Pages

Friday, October 7, 2016

कुरापती उंदीर

कुरापती  उंदीर।                        

एका  ठिकाणी एक मोठा  हत्ती शांतपणे  बसलेला असतो, तेवढयात  एक कुरापती ऊंदराला हत्तीला  चिडवयाचि  हुक्की  येते , तो आपल्या  बिळातुन  येऊन  तो हत्तीला  त्रास देवू  लागतो,  सुरवातीला  हत्ती  दुर्लक्ष  करतो,  पण  नंतर  ऊंदीराला  मजा येवू  लागते,  हत्तीला  त्रास  देण्यात,  हत्ती  जागेवरुन  ऊठतो आणी  ऊंदराला  मारण्या  साठी  त्याच्या  बिळाच्चा  दिशेने   आपल्या  डोक्याने टक्कर  मारू  लागतो,  ऊंदीर  आत  असल्याने ऊंदराला  काहीच  फरक पडत नाही, तो  परत  दुसरी  कडुन त्रास  देत  राहतो,  कारण ऊंदराला  पक्क  माहीत  होत  की  हा  हत्ती  प्रंचड ताकदवर  आहे, तसाच  त्याचा  राग  ही  प्रंचड आहे,  पण  तरीही  तो  आपनास  हरवु  शकत  नाही  ,  कारण  त्याचा  राग  आणी  अतिऊत्साऊ  पणाच त्याला  नडेल,  जितका  ऊंदीर  त्रास  देऊ  लागला,  तितका  हत्तीचा  राग अजुन  वाढु  लागला ,  आणी  आपन कुणाशी  भांडतो  कशासाठी  भांडतोय , हे  हत्तीच्या लक्षात आले  नाही, शिवाय ऊंदाराचे  तर  कामच  आहे  कुरापतीं  करणे,  आपन  तिकडे  लक्ष  न  देता  त्याच्याकडे   दुर्लक्ष  करूण  आपन  ऊंदराला  हरवु  शकतो हेही  हत्ती  विसरला,  ऊंदीर  आपल्याला  आपल्या  ऊद्देशापासुन  लांब  नेतोय  हे  पण  हत्तीच्या  ध्यानातच येत  नसते,  आणी  शेवटी  इतका  मोठा  बलाढ्य  हत्ती , ऊंदराच्या  फालतु  गोष्टीमुळे ,  हत्तीने  आपले  डोके  आपटुन  आपदुन आपला  जिव  गमवाला,,  आता  यात  ऊंदराचे काहीच  नुसकान झाले  का ?  नाही,  उलटे  ऊंदाराने  चागले स्वतःच  मनोरंजन करून  घेतले,  वरून  एका  बलाढ्य  हत्तीला  हरविण्याचा श्रेय  आणी  आनंद  मिळवला ,  हत्ति त्याच्या ताकदीच्या  गर्वाने  झुकवल  आणी बुद्धीने  काम करण थांबवल,  जर  वेळीच त्याने  विचार  केला  असता , आणी त्याप्रमाणे  वागला असता, तर  अस कोणही  त्याची  ताकद  आणी  रागाचा  गैरफायदा घेतला  नसता,,,,,

तात्पर्य,,,,,
   समाजात  पण  असच  होत  असत,  एकदा  का  कळाल  की  आपन गरम डोक्याचे आहात  आणी  रागा  मध्ये  भान  विसरून जातो,  तेव्हा छोटा ऊंदीर ही  आपला  नाश  करु  शकतो,,,,,,,                                     शांत रहा आणी  चांगला निर्णय घ्या , आपल्या  जीवनात  विजयी व्हा,,,,,,,

क्षणांचे सोने

(पु.लं.चा अतिसुंदर लेख)

क्षणांचे सोने...

जमिनीला पाठ टेकताच ज्याला गाढ झोप लागते तो या जगातला सर्वांत सुखी माणूस. झोपताना त्याच्या मनावर कालच्या अपयशाचं मळभ किंवा उद्याच्या अपेक्षांचं ओझं नसतं. झोप हा त्याचा वर्तमान असतो आणि त्याचा तो पुरेपूर आनंद मिळवित असतो.

असा शांतपणे झोपणारा माणूस सकाळी लवकर उठतो, आयुष्यातील नव्या दिवसाच्या आगमनानं आनंदी होतो आणि त्या बक्षिसाबद्दल जीवनाप्रती कृतज्ञता व्यक्त करत नव्या उमेदीनं कामाला लागतो.

असा माणूस शेअर्सच्या चढ-उतारांमुळं भयभीत होत नाही, सोन्याच्या भावातील चढ-उतारांमुळं विचलित होत नाही. घरांच्या वाढत्या किंमतीमुळं अस्वस्थ होत नाही.

भावनांच्या घातक चढ-उतारावर टीआरपीचं गणित असणाऱ्या दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांवरील उथळ कार्यक्रमांनी तो भावविवश होत नाही.

त्याच्या घरात ब्लडप्रेशरच्या गोळ्या नसतात, पोट साफ करण्याची चूर्णं नसतात. अंगारे-धुपारे, मंत्र-तंत्र असल्या कर्मकांडात त्याला रस नसतो. तो इमाने इतबारे आपला नोकरीधंदा करतो. बायको-मुलांना नीट सांभाळतो. घरात लक्ष देतो. पाहुण्या-रावळ्यांची देखभाल करतो. बायकोला हवं नको पाहतो. मुलांच्या शाळा-कॉलेजात जाऊन येतो. त्यांची ऍडमिशन-परीक्षा-निकाल साऱ्याचं वेळापत्रक त्याला तोंडपाठ असतं.

त्याला एक मुलगी असली तरी तो खुष असतो. दोन मुली असल्या तरी खुष असतो. एक मुलगा, एक मुलगी असली तरी तो तेवढ्याच आनंदाने जगत असतो.

त्याला राज्यातील, देशातील, जगातील राजकारण, अर्थकारण, समाजकारणाची माहिती असते. पाणीकपात कधी आहे, मेगाब्लॉक कधी आहे, मोठी भरती कधी आहे, भाज्यांचे-डाळीचे भाव काय आहेत हे माहीत असते. या गोष्टींचा तो बभ्रा करीत नाही की त्यांना तो आपल्या व्यक्तिमत्त्वावर स्वार होऊ देत नाही. त्यांना तो समंजसपणे सामोरा जातो...

तो लोकांच्या अडीअडचणीला धावून जातो. लोकांच्या सुखदु:खाशी तो अकृत्रिमपणे समरस होतो.

त्यानं अतिशय नियोजनपूर्वक पै-पैसा साठवून स्वत:चं छोटंसं घर मिळवलेलं असतं. किंवा तेवढ्याच आनंदानं तो पागडीच्या किंवा भाड्याच्या घरात राहात असतो. तो कधी दुसऱ्याच्या सुखाशी आपली तुलना करत नाही, दुसऱ्याच्या यशानं कुढत बसत नाही. नशापाणी करण्याची त्याला गरज वाटत नाही; कारण या लहान-मोठ्या गोष्टीत आनंद घेत तो दिवसभर इतका बिझी असतो की जमिनीला पाठ टेकताच त्याला आपोआप झोप येते.

परिसाच्या शोधात प्रत्येक दगडावर आपल्या हातातलं लोखंड ठोकत फिरणाऱ्यांपैकी तो नसतो; कारण येणाऱ्या प्रत्येक क्षणाचे सोने कसे करायचे हे त्याला ठाऊक असते..!

~ पु. ल. देशपांडे

💐💐💐💐💐💐💐

परिस्थितीची जाणीव

एक राजा आपल्या कुत्र्यासोबत होडीतून जात होता. कुत्रा याआधी कधी होडीत न बसल्याने त्याला हे सगळं नवीन होत. त्यामुळे तो अस्वस्थ होऊन उड्या मारू लागला भुंकू लागला. त्याचा सहप्रवाश्यांना त्रास तर होऊ लागलाच पण होडी चालणारा नावाडी ही हैराण झाला. होडीत अशीच परिस्थिती राहीली तर नाव पलटू शकते. स्वःता तर बूडेन बरोबर सगळ्याना घेऊन बूडेल. राजाच्या लक्षात ही गोष्ट आली तो ही कुत्र्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला पण कुत्रा तो कुत्रा. तो पहील्यापेक्षा जास्त गडबड करू लागला. हे पाहून एक हुशार प्रवासी पुढे आला आणि राजाला विनम्रपणे म्हणाला "महाराज, मला जर परवानगी दिली तर मी या कुत्र्याला गरीब मांजर बनवतो." राजाने होकार देताच त्या प्रवाश्याने तीन चार प्रवाश्यांच्या मदतीने कुत्र्याला उचलले आणि पाण्यात फेकून दिले. कुत्र्याच्या काना तोंडात पाणी शिरू लागले श्वास घेणे मुश्किल झाले. शेवटी जिवाच्या आकांतने नावेचा आधार घेऊन तरंगू लागला. त्याला नावेची गरज लक्षात आली. थोड्या वेळात त्याला ओढून नावेवर घेतले आणि तो चुपचाप एका कोपर्‍यात जाऊन बसला. त्याने हे वर्तन पाहून राजा आश्चर्यचकीत झाला व म्हणाला " पहा. पहिलं किती त्रास देत होता आणि आता भित्र्या मांजरासारखा चुपचाप बसलाय." प्रवाशी हसून म्हणाला " महाराज, जो पर्यंत स्वताःला त्रास होत नाही तो पर्यंत दुसऱ्याच्या त्रासाची कल्पना येत नाही. त्याला जेव्हा पाण्यात फेकले तेव्हा त्याला स्वतःच्या जिवाची काळजी वाटू लागली आणि नावेची गरज."  

Thursday, October 6, 2016

प्रेरक गोष्ट

** प्रेरक गोष्ट **एका राजाने दोन गरुड आणले आणि त्यांना शिकविण्यासाठी माणूसठेवला .काही दिवस गेले . एक गरुड उंच भराऱ्या घेऊ लागला, अगदी बघत रहावे असे .दुसरा मात्र उडेचना.राजा काळजीत पडला ,अगदी सारखे दोन पक्षी एकभरारी घेतोय दुसरा थंड.काय करावे.. काय करावे..?राजाने दवंडी पिटविली,गरुडाला कोणी उडवून दाखवावे म्हणून .दुसऱ्या दिवशी पहाटेसराजा बागेत आला,बघतो तो दुसरा गरुडपहिल्या पेक्षाही उंचगेला होता आणि हवेत सुंदर संथ गिरक्या घेत होता .राजाच्या आश्चर्यास पारावार उरला नाही.हे अजब घडले कसे ?आणि केले तरी कोणी !एक सामान्यसा दिसणारा शेतकरी अदबीने पुढ्यात आला आणि म्हणाला,"महाराज मी केले."राजा : अरे पण कसे ?शेतकरी : मी फक्त तो गरुड ज्यावर बसला होता ती फांदी कापली,दुसऱ्या क्षणी तो आकाशात झेपावला. बाकी तुम्ही बघत आहातच.****तात्पर्य :आपली फांदी कधीतरी सोडून बघा.सतत सुखद मर्यादित कवचांमध्ये स्वतःला गुरफटवून ठेवू नका.कदाचित बाहेर अधिक सुंदरखुले समृद्ध आकाश तुमची वाट बघत असेल.Change ur thought.....May change ur life...."विचार बदला, आयुष्य बदलेल !!!"

बंद मूठ

*बंद मूठ*
*प्रवीण दवणे*
भाच्यानं अभावितपणे प्रश्न केला, *"मामा, छोट्या छोट्या बाळांच्या मुठी गच्च वळलेल्या का रे असतात? काय लपवलेलं असतं त्यांनी आपल्या हातात?"*
आतापर्यंत इतक्या जणांची कित्येक बाळं पहिली. त्या सर्वांच्या बाळमुठी वळलेल्या होत्या; पण हा प्रश्न मला कधीच पडलेला नव्हता. छोट्या रुचिरला मात्र मात्र तो पडला. बहीण म्हणाली, "कालपासनं मला विचारून भांडावलंय, म्हणून मी तुझ्याकडे पाठवलंय. दे आता उत्तर! शेजारच्या घरात नवं बाळ आलंय - स्वारीनं पाहिलं आणि हेच विचारतोय!"
भाच्यानं माझा चांगलाच 'मामा' केला होता; पण त्याला देण्यासाठी एका उत्तराचा विचार करताना नवाच विचार तरारून आला. म्हटलं, *"अरे, देवाच्या घरून जेंव्हा बाळ येतं ना पृथ्वीवर, तेंव्हा देव प्रत्येकाच्या हातात एकेक नवी गंमत देतो न् म्हणतो, याच्या साहाय्याने स्वतः आनंद घे आणि जगाला आनंद दे. बघ, कुणाच्या हातात सुरेल गळ्याचा खाऊ, कुणाला तबला वाजवण्याची कला, कुणाच्या हाती उत्तम भाषणाची कुवत, कुणाला खेळाचा छंद, कुणाला झाडंच लावण्याची आवड, कुणाला कवितेचे पंख! एक ना दोन! जितके हात, तितक्या प्रकारचा खाऊ देवाकडे आहे, बेटा! देव म्हणतो, ही कला देतोय - मूठ घट्ट कर व पृथ्वीवर जा. हळूच उघडून बघ नि ओळख, स्वतःकडे कुठली कला आहे ते!"*
"म्हणजे सर्वांकडे एखादी कला असतेच?"
*"परमेश्वर कुणालाच मोकळ्या हाताने पाठवीत नाही. शहाण्या मुलांना वेळीच कळतं न् ते त्या कलेच्या, छंदाच्या सोबतीनं सारं जग आनंदी करतात!"*
"अस्सं! माझ्याही हातात कलेचा खाऊ दिला असणारच देवानं!"
"निश्चितच. चल आत्तापासून स्वतःत कुठली कला, कुठली क्षमता आहे हे शोधायला सुरुवात कर!"
*आपल्याही भोवती असे पुतणे, भाचे असतीलच! त्यांच्या बंद मुठीतल्या क्षमतांचं भान देणारे मामा - काका - आई - बाबा होता येणं हीही कलाच! मूठ उघडून बघा तरी...*

Wednesday, October 5, 2016

ज्ञानरचनावाद - संपूर्ण संकल्पना

https://drive.google.com/file/d/0B3HCa04kgm8jOGZROGRhT1JKZmc/view?usp=इगdrivesdk

शालेय नवोपक्रम

*शालेय नवोपक्रम*


नवोपक्रम व्याख्या

📚📚📚📚📚📚📚

पारंपारीक पद्धतीपेक्षा वेगळा, नाविण्यपूर्ण मार्ग वापरून केलेला सर्जनशिल उपक्रम म्हणजे नवोपक्रम होय

☘☘☘☘☘☘☘☘

नवोपक्रम कशासाठी?

 📚वेगळ्या वाटेने चालणार्‍या, आगळा वेगळा विचार करणार्‍या शिक्षकांना आपले विचार कृतीत आणण्याकरीता संधी मिळते

📚विद्यार्थांच्या गुणवत्तेबाबत निर्माण झालेली समस्या स्व—प्रयत्नाने उपाय शोधण्याचा प्रयत्न करण्यासाठी.

📚 धडपडणार्‍या व उत्कृष्टतेचा ध्यास असनार्‍या  शिक्षकाने सातत्याने  स्व—प्रेरना मिळवित राहण्याकरीता

💐💐💐💐💐💐💐💐

नवोपक्रम करणार्‍या शिक्षकाच्या अंगी कोणते गुण असावेत

👇🏾👇🏾

♨कल्पकता♨चिकाटी

♨ सर्जनशीलता♨सकारात्मक दृष्टीकोण♨चिकीत्सक♨स्वयंप्रेरणा

🌴🌴🌴🌴🌴🌴

नवोपक्रम निकष📝📝

👇🏾👇🏾

१)नवीनता


अ)कालसापेक्ष नवीनता

ब)स्थलसापेक्ष नवीनता

क)व्यक्तीसापेक्ष नवीनता


२)यशस्वीता


३)उपयुक्तता

❇❇❇❇❇❇❇❇❇


नवोपक्रम कार्यवाही टप्पे

👇🏾👇🏾👇🏾

१)समस्यांची यादी.


२)कारणे.


३)शीर्षक.


४)उद्दिष्टे.


५)नियोजन.


६)कार्यवाही.


७)माहितीचे संकलन.


 ८)यशस्वीता.

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻


नवोपक्रम अहवाल लेखनाची मुद्दे

👇🏾👇🏾

१)शीर्षक

२)नवोपक्रमाची माझी गरज

३)नवोपक्रमाची माझी उद्दिष्टे

४)नवोपक्रमाचे नियोजन

५)उपक्रमाची कार्यवाही

६)यशस्वीता

७)समारोप

८)संदर्भग्रंथ व परिशिष्टे

९)अहवाल लेखनाचे फायदे

📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚

नवोपक्रम यादी 👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾➖➖➖➖➖➖➖

१.जो दिनांक तो पाढा

२.पेपरलेस प्रशासन

३.शब्द संग्रह वाढवणे

४.प्रोजेक्ट ई लर्निंग

५. बोलीभाषेतून प्रमाणभाषेकडे

६.   दिवस नवा, भाषा नवी

७ पर्याप्त साधनांतून स्वंयप्रेरणेतून शब्द व वाक्य निर्मिती


८.  माझी कविता / विद्यार्थी काव्य संग्रह

९.  सू्र्यमालेचे अभिनव निरीक्षण

१०.  बोलीभाषेतून शब्दकोश निर्मिती

११.. गणित विषयातील संबोध संकल्पना रुजवणूक करणे

१२रद्दीतुन ग्रथालय

१३. एक तास राष्ट्रासाठी

१४.  भाषिक प्रयोगशाला

१५.  पर्यावरण संरक्षक दल

१६. सौरऊर्जा जागरुकता व वापर

१७.  विषय खोली

१८. आम्ही स्वच्छता दूत

१९  तंबाखु मुक्त शाळा

१७.  प्लास्टिक मुक्त शाळा

२०.  विज्ञान भवन

२१.  मैत्री अंकाची , संख्यांची

२२.  आदर्श परिपाठातून नैतिक मूल्य संवर्धन करणे

२३.  एक दिवस गावासाठी, समाजाकरीता

२४  विषय कोपरा - प्रभावी माध्यम

२५.  विशेष विद्यार्थी कोपरा

२६  पुस्तक भिशी

२७.  शालेय व वैयक्तिक स्वच्छता संकल्प

२८.  स्वच्छता  दूत

२९.  राष्ट्रीय महापुरुषांची यशोगाथा.

३१.  हरित शाळा.

३२.  प्रदूषण हटवा अभियान राबवणे

३३.  चालता बोलता प्रश्न मंजुशा घेणे.

३४. माझा मित्र परिवार

३५. माझे पूर्व ज्ञान

३६. शब्दगंगा

३७. कौन बनेगा ज्ञानपती

३८. वर्ड पॉट

३९.सुंदर हस्ताक्षर मोहिम

४०.  संख्यावरील क्रिया - एक छंद

४१.  प्रश्नमंजूषा

४२.  विविध स्पर्धांतून व्यक्तिमत्व विकास

४३.  बालआनंद मेळावे

४४.  सातत्य पूर्ण उपस्थिती

४५.  पुस्तक जत्रा

४६.  फन एंड लर्न

४७.  शंकापेटी

४८. स्वयंपूर्ण विद्यार्थी शोध

४९.  रोपवाटिका निर्मिती

५०. एक तास इंटरनेट

५१  गांडूळ खत निर्मिती

५२  आजचा  बेस्ट मुलगा

५३.  एक तास मुक्त अभ्यास

५४. समस्या व सूचना पेटी

५५. किशोरवयीन मुलींचे शिक्षण

५६.  लोकसंख्या शिक्षण

५७.  स्वच्छ शाळा, सुंदर गाव

५८.  वाचाल तर वाचाल

५९.  बिखरे मोती

६०. पुस्तका करीता एक दिवस

६१.  गावातील विशेष व्यक्तींच्या मुलाखती.

६२.  बालसभा आयोजन

६३.  माझ्या गावचा इतिहास

६४.  परिसरातील भूरुपांची ओळख

६५.  विविध शिबीरांतून विविध प्रकारची यादी करणे.

६६.औपचारीक गप्पा

६७.कथालेखन

६८.कविता लेखन

६९.वाढदिवस ,दिनविशेष च्या माध्यमातुन नैतिक मुल्य रुजवणे

७०.परीसरातील बिया गोळा करणे

७१.अप्रगत करीता ओंजळीणे ग्लास भरणे

७२.प्राण्यांची यादी तयार करणे

७३. बाजार भेट

७४. दुकानातील, बाजारातील,ई. वस्तुंची यादी तयार करणे

७५. टाकावू पासुन टिकावू वस्तु तयार करणे

७६. नाणी नोटांचा संग्रह करणे

७७.एक झाड लावू मिञा.

७८.आपले सण आपली झाडे

७९.मनोरंजनात्मक खेळ

८०.सांस्कृतीक कार्यक्रम

८१.माता प्रबोधन

८२.आनंद दायी शिक्षण

८३.बालमंद्वारे व्यक्तीमत्व विकास

८४.औषधी वनस्पतीची ओळख

८५.गितांचा संग्रह करणे.

८६.निबंध स्पर्धा

८७.वत्तृत्व स्पर्धा

८८.निसर्गातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा संग्रह करणे

८९.कागदी पिशव्या तयार करणे

९०.शोभिवंत झाडाच्या कुंड्या तयार करणे.

सत्याचे प्रयोग (अात्मकथा) - महात्मा गांधी

https://drive.google.com/file/d/0B3HCa04kgm8jb2Z6ek40TmR3R28/view?usp=drivesdk

प्रगत शाळेनंतर पुढे काय.....?

*प्रगत शाळेनंतर पुढे काय............?*
*आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा करण्याची  प्रत्येक जिल्ह्यतील शंभर शाळाना संधी*
मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, श्री नंदकुमार साहेब यांची राज्य आंग्लभाषा अध्यापन संस्थेस भेट देऊन आता शाळाना आंतरराष्ट्रीय होण्याची संधी देणार असल्याचे सांगितले.
1) महाराष्ट्रातील शाळांनी देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे जाण्याची इच्छा बाळगावी व ही क्षमता महाराष्ट्रातील शाळांमध्ये असल्याचा विश्वास. दर्जा सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्रातील शाळांनी PISA, PULSE व STEAM यासारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन त्यात महाराष्ट्रातील विद्यार्थी चमकावेत.
2) आंतरराष्ट्रीय स्पर्धा करीत असतांना पहिल्या दहा क्रमांकामध्ये शाळा आणण्याचे ध्येय उराशी बाळगण्याचे आवाहन. हिमाचल प्रदेश व तामिळनाडू यांनी या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन ७४ वा क्रमांक मिळविला असल्याचे प्रतिपादन. महाराष्ट्राने आंतरराष्ट्रीय दर्जाची योग्यता संपादन करण्याचे आवाहन.
3) काही मुठभर विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यापेक्षा सर्व विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण कसे देता येईल यावर विचार करण्याचे आव्हान. गुणवत्तापूर्ण शिक्षण हा सर्व बालकांचा अधिकार असल्याचे प्रतिपादन.
4) CSR च्या माध्यमातून शाळा आंतरराष्ट्रीय करण्याची दूरदृष्टी मा.नंदकुमार साहेबांनी दिली. आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या विदेशी शाळांचा अभ्यास होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन. आंतरराष्ट्रीय स्पर्धा करण्यासाठी अधिक पटांच्या शाळांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन गुणवत्ता सिद्ध करण्याचे आवाहन.
5) राज्य आंग्लभाषा अध्यापन संस्था राबवीत असलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती मा.नंदकुमार साहेबांनी घेतली. विद्यार्थ्यांना अभिव्यक्तीमध्ये मदत होण्यासाठी मराठी-इंग्रजी शब्दकोषाच्या वापरास प्रोत्साहन देण्याची सुचना. संस्था राबवीत असलेल्या Spoken English project च्या यशाबद्दल मा. नांदकुमार साहेबांनी सर्वांचे अभिनंदन केले. पालकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्व बालकांना इंग्रजीमध्ये आत्मविश्वासाने संभाषण करण्याची क्षमता प्राप्त करून देण्याचा पुनरुच्चार.
6) Continuous Professional Development साठी शिक्षकांच्या कार्यगटांची (Teachers’ Activity Groups) स्थापना व कार्यपद्धती, व यामध्ये ब्रिटीश कौन्सिल व राज्य आंग्लभाषा अध्यापन संस्था यांची भूमिका मा.नंदकुमार साहेबांनी समजून घेतली. TEJAS प्रकल्पांतर्गत TAG मधील विविध कृती,उपक्रम मा.साहेबांनी समजून घेतले व शिक्षकांचा व्यावसायिक विकास शाश्वत कसा होईल व त्याद्वारे विद्यार्थी विकास कसा होईल याकडे लक्ष वेधले.
7) पालकांच्या इंग्रजीबाबत अपेक्षा पूर्तीसाठी विविध उपक्रम व चाचण्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये आत्मविश्वासाने अभिव्यक्त होण्यास कशा मदत करू शकतील याबद्दल विचार करून अंमलबजावणी करण्याची व्हावी
या वेळी बैठकीला मा भाऊसाहेब तुपे शिक्षण  उपसंचालक मा रहीम मोगल शिक्षणाधिकारी प्रा, मा भगवान सोनवणे शिक्षणाधिकारी माध्यमिक,मा MK देशमुख
SIEM मधील सर्व अधिकारी कर्मचारी आणि SARPs उपस्थित होते.
या वेळी siem मार्फत सुरु असलेल्या उपक्रमाचे सादरीकरण डॉ उज्ज्वल करवंदे
यांनी केले
डॉ सुभाष कांबळे
संचालक,राज्य आंग्ल भाषा औरंगाबाद

ज्ञानरचनावाद फरशीवरील फोटो





















Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...