Pages

Pages

Browser Websites

Website Search

Pages

Pages

NAS Question Paper

शिक्षण परिषद

सामान्य ज्ञान

Forts

गोष्टीचा पु्स्तके PDF DOWNLOAD

Cloud Print माहिती

पर्यटन

MSCE PUNE

DOWNLOAD

Physical Game

Video Download

Travel

Cricket Live Score

गाणी Hindi. Mp3. Download

Coronavirus Update

WHO

Travel

Pages

Flights booking

Travel

Education

International Airports Websites

PDF Download

प्रशासन

Online Banking websites

Magazine

Space

Political

Important web

Wednesday, September 6, 2017

ब्रेकथ्रू लिसन प्रकल्प

दूरस्थ दीर्घिकेतून गूढ संदेश मिळाल्याचा दावा



पीटीआय, लंडन | Updated: September 3, 2017 2:54 AM


परग्रहावरील प्रगत जीवसृष्टीचा शोध घेण्याच्या प्रकल्पात तीन अब्ज प्रकाशवर्षे अंतरावरील दीर्घिकेतून गूढ संदेश मिळाले आहेत, असा दावा भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाने केला आहे. स्टीफन हॉकिंग यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात काम करणाऱ्या विशाल गज्जर यांनी दी टेलीग्राफला सांगितले की, हे संदेश नेमके कोठून आले आहेत याची आम्हाला कल्पना नाही. जर कुणाला दुसऱ्या जैव संस्कृतीतील लोकांना टिपता येतील असे संदेश पाठवायचे असतील तर ते तसे करू शकतात पण आताचे संदेश प्रगत जीवसृष्टीकडून आले असतील असे मला वाटत नाही.

संदेशांचे स्रोत पाहिले तर त्यापेक्षा जास्त शक्यता किंवा सिद्धांत या परग्रहावरील जीवसृष्टीबाबत आहेत. आतापर्यंत तरी उत्तरांपेक्षा प्रश्न अधिक आहेत. जितके जास्त खोलात जाऊ तेवढी गुंतागुंत वाढणार आहे. विश्वात कुठेतरी प्रगत जीवसृष्टी असू शकते व ते आपल्या जीवसृष्टीचा शोध घेऊ शकतात असे त्यांनी स्पष्ट केले.

ब्रेकथ्रू लिसन प्रकल्प प्रख्यात विश्वरचनाशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग व रशियाचे अब्जाधीश युरी मिलनर यांनी सुरू केला असून त्यात विश्वाचे सत्य जाणून घेणे व प्रगत जीवसृष्टीचा शोध घेणे हे उद्देश आहेत. आताचे संदेश जिथून आले आहेत ते रेडिओ लहरींच्या स्फोटांचे असून आमची यंत्रणा ठोसपणे काम करीत आहे एवढाच आताच्या संशोधनाचा अर्थ आहे. हे संदेश फिरत्या न्यूट्रॉन ताऱ्याकडून आले असावेत व त्या ताऱ्याचे चुंबकीय क्षेत्र प्रखर असावे. हे संदेश सौरमाला २ अब्ज वर्षांची असताना संबंधित दीर्घिकेतून सुटले व त्यावेळी पृथ्वीवर जीवन नुकतेच आकार घेत होते. सुरुवातीला हा सुपरनोव्हाचा परिणाम असल्याचे सांगण्यात आले होते पण २०१५ व २०१६ मध्ये पुन्हा ते संदेश आल्याने त्याचा स्रोत अजूनही टिकून आहे हे स्पष्ट होत असल्याचा वैज्ञानिकांचा दावा आहे. जास्त कंप्रतेला आताची निरीक्षणे करण्यात आली असून बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या वैज्ञानिक नियतकालिकात या संशोधनाची माहिती प्रसिद्ध होणार आहे.



‘ब्रेकथ्रू लिसन’ प्रकल्प

ब्रेकथ्रू लिसन हा १०० दशलक्ष डॉलर्सचा कार्यक्रम असून तो २०१५ मध्ये हॉकिंग व मिलनर यांनी सुरू केला. त्यात अनेक देशांतील पथके दुर्बिणींच्या मदतीने परग्रहावरील जीवसृष्टीचा शोध घेत आहेत. दहा वर्षांच्या या कार्यक्रमात आपल्या आकाशगंगेच्या दीर्घिका प्रतलातील पृथ्वीजवळच त्या १०००००० ताऱ्यांचा शोध घेतला जाणार आहे. पृथ्वीबाहेर जीवसृष्टी शोधण्याचा हेतू यात आहे, असे स्टीफन हॉकिंग यांनी ही योजना सुरू करताना सांगितले होते.

No comments:

Post a Comment