Pages

Sunday, October 9, 2016

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र G.R. 22/06/2015

https://drive.google.com/file/d/0B3HCa04kgm8jQjVBd256NjVFUG8/view?usp=drivesdk

नील्स बोर

नील्स बोर*
*भौतिकशास्त्रज्ञ*
*जन्म - ऑक्टोबर ७, १८८५*
नील बोरनी अणूच्या रचनेवर सिध्दांत मांडला.त्यानी अर्नेस्ट रुदरफोर्ड यांच्या अणूच्या प्रतिकृतिमध्ये अामूलाग्र सुधारणा घडवून आणल्या व बोअरची अणूची प्रतिकृती जगासमोर ठेवली.
हर्ट्झ व फ्रांक यांच्या संशोधनावरून असे दिसून आले की, अणूवर इलेक्ट्रॉनाचा आघात होण्याकरिता आघाती इलेक्ट्रॉनामध्ये किमान ऊर्जा असावयास पाहिजे; जेणेकरून अणूमधील विशिष्ट इलेक्ट्रॉन स्थानांतरित होतील. इलेक्ट्रॉनामधील किमान ऊर्जेला आयनीभवन वर्चस् असे म्हणतात. हे वर्चस् निरनिराळ्या मूलद्रव्यांसाठी निरनिराळे असते. प्रत्येक मूलद्रव्य प्रकाशाच्या विशिष्ट वर्णरेषा उत्सर्जित करीत असून त्या मूलद्रव्यातील अणूंच्या शक्य असणाऱ्या ऊर्जा-अवस्थेच्या श्रेणींशी तुल्य असतात. ⇨ नील्स बोर यांना या संशोधनाची पूर्वकल्पना आलेली होती आणि त्यांनी ⇨ पुंज सिद्धांता चा उपयोग करून अणूतील इलेक्ट्रॉनांची मांडणी व त्यांची गती म्हणजे अणूचे स्वरूप स्पष्ट करणारा पहिला सुसंगत सिद्धांत विकसित केला.

Friday, October 7, 2016

जॅक बोनियो

बाबांनी खेळणे दिले नाही, ८ वर्षांच्‍या मुलाने सुरु केले लिंबू पाण्याचे दुकान,
करतो १६ लाखांची उलाढाल
------------------------
दोन वर्षांपूर्वी जॅक बोनियो आठ वर्षांचा होता. त्याने वडिलांना एक खेळणे मागितले होते. ते महागडे असल्याने तू तुझे विकत घे, असे बाबांनी त्याला सांगितले. जॅकने पैसे जमवण्यासाठी बाबांच्याच मदतीने लिंबूपाण्याचे दुकान उघडले. ऐन उन्हाळा असल्याने योगायोगाने दुकान चांगलेच चालू लागले. विक्री वाढवण्यासाठी स्थानिक मंडईतही लिंबूपाणी विकले. पहिल्याच हंगामात जॅकने सव्वा लाखाचे लिंबूपाणी विकले. त्यात सुमारे साठ हजार रुपयांचा नफा झाला.

बोनियो कुटुंबाने या व्यवसायाला ‘जॅक स्टँड्स’ नाव दिले. आता जॅक दुकानांच्या शाखा सुरू करण्याच्या विचारात आहे. त्याने ‘यंग अमेरिकन्स बँके’कडून तीन लाखांचे कर्ज उचलले आहे. ही बँक मुलांनाच कर्ज देते. जॅकने वेबसाइट तयार केली आणि तीन मंडयांत दुकाने उघडली. काम वाढल्याने त्याने ७ ते ११ वर्षांपर्यंतची मुले सेल्स टीममध्ये ठेवली. सुट्यांत कमाईची इच्छा असलेली मुले त्याच्याकडे येऊ लागली. जॅक त्यांना स्टँडवर काम करणे, शिफ्ट संपल्यानंतर पैसे मोजणे, नफा-तोटा समजावून सांगू लागला. शिफ्ट संपल्यानंतर मुलांना विक्रीच्या हिशेबाने दोन ते तीन हजार रुपये सुटू लागले. गतवर्षी सुट्यांत ‘जॅक स्टँड्स’मध्ये 200 मुले काम शिकली.
जॅक आता 10 वर्षांचा आहे. त्याने यंग अमेरिकन्स सेंटर फॉर फायनान्शियल एज्युकेशनमध्ये प्रवेश घेतला आहे. हे केंद्र 6 ते 21 वर्षे वयाच्या मुलांना अर्थशास्त्राचे बारकावे शिकवते.

जॅकला त्याच्या बाबांनी मदत केली, पण मुलाने मेहनत करावी, यावरही भर दिला. घराजवळ दुकान उघडले तेव्हा जॅक घरातील फ्रिजमधून बर्फ व कप तर नेणार नाही, याकडेही नजर ठेवली. म्हणजेच त्याने मेहनतीविना नफा मिळवला असता तर तो काहीच शिकला नसता. त्याला गणिताच्या मूलभूत बाबी शिकवल्या. शाळेतही त्याला याचा फायदा झाला. तो सध्या पाचवीत शिकतोय, पण सातवीची गणितेही सहजपणे सोडवतो. त्याला वस्तूंचे घाऊक भाव, विक्री कर परवान्याच्या अर्जाची पद्धत, बिझनेस रिलेशन सर्वकाही माहीत आहे. गतवर्षी जॅकने 16 लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय केला. काही दिवसांआधी त्याने ‘जॅक मार्केटप्लेस’ही उघडले. येथे 18 वर्षांपर्यंतच्या मुलांनी तयार केलेल्या वस्तू विकल्या जातात.

कुरापती उंदीर

कुरापती  उंदीर।                        

एका  ठिकाणी एक मोठा  हत्ती शांतपणे  बसलेला असतो, तेवढयात  एक कुरापती ऊंदराला हत्तीला  चिडवयाचि  हुक्की  येते , तो आपल्या  बिळातुन  येऊन  तो हत्तीला  त्रास देवू  लागतो,  सुरवातीला  हत्ती  दुर्लक्ष  करतो,  पण  नंतर  ऊंदीराला  मजा येवू  लागते,  हत्तीला  त्रास  देण्यात,  हत्ती  जागेवरुन  ऊठतो आणी  ऊंदराला  मारण्या  साठी  त्याच्या  बिळाच्चा  दिशेने   आपल्या  डोक्याने टक्कर  मारू  लागतो,  ऊंदीर  आत  असल्याने ऊंदराला  काहीच  फरक पडत नाही, तो  परत  दुसरी  कडुन त्रास  देत  राहतो,  कारण ऊंदराला  पक्क  माहीत  होत  की  हा  हत्ती  प्रंचड ताकदवर  आहे, तसाच  त्याचा  राग  ही  प्रंचड आहे,  पण  तरीही  तो  आपनास  हरवु  शकत  नाही  ,  कारण  त्याचा  राग  आणी  अतिऊत्साऊ  पणाच त्याला  नडेल,  जितका  ऊंदीर  त्रास  देऊ  लागला,  तितका  हत्तीचा  राग अजुन  वाढु  लागला ,  आणी  आपन कुणाशी  भांडतो  कशासाठी  भांडतोय , हे  हत्तीच्या लक्षात आले  नाही, शिवाय ऊंदाराचे  तर  कामच  आहे  कुरापतीं  करणे,  आपन  तिकडे  लक्ष  न  देता  त्याच्याकडे   दुर्लक्ष  करूण  आपन  ऊंदराला  हरवु  शकतो हेही  हत्ती  विसरला,  ऊंदीर  आपल्याला  आपल्या  ऊद्देशापासुन  लांब  नेतोय  हे  पण  हत्तीच्या  ध्यानातच येत  नसते,  आणी  शेवटी  इतका  मोठा  बलाढ्य  हत्ती , ऊंदराच्या  फालतु  गोष्टीमुळे ,  हत्तीने  आपले  डोके  आपटुन  आपदुन आपला  जिव  गमवाला,,  आता  यात  ऊंदराचे काहीच  नुसकान झाले  का ?  नाही,  उलटे  ऊंदाराने  चागले स्वतःच  मनोरंजन करून  घेतले,  वरून  एका  बलाढ्य  हत्तीला  हरविण्याचा श्रेय  आणी  आनंद  मिळवला ,  हत्ति त्याच्या ताकदीच्या  गर्वाने  झुकवल  आणी बुद्धीने  काम करण थांबवल,  जर  वेळीच त्याने  विचार  केला  असता , आणी त्याप्रमाणे  वागला असता, तर  अस कोणही  त्याची  ताकद  आणी  रागाचा  गैरफायदा घेतला  नसता,,,,,

तात्पर्य,,,,,
   समाजात  पण  असच  होत  असत,  एकदा  का  कळाल  की  आपन गरम डोक्याचे आहात  आणी  रागा  मध्ये  भान  विसरून जातो,  तेव्हा छोटा ऊंदीर ही  आपला  नाश  करु  शकतो,,,,,,,                                     शांत रहा आणी  चांगला निर्णय घ्या , आपल्या  जीवनात  विजयी व्हा,,,,,,,

क्षणांचे सोने

(पु.लं.चा अतिसुंदर लेख)

क्षणांचे सोने...

जमिनीला पाठ टेकताच ज्याला गाढ झोप लागते तो या जगातला सर्वांत सुखी माणूस. झोपताना त्याच्या मनावर कालच्या अपयशाचं मळभ किंवा उद्याच्या अपेक्षांचं ओझं नसतं. झोप हा त्याचा वर्तमान असतो आणि त्याचा तो पुरेपूर आनंद मिळवित असतो.

असा शांतपणे झोपणारा माणूस सकाळी लवकर उठतो, आयुष्यातील नव्या दिवसाच्या आगमनानं आनंदी होतो आणि त्या बक्षिसाबद्दल जीवनाप्रती कृतज्ञता व्यक्त करत नव्या उमेदीनं कामाला लागतो.

असा माणूस शेअर्सच्या चढ-उतारांमुळं भयभीत होत नाही, सोन्याच्या भावातील चढ-उतारांमुळं विचलित होत नाही. घरांच्या वाढत्या किंमतीमुळं अस्वस्थ होत नाही.

भावनांच्या घातक चढ-उतारावर टीआरपीचं गणित असणाऱ्या दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांवरील उथळ कार्यक्रमांनी तो भावविवश होत नाही.

त्याच्या घरात ब्लडप्रेशरच्या गोळ्या नसतात, पोट साफ करण्याची चूर्णं नसतात. अंगारे-धुपारे, मंत्र-तंत्र असल्या कर्मकांडात त्याला रस नसतो. तो इमाने इतबारे आपला नोकरीधंदा करतो. बायको-मुलांना नीट सांभाळतो. घरात लक्ष देतो. पाहुण्या-रावळ्यांची देखभाल करतो. बायकोला हवं नको पाहतो. मुलांच्या शाळा-कॉलेजात जाऊन येतो. त्यांची ऍडमिशन-परीक्षा-निकाल साऱ्याचं वेळापत्रक त्याला तोंडपाठ असतं.

त्याला एक मुलगी असली तरी तो खुष असतो. दोन मुली असल्या तरी खुष असतो. एक मुलगा, एक मुलगी असली तरी तो तेवढ्याच आनंदाने जगत असतो.

त्याला राज्यातील, देशातील, जगातील राजकारण, अर्थकारण, समाजकारणाची माहिती असते. पाणीकपात कधी आहे, मेगाब्लॉक कधी आहे, मोठी भरती कधी आहे, भाज्यांचे-डाळीचे भाव काय आहेत हे माहीत असते. या गोष्टींचा तो बभ्रा करीत नाही की त्यांना तो आपल्या व्यक्तिमत्त्वावर स्वार होऊ देत नाही. त्यांना तो समंजसपणे सामोरा जातो...

तो लोकांच्या अडीअडचणीला धावून जातो. लोकांच्या सुखदु:खाशी तो अकृत्रिमपणे समरस होतो.

त्यानं अतिशय नियोजनपूर्वक पै-पैसा साठवून स्वत:चं छोटंसं घर मिळवलेलं असतं. किंवा तेवढ्याच आनंदानं तो पागडीच्या किंवा भाड्याच्या घरात राहात असतो. तो कधी दुसऱ्याच्या सुखाशी आपली तुलना करत नाही, दुसऱ्याच्या यशानं कुढत बसत नाही. नशापाणी करण्याची त्याला गरज वाटत नाही; कारण या लहान-मोठ्या गोष्टीत आनंद घेत तो दिवसभर इतका बिझी असतो की जमिनीला पाठ टेकताच त्याला आपोआप झोप येते.

परिसाच्या शोधात प्रत्येक दगडावर आपल्या हातातलं लोखंड ठोकत फिरणाऱ्यांपैकी तो नसतो; कारण येणाऱ्या प्रत्येक क्षणाचे सोने कसे करायचे हे त्याला ठाऊक असते..!

~ पु. ल. देशपांडे

💐💐💐💐💐💐💐

परिस्थितीची जाणीव

एक राजा आपल्या कुत्र्यासोबत होडीतून जात होता. कुत्रा याआधी कधी होडीत न बसल्याने त्याला हे सगळं नवीन होत. त्यामुळे तो अस्वस्थ होऊन उड्या मारू लागला भुंकू लागला. त्याचा सहप्रवाश्यांना त्रास तर होऊ लागलाच पण होडी चालणारा नावाडी ही हैराण झाला. होडीत अशीच परिस्थिती राहीली तर नाव पलटू शकते. स्वःता तर बूडेन बरोबर सगळ्याना घेऊन बूडेल. राजाच्या लक्षात ही गोष्ट आली तो ही कुत्र्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला पण कुत्रा तो कुत्रा. तो पहील्यापेक्षा जास्त गडबड करू लागला. हे पाहून एक हुशार प्रवासी पुढे आला आणि राजाला विनम्रपणे म्हणाला "महाराज, मला जर परवानगी दिली तर मी या कुत्र्याला गरीब मांजर बनवतो." राजाने होकार देताच त्या प्रवाश्याने तीन चार प्रवाश्यांच्या मदतीने कुत्र्याला उचलले आणि पाण्यात फेकून दिले. कुत्र्याच्या काना तोंडात पाणी शिरू लागले श्वास घेणे मुश्किल झाले. शेवटी जिवाच्या आकांतने नावेचा आधार घेऊन तरंगू लागला. त्याला नावेची गरज लक्षात आली. थोड्या वेळात त्याला ओढून नावेवर घेतले आणि तो चुपचाप एका कोपर्‍यात जाऊन बसला. त्याने हे वर्तन पाहून राजा आश्चर्यचकीत झाला व म्हणाला " पहा. पहिलं किती त्रास देत होता आणि आता भित्र्या मांजरासारखा चुपचाप बसलाय." प्रवाशी हसून म्हणाला " महाराज, जो पर्यंत स्वताःला त्रास होत नाही तो पर्यंत दुसऱ्याच्या त्रासाची कल्पना येत नाही. त्याला जेव्हा पाण्यात फेकले तेव्हा त्याला स्वतःच्या जिवाची काळजी वाटू लागली आणि नावेची गरज."  

Thursday, October 6, 2016

प्रेरक गोष्ट

** प्रेरक गोष्ट **एका राजाने दोन गरुड आणले आणि त्यांना शिकविण्यासाठी माणूसठेवला .काही दिवस गेले . एक गरुड उंच भराऱ्या घेऊ लागला, अगदी बघत रहावे असे .दुसरा मात्र उडेचना.राजा काळजीत पडला ,अगदी सारखे दोन पक्षी एकभरारी घेतोय दुसरा थंड.काय करावे.. काय करावे..?राजाने दवंडी पिटविली,गरुडाला कोणी उडवून दाखवावे म्हणून .दुसऱ्या दिवशी पहाटेसराजा बागेत आला,बघतो तो दुसरा गरुडपहिल्या पेक्षाही उंचगेला होता आणि हवेत सुंदर संथ गिरक्या घेत होता .राजाच्या आश्चर्यास पारावार उरला नाही.हे अजब घडले कसे ?आणि केले तरी कोणी !एक सामान्यसा दिसणारा शेतकरी अदबीने पुढ्यात आला आणि म्हणाला,"महाराज मी केले."राजा : अरे पण कसे ?शेतकरी : मी फक्त तो गरुड ज्यावर बसला होता ती फांदी कापली,दुसऱ्या क्षणी तो आकाशात झेपावला. बाकी तुम्ही बघत आहातच.****तात्पर्य :आपली फांदी कधीतरी सोडून बघा.सतत सुखद मर्यादित कवचांमध्ये स्वतःला गुरफटवून ठेवू नका.कदाचित बाहेर अधिक सुंदरखुले समृद्ध आकाश तुमची वाट बघत असेल.Change ur thought.....May change ur life...."विचार बदला, आयुष्य बदलेल !!!"

बंद मूठ

*बंद मूठ*
*प्रवीण दवणे*
भाच्यानं अभावितपणे प्रश्न केला, *"मामा, छोट्या छोट्या बाळांच्या मुठी गच्च वळलेल्या का रे असतात? काय लपवलेलं असतं त्यांनी आपल्या हातात?"*
आतापर्यंत इतक्या जणांची कित्येक बाळं पहिली. त्या सर्वांच्या बाळमुठी वळलेल्या होत्या; पण हा प्रश्न मला कधीच पडलेला नव्हता. छोट्या रुचिरला मात्र मात्र तो पडला. बहीण म्हणाली, "कालपासनं मला विचारून भांडावलंय, म्हणून मी तुझ्याकडे पाठवलंय. दे आता उत्तर! शेजारच्या घरात नवं बाळ आलंय - स्वारीनं पाहिलं आणि हेच विचारतोय!"
भाच्यानं माझा चांगलाच 'मामा' केला होता; पण त्याला देण्यासाठी एका उत्तराचा विचार करताना नवाच विचार तरारून आला. म्हटलं, *"अरे, देवाच्या घरून जेंव्हा बाळ येतं ना पृथ्वीवर, तेंव्हा देव प्रत्येकाच्या हातात एकेक नवी गंमत देतो न् म्हणतो, याच्या साहाय्याने स्वतः आनंद घे आणि जगाला आनंद दे. बघ, कुणाच्या हातात सुरेल गळ्याचा खाऊ, कुणाला तबला वाजवण्याची कला, कुणाच्या हाती उत्तम भाषणाची कुवत, कुणाला खेळाचा छंद, कुणाला झाडंच लावण्याची आवड, कुणाला कवितेचे पंख! एक ना दोन! जितके हात, तितक्या प्रकारचा खाऊ देवाकडे आहे, बेटा! देव म्हणतो, ही कला देतोय - मूठ घट्ट कर व पृथ्वीवर जा. हळूच उघडून बघ नि ओळख, स्वतःकडे कुठली कला आहे ते!"*
"म्हणजे सर्वांकडे एखादी कला असतेच?"
*"परमेश्वर कुणालाच मोकळ्या हाताने पाठवीत नाही. शहाण्या मुलांना वेळीच कळतं न् ते त्या कलेच्या, छंदाच्या सोबतीनं सारं जग आनंदी करतात!"*
"अस्सं! माझ्याही हातात कलेचा खाऊ दिला असणारच देवानं!"
"निश्चितच. चल आत्तापासून स्वतःत कुठली कला, कुठली क्षमता आहे हे शोधायला सुरुवात कर!"
*आपल्याही भोवती असे पुतणे, भाचे असतीलच! त्यांच्या बंद मुठीतल्या क्षमतांचं भान देणारे मामा - काका - आई - बाबा होता येणं हीही कलाच! मूठ उघडून बघा तरी...*

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...