लाल पेनने खुणा करून ठेवत. गुरुजी मुलांची खानेसुमारी करीत. त्यात लेखक, चित्रकार, खेळाडू असे मुलांचे वर्गीकरण करीत.

असाचा एक उपक्र म हा मुलांनी आपल्या गावांची वर्णने लिहायची. त्यातून गावातील जातिव्यवस्था, भांडणे, दारूचा परिणाम, ऐतिहासिक-पौराणिक ठिकाणे, शिक्षणाची स्थिती, पाण्याच्या बाबतीत स्थिती, पिके व शेतीची अवस्था, कर्ज, अनेक गावांत सांगितल्या जाणाऱ्या दंतकथा अशी विविध माहिती जमवायला सांगत.

१९४६ मध्ये ‘कुमारांपुढील कार्य’ या भाषणात ते म्हणतात की, ‘‘तुम्ही गोष्टी, गाणी, ओव्या, दंतकथा सारे गोळा करा.

एकेका तालुक्यात ४/४ कुमारांनी हिंडावे व ते गोळा करून त्याचे नीट संपादन करा. ते अमर कार्य होईल.’’

गुरु जींनी जरी शिक्षकी पेशा सोडला तरीसुद्धा त्यांना पुन्हा शिक्षक होण्याची ओढ होती. मृत्यूपूर्वी काही महिने अगोदर ते मित्राला म्हणाले की, ‘‘मला कुठे तरी ग्रामविभागात मुलांत राहावे, त्यांच्यासोबत खपावे, त्यांना चार अक्षरे शिकवावी असे वाटते.

परंतु देवाने येथे गुंतवून टाकले आहे.’’

साने गुरुजींचे

शिक्षणासंबंधी विचार..

मुलांभोवती जितके स्वच्छ, पवित्र, मोकळेपणाचे, आनंदाचे वातावरण तितके मुलांचे जीवन सुंदर. मुले सुधारायला पाहिजे असतील तर त्यांच्या भोवतालची सृष्टीच बदला. आदळआपट आणि शिक्षा, दंड यांनी मुलांचा खरा विकास होत नाही. खरा विकास हृदयात शिरल्याने व प्रत्यक्ष सेवेने होईल. खरा शिक्षक मुलांना भूतकाळाची कल्पना देऊन भविष्याच्या दरवाजापर्यंत आणून ठेवतो. आजपर्यंत जगाने काय केले याची कल्पना देऊन उद्या मानवजातीला काय करायचे याची सूचना देतो. अशा विशाल दृष्टीचे शिक्षक लहानपणी मुलांना मिळायला हवेत. मुलांना कितीही देशभक्तांच्या गोष्टी सांगितल्या तरी त्यांच्या मनावर त्याचा परिणाम होत नाही. उलट त्यांना याच गोष्टींचा कंटाळा वाटू लागतो. मुलांच्या मनावर जर संस्कारच नाही तर एकदम तुमच्या गोष्टी त्यांना कशा आवडू लागतील? शिक्षकांनी प्रथम ५ ते ६ मिनिटे सामाजिक, राष्ट्रीय विषय मुलांशी बोलावे. सर्वच शिक्षक जर असे करू लागले तर मुलांची मने फुलतील...

(लेखक प्रयोगशील शिक्षक आणि शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)

herambkulkarni1971@gmail.com  phone 9270947971

------------------------------------------------
शिक्षक दिनानिमित्त गुरुजींचा हा प्रेरणादायी लेख आपल्या  शिक्षक मित्रांना पाठवा 

Friday, September 2, 2016

झिका रोग

ब्राझिलमध्ये थैमान घालणारा झिका रोग आशियायी खंडात देखील पसरत आहे. आशिया खंडातील काही देशांमध्ये हा रोग अधिक जलद गतीने पसरू शकतो असे नव्या संशोधनातून समोर आहे आहे. एडिस एजिप्ती या डासामुळे होणा-या झिकाने आधिच ब्राझिल आणि दक्षिण अमेरिकी देशांत थैमान घातले आहे. पण नव्या माहितीप्रमाणे भारतात देखील हा रोग पसण्याची शक्यता आहे. भारताबरोबर चीन, फिलीपिन्स, इंडोनेशिया, पाकिस्तान, नाजेरिया, व्हिएतनाम यांसारख्या देशांना या झिकाचा धोका अधिक आहे.
या देशांमध्ये पर्यटकांचा राबता हा जास्त आहे. ज्या देशांत झिकाचा प्रार्दुभाव आहे अशाच देशांतून भारत आणि वर नमूद करण्यात आलेल्या देशांत अधिक पर्यटक येतात त्यामुळे झिकाचा प्रसार या देशांत होऊ शकतो अशी भिती या संशोधातून व्यक्त करण्यात आली आहे. कमरन खान यांनी केलेल्या संशोधनातील प्रंबधात याविषयी अधिक माहिती मांडण्यात आली आहे. तसेच झिकाचा विषाणूचा प्रसार होण्यासाठी या देशातील बदलते हवामान कारणीभूत आहे त्यामुळे झिकाचा धोका या देशांना अधिक असल्याचे म्हटले आहे. या देशांतील लोकसंख्या ही सगळ्यात जास्त असल्याने यातून होणारे नुकसान हे मोठे असणार आहे असेही त्यात म्हटले आहे. झिकाची लागण होऊ नये यासाठी अनेक देशांत आधीच उपाययोजना केल्या आहेत पण मानवी शरीरातील रोगप्रतिकार शक्तीवर हे अवलंबून असल्याचेही या संशोधनात नमूद करण्यात आले आहे. गेल्याच आठवड्यात सिंगापूरमध्ये झिकाचा पहिला रुग्ण आढळला होता, त्यानंतर गुरूवारीच तेथील १३ भारतीयांना झिकाची लागण झाल्याचे पराराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. मलेशियामध्ये देखील झिकाचा रुग्ण आढळला त्यामुळे आशियायी देशांत झिकाचा प्रसार होण्यास सुरूवात झाली हे नक्की. आता भारतासहित अनेक देशांची नावे समोर आल्याने भारताला सुरक्षेच्या दृष्टीने अधिक उपायोजना कराव्या लागणार आहेत.

Saturday, August 27, 2016

Rules of Spelling

⭕ Rules of Spellings⭕

इंग्रजी भाषेत प्रत्येक स्पेलिंगचे ठराविक नियम नसतात. इंग्रजीत काही स्पेलिंग वाचतांना विचित्र वाटतात. म्हणून उच्चाराचे व स्पेलिंगचे कितीही नियम शिकले तरी स्पेलिंग बद्दल संपूर्ण माहिती घेतली असे म्हणता येणार नाही. तरी स्पेलिंग वर प्रभूत्व मिळविण्यासाठी वाचन एक प्रभावी माध्यम आहे. इंग्रजीचे जास्तीत जास्त वाचन केल्यामुळे इंग्रजी शब्दांच्या स्पेलिंगमधील चूका सहजच कमी होत जातील. आपण तीन गोष्टीं बघणार आहोत.

 ***अक्षराची पुनरावृती करण्यासंबंधीचे नियम

शब्दातील शेवटचे अक्षर व्यंजन असताना शेवटच्या अक्षराची पुनरावृती करण्यासंबंधीचे नियम

*1a. एका syllable ( syllable म्हणजे मराठीत एका शब्दात 'शब्दावयव'.) च्या शब्दात शेवटच्या अक्षरापूर्वी एक स्वर असल्यास स्वराने सुरू होणारे प्रत्यय जोडताना शेवटच्या अक्षराची पुनरावृत्ती केली जाते.

उदा. cut + ing = cutting

stop + er = stopper

fat + est = fattest

thin +er= thinner

*1b. पण व्यंजनाने सुरू होणारे प्रत्यय जोडताना शेवटच्या अक्षराची पुनरावृती होत नाही.

उदा. fat +ness = fatness

thin +ly =thinly

*2a. शब्दात शेवटच्या अक्षरापूर्वी दोन स्वर असल्यास प्रत्यय जोडताना शेवटच्या अक्षराची पुनरावृती होत नाही.

उदा.  fear +ed = feared

cook + ing =cooking

keep + er = keeper

*2b. अपवाद-

acquit +ed = acquitted

quit +er = quitter

wool + en = woolen

***great, rich, fall  आणि fat या शब्दांमधे प्रत्येकी एकच शब्दावयव आहे. कारण उच्चाराच्या दृष्टीने या शब्दांचे एकापेक्षा जास्त तुकडे पाडता येत नाहीत. पण fat-ness आणि  joy-ful यांचे अधोरेखित केल्याप्रमाणे प्रत्येकी दोन तुकडी पडतात. म्हणून  fatness, joyful मधे दोन  syllable आहे. आणि im-por-tant आणि joy-ful-ness मधे अधोरेखित केल्याप्रमाणे प्रत्येकी तीन  syllable आहेत.

*3a. एकापेक्षा जास्त शब्दावयव ( =syllable) असलेल्या शब्दात शेवटच्या अक्षरापूर्वी एक स्वर असेल आणि शब्दाच्या शेवटच्या अवयवावर जोर पडत असेल तरच स्वराने सुरू होणारे प्रत्यय जोडताना शेवटच्या अक्षराची पुनरावृती केली जाते.

उदा.  begin +er = beginner
admit + ance = admittance
occur + ence = occurrence
recur + ence = recurrence
commit + ed = committed  (दोन )
commit + ment = commitmet
regret + ed = regretted

*3b. आता पुढील शब्दांना प्रत्यय जोडताना शेवटच्या अक्षराची पुनरावृती होणार नाही कारण पुढील शब्दांच्या  शेवटच्या भागावर जोर पडत नाही.

उदा. open + ing = opening
offer + ed = offered
proffer + ed = proffered
happen + ing = happening
enter + ed = entered
conquer+ or = conqueror

*3c. अपवाद- handicap, kidnap आणि worship अपवाद आहेत. या शब्दांच्या शेवटच्या भागावर जोर पडत नसला तरी प्रत्यय जोडताना शेवटच्या अक्षराची पुनरावृती होते.

जसे. worship +er = worshipper; kidnap +ed = kidnapped; handicap + ed= handicapped

3d. focus आणि  bias मधे ed जोडताना दोन s  (=ss) किंवा एकच s काहीही लिहले जाऊ शकते.

focus + ed = focused/focussed   bias + ed= biassed/biased

4. शब्दाच्या शेवटी -l (एल) आणि -l पूर्वी एक स्वर असल्यास स्वराने सुरू होणारे प्रत्यय जोडताना -l ची पुनरावृती होते.

उदा.

cancel + ed = cancelled
model + ing = modelling
travel + er = traveller
अपवाद : parallel + ed = paralleled

5. शब्दाच्या शेवटी l असल्यास आणि l पूर्वी दोन स्वर असल्यास आणि दोन स्वरांचा उच्चार स्वतंत्र होत असल्यास साधारणपणे l ची पुनरावृती केली जाते.

उदा.  duel + ist = duellist

(duel (ड्यूअल) द्वंद्वयुद्ध; duellist (ड्यूअलिस्ट) द्वंद्वयोद्धा)

dial + ing = dialling

(dial  (डाइअल) = घड्याळ, इ. ची तबकडी, फोन लावणे )

fuel + ing = fuelling

(fuel (फ्युअल)= इंधन, सरपण, जळतण, ला इंधन पुरविणे )

पण

feel + ing = feeling

fail + ed = failed

fool + ed = fooled

6. शब्दाच्या शेवटी w किंवा y असताना मात्र त्याआधी एक स्वर असला तरी प्रत्यय लावताना w किंवा y ची पुनरावृती होत नाही.

उदा. play + er= palyer   slow + est = slowest


 7. शब्दाच्या शेवटी e असताना e काढण्याचा किंवा न काढण्यासंबंधीचे नियम

 i .)  शब्दाच्या शेवटी e असल्यास स्वराने सुरू होणारे प्रत्यय जोडताना e काढले जाते.

उदा. belive + er = believer
sincere + ity = sincereity
believe + able= believable

अपवाद :-
dye + ing = dyeing
singe + ing = singeing

ii.) 'e' शेवटी असलेल्या शब्दाला व्यंजनाने सुरू होणारे प्रत्यय जोडताना शेवटचे e काढले जात नाही.

उदा. sincere + ly = sincerely
hope + less = hopeless
care + full = carefree
polite + ness = politeness

अपवाद :-
argue + ment= argument
nine + th = ninth
awe + full = awfull

due/undue/true/whole/ + ly = duly/unduly/truly/wholly

iii.) judge, abridge आणि acknowledge e काढल्यास किंवा e लिहल्यास दोन्ही प्रकारे स्पेलिंग बरोबर होतात.

उदा. judge +ment = judgement/judgment

iv.) शब्दाच्या शेवटी -ce  किंवा -ge  असल्यास o, a किंवा व्यंजनाने सुरू होणारे प्रत्यय जोडताना e काढले जात नाही.

उदा.  notice + able = noticeable
replace + replaceable
courage +ous = courageous
change + able = changeable
manage + ment = management
peace + full = peaceful
marriage + able = marriageable

v.) शब्दाच्या शेवटी -ee असल्यास प्रत्यय जोडताना e काढले जात नाही.

उदा. see + ing = seeing
agree + able = agreeable
agree + ment = agrement

8. शब्दाच्या शेवटी -y असल्यास प्रत्यय जोडताना स्पेलिंग बदलांसंबंधीचे नियम

   i .)शब्दाच्या शेवटी -y असल्यास प्रत्ययजोडताना y चे i करावे.

उदा. happy + ly = happily
lazy + ness = laziness
hurry + ed = hurried
study + es = studies
beauty + full = beautiful

पण शेवटच्या y पूर्वी स्वर असताना मात्र कोणतेही प्रत्यय जोडताना y चे i केले जात नाही, जसे, obey + ed = obeyed; play + er = player; buy+ ing = buying

ii. ) शेवटी  y असललेल्या शब्दात ing हे प्रत्यय जोडताना y चे i कधीच केले जात नाही किंवा y काढलेही जात नाही.

उदा. study + ing = studying   worry + ing = worrying  try + ing = trying

iii ) twenty, thirty, forty, fifty, sixty इत्यादी संख्यांमध्ये th मिळवताना शेवटचे y चे ie होते.

उदा. twenty +th = twentieth;  thirty + th = thirtieth

9) क्रियापदाच्या शेवटी -ce असल्यास त्या शब्दात -ed/-ing जोडताना k वाढवतात.

उदा. frolic + ing = frolicking  panic + ed = panicked

10) क्रियापदाच्या शेवटी -ie असल्यास त्याला ing लावताना ie चे y करतात.

उदा. belie + ing = belying
 lie + ing = lying
die + ing = dying
tie + ing = tying
vie + ing = vying

11 a) full हे  प्रत्यय एखाद्या  शब्दात जोडताना full मधील एक l काढून टाकले जाते.

उदा. 1. use + full = useful
2. care + full = careful
3. wonder + full = wonderful
4. fear + full = fearful

11b) ज्या शब्दात full जोडले जात आहे त्या शब्दाच्या शेवटी पण ll असल्यास त्यातील एक सुद्धा काढले जाते.

उदा.
skill + full = skilful
  full+ fill = fulfill.. 

सरल माहिती भरणे

Mobile वरून MDM भरण्यासाठी सोपा मार्ग guttedattatray.blogspot.com वर क्लिक करा माझा blog open होईल, त्यानंतर सर्वात खाली vew web version वर क्लिक करा म्हणजे PC वरील blog open होईल त्यानंतरblog वर प्रथम उजव्या बाजूला शैक्षणिक websites मुद्यामध्ये सरल या शब्दावर क्लिक करा, सरल website open होईल त्यातील म भो यो (MDM)वर क्लिक करा login करा व mobile वरून MDM माहिती भरा

blog कसा तयार करावा

1 💻 ब्लॉग तयार करण्यास स्वताःचा Gmail id व Password असणे आवश्यक आहे.
2 💻 प्रथमतः www.blogger.com वर जा.
3 💻 तेथे Gmail चा login id / username व password टाकून login / signin करा.
4 💻 यानंतर New Blog ला click करा.
5 💻 पुढे Blog चे (Tital )शिर्षक व तुम्हाला ठेवायचा Blog address टाका
6 💻 त्याखालील हवे ते Template निवडा .
7 💻 create blog ला click करा .
8 💻 निवडलेल्या Template  वर Blog ची रचना अवलंबून असते .
9 💻 आता new post वर click करा .
10 💻 MSWord प्रमाणे Page open होईल .
11 💻 तेथे आपली post तयार करा .
12 💻नंतर publish करा .
13 💻 समोरील view blog करून आपली blog website पहा .
14 💻 नंतर layout वर जा तेथे header मधे blog मुखपृष्ठासाठी Photo add करा .
15 💻 त्याखालील gadget वर क्लिक करा .
16 💻 त्यात आगोदर तयार केलेली pages select करून save करा .
17 💻 हे पेजेस तुम्हाला blog च्या मुखपृष्ठावर आडवी दिसतील .
18 💻 Pages tab टाकण्यास - new page click करा व त्याचे Title टाकून तयार करा .
19 💻 माहिती तयार असल्यास भरा फोटो टाका .
20 💻 माहिती कशी दिसते हे priview पाहुन तपासा.
21 💻 आता layout page च्या डाव्या बाजूला Template designer वर क्लिक करून ब्लॉग design करता येते .
22 💻 layout वर sidebar कसे हवे ते select करा व apply to blog करा .
23 💻 शेवट advanced menu वर क्लिक करून रंगसंगती 🎨 ठरवा .
24 💻 खाली तुम्हाला live blog दिसेल .
25 💻  सर्व रचना झाली की apply to blog करायला विसरू नका .
26 💻 आपल्या इतर फाईल Google drive , Dropbox वर Save करून तेथील link copy  करून ब्लॉग वर हवी तेथे pest करू शकता .
  आपणांस आपला ब्लॉग बनविण्यास हार्दिक शुभेच्छा !

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...